Wednesday, 22 April 2020

PCMC covers over 12L citizens in health survey


Pune, Pimpri-Chinchwad sealing has good results

The total sealing of Pune and Pimpri-Chinchwad cities - the worst-hit after Mumbai by the Covid-19 pandemic - since Monday seemed to have had the desired effect with no fresh deaths reported from there over past two days, officials said. 

To get early treatment for co-morbid patients, PCMC seeks help from housing societies, senior citizens’ groups


Covid-19 PCMC War Room | 21 Apr Zone wise stats & containment areas


Covid-19 PCMC War Room | 21 Apr City Dashboard


शहरातील 36 ठिकाणी ‘फ्ल्यू क्लिनिक’ सज्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंडवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात प्राधान्याने कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत देखील वाढ होत आहे. त्यामुळे सर्दी, ताप खोकला या रुग्णांसाठी महापालिकेची आठ आणि खासगी 28 अशी 36   ‘फ्ल्यू  क्लिनिक’ (दवाखाने) सज्ज ठेवली आहेत. त्याची यादी जाहीर केली आहे. ‘या’ ठिकाणी आहेत खासगी क्लिनिक संभाजीनगर, घरकुल, […]

जाधववाडीतील आग 21 तासानंतरही धुमसतेय; भंगार गोडाऊन मालकांचे सहकार्य मिळत नसल्याने अग्निशमन विभाग आणि परिसरातील नागरिकांना नाहक त्रास

एमपीसी न्यूज – जाधववाडी येथे भंगारच्या गोडाऊनला लागलेली आग 21 तासानंतर अजूनही धुमसत आहे. मध्यरात्री बंद कॅन, केमिकल डब्यांचे स्फोट झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्लास्टिक आणि अन्य रसायनमिश्रित भंगार उलटेपालटे करणे गरजेचे आहे. त्यासाठी भंगार गोडाऊन मालक अग्निशमन विभागाला सहकार्य करत नसल्याने धुराचे लोट अजूनही हवेत उडत आहेत. धुरामुळे अग्निशमन विभागाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी […] 

पिंपरी-चिंचवड शहरातील पोलिसांना सुरक्षा साधनांचे वाटप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील सर्व पोलिसांना सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले. मंगळवारी (दि. 21) पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात सामाजिक अंतर राखत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव आदी उपस्थित होते. 100 मिली सॅनिटायझर, एक फेस […] 

Video : ढोल-ताशा पथक धावले भुकेलेल्यांसाठी

पिंपरी - दापोडी, कासारवाडी, भोसरी व फुगेवाडी येथे हातावरचे पोट असलेल्या गरजू बांधवांसाठी कासारवाडीतील मातृभूमी प्रतिष्ठान ढोलताशा पथक धावून आले आहे. गेल्या 21 दिवसांपासून हे पथक अहोरात्र अन्नसेवा देवून भुकेलेल्यांची भूक भागवित आहेत. 

पिंपरी-चिंचवड शहरात दररोज 15 हजारांहून अधिक गरजू लोकांना जेवण

पिंपरी - देणाऱ्याने देत जावे..घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस.. देणाऱ्याचे हात घ्यावे अशी जीवनकवी विंदा करंदीकर यांची सुपरिचित कविता आहे. सध्या त्याचीच सर्वत्र अनुभूती येत आहे. शहरातील अनेक सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था दररोज सुमारे 15 हजारांहून अधिक गरजू आणि गोरगरीब लोकांना जेवण पुरविण्यासाठी धडपडत आहेत. त्यासाठी खास काही ठिकाणी 'कम्युनिटी किचन' देखील तयार करण्यात आली आहेत. 

#Lockdown2.0 : रोजगार बुडालेल्यांना दिलासा; पहिल्याच दिवशी 50 हजार मजुरांना मिळाली आर्थिक मदत

पुणे : लॉकडाऊनमुळे रोजगार बुडालेल्या इमारत व इतर बांधकाम मजुरांना दोन हजार रुपये देण्याच्या निर्णयाचा पहिल्याच दिवशी 50 हजार मजुरांना फायदा झाला आहे. सोमवारपासून (ता.20) आर्थिक मदतीचे वाटप सुरू झाले आहे. 

पिंपरी महापालिकेच्या भाजीविक्री केंद्राचा अजब कारभार

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी, महापालिकेने प्रत्येक प्रभागामधील मोकळया जागेत किमान एक तात्पुरत्या स्वरुपातील फळे व भाजीपाला विक्री केंद्र सुरु केले आहे. मात्र, अगोदरच आर्थिक परिस्थितीने पिचलेल्या ग्राहकांना या केंद्रावर भाजीपाला अव्वाच्या सव्वा दरात विकला जात आहे. पण तिच भाजी टेम्पो विक्रेत्यांकडे स्वस्त दरात मिळत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

पोलिस पास रद्द अन् पुढे झाले असे...

पिंपरी : साहेब येतील.. तेव्हा तुमच्या अर्जावर सह्या होतील, तोपर्यंत वाट पाहा.. असे शब्द गरजू लोकांना मदत करणाऱ्या स्वयंसेवी आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या कानावर पडत आहेत. त्यामुळे, सेवाभावी कार्यकत्यांना पालिकेत पासेससाठी ताटकळत थांबावे लागत आहे. पोलिसांनी जीवनावश्‍यक सेवा वगळता इतर पासेस रद्द केल्याने पालिकेने पासेस त्वरीत द्यावेत, अशी मागणी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. 

पिंपरी : 'ते' सव्वाचारशे जण अन् पोलिस...

पिंपरी : "लॉकडाऊन' असतानाही सरकारी आदेशाचे उल्लंघन करीत विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच पिंपरी-चिंचवड शहराला कंटेन्मेंट झोन घोषित केल्याने प्रशासन अधिक सजग झाले आहे. बेशिस्त लोकांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सोमवारी (ता.20) एका दिवसात तब्बल सव्वा चारशे जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.  

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील उद्योजकांना सवलत नाही : विभागीय आयुक्त

पुणे :  कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही औद्योगिक क्षेत्रांकरीता शिथिलता दिली आहे. परंतु  पुणे, पिंपरी-चिंचवड, ग्रामीण तसेच एमआयडीसी क्षेत्रामध्ये  कोणतीच सवलत देण्यात आलेली नाही, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.  

पिंपरी-चिंचवड शहरात 21 फळे, भाजीपाला केंद्र सुरू करण्यात महापालिकेला यश

पिंपरी – शहरामध्ये 21 फळे व भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेला यश आले आहे. करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याने महापालिकेने मोकळ्या मैदानांमध्ये हे केंद्र सुरू केले आहेत. महापालिकेच्या शहरातील 7 भाजी मंडई मात्र बंद ठेवण्यात आल्या आहेत.

JioMart आणि Fecebook मिळून भारतातील किराणा दुकाने सक्षम करणार : मुकेश अंबानी

मुंबई | अमेरिकेतील सोशल मीडिया कंपनी फेसबुक ने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओसोबत मोठा करार केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या डिजिटल ऑपरेशनने रिलायन्स जिओमध्ये फेसबुकने 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. फेसबुक कंपनीची जिओमध्ये 9.99 टक्के भागीदारी विकत खरेदी केली आहे. फेसबुकने यासंदर्भात बुधवारी मोठी घोषणा केली. 

Video : हिरवे-हिरवे गार गालिचे; पिंपरी-चिंचवडमध्ये फुलांचा बहर

पिंपरी : 'हिरवे-हिरवे गार गालिचे...हरित तृणाच्या मखमालीचे...' या त्र्यबंक बापूजी ठोंबरे (बालकवी)यांच्या काव्य पंक्तीची लॉकडाउनमध्ये प्रचिती येत आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरी सध्या प्रदूषण विरहीत असल्याने शहरात सौंदर्यांने कात टाकली आहे. नागरिकांना तणाव मुक्तीतून दिलासा देणारे हे फुलांचे बहावे, गुलमोहर, नीलमोहर, बोगनवेल, पळस, गोल्डनशॉवर, जारुल हे गालिचे मनाला मोहून टाकत आहेत. 

पिंपरी-चिंचवड शहराचे पहा रात्रीचे सौंदर्य


Retailers return 2.5 lakh litres’ milk over limited sale timings


नगरसेवक शैलेश मोरे आणि देवी एज्युकेशन सोसायटीतर्फे पिंपरी पोलिस स्टेशनला ‘सॅनिटायझर टनेल’

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे भाजपाचे नगरसेवक शैलेश मोरे आणि देवी एज्युकेशन सोसायटी (तोतारामशेठ सुखवानी) यांच्या तर्फे पिंपरी पोलिस स्टेशनच्या प्रवेशव्दारावर ‘सॅनिटायझर टनेल’ बसविण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडकरांची ऑनलाईन कर भरण्यास पसंती; मोबाईल, स्मार्ट अँप, डिजिटलमुळे व्यवहारात आली सुलभता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांनी मागील आर्थिक वर्षात ऑनलाइन कर भरून डिजिटल व्यवहारास पसंती दिली आहे. एक लाख 60 हजार 231 मालमत्ताधारकांनी तब्बल 198 कोटी 66 हजार 69 रुपयांच्या कराचा ऑनलाईन भरणा केला आहे. तर, एक लाख 9 हजार 526 मालमत्ताधारकांनी रोख स्वरुपात 97 कोटी 46 लाख 74 हजार 606 रुपयांचा भरणा केला आहे. […] 

प्रभाग स्तरावर तत्पर पथके तयार करा; टेम्प्रेंचर गनद्वारे नागरिकांची तपासणी करा

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयातंर्गत तत्पर पथके तयार करावीत. यामध्ये 10 कर्मचारी असतील, अशी व्यवस्था तयार करुन त्या पथकाच्या माध्यमातुन कोरोना संदर्भातील माहिती घेवून सर्व अडचणी सोडविण्यात याव्यात. पथकांच्या माध्यमातून त्या-त्या भागात टेम्प्रेंचर गनद्वारे झोपडपट्टीतील नागरिकांची तपासणी करावी, अशा सूचना भाजप आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. […]

आयएमएचे डॉक्टर 23 एप्रिलला काळा दिवस पाळणार!

नवी दिल्ली | डॉक्टरांवरचे हल्ले थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने अध्यादेश काढावा नाहीतर 23 एप्रिलला काळा दिवस पाळण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे. हा काळा दिवस पाळण्याच्या एक दिवस आधी सरकारला व्हाईट अलर्ट देण्याचंही नियोजन इंडियन मेडिकल असोसिएशनने केलं आहे. बुधवारी म्हणजे 22 एप्रिलला रात्री 9 वाजता सर्व डॉक्टरांनी आपले पांढरे कोट परिधान करत मेणबत्ती पेटवून शांततेत या हल्ल्यांचा निषेध करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आमदारांचा नगरसेवकांशी ‘ऑडिओ कॉन्फरन्स’द्वारे संवाद; सतर्कतेच्या सूचना!

– शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांनी घेतला आढावा
– कोरोना विषाणु विरुद्धच्या लढाईत प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा संकल्प

फुगेवाडी भागातील गोरगरीब नागरिकांना पिंपरी युवासेनेतर्फे अन्न-धान्य वाटप

कोरेनाचा संसर्ग वाढल्यामुळे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकाने लॉक डाउन केले आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे व काम ठप्प झाले आहेत. आज मजूर कामगारांच्या कामावर गद्दा आली आहे. ह्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी युवासेना व आशीर्वाद महिला गटातर्फे आज फुगेवाडी मधील गरीब व मजूर लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. ह्यावेळेस पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, शीला जाधव, रमेश पवार, गोरख नेटके, महेश बोधले आदी उपस्थित होते.

वकिलांचा कोर्टापर्यंत प्रवास झाला अवघड


वीज गेली.. मोबाइलवरून ‘मिस्ड कॉल’ द्या!

टाळेबंदीच्या कालावधीत महावितरणची ग्राहकांसाठी नवी सुविधा

पुण्यातला वाकड परिसर नऊ तासापासून अंधारात

पिंपरी  : महावितरणच्या केबल फ्लॉटमुळे आज(ता.21)दुपारी तीन वाजल्यापासून वाकड परिसरातील वीज गायब झाली आहे. परिणामी, ऐन लॉकडाउन मध्ये उच्चभ्रू सोसायटीधारकांना अंधारात राहण्याची वेळ आली. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत झाला नव्हता.

कोरोनावर आता ‘आयुष’ औषधांची मात्रा

पुणे - कोरोना विषाणूंचा धोका असणारे तसेच संसर्ग झालेल्या रुग्णांवर आयुर्वेदिक औषधांचा वापर करता येईल. त्यासाठी क्लिनिकल ट्रायल (माणसांवरील तपासणी) करायला परवानगी देण्याचा निर्णय आयुर्वेद, योगशास्त्र, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष) मंत्रालयाने मंगळवारी घेतला.  

महिनाभरात पाच हजार गुन्हे दाखल

पिंपरी  – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली आहे. गेल्या महिनाभराच्या कालावधीत पाच हजार 156 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराचा पारा 39 अंशांवर

पिंपरी – एकीकडे करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता पिंपरी-चिंचवड शहरातील पाराही वाढू लागला आहे. गेल्या आठवडाभरात तापमानानेही 39 अंशाचा पारा गाठला आहे. एका बाजूला करोनामुळे एसी, कूलरचा वापर करण्यावरही काही बंधने आली असल्यामुळे शहरवासिय उकाड्यामुळे हैराण झाले आहेत.