Friday, 26 October 2018

PCMC’s 24X7 water supply projects run into trouble

The Pimpri Chinchwad Municipal Corporation’s 24X7 water supp .. 


Police to set up complaint boxes in Pune housing societies

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad police will undertake .. 


Pimpri, Chinchwad's new flat owners struck with water paucity

Thousands of flat owners in the twin towns of Pimpri and Chinchwad have been gripped with acute water shortages for a while now. These are the same habitants who had probably emptied all their savings in purchasing houses at Dighi, Moshi, Charoli, Dudulgaon, Chikali among other areas

विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे रविवारी महारक्तदान शिबीर

पिंपरी (Pclive7.com):- विश्व हिंदू परिषद बजरंग दल पिंपरी चिंचवड शहर विभागाच्या वतीने रविवारी (दि.२८) शहरात व मावळ विभागात महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. २ नोव्हेंबर १९९० रोजी कारसेवकांवर झालेल्या गोळीबारात हौताम्य प्राप्त झालेले कोठारी बंधू आणि हजारों रामभक्तांच्या स्मरणार्थ घेण्यात येणा-या या शिबीरात रक्तदान करण्या-या सर्वांना बजरंग दलाच्या वतीने टी शर्ट भेट देण्यात येणार आहेत. 

शहर परिवर्तन विकास आराखड्यासाठी पालिकेच्या शहर सुधारणा समितीचा परदेश दौरा

पिंपरी-चिंचवड शहराला नवीन स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्यासाठी पिंपरी-चिंवड महापालिकेने खासगी तत्वावर शहर परिवर्तन कार्यालय (सिटी ट्रॉन्सर्फामेशन ऑफीस-सीटीओ) कार्यान्वित केले आहे. कार्यालयाकडून शहर परिवर्तन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. असे असतानाही शहर सुधारणा समितीने परदेश दौरा निश्‍चित केला आहे. त्यात कोणत्या देशाची पाहणी करणार हे निश्‍चित नसून, त्याचा खर्चाचा उल्लेखही करण्यात आलेला नाही.

आरटीओची ट्रॅव्हल्स चालकांसोबत बैठक

पुणे – शासन नियमानुसार राज्य परिवहन (एसटी) तिकीटदरापेक्षा दीडपट जादा भाडे आकारण्याचा अधिकार ट्रॅव्हल्सचालकांना आहे. मात्र, दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर जादा भाडे आकारणी प्रवाशांची लूट केली जाते. या पार्श्‍वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शहरातील ट्रॅव्हल्स संघटनांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे. यात जादा दर न घेण्याच्या सूचना देण्यात येणार असून दोषी आढळल्यास परवाना रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

दिवाळीच्या तोंडावर ‘पीएमपीएल’च्या बस नादुरुस्त

दिवाळीचे साहित्य खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना ‘पीएमपीएल’च्या नादुरुस्त बसचा फटका बसणार आहे. दिवाळीत प्रवााशांची संख्या वाढत असताना, महसूल वाढीच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त बसेस रस्त्यावर धावणे आवश्यक आहेत. मात्र, दुरुस्तीच्या नावाखाली अथवा पासिंगच्या कारणामुळे विविध आगारात जवळपास एकुण 50 ते 60 बसेस आगारातच पडून आहेत. 

भाजप नगरसेवकांना झालयं तरी काय?, दीड वर्षात पाच नगरसेवकांवर गंभीर गुन्हे !

 एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीवेळी ‘भयमुक्त’ शहराचा नारा देत सत्ता काबीज केलेल्या भाजप नगरसेवकांपासूनच आता ‘अभय’ मागण्याची वेळ मतदारांवर आली आहे. कारण, गेल्या दीड वर्षात भाजपच्या तब्बल पाच नगरसेवकांवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. तर, तीन नगरसेविकेच्या पतीवर गुन्हे दाखल झाले आहेत.

लोकसभेची तयारी; रावसाहेब दानवे उद्या घेणार संघटनात्मक आढावा

एमपीसी न्यूज –  आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार संघटनात्मक आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उद्या (शुक्रवारी) आढावा घेणार आहेत.  चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनमध्ये शुक्रवारी (दि. 26) सकाळी दहा वाजता आढावा बैठकीला सुरुवात होणार आहे. 

पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी सुधाराचा ‘डीपीआर’ तयार

एमपीसी न्यूज – साबरमती नदीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीवर नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर विकास आराखडा डिझाईन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट (एचसीपी)सल्लागाराने तयार केला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहराचे पाणी पेटले

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना, आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून पिण्याचे पाणी देण्यासाठीच्या आरक्षणास राज्य सरकारच्या मंत्री उपसमितीने फक्त मुदतवाढ दिली. या धरणातील पाण्याच्या आरक्षणास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणामुळे पाण्याचे आरक्षण रद्द झाले होते. आता शहरासाठी आम्ही पाण्याचे आरक्षण मंजूर केल्याचा ढोल भाजपचे पदाधिकारी बडवत आहेत; तर हे भाजपचे सर्वात मोठे अपयश असल्याची टीका पालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

नव्या वर्षांत केस कापण्यासाठी मोजा १०० रुपये

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केशकर्तनालय सेवांमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार यापुढे साध्या दाढीसाठी पन्नास रुपये तर, केस कापण्यासाठी शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. नव्या वर्षांपासून म्हणजे एक जानेवारीपासून या दरवाढीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

वाकड जलकुंभाची प्रकीया पूर्ण करावी – नगरसेवक कस्पटे

वाकड : या परिसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी येथील नियोजित जलकुंभाची निविदा काढून कामाला सुरुवात करावी अशी मागणी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाकडमधील दत्त मंदिर रस्ता व कस्पटेवस्ती येथे मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प निर्माण झाले आहे. लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे. परंतु या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी याच परीसरात स्वतंत्र जलकुंभ उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. 

निगडीतील सेक्टर क्रमांक 23 वाहतूकनगरी येथील वाहनतळ प्रकरण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी सेक्टर क्रमांक 23 वाहतूकनगरी येथील आरक्षित वाहनतळावर बेकादेशीरपणे कब्जा करणार्‍यांवर कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. तसेच वाहनतळाचा ताबा कोणाकडे आहे, याचा शोध घेण्यात यावा. वाहनतळाची पाहणी करावी, याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे देण्यात आली आहे.

PCMC issues notice to garden dept chief over illegal cutting of trees

PCMC issues notice to garden dept chief over illegal cutting of trees

Smart City development projects set to be completed by March 2022

PIMPRI CHINCHWAD: The civic body will start construction and .. 


Pimpri Chinchwad to get 406 MLD additional water

PIMPRI CHINCHWAD: Citizens can expect better water supply wi .. 


Pipeline work from Bhama Askhed dam may restart

PUNE: The stalled work on the Bhama Askhed water pipeline is .. 

Public bicycle plan to cover more areas

PIMPRI CHINCHWAD: The second phase of the public bicycle sha .. 


झोपडपट्टीधारकांऐवजी मतांकडेच लक्ष

पुणे - सुस्तीतील विरोधक, मस्तीत असलेले सत्ताधारी आणि बाबूशाहीच्या वर्चस्वामुळे शहरातील झोपडपट्टीधारकांना कोणीच वाली राहिला नसल्याचे दिसत आहे. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास ४० टक्के जनता झोपडपट्टीमध्ये राहते. मात्र, मतपेटीपलीकडे कोणताही राजकीय पक्ष झोपडपट्टीधारकांच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचे चित्र दिसत आहे.

बसथांब्यांचाच अडसर

पिंपरी - हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुरू असणाऱ्या चक्राकार वाहतुकीच्या प्रयोगाला पीएमपीचे बसथांबे अडथळा ठरत आहेत. शिवाजी चौकात पीएमपीसाठी थांबणाऱ्या प्रवाशांमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. चक्राकार वाहतुकीला अडथळा ठरणारे तीन बसथांबे अन्यत्र हलविण्यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी पीएमपी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला असला तरी त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता वाहतूक पोलिस पुन्हा एकदा पीएमपीला स्मरणपत्र पाठवणार आहेत. 

रेशनकार्डधारकांची दिवाळी एक किलो साखर व डाळी

पुणे - खास दिवाळीनिमित्त गहू, तांदूळ आणि तूरडाळीबरोबरच रेशनवर जादा साखर, उडीद आणि चणाडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

भोसरीत आज अतिक्रमणांवर “दणका’

पिंपरी – भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृह परिसर आणि राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली असलेल्या अतिक्रमणावर महापालिका शुक्रवारी (दि. 26) मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करणार आहे. दरम्यान पोलिसांनी गुरुवारी येथील छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना नोटीसा बजाविल्या आहे. या अनधिकृत पथारी टपरीवर मोठा राजकीय वरदहस्त असल्याने खरंच कारवाई होणार का याकडे अख्ख्या शहराचे लक्ष लागले आहे.

11 हजार 310 नागरिकांना “स्वाईन फ्लू’ची लस

पिंपरी – शहरात “स्वाईन फ्लू’ने जानेवारी महिन्यापासून कहर केला होता. या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी “स्वाईन फ्लू’ची लस देण्यात येते. शहरात हा आजार बळावल्यानंतर जानेवारी महिन्यापासून अद्यापपर्यत महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे “स्वाईन फ्लू’ची लस अकरा हजार तीनशे दहा नागरिकांना देण्यात आली आहे. सध्या लसीचा पुरवठा सुरळीत झाल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.