After sitting on a proposal by Maha-Metro for 10 months, the Defence Ministry on Thursday finally gave the green signal for the transfer of 10 acres of land for the Pune Metro project in Khadki area. “We are happy to announce that the Defence Ministry has cleared the Pune Metro right of way permission, as also the land transfer proposal for Metro stations,” said Brijesh Dixit, managing director of Maha-Metro.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 21 September 2018
मेट्रो मार्गातील जागेला संरक्षण खात्याची परवानगी
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट (रिच-1) या मेट्रो मार्गातील खडकीतील रेंजहिल्स येथे होणार्या मेट्रो स्टेशनचे काम संरक्षण विभागाच्या परवानगीसाठी रखडले होते; मात्र गुरुवारी संरक्षण विभागाकडून महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीला (महामेट्रो) या ठिकाणी मेट्रोचे काम करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.
Hinjawadi to feel impact of heavy vehicle ban tomorrow
The police claimed to have reduced the traffic congestion on ..
घरच्या बाप्पासमोर ‘भक्ती-शक्ती उड्डाणपूला’ची प्रतिकृती साकारणाऱ्या अभिषेक दाणी याचा महापालिकेकडून सन्मान
पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपूलाचे काम पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने सुरू आहे. या पूलाची अगदी हुबेहूब प्रतिकृती आकुर्डीतील अभिषेक दाणी या तरूणाने घरीच्या गणपती बाप्पा समोर साकारली आहे. ही सजावट संपूर्णपणे पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करून केली आहे. विशेष म्हणजे बाप्पाची मुर्ती देखील शाडू मातीने बनवलेली आहे. अभिषेक याने केलेल्या या सजावटीचे महापालिकेच्यावतीने कौतुक करण्यात आले. बीआरटीचे प्रवक्ते उपअभियंता विजय भोजने यांनी अभिषेक याच्या घरी जाऊन त्याचा सन्मान केला.
‘पिंपरी चिंचवड-वन’ मोबाईल अॅप द्वारे नागरिकांना एकाच ठिकाणी मिळणार संपुर्ण शहरांची माहिती;अॅपचे महापौरांच्या हस्ते अनावर
पाणीपुरवठा, खोदकामामुळे रस्ता बंद, वाहतूक मार्गात बदल अशी प्रत्येक माहिती शहरवासियांना आता ‘पिंपरी चिंचवड-वन’ या अॅपद्वारे मिळणार आहे. महापालिकेने ‘पिंपरी चिंचवड-वन’ या नावाने मोबाईल अॅप कार्यन्वित केले आहे. या मोबाईल अॅप द्वारे नागरिकांना आवश्यक माहितीचे प्रसारण, संदेश, परिपत्रक, निवेदन इत्यादी स्वरुपाची सर्व माहिती एकाच अॅप द्वारे नागरिकांना सहजरित्या उपलब्ध होणार आहे. या अॅपचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेविका भीमाबाई फुगे, निर्मला गायकवाड, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण उपस्थित होते.
शहरातील मोकाट कुत्री, डुक्करे व जनावरांवर नियमितपणे कारवाई केली जात असल्याचा आयुक्त हर्डीकरांचा दावा
पिंपरी-चिंचवड शहरात या वर्षी आतापर्यंत तब्बल 11 हजार कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. त्यासाठी 3 एजन्सी काम करीत आहेत. तर, डुक्करे पकडण्यासाठी नवीन एजन्सीचे प्रत्यक्ष काम 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, असे सांगून शहरातील मोकाट कुत्री, डुक्करे व जनावरांवर नियमितपणे कारवाई केली जात असल्याचा दावा पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केला.
इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे ज्ञानप्रबोधिनीला बायोगॅस प्लांट भेट
नैसर्गिक वायूच्या वापरासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. या संकल्पनेतुन इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेला बायोगॅस प्लांट भेट देण्यात आला.
गणेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बायोगॅस प्लांट भेट देण्यात आला. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा प्रतिभा जोशी दलाल, रेखा मित्रगोत्री, रंजना कदम, नेहा देशमुख, आरती मुळे, रेणू मित्रा, मुक्ती पानसे, वैशाली देवतळे, अर्जुन दलाल आदी उपस्थित होते. ज्ञानप्रबोधिनी निगडी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने सहभाग घेतला.
प्लास्टिक बंदीसाठी मनपा प्रशासन सरसावले; क क्षेत्रीय कार्यालयाची कारवाई, 15 हजार रूपयांचा दंड केला वसूल
प्लास्टीक बंदी असतानाही व्यावसायीक उपयोगासाठी प्लास्टीक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांचे प्रबोधनाबरोबरच दंडात्मक कारवाईची मोहिम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असून आज क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने केलेल्या कारवाईत सात किलो प्लास्टीक जप्त करून पंधरा हजार रूपयांचा दंड वसूल केला.
पिंपरीत मोफत महाआरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद
राज्यातील कोणताही गरीब रुग्ण कितीही मोठा आजार झाला असला तरी उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोफत महाआरोग्य शिबीरांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आजार झालेल्या रुग्णापर्यंत पोचण्याचा या महाआरोग्य शिबीरांचे उद्देश असल्याचे भाजपच्या डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रमोद कुबडे यांनी गुरूवारी (दि. २०) सांगितले.
जिजाई प्रतिष्ठान आणि पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पिंपरीतील बी. टी. अडवाणी हॉलमध्ये आयोजित मोफत महाआरोग्य शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
चिंचवडच्या भक्ती रेसिडेन्सी सोसायटीचा पर्यावरण पूरक गणेशोत्सव
चिंचवड केशवनगर येथील भक्ती रेसिडेन्सी सोसायटीतील पर्यावरण पूरक ‘पुष्प महाल’ असा देखावा साकारला आहे. भक्ती रेसिडेन्सी सोसायटी गणेशउत्सवाचे अकरावे वर्ष आहे. सोसायटीचा गणेशोत्सव ही खूपच चांगली संकल्पना आहे. त्यामुळे सोसायटीमधील सर्व जण एकत्र येऊन आपापसांत आपुलकीची भावना वाढीस लागेली दिसून येते. या सात दिवसाच्या गणपती उत्सवातील सोसायटीचे वातावरण उत्साहाचे होते. विशेष म्हणजे या भक्ती रेसिडेन्सी सोसायटीचा ‘पुष्प महाल’ देखावा हा कमी कालावधी आणि कमी खर्चात साकारला आहे. कापडी फुले, रद्दी, वर्तमानपत्रे, टाकाऊ लाकडे इत्यादी साहित्यांपासून सोसायटीच्या सर्व कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून देखावा साकारला आहे.
PCMC invites revised tenders for garbage segregation
Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation ..
गृहप्रकल्पांचा मार्ग मोकळा
पिंपरी - केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेतर्फे मोशीतील बोऱ्हाडेवाडी, आकुर्डी आणि पिंपरी गावात राबविण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाला पंतप्रधान आवास योजनेच्या राज्यस्तरीय मूल्यमापन समितीने सुधारित मान्यता दिली आहे. त्यामुळे या तीनही प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे.
सोशल मीडियावरून पुन्हा ‘गॅंगवार’
पिंपरी - शहरातील सोन्या काळभोर टोळी आणि रावण टोळी यांच्यात पुन्हा सोशल मीडियावर गॅंगवार सुरू झाले आहे. दोन्ही टोळ्यांकडून एकमेकांना ‘बघून’ घेण्याची भाषा केली जात असताना पोलिस याबाबत मात्र अनभिज्ञ आहेत.
भाजप वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी डॉ. प्रदीप ननावरे
नवी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी पिंपळे गुरव येथील डॉ. प्रदीप ननावरे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी नुकतेच याबाबतचे पत्र डॉ. ननावरे यांना दिले आहे. सांगवी पिंपळे गुरव डॉक्टर्स असोशिएशनच्या माध्यमातून डॉ ननावरे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यात वैद्यकीय तपासणी व उपचार, पोलिस दलाची आरोग्य तपासणी, अनाथालयातील मुलांना औषधोपचार, सैनिकांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्याकरीता विविध उपक्रम राबविणे व वृक्षारोपणासारख्या कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनासारखे उपक्रम राबविले आहेत.
विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल
पिंपरी – शहरातील दहा दिवसांच्या गणरायांचे रविवारी (दि.23) विसर्जन होणार असून, यासाठी वाहतूक पोलिसांनी दुपारी दोनपासून वाहतुकीत बदल केले आहेत. या बदलानुसार, पिंपरी परिसरातील तीन रस्ते वापरासाठी बंद असणार आहेत. या बंद रस्त्यांसाठी पर्यायी मार्ग वाहतूक पोलिसांनी निर्धारित केले आहेत.
सात किलो प्लॅस्टिक जप्त
पिंपरी – बंदी असतानाही व्यावसायीक उपयोगासाठी प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांच्या प्रबोधनाबरोबरच दंडात्मक कारवाईची मोहीम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असून क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने गुरुवारी (दि. 20) केलेल्या कारवाईत सात किलो प्लॅस्टीक जप्त करून पंधरा हजार रूपयांचा दंड वसूल केला.
पिंपरीत पोलिसांचा रुट मार्च
पिंपरी – शहरातील सार्वजनिक व घरगुती गणपतीचे रविवारी (दि.23) विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांनी गुरुवारी (दि. 20) शगुन चौकातून रुट मार्च करत विसर्जन सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश दिला.
पीएफवर आता आठ टक्के व्याज
चौफेर न्यूज – राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र पीपीएफसह अन्य अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना केंद्र सरकाने गुडन्यूज दिली आहे. सरकारने ऑक्टोंबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी अल्प बचत योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के वाढ केली आहे. अल्प बचत योजनांवरील व्याजदरात दर तिमाहीत बदल होत असतात.
Subscribe to:
Posts (Atom)