Saturday, 11 April 2020

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग उभारावा, महापालिकेचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्दी, ताप, खोकला असणा-या रुग्णांची तपासणी करण्यासाठी महापालिका हद्दीतील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग उभारावा. रुग्णालया बाहेरिल स्वतंत्र मोकळ्या हवेशीर ठिकाणी वेगळा विभाग करुन  रुग्णांची तपासणी करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. फ्लूसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. यासाठी महापालिकेच्या दवाखाने […] 

आणखी तीन बाधित ः 9 दिवसांत 14 जणांना लागण

दिल्लीहून आलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींना होतेय बाधा
पिंपरी, (प्रतिनिधी) -“करोना’चा प्रादुर्भाव दिवसें-दिवस वाढतच असून शुक्रवारी सायंकाळी हाती आलेल्या अहवालानुसार पिंपरी-चिंचवडमधील आणखी तीन जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये करोनाचे नवे 14 रुग्ण आढळले आहेत. यामुळे शहरातील शुक्रवार सायंकाळपर्यत करोना बाधितांचा आकडा 26 वर जाऊन पोहचला आहे. त्यापैकी सुरुवातीच्या बारा जणांना बरे झाल्यामुहे डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. सध्या शहरातील रुग्णालयांमध्ये “करोना’चे 14 रुग्ण उपचार घेत आहे.b

कोरोनाची माहिती देण्यासाठी डॉ. वर्षा डांगे यांची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कोरोना रुग्णांसंदर्भातील एकत्रित माहिती राज्य सरकारला देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही नियुक्ती केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. राज्य सरकारला याबाबतची संपुर्ण माहिती नियमित देणे आवश्यक आहे. त्यामध्ये रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या रुग्णांची […]b

पिंपरी-चिंचवड शहरात मास्क न घालणाऱ्या ३० जणांवर गुन्हे दाखल

अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरत नव्हते

चिखली येथील घरकुलमध्ये कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने हा संपूर्ण परिसर केला सील


मोशी, पिंपरी उपबाजार आजपासून बंद

पिंपरी भाजीमंडई उद्यापासून तीन दिवस बंद
पिंपरी  (प्रतिनिधी) – मोशी, पिंपरी उपबाजार शनिवारपासून (दि. 11) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आदेशानुसार बंद ठेवण्यात येणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे बाजार बंद राहणार आहेत. त्यामुळे फळे व भाजीपाला यांची विक्री बंद राहील. दरम्यान, पिंपरी भाजी मंडई मात्र शनिवारी (दि.11) पहाटे 3 ते सकाळी 8 या वेळेत खुली राहणार आहे. शनिवारी सायंकाळी 6 पासून मंगळवारपर्यंत (दि. 14) मंडई बंद ठेवण्यात येणार आहे.

आणखी 134 जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी (प्रतिनिधी) -संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या 134 जणांवर गुरुवारी (दि. 9) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दररोज कारवाईचे सत्र सुरू असतानाही नागरिक पोलिसांच्या कारवाईला न जुमानता घराबाहेर फिरत असल्याचे चित्र दिसत आहे.

करोनामुळे मिळकत करात सवलत

दंड, व्याजाबाबत काही सवलती जाहीर
पिंपरी (प्रतिनिधी) -सध्या सुरू असलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मिळकत धारकांना पालिकेने दिलासा आहे. दंडव्याजासह काही सवलती जाहीर केल्या असून त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापौर माई ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

परदेशवारी केलेले 1922 जण ‘होम क्वारंटाईन’

एमपीसी न्यूज – परदेशवारी करुन पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्यांची संख्या मोठी आहे. मागील दीड महिन्याच्या काळात परदेशातून तब्बल 1922 जण शहरात आले आहे. या सर्वांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. तर, आज (शुक्रवारी) शहरातील आणखी दोघांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहे. त्यामुळे सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या चौदावर गेली आहे. आजपर्यंत 26 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. […]

'एचए' कामगार, अधिकारी वर्गाची पंतप्रधान निधीला ७ लाख ७२ हजार रुपयांची मदत

पिंपरी - हिंदुस्थान एंटिबायोटिक्स (एचए) कंपनीच्या सुमारे ६२४ कामगार आणि अधिकारी वर्गाने कोरोना विरूध्द च्या लढ्यासाठी पंतप्रधान (केअर) निधीला एक दिवसाच्या वेतनापोटी ७ लाख ७२ हजार रुपये दिले.

भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुरू

लॉकडाउनमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. या परिस्थितीत विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) हेल्पलाईन सुरू केली आहे. अभ्यास असो की वैद्यकीय सल्ला हे सर्व या हेल्पलाईनद्वारे मिळणार आहे.

Corona Virus : कोरोनामुळे मानसिक ताणतणाव वाढलाय? समुपदेशन हवे मग, ही बातमी वाचा

पुणे : कोरोना या संसर्गजन्य आजाराविषयी आपण सगळेच जगभरातील अनेक बातम्या वाचत, ऐकत आहोत.  या बातम्यांमुळे मानसिक अस्वस्थता निर्माण होत आहे. अधूनमधून वाटणारी चिंता, भीती आपल्याला त्रास देऊ शकतात. त्यावर समुपदेशनासाठी सुरू केले आहे. 

“गुड फ्रायडे’ची उपासना घरातूनच ऑनलाइन