पिंपरी - औद्योगिक कंपन्यांकडून रसायनयुक्त पाणी नदीमध्ये सोडण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दीड महिन्यात शहरातील 21 कंपन्यांचे पाणी आणि वीजपुरवठा खंडित केला आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 27 September 2018
पिंपरीत रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे वाहतुकीचा बोजवारा
पिंपरीतील आंबेडकर चौक हा सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यापैकी एक आहे.
पिंपरीत वाहतुकीत अडथळे
महामेट्रोच्या कामांमुळे पिंपरी ते खराळवाडी तसेच पुणे मुंबई महामार्गावर काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. या ठिकाणी सुरु असलेल्या कामांमुळे वाहनचालकांना वळणे वळणे घेत वाहने चालवावी लागत आहे.
स्केटिंग ग्राऊंडच्या कामाला गती द्या; आमदार महेश लांडगे यांचे अधिका-यांना निर्देश
अधिका-यांसमवेत कामाची केली पाहणी
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विकसित करण्यात येणा-या भोसरी, इंद्रायणीनगर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटिंग ग्राऊंडचे काम वेगात करा. खेळाडूंना सर्व सोयीसुविधायुक्त असे शहरातील पहिलेच ग्राऊंड करण्यात येणार आहे. ग्राऊंडचे काम दर्जेदार करावे. खेळाडूंना ट्रॅक उपलब्ध करुन देण्यात यावा. पहिल्या टप्प्याचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण करण्यात यावे असे निर्देश भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अधिका-यांना दिले आहेत.
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विकसित करण्यात येणा-या भोसरी, इंद्रायणीनगर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटिंग ग्राऊंडचे काम वेगात करा. खेळाडूंना सर्व सोयीसुविधायुक्त असे शहरातील पहिलेच ग्राऊंड करण्यात येणार आहे. ग्राऊंडचे काम दर्जेदार करावे. खेळाडूंना ट्रॅक उपलब्ध करुन देण्यात यावा. पहिल्या टप्प्याचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण करण्यात यावे असे निर्देश भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अधिका-यांना दिले आहेत.
Property cess concessions in PCMC area
Pimpri Chinchwad: Illegal constructions in the Pimpri Chinch ..
‘पंतप्रधान आवास’च्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या गृहप्रकल्पातील बांधकामांचा दर बाजारभावापेक्षा अधिक आहे. सदर प्रकल्पाचा ‘डीपीआर’ जाणीवपूर्वक चुकीचा पद्धतीने तयार केल्याबद्दल संबंधित अधिकार्यांवर कारवाईची मागणी शिवसेनेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुसर्यांदा केली आहे. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश संबंधित विभागास दिले आहेत, अशी माहिती आ. चाबुकस्वार यांनी बुधवारी (दि.26) पत्रकार परिषदेत दिली.
स्वच्छता सप्ताह अंतर्गत मोरवाडी परिसर ‘चकाचक’
चौफेर न्यूज – स्वच्छ भारत अभियान सप्ताह अंतर्गत ‘अ’ प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या पुढाकाराने प्रभागातील मोरवाडी परिसरात बुधवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. सकाळी साडेसात ते दहा या अडीच तास राबविलेल्या अभियानात संपूर्ण परिसर, रस्ते चकाचक करण्यात आले.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बंधूंना ‘सायबर क्राईम’चा फटका
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड शहराचे भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बंधूंच्या अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डची गोफणीय माहिती हॅक करुन ५६२६.६ अमेरिकन डॉलर ऑनलाईन पध्दतीने काढून घेतले आहेत. सायबर क्राईम हा पोलिसासमोरील मोठा विषय झाला आहे. यापूर्वी शहरातील अनेकांना सायबर क्राईम द्वारे गंडा घातला असून आता तर चक्क आमदारांच्या बंधूंना याचा फटका बसला आहे.
गुन्हेगारी रोखण्यासाठी “पोलीस आपल्या दारी’
पिंपरी – “पोलीस आपल्या दारी योजने’द्वारे पोलीस आता थेट नागरिकांपर्यंत पोहचून त्यांच्या तक्रारींची दाखल घेणार आहेत. तसेच “फोन अ फ्रेन्ड’ उपक्रमाद्वारे शहरातील गुन्ह्यावर आळा बसवणार असल्याचे पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून नवीन संकल्पना
आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची माहिती
पिंपरी-चिंचवड : पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये कायम सुसंवाद राहायला हवा. पोलीस यंत्रणा समाजात समाजासाठी काम करत आहे, याचा अनुभव नागरिकांना यायला हवा. ठाण्यात पोलीस नाही, तर समाजात दिसायला हवेत. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून विविध संकल्पना राबविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ‘फोन अ फ्रेंड’ आणि ‘पोलीस आपल्या दारी’ या संकल्पना राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिली.
सूचना व हरकती नंतर पुन्हा एक महिना
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करत असताना सर्व प्रथम आयटी पार्कचा विचार करण्यात आला. हिंजवडी मधील शिवाजी चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी, वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि विना अडथळा सुरू ठेवण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करत वाहतूक विभागाने चक्राकार वाहतुकीत अंशतः बदल केले आहेत. हे बदल आज (दि. 25) ते 24 ऑक्टोबर या कालावधीत पुन्हा प्रायोगिक तत्वावर सुरु ठेवण्यात येणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा देणा-या वाहनांना वगळण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या हरकती आणि सूचना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, ऑटो क्लस्टर, पिंपरी येथे 24 ऑक्टोबर पर्यंत लेखी स्वरूपात जमा कराव्यात, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. नागरिकांच्या हरकती आणि सूचनांचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार आहे.
वाहतूक बदल कायम
आयटीपार्क हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी येथील शिवाजी चौकात चक्राकार वाहतूक योजना राबविण्यात आली. त्यानंतर भूमकर चौकात होणारी कोंडी लक्षात घेऊन तेथे नो राइट टर्न (दुतर्फा एकेरी) वाहतूक योजना राबविली जात आहे. यामध्ये काही आयटीयन्स आणि स्थानिकांनी दिलेल्या सूचनांवरून दोन बदल करण्यात आले आहेत. तसेच २६ ऑक्टोबर पर्यंत हे बदल कायम राहणार आहे. याव्यतिरिक्त संपूर्ण शहरातील रस्त्यांवर सकाळी आठ ते दुपारी बारा आणि दुपारी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वच प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
बेशिस्त १७० पालिका कर्मचार्यांवर होणार कारवाई
महापालिकेच्या तब्बल 170 बेशिस्त कर्मचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहेत. त्यांच्यावर ओळखपत्र न लावणे, गणवेश न घालणे, रजेचा अर्ज न देता सुटी घेणे, फिरती रजिस्टरवर सही न करता परस्पर बाहेरील कामासाठी जाणे आदी बेशिस्तीचा ठपका ठेवला आहे. प्रशासन विभागाचे नवे प्रमुख मंगेश चितळे यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारताच बेशिस्त कर्मचार्यांवर बडगा उगारला आहे.
महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते माजी महापौरांचा सन्मान
शहरात कॅन्सर रुग्णांसाठी स्वतंत्र हॉस्पीटल बांधावे. त्यासाठी २ एकर जागा आरक्षित ठेवावी. माजी महापौरांसह एका प्रतिनिधीला कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सन्मापुर्वक बसण्यासाठी जागा ठेवावी. सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये महिलांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत. वाचनालय, स्पर्धा परिक्षा केंद्र महिलांसाठी लघु उद्योग तातडीने सुरू करावेत, अशा अनेक सूचना माजी महापौरांनी आज बुधवारी (दि. 26) बैठकीत केल्या.
पिंपरी-चिंचवड मनपा सेवक पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य फेडरेशनचा दीपस्तंभ पुरस्कार
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने राज्यातील उत्कृष्ट पतसंस्थांना देण्यात येणारा दीपस्तंभ पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था या संस्थेला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला. राज्यातील पतसंस्था संचालकांचे दोन दिवसाचे निवासी प्रशिक्षण शिबिर लोणावळा येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटप्रसंगी मंगळवारी (25 सप्टेंबर 18) सहकार मंत्री देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. या वेळी आमदार बाळा भेगडे, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे शेखर चरेगावकर, सहकार आयुक्त सतीश सोनी, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ बबन झिंजूर्डे तसेच पतसंस्थेचे चेअरमन आबा गोरे व संचालक उपस्थित होते.
“इलेक्ट्रीकल वाहन’ उद्योगांसाठी लघु उद्योगांना तयार करावे
पिंपरी – वाढत्या पेट्रोल-डिझेल दरामुळे सरकार येत्या काळात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर भर देणार आहे. या नवीन बदलांमध्ये पिपंरी-चिंचवडच्या लघु उद्योगांना प्रशिक्षण आणि वेगवेगळ्या योजनांद्वारे इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी तयार करावे, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थकीत मिळकत करावर आकारण्यात आलेल्या मनपा कर शास्तीमध्ये थकबाकीसह मिळकत कराची संपूर्ण रक्कम एक रक्कमी ०१ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०१८ अखेर भरणा करणा-या मिळकतधारकांना मनपाकर शास्ती रकमेच्या ९०टक्के सवलत मिळणार आहे. तर दि.१६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०१८ अखेर भरणा करणा-या मिळकतधारकांना मनपाकर शास्ती रकमेच्या ७५ टक्के सवलत देण्याच्या अभय योजनेस स्थायी समितीने मान्यता दिली. तसेच शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ३४ कोटी २६ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मनपा शास्तीच्या सवलतीच्या निर्णयावरून नागरिकांमध्ये संभ्रम – मारुती भापकर
पिंपरी चिंचवड शहरातील मिळकतींबाबत मनपा कर शास्तीमध्ये देण्याची माफी व सवलत देण्याचा निर्णय घेतला. मात्र, शास्ती (झिजीया) कराबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तो संभ्रम दूर करून नागरिकांच्या खिशाला कुठलाही आर्थिक भृदंड न देता संपूर्ण शास्तीकर माफी व नाममात्र दंड आकारून घरांचे नियमितीकरण करावे, अशी मागणी मारुती भापकर यांनी महापौर राहूल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड आणि सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
सह्याद्री फाऊंडेशन व वीर वाद्यपथकातर्फे इंद्रायणी घाटनदी स्वच्छता
सह्याद्री फाऊंडेशन व वीर वाद्यपथक भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामाजिक उपक्रम आज आयोजित करण्यात आला होता. च-होली परिसरातील इंद्रायणी नदी पात्रातील निर्माल्याचे एकत्रीकरण करून नदी पात्र प्रदूषण मुक्त करण्यात आले. संपूर्ण घाट स्वच्छ करण्यात आला.
उद्योजकांनी बिनपावत्यांचे व्यवहार टाळावेत
उद्योजकांनी नवी मूल्ये आत्मसात करण्याबरोबरच व्यवसायात पारदर्शकता ठेवणे ही काळाची गरज आहे.
सोळाशे अभियंत्यांना रोजगार
पुणे - प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने १ हजार ६०० अभियंते नेमण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील घरकुल योजनांचे तांत्रिक पर्यवेक्षण, नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या अभियंत्यांवर राहणार आहे. या अभियंत्यांना ‘ग्रामीण गृहनिर्माण अभियंता’ म्हणून ओळखले जाणार असून, जिल्हा परिषद बाह्य यंत्रणेद्वारे त्यांची नेमणूक करणार आहेत. त्यामुळे आवास योजनेचे उद्दिष्ट पूर्ण होण्याबरोबरच १६०० अभियंत्यांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे.
जाणून घ्या : आधार कुठे बंधनकारक आणि कुठे नाही
नवी दिल्ली – सरकारी योजनांपासून ते शाळेत प्रवेश मिळवण्यापर्यंत अशा अनेक ठिकाणी सरकाने आधार कार्ड अनिवार्य केले होते. याविरोधात काहींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर सुनावणी करताना न्यायालयाने आधार कार्ड संविधानिकरीत्या वैधच ठरवले. परंतु, आधार सक्तीमध्ये महत्वपूर्ण बदल केले आहेत. जाणून घेऊया कोणत्या गोष्टीत आधार बंधनकारक –
न्यायालयातील कामकाजाचे होणार थेट प्रक्षेपण, सुप्रीम कोर्टाचा निकाल
चौफेर न्यूज – न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. याची सुरूवात सुप्रीम कोर्टातूनच होणार असून यामुळे न्यायालयीन कामकाजात पारदर्शकता येईल, असे कोर्टाने म्हटले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)