Monday, 2 July 2018

शहराचा 2030 चा विकास आराखडा तयार करणार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराचे जागतिक पातळीवर वेगळे स्थान व वैशिष्ट्यपूर्ण शहर म्हणून नावलौकीक मिळविण्यासाठी शहराचे सन 2030 पर्यंतचे नियोजन करा. त्यानुसार कार्य करण्यासाठी तत्पर राहण्याच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या.

PCMC works on improved parking policy, parallel non-motorised transport system

Among the major concerns for PCMC officials are the increasing number of vehicles in Pimpri-Chinchwad, shrinking roads and rampant on-street parking

PCMC, Pune, Pimpri, Chinchwad, parking

ठेकेदारांनी घेतले कामगारांचे पासबुक, एटीएम कार्ड

वाकड पोलिसांत तक्रार : कारवाई करण्याची मागणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची दैनंदिन साफसफाईची कामे करणाऱ्या कंत्राटी कामगारांची ठेकेदार प्रचंड आर्थिक शोषण करत आहेत. हे ठेकेदार सफाई कंत्राटी कामगारांच्या बॅंक खात्यातून वेतनाचे पैसे परस्पर काढून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठेकेदारांनी कंत्राटी कामगारांच्या बॅंकेचे पासबुक आणि एटीएम स्वतःजवळ ठेवले आहे. याप्रकरणी एका महिला सफाई कार्मचाऱ्याने दोन ठेकेदारांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

डॉक्टर डे निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत धावले हजारो डॉक्टर

पिंपरी-‘रन फॉर हेल्थ’ असा संदेश देत पिंपरी-चिंचवडमधील डॉक्टर्सनी मॅरेथॉन स्पर्धेत उस्फूर्त स्पर्धेत सहभाग घेतला. डॉक्टर्स ‘डे’ च्या निमित्ताने रविवार पिंपरी चिंचवड परिसरातील डॉक्टरांच्या सर्व संघटनांनी मिळून भोसरी प्राधिकरण स्पाईन रोड येथुन मॅरेथॉन स्पर्धेत शहरातील हजारो डॉक्टर धावले.

वायसीएममध्ये डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांची "दुकानदारी'

पिंपरी (पुणे) : वायसीएम रुग्णालयात आलेल्या रुग्णांना खासगी दवाखान्यात येण्यास सांगणे, अतिदक्षता विभागात जागा नसल्याचे सांगून खासगी रुग्णालयात पाठविणे, बाहेरील औषध ठराविक मेडिकलमधून घेण्यास सांगणे आणि रुग्णवाहिका चालकाच्या मदतीने रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवून कमिशन उकळणे, हे प्रकार सध्या जोरदार सुरू आहेत. ज्यांना खासगी रुग्णालयातील उपचार परवडत नाहीत असेच रुग्ण वायसीएममध्ये येतात. मात्र डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांकडून त्यांची लूट सुरू आहे. प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. 

'Farmhouses of wealthy destroying Pavana Dam Backwaters'

Petition filed by villagers in NGT claims actors, diamond traders, cricketers have illegally constructed second homes along hills surrounding waterbody, trampling on its fragile biodiversity while destabilising the terrain

पवना धरणसाठ्यात सव्वा टक्‍क्‍याची वाढ

पिंपरी - पवना धरण परिसरात १ जूनपासून ३४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणसाठ्यात अवघी १.३ टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. सध्या धरणात २१.४६ टक्‍के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

देहू-आळंदी बीआरटीएस मार्ग रखडला

एम्पायर इस्टेट उड्डाणपूल होऊनही
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेने बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम अर्थात बीआरटीएस प्रकल्प हाती घेतला. सुरुवातीला मोठा गाजावाजा झाला. परंतु, मागील अडीच वर्षात बीआरटीएस प्रकल्पांकडे महापालिका प्रशासनाने पुर्णत: दुर्लक्ष झाले आहे. काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता हा बीआरटीएस मार्ग सुरू करण्यामधील प्रमुख अडथळा चिंचवड येथील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचा खुला होवूनही काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटीएस मार्ग रखडला आहे. या संदर्भात भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.

पुनावळे शाळेत विदयार्थी पर्यावरण समिती स्थापन

इसिएतर्फे राबविला उपक्रम
निगडीः एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए) तर्फे पिंपरी-चिंचवड शहरामधील सर्व शाळा व शैक्षणिक संस्था सोबत पर्यावरणाचे अनेक उपक्रम राबविते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन कामी गोडी निर्माण करण्यासाठी प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देऊन कामात सहभागी करून घेतले जाते. गुरुकुल शिक्षण संस्थेच्या अनुसाई ओव्हल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुनावळे शाळेत इसिएची विदयार्थी पर्यावरण समिती स्थापन करण्यात आल्याचे पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले. प्रसंगी शाळेचे सचिव विश्‍वास ओहाळ, मुख्याध्यापक गणेश गवळी, इसिए स्वयंसेवक गोविंद चितोडकर, मीनाक्षी मेरुकर, शिकंदर घोडके, सुभाष चव्हाण, इंद्रजीत चव्हाण, विकास भिंताडे, योगेश धावरे आदी शिक्षक उपस्थित होते.

शहरातील रोडरोमिओंवर कारवाई

वाकड – शहरातील शाळा आणि महाविद्यालयाबाहेर मुलींना त्रास देणार्‍या रोडरोमिओंवर पोलिसांनी कारवाई केली. टवाळखोरी करत उभे राहणार्‍या 17 रोडरोमिओंवर वाकड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरातील विविध सात महाविद्यालयाच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात टवाळखोरी करुन मुलींना छेडछाड करणार्‍या रोमियोंवर पोलिसांनी ताब्यात घेतले. समज देत त्यांना सोडून दिले. पोलीस आल्याचे पाहून काही रोडरोमियोंनी पळ काढला. ही कारवाई जेएसपीएम, बालाजी सोसायटी कॉलेज, इंदिरा कॉलेज, राजवाडे नगर येथील माने शाळा, आयबीएमअर कॉलेज आदी ठिकाणी करण्यात आली. पोलीस अधिकारी, कर्मचारी व महिला कर्मचारी यांनी दोन स्वतंत्र पथके त्यासाठी नेमण्यात आली होती.

आळंदीरांना पर्यायी पाण्यीच व्यवस्था करा

आळंदी : पिंपरी महापालिका हद्दीतून जोपर्यंत प्रदुषित पाणी इंद्रायणीत सोडणे बंद होत नाही तोपर्यंत महापालिकेकडून आळंदीकरांना पिण्याचे पाणी पुरवण्याबाबतची पर्यायी व्यवस्था करण्याचा विचार केला जाईल. त्याचप्रमाणे आळंदी शहरविकास आराखड्यात एसटीपीच्या जागेचे मंजूर आरक्षण ऐनवेळी बदलल्याप्रकरणी चौकशी लावण्याचे आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज आळंदीत दिले.

पर्यावरण मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी

आळंदी : प्रक्रिया न करता इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करू शकत नसाल तर तुम्ही महापालिका चालविण्यासाठी नालायक आहात. पिंपरी महापालिकेबरोबर लोणावळा आणि तळेगाव नगरपालिका हद्दीतूनही प्रक्रिया न करताच इंद्रायणीत सोडलेले सांडपाणी तत्काळ थांबवले नाही तर गेली दोन वर्षांपासून कार्यरत अधिकारी आणि नगराध्यक्षांवर सदोष मनुष्यवधाचा विनाजामिन गुन्हा दाखल करून तत्काळ अटकेच्या कारवाईस भाग पाडू. वेळप्रसंगी तुमच्याविरोधात नदीप्रदुषणाचा विषय नागपूर अधिवेशनात मांडू अशा शब्दात संतप्त झालेल्या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 

#SaathChal दिंडीप्रमुखांना यंदा महापालिका खर्चाने भेटवस्तू देण्यास नकार

पिंपरी : "उच्च न्यायालयाचे आदेश आणि राज्य सरकारच्या सूचना लक्षात घेता संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडीप्रमुखांना यंदा महापालिका खर्चाने भेटवस्तू दिल्या जाणार नाही. सर्व गटनेत्यांची सोमवारी बैठक घेऊन नगरसेवकांच्या एक महिन्याच्या मानधनातून वारकऱ्यांना भेटवस्तू देण्याबाबत विचारविनिमय केला जाईल. भाजपचे खासदार, आमदार देखील त्यासाठी मानधन देण्यास तयार आहेत'', अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शनिवारी दिली. 

ऑनलाईन फार्मसीची मागणी नागरिकांची नाहीच

महेश झगडे : कायदा आल्याशिवाय ऑनलाईन नको; तज्ज्ञांचा सूर
पुणे, दि.1 – ऑनलाईन फार्मसी हवी अशी मागणी नागरिकांनी केलेली नसून ती भांडवलदारांकडून आलेली मागणी आहे. त्यामुळेच औषध विक्रेत्यांचा रोजगार नष्ट करण्याचा हा प्रकार असल्याचे मत राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे माजी आयुक्‍त महेश झगडे यांनी रविवारी व्यक्‍त केले.

“तेजस्विनी’ बसचे मार्ग वाढवण्याची मागणी

पुणे – जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत खास महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या तेजस्विनी बससेवेला महिला प्रवाशांची पसंती मिळत आहे. सध्या शहरातील 10 मार्गावर एकूण 32 बसेसमार्फत ही सेवा पुरवली जाते. मात्र, अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या तेजस्विनीला स्थानिकांकडून मागणी वाढत असून महापालिका ते पिंपळे गुरव, आळंदी ते भोसरी, मनपा ते वडगाव शेरी या मार्गावर बस सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांच्या मागणीचा विचार करून या मार्गाचा सर्व्हे सुरु केला असल्याचे पीएमपीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

बंद केलेले 27 पैकी 17 मार्ग पुन्हा सुरू

– पीएमपी : पुरेशी पर्यायी व्यवस्था नसलेल्या मार्गांना प्राधान्य
पुणे – पीएमपीच्या काही मार्गांवर उत्पन्न मिळत नसल्याचे कारण देत गेल्यावर्षी शहर व परिसरातील 27 मार्ग बंद करण्यात आले होते. आर्थिक भार कमी करण्यासाठी तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांच्या बदलीनंतर प्रशासनाने निर्णय बदलला असून 27 पैकी 17 मार्ग पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. तर अत्यल्प उत्पन्न असलेले 10 मार्ग अजूनही बंद आहेत.

स्वेच्छानिवृत्ती कर्मचार्‍यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या 20 तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या 12 अशा एकूण 32 अधिकारी व कर्मचार्‍यांचा आज महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पुस्तक, गुलाबाचे फूल व स्मृतिचिन्ह, तसेच सेवा उपदान अंशराशीकृत धनादेश सुपूर्द करुन त्यांचा सन्मान करण्यात आला. स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्विकृत सदस्य मोरेश्‍वर शेडगे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे बालाजी अय्यंगार आदी उपस्थित होते.