Saturday, 16 February 2013

'Allot more private contractors for cleanliness, security in schools'

'Allot more private contractors for cleanliness, security in schools': The environment cell of Maharashtra Navnirman Sena (MNS) has demanded that the contractor who is responsible for maintaining cleanliness and security at the 153 municipal primary and secondary schools must be blacklisted for not providing the services and violating the terms and conditions of the contract.

महापालिका इमारतही "इको फ्रेंडली' होणार

महापालिका इमारतही "इको फ्रेंडली' होणार पिंपरी - नेहरूनगर रस्त्यालगतच्या बंद असलेल्या महेंद्र कंपनीच्या जागेत पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी प्रशस्त पर्यावरणपूरक (इको फ्रेंडली) इमारत बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. औद्योगिक क्षेत्राचे निवासीमध्ये परिवर्तन (आयटूआर) करताना महापालिकेला मिळालेल्या सहा एकर जागेवर हे संकुल उभारण्याचा विचार सुरू आहे. 

प्राधिकरण कार्यालयाच्या "इको फ्रेंडली' इमारतीचे उद्‌घाटन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 8) झाले. आता पिंपरी-चिंचवड महापालिकाही भविष्यातील गरज म्हणून कार्यालयाची नवीन इमारत बांधण्याच्या तयारीत आहे. 

पिंपरीत महापौरांच्या चालकाला दंड

पिंपरीत महापौरांच्या चालकाला दंडपिंपरी - महापौर आणि शिक्षण मंडळाचे सभापती यांच्यासह महापालिकेच्या सहा अधिकाऱ्यांच्या मोटारींच्या काचांना लावलेल्या काळ्या फिल्म वाहतूक पोलिसांनी गुरुवारी काढून टाकल्या. तसेच नियमभंगाबद्दल या मोटारींच्या चालकांना प्रत्येकी शंभर रुपये दंडही केला. वाहनांना काळ्या काचा लावल्याबद्दल एरव्ही सर्वसामान्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी आपला मोर्चा सरकारी कार्यालये आणि अधिकाऱ्यांकडे वळविल्याने जनसामान्यांनी या मोहिमेचे स्वागत केले. महापौर मोहिनी लांडे यांनी मात्र आपल्या शासकीय वाहनावर अशी कारवाई झाल्याचा इन्कार केला. 
पिंपरीत महापौरांच्या चालकाला दंड

CCTV cameras at water treatment plants

CCTV cameras at water treatment plants: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will soon be installing CCTV cameras worth Rs 1.32 crore at the water treatment plants in sector 23 of Nigdi-Pradhikaran for better vigilance.

पिंपरीत जगतापांची शाही पंगत

पिंपरीत जगतापांची शाही पंगत: राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता समारंभ प्रदर्शनावरील पैशाच्या उधळपट्टीवर नियंत्रण असावे, या नेत्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न आमदार लक्ष्मण जगताप यांनी मात्र वाढदिवसानिमित्त शाही मेजवानीचा शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) थाट मांडला.

२0, २१ फेब्रुवारीला रिक्षा बंदचा निर्णय

२0, २१ फेब्रुवारीला रिक्षा बंदचा निर्णय: पिंपरी । दि. १५ (प्रतिनिधी)

येत्या २0 आणि २१ फेब्रुवारीला रिक्षा चालकांच्या विविध प्रश्नांवर रिक्षा बंद करण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या रिक्षा संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र रिक्षाचालक मालक संघटना कृती समितीच्या वतीने मुंबई येथील मजदूर युनियनच्या कार्यालयात, महाराष्ट्रातील रिक्षाचालक मालक संघटना प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला पुणे येथून महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे बापू भावे, रिक्षा पंचायतचे अमिर शेख, कॅन्टोन्मेंट रिक्षा युनियनचे नूरमोहंमद रंगरेज, राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे प्रदीप रावळे, ठाणे येथील संजय भोळे, कोल्हापूर येथील किशोर पवार, पनवेल रायगड येथील बाळा जगदाळे, थोरात, शंकर साळवी, शशांक राव, रवी राव उपस्थित होते. या वेळी राव यांनी रिक्षाचालकांना सामाजिक सेवेचा दर्जा मिळावा, रिक्षाचालकांना सामाजिक सुरक्षा मिळावी, या प्रमुख मागणीसह इन्शुरन्समध्ये झालेली भरमसाठ वाढ, परमिट धोरण आदी प्रश्नांसाठी संप करण्याचा ठराव मांडला. तो मंजूर करण्यात आला. २0 ते २१ फेब्रुवारीला संप करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

रिक्षा बंदला महाराष्ट्र रिक्षा पंचायतने पाठिंबा दिला असून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व रिक्षा संघटनांनी एकत्र येऊन बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष कांबळे यांनी केले आहे.

आयुक्तांचा ‘धाक’, ४६ स्वेच्छानिवृत्त

आयुक्तांचा ‘धाक’, ४६ स्वेच्छानिवृत्त: पिंपरी । दि. १५ (प्रतिनिधी)

महापालिकेतील ५ अधिकारी व ४१ कर्मचारी गेल्या ९ महिन्यांत स्वेच्छानिवृत्त झाले आहेत. आयुक्त श्रीकर परदेशी यांनी कामकाजात आणलेली शिस्त या सार्‍यांना जाचक वाटल्याची चर्चा आहे. तसेच चौकशीचे कोणतेही लचांड मागे लागण्यापूर्वी नवृत्त झालेले बरे अशी भावनाही त्यामागे असल्याचे बोलले जाते. यातून नवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेले अनेकजण तर एकेक दिवस मोजत आहेत.

आपल्या कार्यपद्धतीने आयुक्तांनी शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे. परंतू, राजकीय पुढार्‍यांसह अनधिकृत बांधकाम धारकांनी त्यांचा धसका घेतला आहे. त्यातच प्रशासकीय कामात आणलेल्या शिस्तीने कामचुकारांची भंबेरी उडाली आहे. वर्षानुवर्षे ठाण मांडून असलेले अधिकारी हैराण झाले आहेत.

२३ मे २0१२ ला परदेशी रुजू झाले. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल ४६ जणांनी स्वेच्छानवृत्ती घेतली आहे. त्यांमध्ये कार्यकारी अभियंता, उपअभियंता, लेखाधिकारी, लिपिक, परिचारिका, मीटर निरीक्षक, मजूर आणि सफाई कामगारांचा समावेश आहे. नवृत्तीसाठी एक वर्षाचा अवधी असतानाही स्वेच्छानवृती घेणार्‍यांचा त्यामध्ये समावेश आहे.

कामकाजात सुसूत्रतेसाठी आयुक्तांनी दहा कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. रुजू होताच पहिल्या टप्प्यात वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठिय्या मारणार्‍यांच्या बदल्या केल्या. नंतर आढावा बैठका, अचानक तपासणी अशी मोहीम राबविल्याने कामचुकार अधिकारी, कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले. त्यातील अनेकांनी महापालिकेला रामराम ठोकला. ज्यांना या कार्यपद्धतीत काम करणे शक्य नाही त्यांनी स्वेच्छा नवृत्तीचा पर्याय अवलंबला आहे.

आर्थिक मंदी अथवा अन्य कारणांमुळे खासगी क्षेत्रातील कामगार स्वेच्छा नवृत्ती घेतात, हे सर्वश्रुत आहे. पण महापालिकेची सुखाची नोकरी असताना स्वेच्छा नवृती घेणार्‍यांचे प्रमाण अचानक वाढल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Basic facilities to illegal structures? PCMC can't decide

Basic facilities to illegal structures? PCMC can't decide: Defers meeting on the subject for 8th time due to absence of civic body chief.The matter was deferred on Tuesday due to absence of PCMC commissioner Dr Shrikar Pardeshi. Earlier too, the PCMC adjourned the issue on similar grounds.

Pimpri-Chichwad:Twin town gets its own tehsil office

Pimpri-Chichwad:Twin town gets its own tehsil office: State approves Pimpri-Chinchwad New Town Development Authority (PCNTDA)old office in Nigdi for the purpose.

No escape for PCMC mayor, education board chief's cars too

No escape for PCMC mayor, education board chief's cars too: Pimpri traffic cops fine 60 vehicles, including seven civic staffers

In 5 days, PCMC removes 123 flexes, 30 hoardings

In 5 days, PCMC removes 123 flexes, 30 hoardings: Intensifying its drive in the twin town, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) officials took action against 123 unauthorised flexes and 30 hoardings in its four zonal wards between February 4 and 8.

पोलीस 'हेल्पलाइन'ला 77 दिवसांत अवघ्या 18 तक्रारी

पोलीस 'हेल्पलाइन'ला 77 दिवसांत अवघ्या 18 तक्रारी
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

वाढदिवसानिमित्त बारणे यांची दुष्काळग्रस्त जनावरांना मदत

वाढदिवसानिमित्त बारणे यांची दुष्काळग्रस्त जनावरांना मदत
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited proposes 1 hike in bus fares

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited proposes 1 hike in bus fares: Commuters travelling by the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) buses need to brace themselves for another hike in fares.

PCMC mayor's car targeted for tinted glasses

PCMC mayor's car targeted for tinted glasses: The official car of Pimpri Chinchwad mayor Mohini Lande was among 253 vehicles targeted by the traffic police on Thursday for the use of tinted glasses.

‘काळा कारभार’ पारदर्शक!

‘काळा कारभार’ पारदर्शक!: - ‘लोकमत’च्या पर्दाफाशनंतर आली जाग
- पिंपरी-चिंचवड महापौर, जिल्हाधिकार्‍यांसह २५३ शासकीय वाहनांवरील काळ्या काचा काढल्या
पुणे। दि. १४ (प्रतिनिधी)

सामान्यांवर कारवाईचा बडगा आणि अधिकारी-राजकारण्यांच्या मोटारीच्या काळ्या काचांकडे डोळेझाक करण्याच्या प्रकाराचा ‘लोकमत’ने पर्दाफाश केल्यानंतर आज पोलिसांनी काळ्या काचा असलेल्या गाड्यांवर कारवाई केली. पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे, जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या मोटारीही या कारवाईतून सुटल्या नाहीत.

अश्लील डीव्हीडींचा धंदा तेजीत

अश्लील डीव्हीडींचा धंदा तेजीत: प्रवीण बिडवे/पराग कुंकुलोळ । दि. १४ (पिंपरी)

मल्टिप्लेक्समध्ये नवीन चित्रपट झळकतो. परंतु, त्याची डीव्हीडी त्याच दिवशी रस्त्यावर विक्रीसाठी येते. तिकिटाच्या निम्म्याहून कमी किमतीत ती मिळते. विशेष म्हणजे तिच्या कव्हरवरच आगामी चित्रपटाची जाहिरातही केली जाते. आंबटशौकिनांचे तर सध्या चांगलेच फावते आहे. पोलिसांचे हात नित्यनेमाने ओले केले जात असल्याने अश्लील चित्रपटांच्या डीव्हीडी विक्रीचा व्यवसाय शहरात भलताच तेजीत आहे. अशा डीव्हीडींची खुलेआम विक्री सुरू राहावी, याची काळजी दस्तुरखुद्द पोलीसच वाहत आहेत. दररोज अशा शेकडो डीव्हीडींची विक्री होत आहे.

पुन्हा उडणार बैलगाडा शर्यतीची धूळ !

पुन्हा उडणार बैलगाडा शर्यतीची धूळ !
पिंपरी, 15 फेब्रुवारी

बैलांना कोणत्याही प्रकारची दुखापत न करण्याच्या अटीवर सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी आज उठवली. न्यायालयाच्या या निर्णयाचे बैलगाडा शर्यतीच्या रसिकांनी स्वागत केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीची धूळ उडणार आहे.

आमदार जगताप यांचे चलो दिल्ली

आमदार जगताप यांचे चलो दिल्ली

प्राधिकरणाने केले 40 लाख कागदपत्रांचे डिजिटायझेशन

प्राधिकरणाने केले 40 लाख कागदपत्रांचे डिजिटायझेशन
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in