MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 12 March 2013
Pune-Lonavla EMU train service completes 35 years
Pune-Lonavla EMU train service completes 35 years: The electrical multiple unit (EMU) local train service for the Pune-Lonavla route completed 35 years on Monday, a small landmark which went unnoticed by the suburban railway commuters as they went about their work, travelling on the very same trains.
रस्त्यावर मिळणार हवामानाचा अंदाज
रस्त्यावर मिळणार हवामानाचा अंदाज: राहुल कलाल । दि. ११ (पुणे)
उन्हाच्या झळा वाढू लागल्याने पारा किती वाढला..रस्त्यावरून जाताना धूर जाणवतोय.. प्रदूषणाची पातळी किती आहे.. याची उत्सुकता सर्वांनाच असते. ही माहिती आता पुणेकरांना रस्त्यावरून येता-जाता मिळणारी आहे. भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्थेने (आयआयटीएम) विकसित केलेली ‘सफर’ ही नवी यंत्रणा शहरात बसविण्यात आली आहे. याअंतर्गत माहिती देण्यासाठी शहरात १२ ठिकाणी एलईडी टीव्ही आणि प्रदूषण, हवामान आदींची मोजणी करण्यासाठी १0 ठिकाणी मॉनिटरिंग सिस्टीमची यंत्रणा उभारली आहे.
दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेसाठी आयआयटीएम संस्थेने ‘सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी फोरकास्टिंग अँन्ड रिसर्च’ (सफर) यंत्रणा विकसीत केली होती. यामध्ये हवेतील एकूण १0 विविध प्रदूषणाचे घटक मोजले जातात. तसेच हवामानाची स्थितीचा पुढील २४ तासाचा अंदाज, उन्हातील अल्ट्रा व्हायलट किरणांची तीव्रतासुध्दा मोजली जाते. त्याचा मोठा उपयोग या स्पर्धांमध्ये झाल्याचे दिसून आले. त्यामुळे केंद्रीय भू विज्ञान मंत्रालयाने मेट्रो शहरांमध्ये ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दिल्लीनंतर पुणे शहराची निवड करण्यात आली होती.
‘सफर’ यंत्रणेचे प्रमुख डॉ. गुफरान बेग यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, शहरात १0 ठिकाणी मोजणी करणारी यंत्रणा उभारण्यात आली आहे. तेथे तापमान, पाऊस, वार्याचा वेग, आद्रता मोजणे, दहा वेगवेगळया स्तरातील प्रदूषण, हवामानाच अंदाज, अल्ट्रा व्हायलेट रेडिएशनची पातळी मोजली जाणार आहे. एप्रिल २0१३ पर्यंत ही सिस्टीम पूर्णपणे काम करेल.
एलईडी टीव्ही
आयआयटीएम, पाषाण
पुणे वेधशाळा, शिवाजीनगर
पिंपरी चौक, चिंचवड
पुणे विमानतळ
आळंदी, कात्रज
पुणे लष्कर भाग
पुणे महापालिका
स्वारगेट, अलका टॉकीज चौक, फुले मंडई
मॉनिटरिंग सिस्टिम
आयआयटीएम पाषाण
पुणे वेधशाळा शिवाजीनगर
भोसरी, निगडी
पुणे विमानतळ लोहगाव
आळंदी
भारती विद्यापीठ कात्रज
लोहिया उद्यान हडपसर
मांजरी
डिआयएटी गिरीनगर

भोसरीत आढळले मृत स्त्री अर्भक
भोसरीत आढळले मृत स्त्री अर्भक: पिंपरी । दि. ११ (प्रतिनिधी)
भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टीत एका नाल्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत अवघ्या चार दिवसांचे स्त्री अर्भक मृतावस्थेत आढळले. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

दोन महिन्यांत पोटनिवडणूक
दोन महिन्यांत पोटनिवडणूक: पिंपरी । दि. ११ (प्रतिनिधी)
महापालिका निवडणुकीत बनावट जात दाखला सादर केल्याचे सिद्ध झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीमा फुगे यांचे नगरसेवकपद रद्द ठरविण्यात आले आहे. भोसरी गावठाण प्रभाग ३५ मधील रिक्त जागेकरिता पोटनिवडणूक घेण्यात यणार आहे. नगरसेवकपद रद्द केल्याचे महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला कळविले असून येत्या दोन महिन्यांत पोट निवडणूक घ्यावी लागणार आहे, असे महापालिका निवडणूक विभागातील अधिकार्यांनी सांगितले.
फुगे यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याबद्दलचा आणि त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासंदर्भातील शिफारस करणारा अहवाल आयुक्त श्रीकर परदेशी यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्यानंतर पुढील कार्यवाहीचे आदेश आल्यानंतर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आयुक्तांनी फुगे यांचे नगरसेवक पद रद्द ठरविले. त्याबाबत ७ मार्चला फुगे यांना कळविले. फुगे यांचे नगरसेवकपद रद्द ठरल्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. महापालिकेने पुढील कार्यवाहीला वेग दिला दिला आहे.

Subscribe to:
Posts (Atom)