Monday, 12 August 2013

नृत्य कला मंदिरात गुरुपौर्णिमा साजरी

निगडी प्राधीकरणातील नृत्य कला मंदिर येथील विद्यार्थिनींनी शनिवारी (दि. 10) नृत्य कला मंदिरच्या संचालिका तेजश्री आडिगे यांना गुरु वंदना देऊन गुरुपौर्णिमा साजरी केली.
निगडीतील मनोहर वाढोकार सभागृहात शनिवारी सायंकाळी

आंतरशालेय समूहगीत स्पर्धा

तारीख व वेळ- 14 ऑगस्ट
स्थळ- प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
अधिक माहितीसाठी संपर्क- 942356560248, 9881736125 अरुणा मराठे
आयोजक- विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, चिंचवड शाखा

मुस्लिम महिलांनीही घेतला नागपंचमीचा आनंद [व्हिडीओ]

पारंपरिक व पर्यावरण पूरक पध्दतीने सुवासिनींनी आज शहरात नागपंचमीचा सण उत्साहात साजरा केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे चिंचवड येथील निसर्गकन्या संत बहिणाबाई सर्पोद्यानात नागपंचमीचा सण आयोजित करण्यात आला होता. आजच्या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिम महिलांनीही या सुवासिनीं समवेत नागोबाची पूजा करून, फुगड्या, झोके खेळून

'दादां'चा अचानक पिंपरी-चिंचवड दौरा; पालिका अधिकाऱयांची दमछाक

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज रविवार सकाळी पिंपरी-चिंचवड येथील विकासकामांची पाहणी करण्यासाठी दौरा केला. मुख्यम्हणजे, शहराचे नेतृत्व करणारे अजित पवार हे आज सकाळी शहरात

मोराला मुक्त करण्यासाठी वनविभागाकडे प्रस्ताव

पिंपरी : संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानातील बंदिस्त मोराला मुक्त करण्यासाठी अधिकार्‍यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. वनविभागाची परवानगी घेऊन त्याला भुजबळवस्तीतील हिरव्यागार गायरानात सोडण्यात येईल. त्यासाठी तीन-चार दिवसांचा कालावधी लागले, अशी माहिती सर्पाेद्यानाचे संचालक अनिल खैरे यांनी रविवारी लोकमतला दिली. 
हिंजवडीतील त्या लांडोराचे रुदन ऐकू येईल का? अशा आशयाचे वृत्त लोकमतने रविवारी प्रसिद्ध केले. आठवडाभरापासून मोर नजरेआड झाल्याने लांडोर आणि तिच्या पिलांची झालेली विषण्णावस्था त्यातून मांडण्यात आली. त्यांचे कण्हणे, टाहो फोडणे मन हेलावून टाकणारे असल्याचा अनुभव लोकमत प्रतिनिधींनी स्वत: शनिवारी सकाळी भुजबळ वस्तीमधील गायरानात जाऊन घेतला. कुत्र्यांच्या उपद्रवापासून पिलांना दूर ठेवण्यासाठी लांडोराची सुरू असलेली तडफड, जिव वाचविण्यासाठीची त्यांची धडपड आणि विरहामुळे त्यांची झालेली अवस्था वृत्तातून मांडण्यात आली. ती मनाला भिडल्याचे अनेक वाचकांनी लोकमत कार्यालयात तसेच लोकमत प्रतिनिधींना दूरध्वनी करून कळविले. हृदयस्पश्री आणि पशु पक्ष्यांबद्दलची संवेदना जागविणारे हे वृत्त असून त्यांच्या विरहाबद्दलची हळहळही व्यक्त केली. विशेष म्हणजे नागपंचमीनिमित्त सर्पोद्यानात आज गर्दी होती. तेथे आलेल्या महिला, अन्य नागरिकांना पिंजर्‍यातील तो बंदिस्त मोर पाहण्याची उत्सुकता होती. त्यांनी आवर्जुन त्याला पाहिले. त्याची तेथून लवकर मुक्तता व्हावी अशा सदिच्छाही एकमेकांजवळ
व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)

मोराची मुक्तता करण्यासाठी आम्हाला वनविभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. सलग तीन दिवस सुट्या आल्याने परवानगी घेण्यास विलंब झाला, त्यामुळे मोराला पिंजर्‍यात ठेवावे लागले. सोमवारी वनविभागाकडे परवानगी मागण्यात येईल. ती मिळताच त्याला भुजबळ वस्तीमधील गायरानात सोडण्यात येईल, त्यासाठी तीन-चार दिवसांचा कालावधी लागेल.
- अनिल खैरे,
संचालक, निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान

Safety first: PMPML to allow women to board buses from front door only

To ensure safe travel for women commuters, PMPML the city''s transport body that ferries 11 lakh commuters daily is planning to allow women, school and college girls to board buses from the front door only.

To curb sex racket, cops keep an eye on hotels, lodges in Pimpri-Chinchwad region

After they busted a sex racket on Wednesday, the police in Pimpri-Chinchwad have started conducting inspection of hotels and lodges where such activities are "brazenly" carried out

कांदा 55 रुपये किलो

चार दिवसांत 220 रुपयांनी वाढ पुणे- भाजीपाल्याच्या घाऊक बाजारात कांदा प्रतिदहा किलो साडेपाचशे रुपये तर किरकोळ बाजारात 50 ते 55 रुपये प्रतिकिलो भावाने मिळत आहे.