Tuesday, 16 October 2012

Helpline numbers to call during the chemists’ strike

Helpline numbers to call during the chemists’ strike: Helpline numbers to call during the chemists’ strikePUNE: Demanding some fundamental changes in Food and Drug Administration (FDA) regulations for pharmacists and chemists, the Maharashtra Chemist and Druggist Association (MSCDA) has called a three-day state-wide strike from Tuesday.

नवरात्र उत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात !

नवरात्र उत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात !
पिंपरी, 18 सप्टेंबर
गणेशोत्सव संपला की वेध लागतात ते नवरात्र उत्सवाचे. उद्यापासून (मंगळवार) देवीच्या नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. शहरातील विविध सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी हा उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यासाठी कंबर कसली आहे. मंडळांच्या मंडप उभारणीचे काम, दांडीया महोत्सवाच्या तयारीचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. पूजेचे साहित्य, फुले, देवीच्या मूर्ती यांच्या खरेदीला वेग आला असून तरुणाईचे आकर्षण असलेल्या दांडीया- गरबासाठी पारंपरिक वेशभूषा, विविध प्रकारच्या दांडिया यांच्या खरेदीची लगबग उडाली आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


दोन किचनना दोन कनेक्शन ‘ओके’

दोन किचनना दोन कनेक्शन ‘ओके’: एकाच पत्यावर घेण्यात आलेल्या दोन गॅस कनेक्शन पैकी एक कनेक्शन गॅस कंपनीला परत करण्याची मुदत येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली आहे. मात्र असे असले तरी एकाच घरात जर दोन किचन असतील; तसेच एकच व्यक्ती दोन वेगवेगळ्या पत्यावर राहत असेल, अशा ग्राहकांना गॅसचे दोन कनेक्शन ठेवता येणार आहेत.

पहिली सहामाही प्रश्नांची

पहिली सहामाही प्रश्नांची: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी अनधिकृत बांधकांमे दंड आकारून नियमित केली जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र, कारवाईला सामोरे जावे लागल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. या समस्येवर तोडगा शोधण्याऐवजी प्रश्नच निर्माण झाल्यामुळे नगरसेवकही अडचणीत सापडले आहेत.

पीयूषची मृत्यूशी झुंज अपयशी !

पीयूषची मृत्यूशी झुंज अपयशी !
पिंपरी, 15 ऑक्टोबर
दोन महिन्यांपूर्वी थेरगावच्या डांगे चौकात 'हायटेन्शन वायर'च्या संपर्कामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चार वर्षांच्या मुलाचा सोमवारी (दि.15) पहाटे पाच वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये पीयूष तब्बल दोन महिने मृत्युशी झुंज देत होता. मात्र ही झुंज अपयशी ठरली आणि त्याने आज पहाटे अखेरचा श्वास घेतला.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


आयटी कंपनीतील तरुणीची आत्महत्या

आयटी कंपनीतील तरुणीची आत्महत्या
पिंपरी, 14 ऑक्टोबर
हिंजवडीतील विप्रो कंपनीत नोकरी करणा-या एका तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पिंपरीतील उद्यमनगर येथे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


गणेश शिर्के यांची निवड बेकायदेशीर -चंद्रकांता सोनकांबळे

गणेश शिर्के यांची निवड बेकायदेशीर -चंद्रकांता सोनकांबळे
पिंपरी, 14 ऑक्टोबर
रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षपदी गणेश शिर्के यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती माजी शहराध्यक्ष रमेश चिमूरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मात्र, ही निवड बेकायदेशीर असल्याचा दावा पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आणि नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


पोलो कारच्या अपघातात तीन जण ठार

पोलो कारच्या अपघातात तीन जण ठार
पिंपरी, 14 ऑक्टोबर
पोलो कार रस्ता दुभाजक तोडून विरुध्द दिशेने येणा-या एका इंडिगो कारवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले. सांगवी फाटा येथील राजीव गांधी पुलावर आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये इंडिगो कारमधील विवाहित जोडपे किरकोळ जखमी झाले.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


'ऑनलाईन' तक्रार देऊनही पालिका खड्डे बुजविण्यामध्ये 'ऑफलाईन'

'ऑनलाईन' तक्रार देऊनही पालिका खड्डे बुजविण्यामध्ये 'ऑफलाईन'
पिंपरी, 12 ऑक्टोबर
नागरिकांच्या तक्रारी ऑनलाईन देण्याची सोय पिंपरी-चिंचवड महापालिकेने 'वेबपोर्टल'च्या माध्यमातून करून दिली आहे. नागरिकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत असतो. परंतु पालिका या तक्रारीकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. पिंपरीच्या ग्रेड सेपरेटरमध्ये खड्डे पडले असून ते त्वरित दुरुस्त करावेत अशी विनंती अमोल देशपांडे यांनी पाच दिवसांपूर्वी पालिकेच्या वेबपोर्टलवर केलेली होती. त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच शनिवारी (ता.13) संध्याकाळी तीन कारमध्ये अपघात झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

बसने प्रवासाची तेली समाजाची ग्वाही

बसने प्रवासाची तेली समाजाची ग्वाही: बसने प्रवासाची तेली समाजाची ग्वाहीपिंपरी - सकाळ माध्यम समूहाच्या "पुणे बस डे' उपक्रमाला पिंपरी-चिंचवड शहरातील वीस हजारावर तेली समाज बांधवांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

बस कार्यान्वित राहण्यासाठी प्रयत्न करणार

बस कार्यान्वित राहण्यासाठी प्रयत्न करणार: बस कार्यान्वित राहण्यासाठी प्रयत्न करणारपिंपरी - सकाळ माध्यम समूहाच्या "पुणे बस डे' उपक्रमाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बालवाडी सेविका, घंटागाडी, समूह संघटक, साफसफाई कर्मचारी, आयटीआयमधील मानधनावरील शिक्षक आणि जीवरक्षक यांनी रविवारी पाठिंबा जाहीर केला.

शहरात एक लाख बोगस शिधापत्रिका

शहरात एक लाख बोगस शिधापत्रिका: पिंपरी - पिंपरी-चिंचवडमधील दोन लाख 25 हजार 183 शिधापत्रिकांपैकी तब्बल एक लाख दोन हजार एकशे ऐंशी शिधापत्रिका अपात्र तथा बोगस असल्याचे आढळून आले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील कॉंग्रेसचे नगरसेवक देणार महिन्याचे मानधन

पिंपरी-चिंचवडमधील कॉंग्रेसचे नगरसेवक देणार महिन्याचे मानधन: पिंपरी-चिंचवडमधील कॉंग्रेसचे नगरसेवक देणार महिन्याचे मानधनपिंपरी - पिंपरी चिंचवड शहरातील कॉंग्रेसचे सर्व आजी- माजी नगरसेवक आणि शहर पदाधिकाऱ्यांनी "सकाळ'च्या "पुणे बस डे' उपक्रमाला अपेक्षित ती सर्व मदत करण्याचे ठोस आश्‍वासन शुक्रवारी (ता.

पोलिस आयुक्तांचा सतर्कतेचा इशारा

पोलिस आयुक्तांचा सतर्कतेचा इशारा: पुणे - जंगली महाराज रस्त्यावरील बॉंबस्फोटप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पुण्यातील युवकासह तिघांना अटक केल्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी शुक्रवारी शहर व पिंपरी-चिंचवडमधील पोलिस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

एजंटच्या माध्यमातून फिरोजने मिळविले घर

एजंटच्या माध्यमातून फिरोजने मिळविले घर: पिंपरी - पुण्यातील साखळी बॉंबस्फोटप्रकरणी दिल्लीत पकडलेला संशयित दहशतवादी फिरोज सय्यद हा पिंपरीतील कासारवाडी येथे भाडेतत्त्वावर राहत असलेल्या घराचा भोसरी पोलिसांनी शुक्रवारी शोध घेतला.

एजंटच्या माध्यमातून फिरोजने मिळविले घर

एजंटच्या माध्यमातून फिरोजने मिळविले घर: पिंपरी - पुण्यातील साखळी बॉंबस्फोटप्रकरणी दिल्लीत पकडलेला संशयित दहशतवादी फिरोज सय्यद हा पिंपरीतील कासारवाडी येथे भाडेतत्त्वावर राहत असलेल्या घराचा भोसरी पोलिसांनी शुक्रवारी शोध घेतला.

Pimpri youth succumbs to injuries, five arrested

Pimpri youth succumbs to injuries, five arrested: A 22-year-old youth, who was severally assaulted by five youths for intervening in a petty dispute on Friday night, succumbed on Sunday morning.

Pimpri Chinchwad Municipal Corporation main building may get Rs 2-cr fire safety revamp

Pimpri Chinchwad Municipal Corporation main building may get Rs 2-cr fire safety revamp: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will spend Rs 2 crore to improve the fire fighting capacity at its main administrative building.

Pimpri Chinchwad Municipal Corporation to take up work road improvement work in Nigdi

Pimpri Chinchwad Municipal Corporation to take up work road improvement work in Nigdi: Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) will be spending Rs 20.47 lakh for improving the road stretch from Bhakti Shakti chowk to Hutatma chowk in Nigdi.

Pimpri Chinchwad Municipal Corporation to complete traffic improvement measures near schools

Pimpri Chinchwad Municipal Corporation to complete traffic improvement measures near schools: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will be spending Rs 16.46 lakh for implementing various traffic improvement measures near schools located along main roads in Zone D which includes Sangvi and other areas.

Woman’s body in bag: Victim’s live-in partner held

Woman’s body in bag: Victim’s live-in partner held: A 28-year-old painting labourer, Pravin Thakre of Pimpri, was arrested by a Government Railway Police (GRP) team from Pune for allegedly killing his live-in partner Roshni (25) and stuffing her body in a suitcase that he left at the Chhatrapati Shivaji Terminus (CST) railway station, Mumbai.

Ex-Gujarat cops depose through video-conferencing

Ex-Gujarat cops depose through video-conferencing: They had arrested suspects in the abduction and murder of Pimpri businessman.

सुटकेसमधील महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलले ; पतीस चिखलीतून अटक

सुटकेसमधील महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलले ; पतीस चिखलीतून अटक
पिंपरी, 13 ऑक्टोबर
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) रेल्वे स्थानकात सापडलेल्या सूटकेसमधील एका महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलले असून या महिलेच्या खून प्रकरणी तिच्या पतीला चिखली येथून रेल्वे पोलिसांनी आज अटक केली.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


आठ वर्षापूर्वी पत्नीचा खून करणा-या पतीस चिंचवड येथून अटक

आठ वर्षापूर्वी पत्नीचा खून करणा-या पतीस चिंचवड येथून अटक
पिंपरी, 13 ऑक्टोबर
आठ वर्षापूर्वी पहिल्या पत्नीच्या मदतीने दुस-या पत्नीला जिवे मारून तिचे प्रेत आपल्या नातेवाईकांच्या गावात पुरणा-या पतीस गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने चिंचवडच्या चापेकर चौकातून आज अटक केली.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


साखळी बॉम्बस्फोटानंतरही दहशतवाद्यांचा 25 दिवस कासारवाडीत मुक्काम !

साखळी बॉम्बस्फोटानंतरही दहशतवाद्यांचा 25 दिवस कासारवाडीत मुक्काम !
पिंपरी, 13 ऑक्टोबर
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर चार साखळी बॉंबस्फोट घडविणा-या 'इंडियन मुजाहिदीन'च्या तीन दहशतवाद्यांचा साखळी बॉम्बस्फोटानंतरही तब्बल 25 दिवस कासावाडीत मुक्काम होता. त्यामुळे या धक्कादायक घटनेनंतर दहशतवाद्यांना भाडय़ाने फ्लॅट देणा-या घरमालकाकडे अजूनही पोलिसांचा चौकशीचा फेरा दुस-या दिवशीही सुरू होता. या दहशतवाद्यांनी एजंटमार्फत तीन महिन्यांसाठी फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्यासाठी घरमालकाला राहण्यापूर्वीच दहशतवाद्यांनी एकरकमी 18 हजार रूपये देण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


ग्रेड सेपरेटर मधील खड्डयांमुळे महिन्याभरात तिस-यांदा अपघात

ग्रेड सेपरेटर मधील खड्डयांमुळे महिन्याभरात तिस-यांदा अपघात
पिंपरी, 12 ऑक्टोबर
गेल्या महिनाभरात पिंपरी चौकातील पुलाखालील ग्रेड सेपरेटरमध्ये एकाच ठिकाणी तीन अपघात झाले आहेत. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास याच ठिकाणी पुन्हा तीन मोटारीना अपघात झाला. यामध्ये मारुती ओम्नी गाडीचा चालक किरकोळ जखमी झाला.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


साहिलच्या मृत्यूप्रकरणी कल्पतरु कंस्ट्रक्शन कंपनी विरुध्द गुन्हा

साहिलच्या मृत्यूप्रकरणी कल्पतरु कंस्ट्रक्शन कंपनी विरुध्द गुन्हा
पिंपरी, 12 ऑक्टोबर
हौसिंग सोसायटी मधील बागेत खेळत असताना तेथील एका वीज प्रवाह चालू असलेल्या खांबाला स्पर्श केल्यामुळे विजेचा धक्का बसून एका सव्वा वर्षाच्या चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागला. ही घटना पिंपळेगुरव येथील कल्पतरु इस्टेट फेज 2 येथे आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेत मुलाला वाचविण्यास गेलेल्या मुलाच्या आजोबाही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कल्पतरु कंस्ट्रक्शन कं. प्रा. लि. यांच्याविरुध्द रात्री उशिरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


एसएनबीपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; एक विद्यार्थी जखमी

एसएनबीपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; एक विद्यार्थी जखमी
पिंपरी, 13 ऑक्टोबर
पिंपरी येथील एमएनबीपी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या भांडणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून चार विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्यावर चाकू, तलवारीने प्राणघातक हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (ता. 12) रात्री दहाच्या सुमारास पिंपरीतील मासुळकर भाजी मंडई येथे घडली. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघांना अटक केली असून अन्य एक साथीदार फरार आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in