Saturday, 21 December 2013

Property tax defaulters in PCMC areas to face the music

Taking a leaf out of the Pune Municipal Corporation's book, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has employed 10 bands to play music outside the houses of property tax defaulters.

Open DP boxes pose major threat

PIMPRI: Many Distribution Point (DP) boxes of the Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) are lying dangerously open in the Pimpri Camp area.
Open DP boxes pose major threat

मिळकतकर वसुलीसाठी बँडपथकाची नियुक्ती बेकायदेशीर

मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अभिनव उपक्रम म्हणून दहा बँड पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा उपक्रम बेकायदेशीर आणि राज्यघटनाविरोधी असल्याचे मत नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

शहरात काही ठिकाणच्या रस्त्यावर 'नो पार्किंग '

वाहतूक सुरळीत करण्यासाठी आकुर्डी, चिंचवडगाव आणि पिंपळे सौदागर येथील काही रस्त्यांवर वाहतूक पोलिसांकडून समविषम पार्कीग आणि नो पार्किंग करण्यात आली आहे.

पोलिस व्हेरिफिकेशन ऑनलाइन

पासपोर्टसाठी आवश्यक असलेल्या पोलिस ‘व्हेरिफिकेशन’साठी करावी लागणारी दीर्घ प्रतीक्षा आता थांबणार आहे. पासपोर्ट कार्यालयात कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर लगेचच पोलिस व्हेरिफिकेशनची माहिती शहरातील पोलिस ठाण्यांना ऑनलाइन कळविण्यात येणार आहे.

विधिमंडळाचे अधिवेशन संपताना पिंपरीतील आमदारांचे राजीनामे मागे

मुख्यमंत्र्यांवर टीका करत राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलेले राजीनामे कोणताही निर्णय होण्याआधीच मागे घेतले.

राजीनामा दिलेले नगरसेवक सांगा

पिंपरी : अनधिकृत बांधकाम प्रश्नी तोडगा निघत नाही, म्हणून आमदारांनी राजीनामा दिल्याची घोषणा करताच, त्यांना पाठिंबा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४0 नगरसेवकांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केले. परंतु विषय समित्या, स्थायी समिती सभा, तसेच नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेला अनेक नगरसेवक हजेरी लावत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर महापालिका सभा संपताच शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी महापौर मोहिनी लांडे यांची भेट घेतली. राजीनामा दिलेल्या नगरसेवकांची यादी मागितली. यादी उपलब्ध होत नसल्याने त्यांनी महापौरांना कोंडीत पकडले. नागरिकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार थांबवा. राजीनामानाट्य पुरे झाले, असेही सुनावले.

सूडबुद्धिने दूरध्वनी सेवा केली बंद

पिंपरी : शासकीय, निमशासकीय कार्यालये आता संगणकीकरणाने जोडली जात असून, कारभार लोकाभिमुख होत असल्याचे चित्र निर्माण होत असताना, शासकीय सेवांच्या दर्जात अद्यापही अपेक्षित सुधारणा घडून येत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. कटू अनुभवांना सामोरे जावे लागते, अशी तक्रार सुयोग सपकाळ यांनी केली. 

स्मशानभूमी सुरक्षेचा खर्च पाण्यात?

रहाटणी : पिंपरी-चिंचवड शहरातील स्मशानभूमीची सुरक्षा चांगल्या प्रकारे ठेवली जावी म्हणून पालिकेच्या वतीने ठेका पद्धतीने शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांना सुरक्षेचा ठेका देण्यात आला आहे. यावर महापालिका प्रशासन लाखो रुपये खर्च करीत असले तरी स्मशानभूमीची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सुरक्षेवरचा खर्च पाण्यात जात असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. 

बॅण्डपथकास विरोध

पिंपरी : मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी बँडपथक नियुक्तीस नागरी हक्क सुरक्षा समितीने आयुक्त श्रीकर परदेशी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे विरोध दर्शविला आहे.

संवेदनशील, सुजाण नागरिक घडवावेत

पिंपरी : शिक्षकांनी विद्यार्थी घडवताना संवेदनशील, सुजाण नागरिक घडविण्याचा प्रयत्न करावा असे मत महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.श्रीकर परदेशी यांनी व्यक्त केले.

’ताथवडे’चा प्रस्ताव 20 दिवस लांबणीवर

ताथवडे विकास आराखड्याच्या मुद्दयावरुन सत्तारुढ राष्ट्रवादीमध्ये गटतट उफाळल्याने महासभाच लांबणीवर टाकण्याची खेळी आज (शुक्रवारी) खेळण्यात आली. त्यामुळे मागील दोन सभांमध्ये तहकूब ठेवण्यात आलेला ताथवडेचा प्रस्ताव आणखी 20 दिवस लांबणीवर पडला आहे.

ताथवडे ग्रामस्थांकडून विकास आराखड्याचे समर्थन

ताथवडे विकास आराखड्यावरुन सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये जुंपली असताना ताथवडे ग्रामस्थांनी मात्र विकास आराखड्याचे समर्थन केले आहे. विकास आराखडा नियोजन समितीने सुचविलेले बदल शेतक-यांसाठी हितकारक असल्याचे सांगत महापालिका सभेने त्याला मंजुरी द्यावी,

हेल्मेट सक्तीच्या विरोधात बोपखेलकरांनी रोखले सीएमईचे प्रवेशव्दार

हेल्मेट सक्ती, ओळखपत्राच्या नावाखाली लष्कराकडून होत असलेली अडवणूक आणि रस्त्यांच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ बोपखेल ग्रामस्थ आज (शुक्रवारी) रस्त्यावर उतरले. खासदार गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली सीएमईच्या प्रवेशव्दारावर ठिय्या मांडत व्दार रोखून धरले. 

पवनातीरी रंगली 'रंगतरंग'ची मैफल

पवनेच्या तीरी जमलेला वाद्यवृंद्य...प्रेक्षकांच्या टाळ्यांची भरघोस दाद.. सुगम संगीताच्या स्वरांनी चिंब झालेल्या वातावरणात 'रंगतरंग' हा संगीतमय कार्यक्रम रंगला. मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात तानसेन संगीत विद्यालय प्रस्तुत मराठी भावगीतांचा कार्यक्रम गुरुवारी (दि. 19) मोरया गोसावी समाधी मंदिराजवळील पटांगणावर सादर झाला. 

तीनही विधानसभा मतदारसंघाची 'आप'ची कार्यकारणी लवकरच

आम आदमी पक्षाच्या वतीने आज (दि.19) आम आदमी पक्षाची ध्येयधोरणे, कार्यक्रमाची माहिती तसेच पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघाची कार्यकारिणी स्थापन करण्यासाठी प्राथमिक चर्चा बैठक मोहननगर येथील महादेव मंदिरात झाली. येत्या आठवडाभरात दिवसांत कार्यकारणी निवडून जाहीर करण्यात येणार आहे.