Thursday, 17 May 2018

PCMC submits proposal for merger of 7 villages

Pimpri Chinchwad: The civic body has submitted a proposal to the state department to merge seven villages in its limits.
These villages include Dehugaon, Sangawade, Gahunje, Jambhe and Marunji. The new area, excluding Dehu Road Cantonment Board limits, will feature planned development.

PCMC extends wet garbage processing deadline to June 30

PIMPRI CHINCHWAD: The civic body has extended the deadline to process wet trash into compost on the premises of big societies and other bulk garbage generators to June 30.

प्राधिकरणात यशवंतराव चव्हाण स्मृती स्मारक

कै. यशवंतरावजी चव्हाण स्मारक समितीच्या वतीने प्राधिकरण, निगडीतील संत तुकाराम महाराज उद्यानाशेजारी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरराव चव्हाण यांचे भव्य स्मारक उभे केले जात आहे. येथील 4 हजार 40 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत उभ्या राहणार्‍या या स्मारक इमारतीसाठी  पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीने 5 कोटी रुपयांचे अर्थसहाय बुधवारी (दि.16) मंजूर केले.

Pension for disabled people in Pimpri Chinchwad area, yet to take off

The officials of the Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) have failed to implement pension scheme for the disabled people, the sanction for which was given by the civic body in November 2017.

The sanction for the pension scheme for the disabled was given by the civic body in November 2017.

Final draft of lay-by norms for PCMC to be tabled on May 19

Opposition and social organisations up in arms against proposal as they feel the move will prove to be a burden on citizens’ pockets

काळेवाडी फाटा-आळंदी बीआरटी मार्ग बदलणार

पिंपरी - काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता (चिखली) बीआरटी मार्गात अडथळा ठरणाऱ्या दोन कंपन्यांच्या जागा हस्तांतराचा तिढा कायम असल्याने बीआरटी बस मार्गात बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

PMPML to start helpline for ‘Raat Rani’ buses


महापालिकेत रेकॉर्डची विशेष तपासणी मोहीम

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील प्रलंबित आक्षेपाधीन रकमा, वसुलपात्र रकमा व रेकॉर्ड तपासणीसाठी मुख्य लेखापरीक्षण विभागाने 1 जूनपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती मुख्य लेखापरिक्षक पद्मश्री तळदेकर यांनी दिली.

पाणी उधळपट्टीवर “वॉच’!

जललेखा परीक्षण होणार : जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा निर्णय
पिंपरी – निर्धारित मापदंडापेक्षा अधिक पाणी महापालिका पवना धरणातून उचलत आहे, असा आरोप वारंवार होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पाण्याचा वारेमाप उपसा करुन उधळपट्टी सुरु आहे. त्यामुळे उपसा केलेल्या पाण्याची नासाडी तर होत नाही ना? याकरिता राज्याच्या जलसंपत्ती नियमन प्राधिकरण विभागाकडून महापालिकेच्या पाणी वापराचे जललेखा परीक्षण करण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिकेच्या पाण्याचे “ऑडिट’ येत्या जून महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात सुरू केले जाणार आहे. शहरातील अधिक पाणी वापरावर निर्बंध घातले जाण्याची शक्‍यता आहे.

पाण्याअभावी जळताहेत मोशी गायरानातील झाडे

पिंपरी - मोशी कचरा डेपो आणि दगड खाणी या दरम्यानच्या गायरान जमिनीवर लावलेली झाडे पाण्याअभावी सुकली आहेत. ही झाडे आम्ही लावलेली नसल्याचे महापालिकेच्या उद्यान आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, काही वर्षांपूर्वी या जागेवर महापालिकेने व दरवर्षी पावसाळ्यात वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांनी वृक्षारोपण केल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जळणाऱ्या झाडांना पाणी घालायचे कोणी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

निगडी आयटीआयमध्ये तीन नवीन अभ्यासक्रम

पिंपरी - निगडीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) यंदापासून संगणक प्रशिक्षणासह तीन नवीन अभ्यासक्रम सुरू होत असून, अन्य पाच ट्रेडमध्येही सहा नवीन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. नव्या वर्गांमुळे यंदा ९३३ विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश मिळेल.

महिला स्वच्छतागृहांचा अभाव

पिंपरी - शहरामध्ये महिलांसाठी रहिवासी भाग, झोपडपट्टी क्षेत्र, उद्याने आदी ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता आहे. मात्र, चार प्रमुख बीआरटीएस रस्त्यांवर पुरुष व महिला मिळून केवळ २१ स्वच्छतागृहे आहेत. त्याशिवाय, अंतर्गत रस्त्यांवरही विदारक परिस्थिती पाहण्यास मिळते. या पार्श्‍वभूमीवर उद्योगांच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) उपक्रमांतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांवर महिलांसाठी नव्याने काही स्वच्छतागृह उभारण्याचे नियोजन आहे.

म्हाडाकडून राज्यभरात तीन हजार घरांसाठी सोडत

सर्वात जास्त सदनिका पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीत आहेत.

स्थायीची 20 कोटींच्या विकास कामांना मंजूरी

शहरातील विविध विकास कामे करण्यासाठी सुमारे 19 कोटी 87 लाख 49 हजार रुपयांच्या खर्चास आज (बुधवारी) स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली, अशी माहिती विलास मडेगिरी यांनी दिली. या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. तसेच यावेळी पी.सी.एम.टी चे माजी सभापती सुरेश चोंधे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

अमराठी पाट्यांवरून मनसे आक्रमक; शहरात दुकानांवरील पाट्या हटविल्या

पिंपरी-चिंचवडमध्ये अमराठी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. त्यांनी या पाट्यांविरोधात मोहीम उघडली आहे. मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. १६) शहराच्या काही भागातील अमराठी पाट्या काढून टाकल्या.

पिंपरीत शहीद हेमू कलानी यांच्या अर्ध पुतळ्याच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; राष्ट्रवादीचे नगरसेवक ‘गैरहजर’

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने पिंपरी कँम्प येथील उद्यानात शहीद हेमू कलानी यांच्या अर्ध पुतळा सुशोभिकरण करून बसविण्यात येणार आहे. गेल्या १५ वर्षापासून हे काम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रलंबित होते. आज पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले. मात्र या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवक गैरहजर असल्याने त्यांनी बहिष्कार टाकला असल्याची चर्चा यावेळी होती.

पालिकने 16 लाख खर्च केल्यानंतरही वायसीएममधील एक्स-रे मशीन बंद

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) मधील ३ एक्स-रे मशीन बंद अवस्थेत आहेत. सध्या एकाच मशीनवर काम सुरू आहे. सहा महिन्यांपुर्वीच लाखो रुपये खर्च करून मशीनची दुरूस्ती करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा या मशीनमध्ये बिघाड निर्माण झाला. त्यामुळे एवढे पैसे खर्च करूनही मशीनमध्ये बिघाड कसा झाला, असा सवाल उपस्थित होत आहे.

“वायसीएम’मध्ये एसीला आग

पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात सिटी स्कॅन मशीनच्या विभागात एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. ही घटना बुधवारी (दि. 15) पाचच्या सुमारास घडली.

दत्ता सानेंच्या गटनेतेपदावर शिक्‍कामोर्तब

– विभागीय आयुक्‍तांचे महापालिकेला पत्र

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेतेपदी नगरसेवक दत्ता साने यांची अधिकृतपणे नियुक्ती झाली आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने अधिकृतपणे नोंदणी झाल्याचे पत्र बुधवारी (दि.16) महापालिकेतील नगरसचिव विभागाला पाठविले आहे.