Monday, 9 October 2017

अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची अधिसूचना जारी; पिंपरी चिंचवडकरांना दिलासा

पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरासाठी कळीचा मुद्दा बनलेला अनधिकृत बांधकामांचा प्रश्न राज्य सरकारने अखेर मार्गी लावला आहे. सरकारने राज्यभरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली असून, त्याचे कायद्यात रुपांतर झाले आहे. त्यानुसार ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित केली जाणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

निगडी परिसरात वीजेचा खेळखंडोबा

पिंपरी – निगडी गावठाण, यमुनानगर, साईनाथ नगर, सेक्‍टर 22 मध्ये गेल्या पाच महिन्यांपासून दररोज सकाळी व सायंकाळी वीज खंडीत होते. त्यामुळे नागरिकांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

Excited for Sunburn Festival in Pune? Here's why you might not get to go to the event this year

BJP corporator Vasant Borate wrote a letter to the Pimpri Chinchwad New Town Development Authority's (PCNTDA) chief executive officer Satishkumar Khadke and demanded not to give permission for the Sunburn festival 2017. The first 10 editions of the 

ई-रिक्षा तातडीने सुरू करा

‘वाहतुकीवर विपरीत परिणाम होणार नाही, अशा मार्गांवर ई-रिक्षांचा वापर सुरू करण्यास तातडीने परवानगी द्यावी,’ अशी सूचना राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी रविवारी केली.

'ब्लॅकमेलिंग करणारेच आता कारभारी'

पिंपरी - ज्यांचे आयुष्य ‘ब्लॅकमेलिंग’ करण्यात गेले, त्यांच्या हातून चांगला कारभार कसा होणार, असा रोखठोक सवाल करत खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजपचे सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादीने केलेल्या चुका, सामान्यांच्या मूलभूत प्रश्‍नांकडे केलेले दुर्लक्ष आणि मोदी लाटेमुळे भाजपच्या त्रिकुटाला सत्ता मिळाल्याची टीकाही केली.

'उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करा'

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे २०१६ मध्ये संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान दिंडीप्रमुखांना देण्यात आलेल्या विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्तीखरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले होते. या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

जनसंपर्क विभागाचा सावळा-गोंधळ

  • अधिकाऱ्यांची चालढकल : कार्यवाही शून्य
पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेच्या विविध योजना, रखडलेले प्रकल्प, अन्य समस्या, अडीअडचणी, दैनंदिन घडामोडीच्या घटनावर आधारित वृत्तपत्रात येणाऱ्या नकारात्मक बातम्यांवर आयुक्‍तांकडून कार्यवाही शून्य असल्याचे दिसून येत आहे. तसेच महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाही काही ठराविक बातम्याचे कात्रण काढून त्यांची फाईल आयुक्‍तांकडे उशिरा सादर करीत आहेत. त्यामुळे पालिकेच्या अन्य कोणत्याही विभागाच्या बातम्या त्या-त्या प्रमुखाकडे पाठविल्या जात नाहीत. यामुळे आमचे सारे आलबेल असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

भाजप नगरसेवकांमध्ये खदखद ?

विकास कामे होत नसल्याची नाराजी : नागरिकांच्या तक्रारी वाढल्या
पिंपरी – पावसाळ्यातही पाणी टंचाई, शैक्षणिक गुणवत्तेचा ढासळता आलेख अन्‌ सर्वच प्रभागांमध्ये मुलभूत सुविधांची वानवा झाल्याने नागरिकांच्या तक्रारींचा भडीमार वाढला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आयुक्त किंवा प्रभाग अधिकाऱ्यांकडूनही समाधानकारक तोडगा मिळत नाही. त्यातच नागरीकांच्या तक्रारी वाढल्याने सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांची राजकीय वाटचाल खडतर सुरू आहे. त्यामुळे भाजपचे नगरसेवक स्वपक्षीय महापालिकेतील पदाधिकाऱ्यांवर खासगीत तोफ डागू लागले आहेत.

देशभरातील 54,000 पेट्रोल पंपांचा 13 ऑक्‍टोबरला संप

नवी दिल्ली- देशभरातील सुमारे 54,000 पेट्रोल पंप13 तारखेच्या मध्यरात्रीपासून एक दिवसाच्या संपावर जाणार आहेत. अधिक मार्जिनसह आपल्य अनेक मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी अले हा एक दिवसाचा संप पुकारण्यात आला असल्याची माहिती यूपीएफ (युनायटेड पेट्रोलियम फ्रंट) ने दिली आहे. पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटी लागू करावा अशीही एक मागणी यूपीएफने केली आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोलियम ट्‍रेडर्स, द ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन आणि कन्सोर्टियम इंडियन पेट्रोलियम डीलर्सच्या 54,000 पेट्रोल पंपांचे प्रतिनिधित्व यूपीएफ करते.