औंध - पुणे-मुंबई मार्गावरील बोपोडीच्या गांधीनगर परिसरात गेली पस्तीस वर्षे असलेली वस्ती आज पूर्णपणे हटविण्यात आली. पुणे-मुंबई मार्गावर बोपोडीत उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यासाठी येथील झोपड्या हटविण्यात आल्या. पस्तीस वर्षे जपलेले ऋणानुबंध तुटल्याचे भाव येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होते; तसेच भावनिक संबंध जुळलेले शेजारी दुरावणार असल्याचे दुःखही दिसत होते.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 30 June 2018
PCMC to adopt bike sharing schemes and pedestrian corridors
Following in the footsteps of the Pune Municipal Corporation (PMC), Pimpri-Chinchwad is going to adopt bicycle sharing schemes, along with other forms of non-motorised transport under the Smart City Mission. Pimpri-Chinchwad is also planning to set up pedestrian corridors in five roads.
१ हजार २८८ सदनिका बांधकामाच्या प्रस्तावास मंजुरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहराच्या विविध भागातील १० ठिकाणी ९ हजार ४५८ सदनिका बांधण्याचे नियोजन केले आहे. बो-हाडेवाडीत १ हजार २८८ सदनिका बांधण्यासाठी १२३ कोटी ७८ लाखांचा खर्च येणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी घेतली जाणार आहे.
समाविष्ट गावातील रस्त्यांची कामे रखडली
नगरसेवक डोळस यांनी अधिकार्यांना घेतले फैलावर
पिंपरी-चिंचवड : समाविष्ट गावातील रस्त्यांच्या कामांना स्थायी समितीने मंजुरी देऊनही ती कामे रखडली आहेत. अधिका-यांनी जाणीवपूर्वक ही कामे रखडविली आहेत. अधिका-यांनी शहरातील विकासाची कामे करणे अपेक्षित आहे, राजकारण नव्हे, असा हल्लाबोल करत भाजपचे नगरसेवक विकास डोळस यांनी अधिकार्यांना स्थायीच्या सभेत चांगलेच फैलावर घेतले.
पिंपरी-चिंचवड : समाविष्ट गावातील रस्त्यांच्या कामांना स्थायी समितीने मंजुरी देऊनही ती कामे रखडली आहेत. अधिका-यांनी जाणीवपूर्वक ही कामे रखडविली आहेत. अधिका-यांनी शहरातील विकासाची कामे करणे अपेक्षित आहे, राजकारण नव्हे, असा हल्लाबोल करत भाजपचे नगरसेवक विकास डोळस यांनी अधिकार्यांना स्थायीच्या सभेत चांगलेच फैलावर घेतले.
सहा कोटीच्या कामांना मंजुरी; स्थायी समिती सभेत निर्णय
पिंपरी : चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणार्या सुमारे एक कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली. जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी मनपा कार्यक्षेत्रामधील आकुर्डी येथे मुक्कमी असते वारकर्यांना एक तातडीची व विशेष बाब म्हणून मोफत वैदयकीय सुविधा देण्यास येणार्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
मोरवाडी आयटीआयतील 33 विद्यार्थ्यांना मिळाला रोजगार
शैक्षणिक सामंजस्य कराराव्दारे ‘करिअर डे’मधून 33 विद्यार्थ्यांची निवड
टोयोटा किर्लोस्कर मोटर्सव्दारे विविध ठिकाणी नोकरी
टोयोटा किर्लोस्कर मोटर्सव्दारे विविध ठिकाणी नोकरी
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या मोरवाडी आयटीआय येथील विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या ’करिअर डे’ मधून 33 विद्यार्थ्यांना टोयोटा कंपनीत ‘टेक्निशियन’ म्हणून रोजगार मिळाला आहे. मुलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आयटीआय आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्स यांच्याशी शैक्षणिक सामंजस्य करार झाला आहे.
#SaathChal ‘साथ चल’साठी रोटरीचाही निर्धार
पिंपरी - ‘सकाळ’ आणि ‘फिनोलेक्स केबल्स’च्या ‘साथ चल’ या उपक्रमात सर्व सभासदांसह सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प निगडी रोटरी क्लबने शुक्रवारी (ता. २९) केला.
पिंपरी शहराचे पाणी मुख्यमंत्र्यांच्या हाती
पिंपरी - पवना जलवाहिनी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी आता केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेची आवश्यकता आहे. पालकमंत्री गिरीश बापट, स्थानिक राजकीय नेत्यांनी या प्रकल्पाला चालना देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू केले. विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीत या संदर्भात बैठक होऊन प्रकल्पाला मान्यता मिळाल्यास शहरवासीयांची पाणीपुरवठ्याची समस्या संपेल.
कुदळवाडीत ८ बांधकामे जमीनदोस्त
चिखली- पिंपरी-चिंचवड महापालिकेने शुक्रवारी (ता. २९) अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. त्यात कुदळवाडी येथील सुमारे ५०० चौरस फुटांची आठ बांधकामे पाडली. मोठ्या पोलिस बंदोबस्तात केलेल्या कारवाईमुळे विशेष विरोध झाला नाही.
उद्यानाच्या जागेवर अतिक्रमण
पिंपरी - चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील आयुर्वेदिक वनौषधी उद्यानाच्या जागेवर खासगी प्रवासी कंपन्यांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत महापालिका आणि एमआयडीसी प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवीत आहे.
पिंपळे गुरव येथे साईड पट्ट्या खचल्या, रस्ता दुरूस्तीची मागणी
जुनी सांगवी (पुणे) : रस्त्याच्या साईड पट्ट्या खचल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक रस्त्याचे खोदाई काम काही दिवसांपुर्वी करण्यात आले होते. त्याजागी पालिका प्रशासनाकडुन खडी टाकुन खोदकामांचे चर भरण्यात आले. मात्र जड वाहने रस्त्यावरून गेल्यास याभागातील रस्ते खचल्याने मोठ्या गाड्या फसण्याचे प्रकार वाढले आहेत. गाड्या अडकुन राहिल्याने वहातुककोंडी होवुन रहदारीस अडथळा होत आहे. याच भागात शाळा असल्याने शाळकरी मुलांना रहदारीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे चारचाकी वाहने खचत आहेत. त्यामुळे ही कामे दर्जेदार करावीत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमरसिंह आदियाल यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निकला अधिस्विकृती प्रमाणपत्र
पिंपरी – पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निक महाविद्यालयाचा (पीसीपी) राष्ट्रीय अधिस्विकृती प्रमाणपत्र संस्थेने (नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन) नुकतेच राष्ट्रीय अधिस्विकृती प्रमाणपत्र देऊन गौरव केला.
पोलिसांचे “ऑपरेशन ऑल आऊट’
पिंपरी – पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनमध्ये पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली “ऑपरेशन ऑल आऊट’ राबविण्यात आले. या मोहिमेत तडीपार, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, रेकॉर्डवरील, फरार अशा वेगवेगळ्या गुन्ह्यातील तब्बल 389 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. मोहिमेत परिमंडळ तीन मधील 50 अधिकारी आणि 400 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. ही मोहीम गुरुवारी (दि. 28) रात्री नऊ ते रात्री बारा वाजेपर्यंत परिमंडळ तीनच्या हद्दीत राबविण्यात आली.
Pune: MahaMetro starts survey on 2 routes
PUNE: The Maharashtra Metro Rail Corporation (MahaMetro) on Friday said it has initiated a baseline survey of properties, including homes, slums and shops, which will be demolished since they fall on Metro route.
Financial closure of Pune Metro nears completion
PUNE: The Department of Economic Affairs (DEA) has posed Pune Metro Rail Project to funding agencies European Investment Bank (EIB) to the tune of 600 million euros and AFD for the balance 245 million euros.
बीआरटीएस मार्ग तातडीने सुरू करण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम अर्थात बीआरटीएस प्रकल्प हाती घेतला. सुरुवातीला मोठा गाजावाजा झाला. परंतु, मागील अडीच वर्षात बीआरटीएस प्रकल्पांकडे महानगरपालिका प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता हा बीआरटीएस मार्ग सुरू करण्यामागील प्रमुख अडथळा चिंचवड येथील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचा होता. हा उड्डाणपूल सुरू झाल्याने महापालिकेने हा रखडलेला काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटीएस मार्ग तातडीने सुरू करावा, अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
वटपौर्णिमेनिमित्त ‘इसीए’ने केले ठिकठिकाणी वृक्षारोपण!
पिंपरी-एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए ) तर्फे पिंपरी चिंचवड शहरा मधील सर्व शाळा व शैक्षणिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनासोबत वृक्षारोपणाचे उपक्रम राबविले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची गोडी निर्माण करण्याचे कार्य केले. २७ रोजी सिटी प्राईड स्कूल, निगडी, जयवंत भोईर प्राथमिक शाळा भोईरनगर / महाराष्ट्र कल्याण केंद्र, चिंचवड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, उद्यान विभाग पिंपरी, निवृत्त शिक्षक संघ, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए ) च्या एकत्रित उपक्रमातून महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राच्या आवारात व बाहेरील बाजूस ३९ बारतीय वंशाची रोपे लावण्यात आली.
शहराच्या पर्यावरणाची चुकीच्या धोरणांमुळे दुर्दशा
पिंपरी – शहराच्या पर्यावरणाची दुर्दशा ही महापालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे होत असल्याचा आक्षेप घेत यात त्वरीत सुधारणा करण्याची मागणी पर्यावरण संवर्धन समिती (इसीए) या सामाजिक संस्थेने केली आहे. संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी महापौरांना संबोधित करून पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहरातील विकास व पर्यावरण यामध्ये काहीतरी मोठी गडबड सुरू आहे. आपण शहरातील सर्व नद्या प्रदूषित करत आहोत. अनावश्यक बाबींवरच जास्त लक्ष केंद्रित करत आहोत. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सोयीस्कर रित्या पांघरुन घालून प्रलंबित ठेवण्यात येत आहे.
भक्ती-शक्ती उद्यान सुशोभिकरणाची मागणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची ओळख असलेल्या भक्ती-शक्ती उद्यानाचे सुशोभिकरण करण्याची मागणी मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे.
भाजपातील पानसरे समर्थक अस्वस्थ
राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्यात सिंहाचा वाटा असणार्या माजी महापौर आझम पानसरे यांना पक्षाकडून दीड वर्ष उलटूनही अद्याप कुठलेच सन्मानीत पद दिले गेले नसल्याने पक्षातील पानसरे समर्थक अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. आगामी विधान परिषदेतील निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीत पानसरे यांचा क्रमांक लागावा म्हणून पालकमंत्री गिरीश बापट, भाजपाचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप व अपक्ष आ. महेश लांडगे यांनीही पक्षश्रेष्टींकडे जोर लावला आहे. परंतु; भाजपा पक्षश्रेष्टी तरी पानसरे यांना न्याय देतात का? याकडेच आता भाजपा कार्यकर्त्यांसह पानसरे समर्थकांचे डोळे लागले आहेत.
आयुक्तांनी अगोदरच अभ्यास केला नव्हता का?
सत्ताधार्यांच्या दबावाखाली कामकाज करता, कामाच्या पद्धतील बदल करा
258 कोटींचे विषय वर्गीकरणावरून विरोधकांचा आयुक्तांवर हल्लाबोल
258 कोटींचे विषय वर्गीकरणावरून विरोधकांचा आयुक्तांवर हल्लाबोल
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांना तात्पुरता दिलासा
पिंपरी – भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या जात प्रमाणपत्राची फेरपडताळणी करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिला आहे. त्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे महापौरपदाचे प्रबळ दावेदार असलेले शत्रुघ्न काटे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
मल्टीप्लेक्सच्या मनमानीच्या निषेधार्थ मनसेचे आंदोलन
पिंपरी – मल्टी प्लेक्समध्ये खाद्यपदार्थ छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विकले जातात. तसेच बाहेरील खाद्यपदार्थ मल्टीप्लेक्स नेण्यास परवानगी असताना देखील मल्टी प्लेक्समध्ये ते नेऊ दिले जात नाही. याच्या निषेधार्थ शहरातील विविध मल्टीप्लेक्समध्ये मनसेच्या वतीने शुक्रवारी (दि. 29) आंदोलन करण्यात आले. यावेळी बिग सिनेमाच्या बाहेरील फलक फाडण्यात आला. तसेच खाद्य पदार्थ विक्री स्टॉल मधील पॉपकॉन फेकत मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Subscribe to:
Posts (Atom)