Saturday, 9 December 2017

'निगडी' देशाच्या नकाशावर झळकणार! पुणे मेट्रोच्या नकाशावर केव्हा?

‘निगडी’ देशाच्या नकाशावर झळकणार! परंतु पुणे मेट्रोच्या नकाशावर केव्हा? भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे बांधण्यात येणारा 107 मीटर उंचीचा ध्वजस्तंभ हा देशातील दुसरा सर्वात उंच स्तंभ आहे, 110 मीटर उंचीचा सर्वात उंच ध्वजस्तंभ अटारी, अमृतसर येथे आहे. निगडीचे वाहतूक-दळणवळण, शैक्षणिक, व्यवसाय व आता पर्यटनदृष्टीने अनन्यसाधारण महत्व असतानाही पुणे मेट्रो फेज १ ची सुरवात निगडी पासून होत नाही हे समस्त पिंपरी-चिंचवडकरांचे दुर्भाग्य बाकी काय!

👉 Our two main demands: 1) Start Pune Metro phase 1 from Nigdi & 2) Multimodal Transport Hub at Nigdi
👉 Sign Online Petition http://goo.gl/kDKV9I (signature count 924)

ALL FOR PEOPLE | New age social activism in Pimpri Chinchwad

#CitizenMatters ALL FOR PEOPLE | New age social activism in Pimpri Chinchwad covered by The Times of India #PCMCPlus Our Co-founder Amol Deshpande shared his experience. Thanks Mini Shukla for covering interview & spreading positivity 

PCMC seeks monthly plan for improved water supply

Pimpri Chinchwad: A month-wise plan has been sought for the implementation of water supply scheme with pressure under Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation (Amrut).

वल्लभनगर मेट्रो स्टेशनचे पंकजा मुंढे यांच्या हस्ते २४ डिसेंबरला भूमिपूजन

पिंपरी-चिंचवडमधून पिंपरी ते स्वारगेट मार्गाचे काम जोरदारपणे सुरू आहे. या मार्गावर पहिले मेट्रो स्टेशन वल्लभनगर येथे उभे करण्याचे नियोजन महामेट्रोकडून सुरू आहे. त्याचे भूमिपूजन येत्या २४ डिसेंबरला होणार आहे. राज्याच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंढे यांच्या हस्ते या स्टेशनच्या कामाचा नारळ वाढविण्यात येणार आहे.

मेट्रोचा सुधारित प्रस्ताव "अर्थ'ला सादर

पुणे - केंद्र सरकारच्या "न्यू मेट्रो पॉलिसी'नुसार शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचा सुधारित प्रस्ताव अर्थ विभागाला पाठविण्यात आला असून, लवकरच मेट्रोच्या प्रक्रियेला मान्यता मिळेल, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली. तसेच येत्या वर्षात रेल्वे, बससेवा, बीआरटी, मेट्रो, टॅक्‍सी यांच्या पदाधिकाऱ्यांची मिळून "युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्स्पोर्ट ऍथॉरिटी' (उम्टा) स्थापन करू, असे लेखी आश्‍वासन प्रस्तावास जोडल्याचेही त्यांनी सांगितले.

More than 30 IT employees seek FITE guidance daily

PUNE: Over 30 information technology (IT) professionals from across the state are approaching the Forum for IT Employees (FITE) every day to seek guidance against pressure to resign at their workplaces.

कॉग्निझंट आयटी कंपनीतून शेकडो कर्मचाऱ्यांची कपात

पुणे : पुण्यातील कॉग्निझंट कंपनीने शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याच्या नोटीसा पाठवल्या आहेत. कर्मचाऱ्यांचा विरोध कमी करण्यासाठी कंपनीने पुढच्या चार महिन्यांसाठी कर्मचाऱ्यांना कंत्राटावर कामावर ठेवलं आहे. मात्र हे प्रकरण न्यायालयात असल्याने कर्मचाऱ्यांनी काही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. कर्मचाऱ्यांनी कामगार आयुक्तालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

Bapat tells MIDC to solve Hinjewadi woes by April

Pimpri Chinchwad: Guardian minister Girish Bapat has urged officials concerned to develop alternative roads by April next year to ease the perennial traffic congestion in the Rajiv Gandhi IT Park in Hinjewadi. In a special meeting at Mantralaya, Bapat made the appeal to industries minister Subhash Desai, district collector Saurabh Rao and PMRDA chief Kiran Gitte. Also present at the meeting were officials from Maharashtra Industrial Development Corporation (MIDC), Public Works Department (PWD), National Highways Authority of India (NHAI), and Hinjewadi Industries Association (HIA).

Panel chief backs home food rights at multiplexes

Pune: Consumer Welfare Advisory Committee president Arun Deshpande on Friday urged citizens to question authorities who prevent them from carrying food or water from home to cineplexes and charge parking fees at multiplexes.

मल्टिप्लेक्समध्ये पार्किंग शुल्क नाही


मल्टिप्लेक्समध्ये पार्किंग शुल्क नाही

‘मल्टिप्लेक्समध्ये येणाऱ्या नागरिकांना पार्किंग शुल्क आकारण्यात येऊ नयेत, अशा सूचना दिल्या आहे. याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांकडून केली जाणार असून, संबंधित मल्टिप्लेक्सवर कारवाई होणार आहे.’ असे राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी सांगितले.
‘मल्टिप्लेक्समध्ये येणाऱ्या नागरिकांकडून पार्किंगचे शुल्क आकारण्यात येते. मात्र, पार्किंगची जागा ही सार्वजनिक वापरासाठी असल्याने त्यावर शुल्क आकारता येणार नाही. त्यामुळे संबंधितांवर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारवाई केली जाणार आहे,’ असे देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

“ई-पॉस मशिन’ शासनाकडे जमा

धान्य वितरण ठप्प : “सॉफ्ट वेअर अपग्रेड’ करणार
पिंपरी – चार महिन्यांपूर्वी अन्न-धान्य वितरणाकरिता रेशनिंग दुकानदारांना दिलेल्या 201 “ई-पॉस मशिन’ अन्न-धान्य पुरवठा विभागाने “सॉफ्ट वेअर अपग्रेड’ करण्यासाठी परत घेतल्या. डिसेंबरचे धान्य दुकानदारांना अद्यापही न पोचल्याने धान्य वितरण ठप्प झाले.

शासकीय कामासाठी स्वतःचे वाहन वापरा

आयुक्‍तांनी दिले आदेश : महापालिका देणार खर्च
पिंपरी – महापालिकेतील वर्ग 1 आणि वर्ग 2 च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतःचे वाहन शासकीय कामकाजासाठी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय कामकाजासाठी स्वतःचे खासगी वाहन वापरता येणार आहे. तसे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पालिकेतील सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.

'आधार' अपडेटसाठी ५० यूसीएल कीट

आधार केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांमध्ये सुमारे ८० टक्के नागरिक हे आधारकार्डमध्ये माहिती अद्ययावत करण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी येत आहेत. हे काम अवघ्या पाच मिनिटांत करणारी ‘अपडेट्स क्लाइंट लाइफ’ (यूसीएल) हे ५० कीट येत्या दोन ते तीन दिवसांत प्रशासनाकडे येणार आहेत. शहरातील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये असलेल्या केंद्रांमध्ये ही कीट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे,’ असे ‘आधार’ चे नोडल ऑफिसर तहसीलदार विकास भालेराव यांनी सांगितले.

मल्टिप्लेक्‍स मध्ये बाहेरून पाण्याची बाटली आणि खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार

मल्टिप्लेक्‍सचालकांनो, ग्राहकांची लूट थांबवा 
एमआरपीपेक्षा जास्त दराने वस्तूंची विक्री करता येणार नाही 
राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती अध्यक्ष अरुण देशपांडे यांची माहिती
प्रभात वृत्तसेवा
पुणे – मल्टिफ्लेक्‍समध्ये बाहेरून पाण्याची बाटली अथवा खाद्यपदार्थ नेण्यास ग्राहकांना मज्जाव करता येणार नाही. त्याचबरोबर मल्टिफ्लेक्‍समध्ये एमआरपीपेक्षा (वस्तूची किमान निश्‍चित किंमत)जास्त किंमतीने वस्तूंची विक्री करता येणार नाही, अशी माहिती इशारा राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आकुर्डीत संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालय सुरू होणार; आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश

निर्भीडसत्ता न्यूज – 
आकुर्डी येथील अप्पर तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे कार्यालय सुरू करण्यासाठी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या कार्यालयासाठी पदनिर्मिती करण्याबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

[Video] रावेत आकुर्डी परिसरात धुक्याची चादर

रावेत आकुर्डी परिसरात धुक्याची चादर परिसरातील नागरिकांना सिमला कुलू मनालीचा आनंद

चिंचवडमध्ये एक्‍साईडतर्फे स्वच्छतागृह

पिंपरी - एक्‍साईड इंडस्ट्रीज कंपनीतर्फे व्यावसायिक-सामाजिक बांधिलकी (सीएसआर) उपक्रमातून चिंचवड येथील एसकेएफ कंपनीजवळ बांधलेल्या महिला व पुरुषांसाठीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे हस्तांतर गुरुवारी पालिकेकडे केले. 

सायकल मिळाली? …आम्ही नाही पाहिली!

– लाभार्थींची यादी गायब :चार हजार सायकलींचा घोळ उघड 
– महापालिकेचा कारभार : लेखा परिक्षणात दीड कोटींला आक्षेप
विकास शिंदे 
पिंपरी – महापालिका नागर वस्ती विकास योजनेतून आठवी ते बारावीतील आर्थिक दुर्बल मुलींना व मागास विद्यार्थ्यांतील शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी मोफत सायकल वाटप करते. 2011-12 आर्थिक वर्षांत विविध योजनेंतर्गत सायकली वाटप करून 1 कोटी 39 लाख 32 हजार रुपये एवढा खर्च केला; मात्र त्या लाभार्थींची यादीच नागर वस्ती विभागातून गायब झाली. त्यामुळे सायकलींचे वाटप खरेच झाले का? की सव्वा कोटी रुपये खर्ची दाखवून ते पैसे हडप केले? याबाबत राज्य शासनाच्या स्थानिक निधी लेखा परिक्षणातून उघड झाले आहे.

एक मूठ अनाथांसाठी संकल्पनेतंर्गत विद्यार्थ्यांनी गोळा केले धान्य

भोसरी – श्री अष्टविनायक एज्युकेशन सोसायटी संचालित श्रमजीवी माध्यमिक विद्यालयात एक मूठ अनाथांसाठी ही मुष्टी धान्य संकल्पना राबविण्यात आली. या संकल्पनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अनाथ मुलांसाठी तब्बल 15 पोती धान्य एकत्र केले.

काळेवाडी-रहाटणीतील पदपथ “गिळंकृत’

काळेवाडी – रहाटणी व काळेवाडी परिसरातील बहुतेक रस्त्यांवरील पदपथांवर अतिक्रमण झाले आहे. तसेच, वाहन पार्किंगसाठीही पदपथांचा वापर केला जात आहे. परिणामी, परिसरातील पदपथ “गिळंकृत’ झाले का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

हिंजवडीचा पर्यायी रस्ता अखेर ‘ट्रॅक’वर

एप्रिलपर्यंत काम पूर्ण करा : पालकमंत्री बापट यांचे आदेश, मुंबईत बैठक 

पुणे /पिंपरी – ‘आयटी हब’मध्ये पोचताना वाहतूक कोंडीमुळे आयटीयन्सची होणारी दमछाक रोखण्यासाठी हिंजवडीच्या पर्यायी रस्त्यांचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीष बापट यांनी दिले आहेत. विशेष बाब म्हणून चांदे-नांदे या रस्त्याची निविदा एका महिन्यात काढण्याचा निर्णय मुंबईतील विशेष बैठकीत घेण्यात आला.
हिंजवडी आयटी पार्क मधील समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मंत्रालयात गुरुवारी (दि.7) विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी सौरभ राव, “पीएमआरडीए’चे आयुक्त किरण गित्ते, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Traffic cops fine 2500 violators on 1st day

Summary: On Thursday, the special drive was executed on 28 stretches in Pune and Pimpri Chinchwad. The entire strength of the traffic branch was on duty during the drive. Also, the police have put up 300 traffic awareness posters at these junctions. "The constable will make an announcement by referring to the registration number, following which the rule violator will be taken off the road and asked to follow the traffic rules," Morale said. A police constable at the chowk will keep an eye on motorists who park their vehicles on zebra crossings, jump signals, helmetless riders or drivers not using seat belts.

25 years on, this institute continues to share waste management tips

At a time when cities are struggling to deal with heaps of garbage, here is an organisation that is focusing on decentralization of waste. City-based Institute Of Natural Organic Agriculture has been providing sustainable waste management solution for the past 25 years. Founded in 1992 by Late M R Bhidey and R T Joshi

सुधारीत विकास आराखड्याचा स्थायी करणार अभ्यास

पिंपरी – महापालिकेच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा पारंपरिक पध्दतीने सुधारित करण्याऐवजी पालिकेच्या संपूर्ण क्षेत्राचा सखोल अभ्यास करून अद्यावत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार आहे. आता त्यासाठी खासगी सल्लागार संस्था नेमण्याच्या हालचाली असून संपूर्ण अभ्यास होईपर्यंत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीने हा विषय लांबणीवर टाकला आहे.

पीएमआरडीएचा डीपी वर्षभरात पूर्ण करणार

आयुक्‍त किरण गित्ते : जमीन वापर नकाशा तयार
पुणे- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) विकास आराखडा (डीपी) तयार करण्याचे काम सुरू आहे. पीएमआरडीएचा विकास आराखडा एक वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली आहे.