Thursday, 21 May 2020

PCMC seeks state’s permission to keep some restrictions intact in non-containment zones

Video : अरे! पिंपरीमधील आनंदनगरमध्ये 'हे' चाललंय काय?

पिंपरी ः तोंडाला मास्क नाही, सोशल डिस्टंसिंगचे पालन नाही, जमाव व संचारबंदीचा पत्ता नाही, असे चित्र बुधवारी चिंचवड स्टेशन परिसरातील कंटेन्मेंट झोन असलेल्या आनंदनगरमध्ये बघायला मिळाले. हजारोच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आणि "अन्नधान्य घरपोच द्या, दुकाने उघडू द्या' अशी मागणी केली. पोलिस व महापालिका आयुक्तांनी सेवासुविधा घरपोच देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर नागरिक आपापल्या घरी परतली. 

महापालिकेची सर्वसाधारण सभा गणसंख्येअभावी तहकूब

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या भितीने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांनी महासभेकडे पाठ फिरविली. त्यामुळे गणसंख्येअभावी महापालिकेची मे महिन्याची सर्वसाधारण सभा आज (बुधवारी) तहकूब करावी लागली. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरु झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिकेची मार्च, एप्रिल अशी सलग दोन महिने सर्वसाधारण सभा झाली नव्हती. त्यामुळे सत्ताधारी भाजपने मे महिन्याची सर्वसाधारण सभा घेण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार […] 

‘गार्बेज फ्री सिटी’ स्पर्धेत शहराचा ‘कचरा’; ‘पंचतारांकित’ दर्जा नाकारला

एमपीसी न्यूज – मागील तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात घसरण होणा-या पिंपरी-चिंचवड शहराला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. केंद्र सरकारच्या कचरामुक्त स्पर्धेत शहराचा ‘कचरा’ झाला असून शहराला पंचतारांकित (फाइव्ह स्टार रेटिंग) दर्जा नाकारला आहे. केंद्राकडून महापालिकेला साधा एक स्टारचाही दर्जा मिळाला नाही.  यामुळे स्वच्छतेवर कोट्यवधी रुपये खर्च करणा-या प्रशासनाचा भांडाफोड झाला आहे. तर, महापालिकेत सत्ता […]

PCMC out of red zone, decision on new guidelines by May 22

United Way Delhi, Whirlpool तर्फे पालिकेला 5 लाख किमतीची वैद्यकिय साहित्याची मदत

दि. १९ मे २०२० रोजी मनपा मुख्य कार्यालयात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलसाठी #ECA (इसिए) च्या पुढाकाराने एनजीओ- United Way Delhi आणि  Whirlpool India संस्थेच्या वतीने अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य महापालिकेस सुपूर्द करण्यास आले. 

यावेळी मा.आयुक्त श्रावण हर्डीकर, मा.अतिरिक्त आयुक्त श्री. संतोष पाटील व मा. स्थायी समिती सभापती श्री संतोष लोंढे , United way Delhi & Whirlpool चे श्री संतोष मोरे आणि श्री राजेंद्र जानराव, पर्यावरण तज्ञ विकास पाटील,सौ.संजीविनी मुळे, सौ. विनिता दाते, श्री हिरामण भुजबळ, श्री. नीलकंठ पोमण, श्री. विजय वावरे आदी उपस्थितीत होते. 

5 Pimpri Chinchwad cops infected

Check-up bus in PCMC limits

'कोवीड-19 टेस्ट बस' आजपासून नागरिकांच्या सेवेत दाखल

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संशयित रूग्णांची चाचणी करण्याकरीता 'कोवीड-19 टेस्ट बस' आजपासून नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे.

या उदघाटन प्रसंगी मा. महापौर उषा उर्फ माई ढोरे, मा. खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, मा. आमदार लक्ष्मण जगताप, मा. आमदार महेश लांडगे, मा. आयुक्त श्रावण हर्डीकर, मा. उपमहापौर तुषार हिंगे, मा.स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, मा. सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, मा.अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, मा. इ प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, मा. नगरसदस्या भिमाताई फुगे, सोनाली गव्हाणे, अश्विनी चिंचवडे, अनुराधा गोरखे, मा.आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, मा.अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, मा.मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मा.सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, मा.महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, मा. क्रिस्ना डायग्नोस्टीकच्या व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी जैन, मा. कार्यकारी अधिकारी अनिल साळुंके, मा. वैद्यकीय विभागाचे संचालक डॉ. किरणकुमार भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.


माझा प्रभाग…माझी जबाबदारी : मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसरात अर्सेनिकम ॲल्बम-30 औषधाचे वाटप

माझा प्रभाग…माझी जबाबदारी…या संकल्पनेअंतर्गत मोशी-बोऱ्हाडेवारी परिसरात कोरोना रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिकम अल्बम-30 या औषधाचे वाटप करण्यात येत आहे, अशी माहिती भाजपा नगरसेवक वसंत बोराटे यांनी दिली. 

कोरोनामुळे मेट्रोचे 50 टक्के कामगार पळाले; पुणे मेट्रो प्रकल्प लांबणार!

पुणे : देशात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजूर, कामगारांना आपआपल्या गावी परतण्यासाठी केंद्र सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू केली खरी, परंतु, त्याचा फटका मेट्रोच्या पुणे आणि पिंपरीतील प्रकल्पांना बसला आहे. या विशेष ट्रेनमुळे मेट्रोचे सुमारे 50 टक्क्यांहून अधिक मजूर गावी निघून गेले आहेत. 

5 Pimpri Chinchwad cops infected

क्वींस्टाऊन हाउसिंग सोसायटीकडून डी. वाय. पाटील रुग्णालयाला पीपीई किटचे वाटप

चिंचवड येथील क्वींस्टाऊन हाऊसिंग सोसायटीच्या सोशल फाउंडेशन च्या वतीने पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल करता 200 पीपीई कीट आणि सेनीटायझर याचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर उपस्थित होते. त्यांच्यासमवेत डॉ. मिलिंद पटवेकर, डॉ. मीनल पटवेकर आणि सोसायटीचे चेअरमन सुजित पाटील सेक्रेटरी शिरीष पोरेडी खजिनदार वडाळकर आणि मॅनेजिंग कमिटीचे व सोशल फाउंडेशन चे सभासद उपस्थित होते.

ISKCON body, Bajaj Group feed 32 lakh

ISKCON's Annamitra Foundation in association with Janakidevi Bajaj Gram Vikas Sanstha has been providing food to 90,000 needy persons in Pune and Pimpri Chinchwad since the lockdown commenced. According to representatives, the foundation with help from Shri Mukund Bhavan Trust, has provided help to over 32 lakh people in Pune since March 24.

New handwash and disinfectant developed for edible items

Flipkart steps up to reduce its plastic waste by 50 per cent

Pune: Moving towards a zero waste process, Flipkart has cut down the usage of plastic packaging in its own supply chain by 50 per cent.

‘पीएमपी’ प्रशासनाचा कर्मचाऱ्यांच्या जिवाशी “खेळ’

सुरक्षा साधनांचा अभाव वेतनही न मिळाल्याने जगण्याचा प्रश्‍न

1 जूनपासून सुरु होणाऱ्या रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगला आजपासून सुरुवात

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून 200 प्रवासी ट्रेन सुरु होणार आहे. यासाठी आज म्हणजेच 21 मे रोजी सकाळी दहा वाजल्यापासून तिकीटाच्या बुकिंगला सुरुवात होणार आहे. ही तिकीटं ऑनलाईनच बुक करता येणार आहेत. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर लोक तिकीट बुक करु शकतील. या रेल्वे सेवेत जनशताब्दी ट्रेन, संपर्क क्रांती, दुरांतो एक्स्प्रेस आणि इतर नियमित प्रवासी ट्रेनचा समावेश आहे. या ट्रेनमध्ये अनारक्षित डबे नसतील. 

आता स्थायी समितीकडून महापालिकेची लूट

  • वाढीव खर्चांसह कोट्यवधींच्या अनावश्‍यक विषयांना मंजुरी