The Pimpri Chinchwad Municipal Corporation is aiming for early completion of the Pavana dam-Nigdi water pipeline project, which has been faced with several hurdles.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 10 March 2014
संगीत, नृत्य अभिनयातून मांडली स्त्रीजीवनाची गाथा
रहाटणी येथील यशःसुख सोशल फौंडेशन संचलित "निर्भया"महिला मंचच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या "निर्भया" महिला महोत्सवाच्या तिस-या दिवशी अमोल मोरे दिग्दर्शित नृत्य संगीत अभिनयातून कलाकारांनी स्त्रीजीवनाची गाथा मांडली.
या संगीतमय नाटिकेमध्ये सुरुवातीला राणी लक्ष्मीबाई, जिजाबाई, इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू, कल्पना चावला, पत्रकार बरखा दत्त यांसारख्या क्रांतीकारी स्त्रियांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी चित्रफित दाखविली. बालविवाहमुळे मुलींच्या आयुष्याची झालेली राखरांगोळी एका प्रयोगातून साकार केली. कौटुंबिक हिंसाचार, स्त्रीभ्रुण हत्या यावरील लघुनाटिकाही सादर केली. मागील वर्षी दिल्लीमध्ये घडलेली सामूहिक बलात्काराची घटनेचे नाट्यरुपांतर कलाकारांनी प्रेक्षकांसमोर मांडले.
म्हाळसाकांत विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त राज्यपातळीवर क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य सुनील लाडके, उपमुख्याध्यापक के. जे. जाधव, सिम्बॉयसिस कॉलेजच्या प्राध्यापिका स्मिता वरपे, प्रा. संध्या देशपांडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात यावेळी मतदारांना मतदानासाठी उद्युक्त करण्याची विद्यार्थिनीनी व महिला शिक्षकांनी शपथ घेतली.
यावेळी प्राचार्य सुनील लाडके यांनी सुसंस्कारित समाज निर्मितीसाठी महिलांचे योगदान मोठे आहे. यासाठी महिलांनी आत्मनिर्भर व सक्षम बनणे ही काळाची गरज आहे असे सांगून स्त्रीशक्तीचा गौरव केला. प्रा. आशा होळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. भारती कदम यांनी आभार मानले.
कार्यक्रमात यावेळी मतदारांना मतदानासाठी उद्युक्त करण्याची विद्यार्थिनीनी व महिला शिक्षकांनी शपथ घेतली.
यावेळी प्राचार्य सुनील लाडके यांनी सुसंस्कारित समाज निर्मितीसाठी महिलांचे योगदान मोठे आहे. यासाठी महिलांनी आत्मनिर्भर व सक्षम बनणे ही काळाची गरज आहे असे सांगून स्त्रीशक्तीचा गौरव केला. प्रा. आशा होळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. भारती कदम यांनी आभार मानले.
दक्षता संघातर्फे निगडी पोलिसांचा सत्कार
निगडी पोलिसांनी वाहनचोरी करणारी टोळी पकडल्याबद्दल त्यांचा पोलीस मित्र नागरिक दक्षता संघातर्फे सत्कार करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाईक-पाटील व गुन्हे पोलीस निरीक्षक पी. एन. सुपेकर यांनी हा सत्कार स्वीकारला.
निगडी पोलिसांनी काही दिवसापूर्वी शहरात वाहनचो-या करणा-या टोळीला गजाआड केले. त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे. या हेतुने पोलीस मित्र नागरी दक्षता संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष मनोहर दिवाण, सचिव पोपट आरणे, इम्तियाज बागवान, विकास साखरे, सुनील चौगुले आदी उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)