PUNE: A three-year struggle by Bopkhel’s residents for an ea ..
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 20 September 2018
शहराची आवश्यक माहिती एका "क्लिक'वर
पिंपरी - महापालिका आणि पोलिस आयुक्तालय यांचे संदेश, परिपत्रक, निवेदन आदी स्वरुपाची सर्व माहिती नागरिकांना आता एका क्लिकवर मिळणार आहे. त्यासाठी विकसित केलेल्या "पिंपरी-चिंचवड वन' या "मोबाईल ऍप'चे अनावरण महापौर राहुल जाधव आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते बुधवारी झाले. ""असे ऍप विकसित करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे,'' असे आयुक्तांनी सांगितले.
Pimpri-Chinchwad civic body floats water drone to clean rivers
The efforts taken by Pimpri Chinchwad municipal corporation (PCMC) to keep rivers clean and pollutant free have taken a watery route, literally. The civic administration launched the test drive to collect floating trash using a floating water drone, an unmanned water vehicle, at Chinchwad ghat of Mula river on September 17.
मेट्रोबाबत वेगवेगळी धोरणे
पुणे - मेट्रो स्टेशनच्या परिसरात चार एफएसआय देण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला असताना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मात्र हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या दुतर्फा चार एफएसआय देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या दोन्ही मेट्रो मार्गांवर बांधकामांना परवानगी देण्यासंदर्भातील वेगवेगळे धोरण राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोहमार्गावरील अपघातांना “ब्रेक’ लागेना!
पिंपरी – प्रवासी सुरक्षितता हीच रेल्वेची प्राथमिकता असल्याचे रेल्वे प्रशासन नेहमी सांगते. मात्र, रेल्वे प्रशासनाचा दावा फोल ठरल्याचे अपघातांच्या वाढत्या संख्येवरून दिसून येत आहे. गेल्या चार दिवसात पिंपरी, कासारवाडी व चिंचवड या रेल्वे स्थानकांच्या हद्दीत चार जणांचा बळी गेला आहे. रेल्वे प्रशासनाने अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. प्रवाशांच्या चुकांमुळे तर कधी प्रशासकीय यंत्रणेच्या अकार्यक्षमतेमुळे वर्षाकाठी शेकडो प्रवासी मृत्युमुखी पडतात. यात धावती लोकल पकडणे, गर्दीमुळे दरवाजावर उभे असताना हात सटकणे, स्टंट करणे, रेल्वे रुळ ओलांडणे, हेडफोन लावून रुळांवरुन चालणे या आणि अन्य कारणांचा समावेश आहे. रेल्वे रुळ ओलांडताना अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. तर रेल्वेने प्रवास करत असताना बाहेर डोके काढणे महागात पडत असून रविवारी (दि. 16) डोक्याला खांब लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. पुणे-लोणावळा दरम्यान पिंपरी, चिंचवड, कासारवाडी या भागात अपघाताचे प्रमाण कमालीचे वाढत चालले आहेत. पुणे-लोणावळा दरम्यान 2016 मध्ये 425, 2017 मध्ये 450 जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. जानेवारी ते 18 सप्टेंबर 2018 पर्यंत 306 जणांचा बळी अपघातात गेला आहे.
नियम तोडल्यास तुरुंगवास वाहतूक पोलिसांची धडक कारवाई
पिंपरी- तुम्ही जर चुकीच्या दिशेने वाहन चालवणार असाल तर थेट तुरुंगात जायची आणि अडीच हजार रुपये दंड भरायची तयारी ठेवा. वाहतूक पोलिसांनी नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
225 वाहन चालकांवर गुन्हा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने वाहतूक व्यवस्था चोख राखण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार 14 सप्टेंबर पासून विरुध्द दिशेने येणाऱ्या 225 जणांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांद्वारे कलम 279 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात ‘पिस्तूलांचा बाजार’
पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी ही सर्व परिचित आहेच, त्यामुळेच शहरातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्याने शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले. सराईत गुन्हेगारांचे खून, व्हाईट कॉलर गुन्हेगारांच्या हत्या, वाहनांची तोडफोड, महिलांची असुरक्षितता, कंपन्या, व्यवसायकडून हप्ता वसुली, जमिनीच्या ‘लिटीगेशन’मधून दहशत आणि भाई, अल्पवयीन गुन्हेगार यामुळे पिंपरी-चिंचवड शहर गुन्हेगारी नगरी झाले होते. या सोबतच शहरात बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्याची संख्या मोठी आहे. अनेक गुन्ह्यामध्ये अश्या हत्यारांचा वापर केला जातो. शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर हे अधोरेखीतच झाले आहे. एक महिन्यात सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल २१ पिस्तुल आणि ३६ काडतुसे मिळाली आहेत. तर चालू वर्षात आयुक्तालयातील १५ पोलीस ठाण्यात ४१ पिस्तुल आणि ७४ काडतुसे जप्त करण्यात आलेली आहेत.
गणेश उत्सवात किंवा विसर्जन मिरवणुकीत मद्यसेवन केल्यास कठोर कारवाई-आर.के.पद्मनाभन
पिंपरी चिंचवडमधील गणेशोत्सव दरम्यान आणि विसर्जन मिरवणुकीत मद्यसेवन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पिंपरी-चिंचवड पोलीस हे कठोर कारवाई करणार असल्याचे शहराचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी आदेश दिले आहेत.त्यामुळे तळीरामांचे धाबे दणाणले आहेत.
भूमकर चौकात अवजड वाहनांना प्रवेश बंद
पिंपरी – भूमकर चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतुकीत बदल करत अवजड वाहनांना ठराविक वेळेत प्रवेश बंद करण्यात आला आहे. यामध्ये सकाळी सात ते दुपारी एक आणि सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत ही बंदी घालण्यात आली आहे.
पंतप्रधान कार्यालयात रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक
पिंपरी – रिक्षा टॅक्सी चालकांचे प्रश्न समजावून घेत, ते सोडविण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी देशभरातील रिक्षा टॅक्सी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न समजावून घेतले. देशभरातील रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक घेतली जाईल असे आश्वासन डॉ. जितेंद्र सिंग यांनी दिले. रिक्षा विमा हप्ता (इन्शुरन्स) रकमेत केलेली भरमसाठ वाढ, रिक्षा चालकांना सामाजिक सुरक्षा मिळावी, रेल्वे स्टेशनवर रिक्षा टॅक्सी चालकांची जागा भांडवलदार कंपन्यांना भाड्याने दिली जात आहे. ओला उबर, मुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत आला आहे, बॅटरी अपरेड रिक्षा या सह विविध प्रश्नांवर या वेळी चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे, भारतीय मजदूर संघाचे नेते राजेंद्र सोनी, जम्मू- काश्मीर रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष अचल सिंग, अखिल मोटर ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष मधुकर थोरात, नवी मुंबई कृती समितीने नेते मारुती कोंडे, सुनील बोर्डे, विजय पाटील, श्रीरंग जाधव, विदर्भ रिक्षा फेडरेशनचे मोशविर लोकरे, दीपक दासगाय, गणेश चौधरी आदी उपस्थित होते.
आझम पानसरेंसाठी भाजप विशेष आग्रही
पिंपरी - राज्याचे दिवंगत मंत्री पाडुंरग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर आझम पानसरे यांनाच संधी मिळावी म्हणून शहर भाजपच्या सर्वच नेत्यांनी अत्यंत आग्रही भूमिका घेतली आहे. आगामी लोकसभा-विधानसभेची राजकीय समीकरणे विचारात घेऊन भाजपचा एक मुस्लिम चेहरा म्हणून पानसरे यांच्या उमेदवारीवर गुरुवारी (ता.२०) मुंबईत होणाऱ्या कोअर कमिटीमध्ये निर्णय अपेक्षित आहे. दरम्यान, शहर राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा मोठे खिंडार पाडण्याचेही डावपेच सुरू असल्याचे भाजपातील वरिष्ठ सूत्रांकडून समजले.
भाजपा युवती आघाडी प्रमुखपदी तेजस्विनी कदम यांची नियुक्ती
पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर युवती प्रमुखपदी तेजस्विनी चंद्रकांत कदम यांची नियुक्ती शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी नुकतीच केली आहे. यावेळी आमदार महेश लांडगे, जेष्ठ नेते आझमभाई पानसरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, युवा मोर्चा प्रदेश सचिव अनुप मोरे, प्रवक्ते अमोल थोरीत आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वाईन फ्ल्यूच्या बळींना प्रशासनासह सत्ताधारीच जबाबदार; गुन्हे दाखल करण्याची राहुल कलाटेंची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- ‘स्वाईन फ्ल्यू’मुळे पिंपरी चिंचवड शहरातील २० जणांचा मृत्यू झाला आहे. या नागरिकांच्या मृत्यूला प्रशासन आणि सत्ताधारी भाजप जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी आज महासभेत केली.
भष्ट्राचाराची प्रकरणे पचविण्यासाठी सिमा सावळे यांचा ‘थयथयाट’ – दत्ता साने
पिंपरी (Pclive7.com):- मी ९६ कुळी शेतकरी असून असून गाय, म्हैस, बैल, कुत्रा, मांजर ही जनावरे पाळण्याची आमची परंपरागत संस्कृती आहे. हे सर्व प्राणी आमच्या कुटूंबियांचे सदस्य म्हणून पाहतो. त्यांना पोटच्या पोरापेक्षा जास्त सांभाळतो. यामध्ये कुठलाही जातीचा उद्देश ठेवून मी हे वक्तव्य केलेले नाही, उलट ९६ कुळी या शब्दाबाबत राजकारण करुन भाजपा राजकीय हिन राजकारण करत आहे. मी सिमा सावळे यांच्या अध्यक्षपदाच्या काळात मंजुर झालेल्या पंतप्रधान आवास योजनाच्या निविदेमध्ये झालेल्या भष्ट्राचाराच्या चौकशी मागणी केली आहे, तसेच कचरा संकलन निविदा, ४२५ कोटीचे रस्ते विकास योजना, वारक-यांसाठी ताडपत्री खरेदी, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आदी प्रकरणांमधिल गैरव्यवहार व भष्ट्राचारबाबत सत्ताधा-यांचे बुरखे फाडण्याचे काम मी केले आहे. ही भष्ट्राचाराची प्रकरणे पचविण्यासाठी सिमा सावळे यांचा थयथयाट चालू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे.
पिंपरी महासभेत भटक्या कुत्र्यांच्या चर्चेवरुन सीमा सावळे – दत्ताकाका साने यांच्यात जुंपली
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील भटक्या कुत्र्यांच्या चर्चेत दरम्यान सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये चांगलाच राडा झाला. विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि नगरसेविका सीमा सावळे या दोन सदस्यांमधील वाद टोकाला गेल्याने अखेर २७ सप्टेंबर प्रयत्न सभा तहकूब करण्यात आली. आज झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.
Subscribe to:
Posts (Atom)