Sunday, 12 November 2017

पालिकेने प्रदुषण नियंत्रणाचे धोरण जाहीर करावे

पिंपरी – दिल्ली शहरासारखी पिंपरी-चिंचवड शहराची हवा प्रदूषित होऊ नये, याकरिता काळजी घेणे गरजेचे आहे. प्रदूषण हा थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्‍न आहे. त्यामुळे पालिकेने स्वतंत्र प्रदूषण नियंत्रणाचे धोरण जाहीर करावे, अशी मागणी प्रदीप मस्के यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

[Video] रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे विविध आजारांवरील मोफत शस्त्रक्रिया शिबिर


रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे विविध आजारांवरील मोफत शस्त्रक्रिया शिबिर रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पिंपरी येथे विविध प्रकारच्या आजारांवरील मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार (दि. 24) ते रविवार (दि. 26) दरम्यान हे शिबिर होणार आहे. 

महापौर नितीन काळजे निघाले स्पेन दौ-यावर

पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे सोमवार दि.१३ रोजी स्पेनच्या दौ-यावर जाणार आहेत. या दौ-यात महापौर काळजे तेथील विविध प्रकल्पांची माहिती घेणार असून २१ नोव्हेंबर रोजी ते परतणार आहेत.

पिंपरी चिंचवड: अनियमित पाणीपुरवठ्यामुळे फुगेवाडीकर रस्त्यावर

नवी सांगवी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सततच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे वैतागलेल्या फुगेवाडीतील नागरिकांनी मेघामार्ट येथील दापोडी फुगेवाडी जंक्शन चौकात आज रास्ता रोको केला. त्यामुळे पुणे मुंबई रस्ता सकाळी सात वाजल्यापासून जाम झाल्याने येथे काही काळासाठी वाहतुक कोंडी झाली होती. परंतु भोसरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अजय भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी जमावाला विश्वासात घेतल्यानंतर वाहतुक पुन्हा सुरळीत झाली. 

हिशोब न दिल्याने 88 उमेदवारांवर तीन वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी

चौफेर न्यूज – महापालिका सार्वत्रिक निवडणुक निकालानंतर 30 दिवसात 88 उमेदवारांनी निवडणुक खर्चाचा हिशोब सादर केला नाही. त्या उमेदवारांना तीन वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरविण्यात आल्याचा आदेश विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी यांनी दिला आहे. याबाबत अपात्र ठरविलेल्या उमेदवारांची यादी त्यांनी पालिका निवडणूक विभागास पाठविली आहे.

‘स्वाईन फ्लू’चे आणखी तीन रुग्ण

पिंपरी- स्वाइन फ्लूने आता चांगलेच डोके वर काढले आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गुरुवारी (दि.9) ला स्वाइन “फ्लू’चे आणखी तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे स्वाइन “फ्लू’च्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 413 वर पोहोचली आहे.