पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीला वाढता विस्तार आणि विकासाबरोबरच जलप्रदूषणाच्या समस्येचा मोठा विळखा आहे. हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा, नियमांची पायमल्ली आणि यंत्रणांचा अभावा यामुळे दिवसेंदिवस या प्रदूषणात वाढ होत आहे. प्रशासनाने प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना ठोसपणे अमलात येऊ शकत नाहीत.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 15 December 2013
विद्यापीठ होणार चकाचक.!
पुणे : पुणे विद्यापीठ परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक महिन्यातील एका रविवारी विद्यापीठामध्ये ‘स्वच्छता जागृती अभियान’ राबविले जाणार आहे. या अभियानात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. विद्यापीठातील विद्यार्थी कमवा व शिका योजनेंतर्गत विद्यापीठातील परिसर स्वच्छ ठेवतात. परंतु, विद्यापीठचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे हे ‘स्वच्छता जागृती’ अभियानात सहभागी होऊन विद्यार्थ्यांबरोबर विद्यापीठाचा परिसर स्वच्छ करणार आहेत. येत्या रविवारी सकाळी ६.३0 ते ९.00 या कालावधीत ही स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे.
चिंचवडगाव-चांदखेड पीएमपी बससेवा सुरू
आढले बुद्रुक : चिंचवडगाव ते चांदखेड पीएमपी बससेवा नुकतीच सुरु झाली. चांदखेड व परिसरातील दहा गावांतील नागरिकांचा रोज हिंजवडी, पिंपरी-चिंचवड, वाकड, डांगे चौक आदी गावांशी संपर्क येत असतो. तसेच हिंजवडी आयटी पार्कमध्ये जाणारा कामगारवर्गही मोठय़ा प्रमाणामध्ये असल्यामुळे बर्याच दिवसांपासून प्रवाशांची बससेवा सुरू करण्याची मागणी होती.
चिंचवडगाव येथून सुटणारी बस चिंचवडगाव मार्गे डांगे चौक, वाकड, हिंजवडी, मारुंजी, नेरे, कासारसाई अशी सुटणार असून, त्यामुळे या गावांतील प्रवाशांची सोय होणार आहे.
चिंचवडगाव येथून सुटणारी बस चिंचवडगाव मार्गे डांगे चौक, वाकड, हिंजवडी, मारुंजी, नेरे, कासारसाई अशी सुटणार असून, त्यामुळे या गावांतील प्रवाशांची सोय होणार आहे.
100 mobile phones lost at Pimpri's agri exhibition
As many as 100 people among those who had come to see an agriculture exhibition on HA Grounds in Pimpri on Saturday reportedly lost their mobile phones. However the police have claimed that only 20 people have lodged complaints with them. The Detection Branch (DB) officials of the Pimpri police have arrested a 19-year-old person in this connection. He was allegedly found taking undue advantage of the crowd at the exhibition.
Subscribe to:
Posts (Atom)