Thursday, 13 April 2017

मराठी शाळांच्या भूखंडावर इंग्रजी शाळांचा ‘गोलमाल’

नव्या भूखंड वाटपात मराठी-इंग्रजी शाळांचा मुद्दाच वगळला
मराठी माध्यमातील शाळांना प्रोत्साहन मिळावे म्हणून िपपरी प्राधिकरणाने अशा शाळांसाठी १२ भूखंड आरक्षित केले होते. त्यातील चार भूखंडांचे वाटप झाले, तेव्हा त्यावर व्यावसायिक स्वरूपातील इंग्रजी शाळा सुरू करण्यात आल्या. शासनाची फसवणूक झाल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतरही प्राधिकरणाने कोणतीही कारवाई केली नाही. अजूनही केवळ कागदी घोडे नाचवण्याचे काम सुरू आहे. उर्वरित आठ भूखंडांचे वाटप करताना अडचणीचा ठरलेला मराठीचा मुद्दा पूर्णपणे वगळण्यात आला असून, शैक्षणिक संस्थांसाठी भूखंड वाटप अशी पळवाट शोधण्यात आली आहे.

[Video] मुंढेंना पिंपरी चिंचवडचे आयुक्त करा


Pimpri Chinchwad general secretary urges for expansion of Nigdi bus depot

The transport utility, the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited, has ten bus depots, three in Pimpri Chinchwad, and seven in Pune. The ministry of urban development, during its meeting in New Delhi while reviewing projects under the Jawaharlal ...

PCMC standing comm demands missing audit reports in various depts

Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) standing committee chairman, Seema Savale, ordered the civic administration on Wednesday to produce audit reports papers of Rs 1,700 crore in funds that are reportedly missing from various civic ...

Pimple Saudagar-Wakad gets PCMC nod for 'smart' area development

Neelkanth Poman, the chief information and technology (IT) officer of PCMC, said, "We shall be installing pollution measurement and display devices across the city for monitoring pollution. A control and command area would be set up to monitor the ...

“बीआरटी’त खासगी वाहनांना पुन्हा “नो एन्ट्री’च?

तुकाराम मुंढे यांच्या सूचना : “पीएमपी’ प्रवाशी मंचची तक्रार
  • अमोल शित्रे 
पिंपरी – निगडी ते दापोडी “बीआरटी’ मार्गात खासगी वाहनांना प्रवेश बंदच राहण्याची चिन्हे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा “बीआरटी’ मार्ग खासगी वाहनांसाठी खुला करावा, अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केली होती. मात्र, खासगी वाहनांना या मार्गावर “एन्ट्री’ दिल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे नागरिकांच्या जीवावर बेतेल असा निर्णय घेता येणार नाही. खासगी वाहनांसाठी खुला केलेला “बीआरटी’ मार्ग पुन्हा बंद करावा, अशा सूचना “पीएमपीएमएल’चे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

पीएमपी अधिकाऱ्यांच्या कामात बदल

तुकाराम मुंढे यांचा निर्णय, प्रशासकीय जबाबदारी सुषमा कोल्हेंकडे
पुणे – पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळाला मार्गावर आणण्यासाठी पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांच्या कामामध्ये बदल करण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे. पीएमपीची प्रशासकीय जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा कोल्हे यांच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे कामकाजात सुसूत्रता आणणे आणि कर्मचाऱ्यांसह विविध विभागांच्या

महामार्गावरील वृक्षतोडीबाबत आज सुनावणी

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गाच्या निगडी ते देहूरोडदरम्यान रुंदीकरणास अडथळा ठरणारे २६१ वृक्ष तोडण्यात आले. त्यावरील हरकतींकडे दुर्लक्ष करून वृक्षतोड सुरूच ठेवल्याने ह्यूमन राइट्‌स संस्थेने हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. त्यावरील दुसरी सुनावणी उद्या (ता. १३) होत आहे. 

औंध रुग्णालयातील उपाहारगृह धूळ खात

पिंपरी - मेट्रो रक्तपेढीप्रमाणे औंध येथील जिल्हा रुग्णालयासाठी बांधण्यात आलेले उपाहारगृह तब्बल पाच वर्षांपासून विनावापर पडून आहे.  
औंध रुग्णालय आवारातील रुग्णालय इमारतीसमोरील चहा-नाश्‍त्याची टपरी नुकतीच जळून खाक झाली. सुदैवाने ही घटना मध्यरात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र रुग्णालयाचे उपाहारगृह बांधून तयार असताना, ते चालविण्याबाबत प्रशासन उदासीन का? शासनाच्या लाखो रुपयांची उधळपट्टी कशासाठी, असा संतप्त सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. 

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची २६,२७ रोजी बैठक

पिंपरी - भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या पिंपरी- चिंचवड शहरात होणाऱ्या त्रैमासिक दीर्घ बैठकीत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, तसेच अन्य काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला भुईसपाट केल्यानंतर या पक्षाने पुन्हा डोके वर काढू नये यासाठी महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपचे पाय या बैठकीच्या माध्यमाद्वारे शहरात आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न आहे. येत्या २६ व २७ एप्रिलला ही बैठक होणार असून, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीचे एक हजाराहून अधिक सदस्य, मंत्रिगण, खासदार, आमदार उपस्थित राहणार असल्याचे समजते.

चिखली ‘आरटीओ’ची सूत्रे आनंद पाटलांच्या हाती

मोशी - पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांची कराडला बदली झाली असून त्यांच्या जागी आनंद पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी बुधवारी (ता. १२) शिंदे यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. 

काळेवाडी फाट्यावर वाहतुकीचा बट्ट्याबोळ

काळेवाडी - औंध-किवळे बीआरटी मार्गावरील काळेवाडी फाटा येथील धर्मवीर संभाजी महाराज चौकाला अतिक्रमणांनी वेढले आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे चौक ओलांडणे नागरिकांसाठी जीवघेणे झाले असून, वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. याकडे महापालिका व पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे.

पिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी

पिंपरी, (प्रतिनिधी) – प्लॅस्टिक पिशव्यांचा वाढता वापर आणि त्यातून पर्यावरणाला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन पिंपळे सौदागरचे नगरसेवक विठ्ठल काटे यांनी प्लॅस्टिक बॅग्ज हा उपक्रम हाती घेतला आहे. उद्या, गुरुवार दि. 15 तारखेपासून उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

…तर साफसफाई संस्थांवर फौजदारी करणार!

  • स्थायी समितीचा निर्णय ः कामगारांची पिळवणूक थांबवा
पिंपरी, (प्रतिनिधी) – साफसफाई व कचरा गोळा करणाऱ्या कंत्राटी कामगारांची पिळवणूक करुन त्यांचा “ईएसआय’, “पीएफ’ व किमान वेतन न देणाऱ्या आरोग्य विभागातील 68, तर स्मशानभूमीचे कामकाज करणाऱ्या 41 संस्थांची चौकशी करुन दोषी आढळणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाकडून फौजदारी दाखल करावी, अशा सूचना स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी आरोग्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

चिंचवड लिंकरोडवर साडेतीन लाखांचा बेकायदा मद्यसाठा जप्त

पिंपरी, (प्रतिनिधी) – राज्य उत्पादन शुल्क विभागाने पिंपरी-चिंचवड लिंकरोडवर साडे तीन लाख रुपये किंमतीचा विदेशी मद्याचा बेकायदा साठा एका वाहनातून जप्त केला. याप्रकरणी वाहन चालकाला अटक केली आहे. विजय सुरेश ठाणगे (वय 34, रा. आदर्शनगर, श्रीरामपुर, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या वाहनचालकाचे नाव आहे.

लेखापरीक्षण विभागाकडून 1 हजार 700 कोटींचा गोलमाल?

चौकशीची मागणी ः सन 2000 पासून पाठपुरावा
पिंपरी, (प्रतिनिधी) – सन 1982-83 ते 2014-15 या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण करताना 33 हजार 777 आक्षेप घेण्यात आले आहेत. विशेष लेखापरीक्षणातील आक्षेपाधीन 1 हजार 787 कोटी 54 लाख 4 हजार 65 एवढी रक्कम संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. लेखापरीक्षणातील आक्षेपांवर तुरंत कार्यवाही सुरू करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी सन 2000 पासून सातत्याने लावून धरली. मात्र, महापालिका प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. स्थानिक पातळीवर कारवाई होत नसल्यामुळे आक्षेपाधीन रक्कम वसूल करुन आठ दिवसांत दोषींवर कारवाई करावी, अशी तक्रार भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आयुक्तांसह लेखा परीक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.