MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 31 January 2018
पिंपरी-चिंचवड नागरिक पोर्टलचे अनावरण: पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद
शहरातील नागरिकांना नाविन्यपूर्ण डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने PimpriChinchwad.ORG या संकेतस्थळाची सुरुवात करण्यात आली आहे. 69 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते शुक्रवारी (26 जानेवारी) या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.
Health & vigil go hand in hand for Sangvi cops’ cycle brigade
Pune: Traffic constable Kunal Shinde has shed three kilos in just a month. "Cycling every day has increased my stamina and I can work more efficiently throughout the day," his colleague Santosh Jadhav said.
शिवसृष्टी उद्यानातील नवीन खेळणी बालचमुंसाठी खुली
जुनी सांगवी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जुनी सांगवी येथील शिवसृष्टी उद्यानात बसविण्यात आलेली नविन खेळणी बालचमुंसाठी खुली करण्यात आली. या उद्यानात शिवाजी महाराजांचा बालपणापासूनचा इतिहास शिल्पांमधून साकारलेला आहे. याच बरोबर येथे पिंपरी चिंचवड शहरातील मोठे आध्यात्मिक ध्यान धारणा केंद्र या उद्यानात आहे.
‘अजंठानगर’ प्रकल्पाशेजारी वाढतेय झोपडपट्टी
पिंपरी - शहर झोपडपट्टीमुक्त होण्यासाठी झोपडपट्ट्यांचे सरकार पुनर्वसन करते. मात्र, प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या लाचखोरीमुळे सरकारच्या या हेतूला हरताळ फासत आहे. असाच प्रकार अजंठानगर पुनर्वसन प्रकल्पाच्या बाबतीत घडला आहे. पुनर्वसन झालेल्या झोपड्या त्याच ठिकाणी आहेत, तर शेजारी झोपडपट्टी वाढत असून, अनेकांना एकापेक्षा जास्त सदनिका दिल्याच्या तक्रारी सरकार दरबारी दाखल आहेत. प्रकल्पात सदनिका वाटपात भ्रष्टाचार झाला असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डी. के. दोडके यांनी पुराव्यानिशी मुख्यमंत्री, पालिका आयुक्तांकडे केली आहे.
कासारवाडीतील शाळेला खासदार रेखा कडून ३ कोटींचा निधी; नगरसेवक शाम लांडे यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे बांधण्यात येणार्या शाळेच्या इमारतीसाठी राज्यसभा खासदार रेखा यांच्या खासदार निधीतून ३ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाले आहे. आवश्यक कागदपत्रे सादर करून हा निधी घेण्यासंदर्भातील पत्र महापालिका आयुक्तांना प्राप्त झाले आहे. या निधीसाठी माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शाम लांडे यांनी पाठपुरावा केला आहे.
पिंपरी न्यायालयात मोफत वकील
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी न्यायालयात केस चालविण्यासाठी ‘रिमांड अॅडव्होकेट’ म्हणून अॅड.अतिश लांडगे व अॅड. प्रसन्ना लोखंडे यांची पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने नियुक्ती केली आहे. ज्यांना आपल्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी वकील नेमणे परवडणारे नाही, अशा नागरिकांना न्यायालयात हक्काचा वकील मिळणार आहे.
1 फेब्रुवारीपासून स्वरसागर संगीत महोत्सव; पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे १ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत ‘स्वरसागर संगीत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात, गायन, वादनाचे विविध सांगितीक कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांची मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे १ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत ‘स्वरसागर संगीत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात, गायन, वादनाचे विविध सांगितीक कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांची मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले आहे.
Cracks surface in Pimpri BJP, leaders train guns at each other
Less than a year after the BJP came to power in Pimpri-Chinchwad, different camps led by key leaders seem to be forming in the party. The party-led Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) administration recently came under the lens when BJP MP Amar Sable sought Chief Minister Devendra Fadnavis’s intervention in the “corruption in allotment of road development projects worth Rs 425 crore” and sought an investigation. Sources said the development has caused fissures and anger in the party rank and file.
विकासकामात राजकारण आणू नका; आमदार लांडगेंचा विरोधकांना सल्ला
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या गावांकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले. मात्र भाजप सत्ता येताच समाविष्ट गावांचा कायापालट करण्यास सुरुवात केली. यामुळे विरोधकांनी भ्रष्टाचाराचे खोटे-नाटे आरोप करायला सुरुवात केली आहे. आरोप करताना पुराव्याचा आधार असावा. विकासकामात कोणीही राजकारण आणू नये, असा सल्ला आमदार महेश लांडगे यांनी विरोधकांना दिला आहे.
[Video] पिंपरीच्या सीमा सावळे यांचा गौप्यस्फोट ...!
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी त्यांच्या पालिकेतील कार्यालयात पत्रकार यांच्या बरोबर वार्तालाप करताना अनेक राजकीय गौप्यस्फोट करून धम्माल उडवून दिली.विरोधी पक्षासमवेत स्वपक्षातील विरोधकांचीही गय केली नाही
अमर साबळे यांची भाजपकडून चाचपणी
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापुरातून काँग्रेसचे उमेदवार होते.
शहरबात पिंपरी : भाजपचा तमाशा आणि शिवसेनेची खदखद
शिवसेनेने स्वबळाची भाषा सुरू केली असली तरी पक्षात सध्या मरगळ आणि नैराश्येचे वातावरण आहे.
पिंपरीत काँग्रेसचे पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधातील आंदोलन फसले; सायकल रॅलीत कार्यकर्ते गायब
शहराध्यक्ष सचिन साठे एकटेच किल्ला लढवत होते.
महापालिकेतील “ती’ निविदा रद्द करा!
– खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची मागणी
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पुढा-यांनी व ठेकेदारांनी 425 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामात संगनमत करुन मोठा भ्रष्टाचार केल्याची जोरदार चर्चा आहे. 425 कोटींच्या कामांसाठी केलेल्या निविदा प्रक्रियेतील रिंगमुळे जादा दराच्या निविदा भरल्याने सुमारे 70 ते 90 कोटींचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. जागा ताब्यात नसतानाही कामाच्या वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी या अगोदर 425 कोटींच्या रस्ते कामाच्या निविदा त्वरित रद्द कराव्यात. तसेच नव्याने निविदा मागविण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
महापालिकेत विरोधकांची मुस्कटदाबी?
पिंपरी – सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेताना महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांच्या सूचनांचा त्यामध्ये अंतर्भाव होणे क्रमप्राप्त असते. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या काही विषयांना गटनेत्यांचा होणारा विरोध टाळण्यासाठी निर्णय पूर्व बैठकांमधून त्यांना सोयीस्करपणे डावलले जात आहे. बैठक असो अथवा भूमिपूजन, उद्घाटन सोहळा अशा सर्वच ठिकाणी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना सत्ताधाऱ्यांकडून कटू अनुभव मिळत आहे.
शहरातील उद्योजकांची चार वर्षांपासून ससेहोलपट
- चाकण “एमायडीसी’तील जागेचा ताबा रखडला
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांनी चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये कारखाना चालू करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी अर्ज केले आहेत. या सर्व उद्योजकांना टप्पा क्रमांक दोनमधील डी-ब्लॉकमधील भूखंड मंजूर केला असतानाही स्थानिक गावकऱ्यांच्या विरोधामुळे हा भूखंड ताब्यात मिळालेला नाही. त्यामुळे या उद्योजकांच्या समस्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. येत्या 15 दिवसांत ही समस्या न सोडविल्यास “एमआयडीसी’ कार्यालयाबाहेर आंदोलन छेडण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने दिला आहे.
विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्प कात टाकणार
पिंपरी – महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत विठ्ठलनगर येथील घरकुल प्रकल्प राबवण्यात आला. या प्रकल्पामधील ए-8 व ए-9 या दोन इमारतींमध्ये स्थापत्य, विद्युत, पाणी पुरवठा व जल नि:सारण विषयक कामे होणार आहेत. याकरिता सुमारे 2 कोटी 7 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या विषयाचा प्रस्ताव बुधवार दि. 31 ला स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवणार आहे.
दांडीबहाद्दर लिपिकाची खातेनिहाय चौकशी
पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील महिला लिपिक विनापरवानगी तब्बल दहा महिने झाले गैरहजर राहिल्या आहेत. गैरहजेरीमुळे रुग्णालयीन अत्यावश्यक सेवेत आणि प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचा ठपका ठेवत त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
स्वच्छता मोहिमेत इंदिरा ग्रुपचे योगदान मोलाचे – दिलीप गावडे
चौफेर न्यूज – शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून देखील स्वच्छता मोहिमेत इंदिरा ग्रुपचे योगदान मोलाचे आहे. इंदिरा ग्रुपचा आदर्श घेउन इतर संस्थानी स्वच्छता मोहिमेत योगदान देवून शहराचा नावलौकिक वाढवावा, असे अवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे सह.आयुक्त दिलीप गावडे यांनी केले.
पिंपरी चिंचवडमधील १ लाख ९७ हजार बालकांना पोलिओचे लसीकरण
चौफेर न्यूज – राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत आज पिंपरी चिंचवड शहरातील १ लाख ९७ हजार ७७८ बालकांना पोलिओचे लसीकरण देण्यात आले असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकिय संचालक डॉ. पवन साळवे यांनी दिली.
या पोलिओ लसीकरण मोहिमेचे आज सकाळी भोसरी रूग्णालयात महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, रोटरी क्लबचे पदाधिकारी तसेच महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेच्यावतीने संपूर्ण शहरात ८५५ केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. ८ प्रभारी वैद्यकिय अधिकारी रूग्णालय व ५३ वैद्यकिय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली २७३४ लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले होते.
'स्थायी'च्या 11 सदस्यांचे राजीनामे घेणार?
पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये असणाऱ्या भाजपच्या 11 सदस्यांचे राजीनामे घेऊन त्या ठिकाणी नवीन सदस्यांची नेमणूक करण्याचा विचार पक्षात सुरू असल्याचे समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी सांगितले. पक्षाने हे सूत्र मान्य केल्यास पाच वर्षात 77 पैकी 55 नगरसेवकांना स्थायी समितीवर जाण्याची संधी मिळणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)