PUNE: The Pune Municipal Corporation (PMC) has introduced a ..
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 8 March 2019
Change in season spurs rise in chickenpox cases
The rise in chickenpox cases during the ongoing exam season is keeping the children and their parents on tenterhooks.
‘तेजस्विनी’ ठरतेय देशासाठी आदर्श
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- गेल्या वर्षी जागतीक महिला दिना निमित्त पीएमपीने महिला प्रवाश्यांच्या सोयीसाठी सुरू केलेली तेजस्विनी बससेवा देशासाठी आदर्श ठरत आहे. सध्या एकुण ३८ बसमार्फत ही सेवा दिली जात असून मार्च अखेरपर्यंत आणखी २७ बसची त्यात भर पडणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बस सेवा उपलब्द् करुन देणारी खास महिलांसाठी बससेवा पुरविणारी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) ही देशातील पहिलीच सार्वजनिक संस्था असल्याचे पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी सांगितले.
पुण्यात ४० पाकिस्तानी नागरिकांना भारतीय नागरिकत्व बहाल
पुण्यात आज (ता. ८) जवळपास ४० च्या वर पाकिस्तानी नागरिकांना भारताचे नागरिकत्व बहाल करण्यात आले. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत नागरिकत्व देण्यात आले. पाकिस्तानातील हे अल्पसंख्यांक नागरिक अत्याचाराच्या भितीने भारतात पळून आले होते.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 12 ते 20 मार्च दरम्यान मेगाब्लॉक
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्याजवळ मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडुन द्रुतगती महामार्गावरील खंडाळा बोगदा (पुणे व मुंबई लेन) येथील कि.मी. 46.710 ते 46.579 दरम्यान ढिले झालेले दरडीचे दगड काढण्याचे काम 12 मार्च ते 20 मार्च दरम्यान करण्यात येणार असल्याने महामार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. पुणे प्रादेशिक विभागाचे महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी ही माहिती दिली आहे.
पुण्याची वाहतूक कधी सुधारणार रे..?
पुण्याची वाहतूक हा कायमच शहरातील चर्चेचा, वादाचा आणि नुसताच घोळ घालण्याचा विषय आहे. काहीही करा, रोज ऑफिसला जाताना आणि घरी येताना प्रत्येकाच्या कपाळावर आठ्याच असतात..
वाहनांना पुरतील एवढे रस्ते नाहीत.. असलेले रस्ते चांगले नाहीत आणि मुळातच वाहतुकीला शिस्त अजिबात नाही.. इथली पीएमपी रस्त्यात कधीही बंद पडू शकते आणि रिक्षावाले कुठे येतील अन कुठे नाही, हे कुणीच सांगू शकत नाही.. मेट्रोचं काम सुरू झालेलं दिसतंय.. पण रिंगरोड कुठे दृष्टीक्षेपातही नाही..
खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून दिव्यांगाना साहित्याचे वाटप
पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारचा दिव्यांग विभाग, सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने मावळ लोकसभा मतदार संघातील दिव्यांग नागरिकांना साहित्याचे वाटप करण्यात आले. ५९० दिव्यांगांनी याचा लाभ घेतला असून अडीच हजार लोकांची तपासणी शिबिराचा लाभ घेतला. छोट्या-मोठ्या सायकल, व्हिलचेअर, विकलांगांसाठी कीट, अंधांसाठी इलेक्ट्रॉनिकच्या काट्या, कर्णबधीरांसाठी कानातील मशिन, स्मार्ट अॅप, अॅल्युमिनियमच्या कुबड्या या साहित्याचे वाटप करण्यात आले.
‘८ मार्च’ला का साजरा केला जातो ‘जागतिक महिला दिन’
नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात होऊन तब्बल १०९ वर्ष होत आहेत. या निमित्ताने जागतिक सोशल मीडियातून महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. पण अनेकांना हे माहितीच नसते की, ८ मार्चला जागतिक महिला दिन का साजरा केला जातो किंवा जागतिक महिला दिन साजरा करण्याची सुरूवात कधीपासून व कशी झाली. अमेरिकेत समाजवादी महिलांनी आपल्या हक्कांसाठी आणि मतदानाच्या हक्कासाठी याच दिवशी १९०८ मध्ये मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनाची आठवण म्हणून जागतिक महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली आहे.
अबोल ‘ममतां’मुळे मडिगेरी यांना ‘लॉटरी’
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा ममता गायकवाड या नवख्या असल्याने त्यांनी आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात सभा कामकाजात थेट सहभाग घेतला नाही. तसेच, त्यांच्या अबोल व्यक्तिमत्त्वामुळे अनुभवी सदस्य विलास मडिगेरी यांनी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व अधिकार्यांशी ताळमेळ ठेवत योग्य समन्वय ठेवला. त्यामुळे पहिल्या वर्षी झालेले वादंग शांत झाले. या सुकर कार्यपद्धतीमुळे त्यांना दुसर्या वर्षी थेट अध्यक्षपदाची ‘लॉटरी’ लागली आहे.
‘जीआयएस’ अद्ययावत प्रणालीमुळे महापालिका कारभार होणार ‘पेपरलेस’
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या वतीने भौगोलिक सूचना प्रणाली (जिओग्राफिक इम्फार्मेशन सिस्टिम-‘जीआयएस’) प्रणालीद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्या माध्यमातून पालिकेचे सर्व विभाग आणि आवश्यक माहिती उपलब्ध करून इंटर कनेक्टिव्हिटी साधली जाणार आहे. या अद्ययावत कार्यपद्धतीमुळे भविष्यात पालिकेचा कारभार ‘पेपरलेस’ होणार आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.
आयुष्याचा मुक्त प्रवास करणारी रणरागिणी ‘नीलिमा जाधव’
एमपीसी न्यूज – आयुष्याचे स्वत्व ओळखून त्यानुसार प्रवास करत, आपल्या कार्याची पावती जगाकडून घेण्याऐवजी स्वतः स्वतःला ओळखून स्वतःची मतं तयार करून मनमोकळे, मनमुराद, यथेच्छ जगणारी रणरागिणी म्हणजे पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील महिला सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा श्रीरंग जाधव. कोणतीही वाहने चालवण्याची प्रचंड आवड असल्याने विशेषतः बुलेट चालविण्याचे वेड असल्याने यांना ‘बुलेटवाली’ या नावाने देखील काहीजण ओळखतात.
प्राधिकरणातील हॉटेल रागामधील ‘द ओरियन अॅपेटाइट’मध्ये पूर्वेकडील देशांमधील वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांची मेजवानी
एमपीसी न्यूज- असं म्हणतात की व्यक्ती तितक्या प्रकृती. त्याचप्रमाणे प्रत्येकाची खाण्याची आवड देखील वेगवेगळी असते. कोणाला खमंग आवडते तर कोणाला चमचमीत तर कोणाला गोडावर मनसोक्त ताव मारायचा असतो. तर कोणी फक्त पोट भरण्यापुरते खातो, त्याला काही विशिष्ट आवडीनिवडी नसतात. काही जणांना तर नेहमी काहीतरी व्हरायटी हवी असते तर काही मोजून मापून खातात.
दिव्यांगांना अपमानास्पद वागणूक देणा-या सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांच्यावर गुन्हा दाखल करा
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या वादग्रस्त सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांना कामानिमित्त भेटायला गेलेल्या दिव्यांग व्यक्तीला त्यांनी केबीनमधून बाहेर जाण्यास सांगितले. दिव्यांगांना झगडे यांनी अपमानास्पद वागणूक दिली असून त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांची सहाय्यक आयुक्त पदावरून हक्कालपट्टी करावी, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.
पिंपळे सौदागरमधील शिवसृष्टीचे आमदार जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन
एमपीसी न्यूज – नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मलाताई कुटे यांच्या पाठपुराव्यामुळे पिंपळे सौदागर येथे लवकरच ‘शिवसृष्टी’ साकारणार आहे. या शिवसृष्टीच्या कामाचे भूमिपूजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
महिला दिन : ऑल राउंडर लेडी सिंघम
नारी हे सरस्वती, काली, लक्ष्मी व पार्वतीचे रूप असते. ती एकाच वेळी आई असते, कर्तव्यावर अधिकारी असते आणि स्वतःसाठी वेळ देणारी सखीही असते. असाच एक मिलाप म्हणजे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील. मुलींची जबाबदारी, घरातील कामे व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम त्या तेवढ्याच तत्परतेने पेलतात हसतमुखाने…
Manhole in Pradhikaran poses threat to riders
Residents and commuters cry foul as the open manhole in Krishna Nagar has been left neglected for the past one month.
पुणे-नाशिक महामार्गावर “रॉंग साईड’ने वाहने सुसाट
भोसरी – पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी ते मोशी दरम्यान “शॉर्टकट’साठी विरुद्ध दिशेने बिनदिक्कतपणे वाहने हाकली जात आहेत. त्यामुळे अपघात होत असून पादचाऱ्यांना जीव मुठीत धरुन चालावे लागते. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांनी “रॉंग साईड’ने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बक्षीस योजना जाहीर केली असतानाही कर्मचारी मात्र गांधारीच्या भूमिकेत आहेत.
वाकडमध्ये रस्त्यांचे काँक्रिटीकरणाबरोबरच विकासकामांचा ‘सपाटा’
पिंपरी चिंचवड ः वाकड-पिंपळे निलख प्रभाग 26 मधील रस्त्यांचे काँक्रिटीकरणाबरोबरच नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी 25 लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमीपूजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले. महापौर राहुल जाधव, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी नगरसेवक विनायक गायकवाड, नगरसेविका आरती चोंधे, नगरसेवक तुषार कामठे, संदीप कस्पटे आदी उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)