That is what lakhs of IT professional working at Hinjewadi IT park feel, when they commute to office everyday. With an idea was to decongest the roads leading to Hinjewadi at peak hours, the city traffic police has banned right turns at all the four ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 28 March 2014
आयुक्त करणार रस्त्यांची पाहणी
पिंपरी : महापालिकेच्या सहा क्षेत्रिय कार्यालयांच्या अखत्यारीत भागाचा आठवडाभराचा पाहणी दौरा नुकताच संपला. स्वच्छतेच्या उपाययोजना कराव्यात, आरोग्याच्या सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना संबंधित अधिकार्यांना देऊन आयुक्त राजीव जाधव यांनी आता शुक्रवारपासून शहरातील प्रमुख रस्त्यांचा पाहणी दौरा करण्याचे नियोजन केले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून, चौकांचे सुशोभिकरण करण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गतिरोधकांवर पांढरे पट्टे
किवळे : किवळे-सांगवी बीआरटी रस्त्यावरील रावेत परिसरात रविवारी झालेल्या विविध तीन अपघातांत दोघे जखमी झाले होते व सहा वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. महापालिकेने नव्याने बनविलेल्या अधिक उंचीच्या गतिरोधकांमुळे अपघात झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने दखल घेत रावेत परिसरातील सर्व गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारले आहेत. तसेच रिफ्लेक्टर बसविले आहेत.
मावळातील 25 उमेदवारी अर्ज वैध ; 1 अवैध
मावळ लोकसभा मतदार संघातील 26 पैकी 25 उमेदवारांचे अर्ज आज छाननीमध्ये वैध ठरले. तर एबी फॉर्म नसल्याने बसपाच्या एका उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला.
मावळ लोकसभा मतदार संघासाठी येत्या 17 एप्रिल रोजी मतदान होत आहे. तत्पूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीमध्ये विविध पक्षांच्या 13 उमेदवारांसह अपक्ष 13 असे एकूण 26 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जांची आज पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात छाननी करण्यात आली.
तुमचे नगरसेवकपदही राहणार नाही
पिंपरी : ‘‘आमदार आणि मंत्रिपद उपभोगलेले डॉ. विजयकुमार गावित यांच्यासारख्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते हे लक्षात घ्या. पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही. पदे देतो, काढूनही घेऊ शकतो. आपला गावीत होऊ नये, याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी. कारण अशा कारवाईसाठी मला कोणाला विचारावे लागत नाही,’’ अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व नगरसेवकांना दिली.
Water shortage at 3,000 households in PCMC
PIMPRI: Over 3,000 households in Pimpri Chinchwad have been facing an acute shortage of water for the last few months.
खासदार निधी खर्च करण्यात गजानन बाबर महाराष्ट्रात अव्वल
"आपण कोणाचे देत नाय अन् कोणाचे घेत नाय" असे सांगणारे खासदार गजानन बाबर यांनी मात्र, आपल्या मतदारसंघाला भरभरुन दिले आहे. खासदार निधीचा पुरेपूर वापर करणा-यांमध्ये बाबर महाराष्ट्रात अव्वल ठरले असून त्यांनी शंभर टक्के निधी खर्ची केला आहे.
भाजप नेते राम नाईक यांनी महाराष्ट्रातील खासदारांच्या कामगिरीविषयी मागविलेल्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे. सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खासदार निधी खर्च करण्यात कसूर करत असल्याचेही त्यातून स्पष्ट झाले आहे. जास्तीत जास्त निधीचा वापर करणा-या खासदारांमध्ये गजानन बाबर यांच्यासह शिवसेनेचे 6, भाजपचे 5 आणि काँग्रेसचे फक्त 4 खासदार आहेत.
‘आप’चे उमेदवार मारुती भापकर यांचा साध्या पद्धतीने अर्ज दाखल
पिंपरी : रिक्षा, बसमधील प्रवाशांशी संवाद साधत साधत महापालिका भवनापर्यंत येऊन अगदी साध्या पद्धतीने आम आदमी पक्षाचे उमेदवार मारुती भापकर यांनी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला.
मोहननगर येथील निवासस्थानापासून सकाळी दहाच्या सुमारास भापकर रिक्षाने चिंचवड स्टेशनला आले. तेथून पीएमपीएल बसमध्ये बसून पिंपरीकडे निघाले. बसमध्ये त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. साडेअकराच्या सुमारास महापालिकेसमोर उतरले. तेथून २५ ते ३0 कार्यकर्त्यांसह चालत प्रवेशद्वारावर आले. कार्यकर्त्यांच्या डोक्यावर ‘मैं आम आदमी हूँ’ लिहिलेल्या गांधी टोप्या दिसत होत्या. निवडक पाच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये नागरी हक्क कृती समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, दिलीप पवार, प्रशांत खाडे, श्रीमंत बोरसे उपस्थित होते.

मतदान जनजागृतीसाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या
मतदान करण्याच्या जनजागृतीसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध संस्था पुढे सरसावल्या असून त्यांचे 25 प्रतिनिधी घरोघरी जाऊन तसेच माहिती पत्रकांव्दारे मतदानाचे आवाहन करणार आहेत.
चिंचवड येथे दोघांकडून बनावट तिकिटे जप्त
चिंचवड येथील आरक्षण केंद्रात छापा टाकून 78 हजार रूपयांची तिकीटे बुधवारी (दि.26) रोजी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास जप्त करण्यात आली. रेल्वे पोलिस उपअधिक्षक ए.के रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
नार्वेकरांकडे 8 कोटी तर भापकरांकडे 36 लाख मालमत्ता
मावळात श्रीरंग बारणे सर्वात श्रीमंत उमेदवार
मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अॅड. राहुल नार्वेकर यांची 8 कोटी 85 लाख रुपये, आम आदमी पक्षाचे उमेदवार मारूती भापकर यांच्याकडे 36 लाख 28 हजार रुपयांची मालमत्ता आहे. अर्ज सादर केलेल्या 26 उमेदवारांमध्ये शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सर्वाधिक श्रीमंत ठरले असून त्यांच्याकडे 52 कोटींची संपत्ती आहे.

दादांच्या भाषणाच्या चाकण विमानतळावरच ‘घिरटय़ा’
मेट्रोपासून मैलापाणी प्रक्रियेपर्यंतची कामे तर आहेतच, पण पुणे आणि पिंपरी-चिंचवडला आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले नाही तर भावी पिढी तुम्हा-आम्हाला माफ करणार नाही, असाच दादांचा सूर होता.
भिरभिरताहेत छोटी हेलिकॉप्टर
संजय माने, पिंपरी
मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज भरतेवेळी बुधवारी महापालिका आवारात झालेल्या गर्दीच्या ठिकाणी ५0 ते ६0 फूट उंचीवर खेळण्यातील हेलिकॉप्टरसारखे छोट्या आकारातील भिरभिणारे ‘कॉडकॉप्टर’ नागरिकांच्या दृष्टिपथास आले. उमेदवारीअर्ज भरण्यासाठी गर्दी झाली असताना, भिरभिरणारे छोटे कॉडकॉप्टर उपस्थितांसाठी कुतूहलाचा विषय ठरले. गर्दीच्या ठिकाणी उंचावरून गर्दीचे छायाचित्रण करून सर्व्हेक्षणाच्या कामात हे ‘कॉडकॉप्टर’ उपयुक्त असल्याने त्यामुळे अशा हायटेक यंत्रणेसाठी खर्च करण्यास उमेदवार तयार होत असल्याची प्रचिती या निमित्ताने आली.

निवडणूक विभाग, पोलिसांची ढिलाई
पिंपरी : निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयाच्या शंभर मीटरच्या आत उमेदवारासह केवळ पाचच लोकांना प्रवेश होता. मात्र, हा निवडणूक आयोगाचा नियम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धाब्यावर बसविला. सोमवारसारखीच परिस्थिती आज होती. निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयातच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठय़ाप्रमाणावर वावरत होते. यातून पोलीस व निवडणूक विभागाची ढिलाई दिसून आली.
सोमवारी शेकापचे उमेदवार लक्ष्मण जग
सोमवारी शेकापचे उमेदवार लक्ष्मण जग
दादांच्या भीतीने पदाधिकारी हजर
पिंपरी : पक्षविरोधी कारवाया केल्यास गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड व मावळमधील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते, प्रमुख पदाधिकार्यांना भरल्याने दादांना आपण दिसावे, यासाठी अनेक कार्यकर्ते आटापिटा करीत होते. दादांच्या भीतीने प्रमुख नेते महापालिकेत सकाळी हजर झाले होते. ते केवळ नेत्यांस दिसावे यासाठी.
पिंपरी व चिंचवड विधानसभेतील राष्ट्रवादीचे महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी, संघटनेचे कार्यकर्ते रात्री ‘भाऊं’कडे, तर दिवसा दादांच्या उमेदवाराकडे अशी दुहेरी भूमिका बजावतात. हे माहिती पडल्याने उपमुख्यमंत्र्यांनी तळेगाव दाभाडेतील सभेत चांगलेच सडकावले होते. तसेच कोणालाही माफी करणार नाही, असा सज्जड दम भरला होता. मात्र, जगतापांविषयी कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. त्यामुळे अजूनही भाऊ आणि दादांना न दुखावण्याची कसरत राष्ट्रवादीतील कार्यकर्ते करीत आहेत. सोमवारी जगतापांनी अर्ज दाखल केला. त्या वेळी काही पदाधिकारी प्रत्यक्षपणे, तर काही अप्रत्यक्षपणे काम करीत होते. चिंचवडच्या काही नगरसेवकांनी थेट निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयात भाऊंना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, माध्यमांनी छेडल्यानंतर ‘तो मी नव्हेच’ ही भूमिका घेतली होती, तर मावळातील काही पदाधिकारी वाहनतळात गाडीमध्ये थांबले होते.

तीन लक्ष्मण जगताप, २ श्रीरंग बारणे!
पिंपरी : नावात साधम्र्य असलेल्या व्यक्ती निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर काही प्रमाणात का होईना मतांचे विभाजन होते. मावळ लोकसभा मतदार संघात नेमकी हीच खेळी खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या नावाशी साधम्र्य असलेल्या दोन व्यक्तींनी अपक्ष उमेदवारीअर्ज दाखल केला आहे, तर महायुतीचे श्रीरंग बारणे यांच्या नावाशी साधम्र्य असलेल्या एकाने अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी लक्ष्मण जगताप नावाचे तीन आणि श्रीरंग बारणे नावाचे दोन अर्ज दाखल झाले आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)