Saturday, 19 October 2013

DP: PCMC will ensure red, blue lines demarcation

Move will enable citizens to check whether the property is illegal or not

PMC, PCMC told to pay Rs 16 cr for treatment plants

The pollution of Mula-Mutha and Indrayani rivers by civic bodies was affecting villages in Haveli and Shirur talukas. Many villages in Daund taluka have also been affected

भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पिंपरी-चिंचवड शहर विभाग अध्यक्षपदी विशाल हजारे यांची निवड

भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पिंपरी-चिंचवड शहर विभाग अध्यक्षपदी विशाल हजारे यांची निवड करण्यात आली आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे शहराध्यक्ष ईश्वर कांबळे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.

औंध रुग्णालयाच्या जागेत पाण्याची टाकी बांधण्याचा निर्णय

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आग्रहाखातर औंध जिल्हा रुग्णालयाच्या जागेत पाण्याची टाकी बांधण्याचा निर्णय आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेत महापालिका खर्चाने पाण्याची टाकी बांधणे फायदेशीर असल्याचेही आयुक्तांनी आपल्या प्रस्तावात म्हटले आहे.

पस्तीसशे कर्मचाऱ्यांची ‘पीएमपी’त भरती

‘पीएमपी’च्या ताफ्यातील बसची संख्या आगामी काळात वाढणार असल्याने, तीन हजार पाचशे चालक-वाहकांची भरती करण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली. मार्चअखेर, ‘पीएमपी’च्या ताफ्यात सहाशे नव्या बस दाखल होणार आहेत.

गिफ्ट कुपनपासून सावधान

पिंपरी : सर, नमस्कार, आपणास आमच्या कंपनीच्या वतीने काढलेल्या लकी ड्रॉमध्ये बक्षीस मिळाले आहे. ते आपण आमच्या ‘..’ शाखेतून घेऊन जावे, असा फोन येताच ती व्यक्ती भारावून जाते. मोठे बक्षीस मिळणार या कल्पनेने हुरळून जाते. आनंद गगनात मावेनासा होतो. मात्र, बक्षीस घेऊन परतल्यानंतर त्या व्यक्तीचा चेहरा फोटो काढण्याजोगाच होतो.

तिन्ही आमदारांना दादांनी केले खूष

पिंपरी -&nbsp शिक्षण मंडळाचे सभापतिपद पिंपरी विधानसभा मतदारसंघाला देत पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील तिन्ही मतदारसंघांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

केबल कंपन्यांच्या पॅकेजला विरोध

पिंपरी -&nbsp दूरचित्रवाहिन्यांच्या संभाव्य पॅकेजवरून केबल ऑपरेटर आणि केबल कंपन्यांत आतापासूनच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत