The Roseland Residency Co-op Housing Society at Pimple Saudagar with 30 buildings and an estimated 3,500 residents has demonstrated how a colony of smart, well-educated people can take up numerous eco-friendly initiatives which not only result in huge savings but are also harmonious with the goals of the civic body. It is not for nothing that this colony is a recipient of a national Swacch Bharat award.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 18 June 2018
Residential society donates cycles to kin of farmers who committed suicide
The society called upon its over 1,000 residents to participate in this cause and hosted a day-long donation drive on Sunday, during which they managed to collect stationery and books for these children, who are from different parts of Maharashtra.
पिंपळे सौदागरमध्ये महिलांसाठी इ-टॉयलेट
नवी सांगवी (पुणे) - सार्वजनिक स्वच्छता गृहांच्या अभावी महिलांची होत असलेली कुंचबना पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिका व सँमटेक क्लिन अँण्ड क्लिअर सिस्टिमच्या वतीने पिंपळे सौदागर येथे लवकरच इ-टॉयलेट ही संकल्पना प्रत्यक्षात येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे लिनियर गार्डनचे काम पुर्णत्वाला येत असताना येथे आधुनिक तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणेने जोडलेले स्वच्छता गृह येत्या आठवडाभरात बसविले जाणार आहे.
स्मार्ट सिटीसाठी पार्किंग पॉलिसी
पिंपरी - शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. त्यासाठी वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या विचारात घेऊन पार्किंग धोरणही ठरवावे लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर युरोपातील शहरांसह देशातील मुंबई, रांची, बंगळूर, चेन्नई, नागपूर, पुणे या शहरांचा अभ्यास करून महापालिकेने पिंपरी-चिंचवडसाठी पार्किंग धोरण आखले आहे. त्याचे सादरीकरण दोन दिवसांपूर्वी महापालिका भवनात सहशहर अभियंता राजन पाटील यांनी केले होते. हे धोरण मान्य करण्यासाठी आगामी सर्वसाधारण सभेसमोर बुधवारी (ता. २०) प्रशासनाकडून मांडले जाण्याची शक्यता आहे. शहरासाठी निश्चित केलेले पार्किंगचे दर अन्य शहरांच्या तुलनेने कमी राहणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
पार्किंग धोरण गरजेचे - हर्डीकर
पिंपरी - रस्त्यांच्या रुंदीकरणाला असलेल्या मर्यादा, शहरातील वाढती वाहने, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि हॉकर्स झोनचा प्रश्न यासाठी पार्किंग धोरण ठरविणे गरजेचे आहे. त्यासाठी नगरसेवक व नागरिकांनी सूचना मांडाव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.
लाखो कालबाह्य वाहने वापराविना
पिंपरी - वाहन घेतल्यानंतर त्याच्या वापराची १५ वर्षांची मुदत संपल्यानंतर वाहन भंगारात टाकण्यासाठी पर्यावरण करासारख्या जाचक करामुळे लाखो कालबाह्य वाहने वापराविना पडून आहेत. या वाहनांचा गौरवापर होण्याची शक्यता आहे.
हायपरलूप प्रकल्प पुणेकर करणार पहिला प्रवास
पुणे - हायपरलूपमधून पहिला प्रवास करण्याचा जगात पहिला बहुमान पुणेकरांना मिळणार आहे. कारण मुंबई-पुणेदरम्यान प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात येणारा १५ किलोमीटर लांबीचा पहिला ‘डेमन्स्ट्रेशन ट्रॅक’ असणार आहे. त्यामुळे जगातील अन्य देशांसाठी हा ट्रॅक पथदर्शी ठरणार आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठीचा व्यवहार्यता पडताळणी अहवाल (फिजिब्लिटी रिपोर्ट) ऑगस्टमध्ये संबंधित कंपनी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) सादर करणार आहे.
गुगलवर बस फेऱ्यांची माहिती
पुणे : स्टॉपवर पोहोचल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बस किती वेळात येणार? प्रवाशांना किती वेळ प्रतीक्षा करावी लागणार? एखाद्या स्टॉपवरून कोणत्या मार्गाच्या बस धावतात ? त्यांचे वेळापत्रक कसे आहे, आदी सर्व प्रश्नांची उत्तरे प्रवाशांना एका क्लिकवर मिळत आहेत. प्रवासी बस स्टॉपवर पोहोचताच त्यांच्या मोबाइलवर 'गुगल मॅप'कडून बस स्टॉपचे नाव आणि तेथून जाणाऱ्या सर्व बसच्या माहितीचे नोटिफिकेशन प्राप्त होत आहे. त्यासाठी, प्रवाशांच्या किंवा सामान्य नागरिकांच्या मोबाइलचे 'गुगल लोकेशन' किंवा 'जीपीएस' सुरू असणे आवश्यक आहे.
समन्वयाअभावी रखडली मेट्रो
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी महामेट्रो आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील समन्वयाच्या अभावामुळे पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे काम सध्या रखडलेले आहे. महापालिका इमारत ते खराळवाडी या दरम्यान बीआरटी मार्गातून मेट्रोचे पीलर घेण्याचा नसता उद्योग काही अधिकाऱ्यांनी केला. त्याला महापालिका अधिकाऱ्यांनी तोंडी परवानगी दिल्याचे सांगितले गेले. आता महापालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांना उपरती झाली आणि हे कामच थांबविण्यात आले. त्यापुढे जाऊन बीआरटी मार्गात मेट्रोचे उभारण्यात आलेले पीलर (खांब) तोडून टाकण्यात येणार आहे.
गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचे पाऊल
महापालिकेपासून नगरपरिषदापर्यंत प्रभाग रचनेत होणारा हस्तक्षेप आणि निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने आता पाऊल उचलले आहे. त्यानुसार प्रभाग रचनेपासून प्रत्यक्ष मतदानापर्यंत निवडणुकीशी संबंधित अधिकार्यांच्या बदल्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत आयोगाकडून धोरण तयार करण्यात येत असून त्यासंबंधीचा मसुदा तयार करण्यात आला आहे.
Maharashtra's penalty tax waiver will benefit thousands, but it raises several questions
The decision, which will be applicable to all illegal structures across Maharashtra, will benefit as many as 32,774 illegal structures in Pimpri-Chinchwad, where the demand for scrapping the penalty tax had first emerged, triggering protests by residents.
Minimum Wages Act: Unions say implementation ‘just on paper’
Ramesh Shetty (name changed), who works as an unskilled labour in an automobile company in Chinchwad, has been making Rs 7,000 per month for the last one year, instead of the mandatory Rs 9,000. A migrant labourer, Shetty said the fear of losing his only source of income has kept him silent. “Labour leaders in the neighbouring companies have told me that I am getting lesser than I should. But I do not want to take any action, as I may end up losing my only source of income,” he said.
‘In Pimpri-Chinchwad, small and medium industries can’t expand due to land constraint’
A year since the promulgation of the GST, small and medium industries of Pimpri Chinchwad have reported ease in filing of returns. Sandeep Belsare, president of the Pimpri Chinchwad Small and Medium Scale Industries Association, spoke to The Indian Express about the atmosphere in the industrial circles in the region
भामा आसखेड प्रकल्पप्रश्नी लवकरच उच्चस्तरीय बैठक
पुणे - भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पंधरा दिवसांत विभागीय आयुक्तांबरोबर उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन आमदार जगदीश मुळीक यांनी दिले.
सुरक्षा रक्षकाकडून प्राधिकरणात एक कोटींची घरफोडी
पिंपरी : कटावणीच्या साहाय्याने दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 97 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना प्राधिकरण निगडी येथे शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली. सुरक्षा रक्षकानेच ही चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
चिंचवडेनगर येथे पदपथावरच भरते भाजी मंडई
पिंपरी : चिंचवडेनगर येथे सध्या पदपथावरच भाजी मंडई भरते आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्याने ये-जा करणे अवघड जात आहे. असे असले तरी मंडई नसल्याने भाजी विक्रेते व नागरिक यांची गैरसोय होत आहे. चिंचवड जुना जकातनाका ते वाल्हेकरवाडी या रस्त्यावर सध्या चिंचवडेनगर येथे रस्त्याच्या एका बाजूला भाजी मंडई भरते आहे. याच रस्त्यावर भाजी मंडईपासून काही अंतरावर चिंचवडकडे जाताना फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या लावलेल्या पाहण्यास मिळतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो.
“एचए’ वसाहतीला “घरघर’
– वसाहतीतील घरे मोजतायेत अखेरची घटका
रुपेश पाईकराव
पिंपरी – हिंदुस्थान ऍण्टीबायोटीक्स कंपनीच्या कामगार वसाहतीमध्ये महिलेवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे येथील रहिवासी कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. वसाहतीची सुरक्षा, देखभाल, दुरुस्ती अशा सर्वच बाबतीत केंद्र सरकारचे दुर्लक्ष झाल्याने या वसाहतीतील घरे अखेरची घटका मोजत आहेत.
पिंपरी – हिंदुस्थान ऍण्टीबायोटीक्स कंपनीच्या कामगार वसाहतीमध्ये महिलेवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे येथील रहिवासी कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. वसाहतीची सुरक्षा, देखभाल, दुरुस्ती अशा सर्वच बाबतीत केंद्र सरकारचे दुर्लक्ष झाल्याने या वसाहतीतील घरे अखेरची घटका मोजत आहेत.
झाडे जगवण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा- साध्वी प्रीतिसुधाजी
पिंपरी : 'भगवान महावीर यांनी "जिओ और जिने दो.." हा संदेश दिला आहे. प्राणीमात्रांविषयी करूणाभाव ठेवण्याची भावना जपताना झाडे जगवण्याचे काम देखील आपण केले पाहिजे. पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे यामध्ये सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे'', असे प्रतिपादन वाणीभूषण साध्वी प्रीतिसुधाजी यांनी रहाटणी येथे केले.
वृक्ष लागवडीसाठी हरीत सेना सज्ज
पिंपरी – जागतिक तापमानात होत असलेली वाढ, वातावरणात होणारे बदल, निसर्गाचे बदलेले ऋतुचक्र, अनियमित पर्जन्यमान यासह अनेक कारणांमुळे पर्यावरण ढासळत चालले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 1 जुलै ते 15 जुलै या कालावधीत राज्यभरात 30 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी हरीत सेना स्थापन करण्यात आली आहे. त्याला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून पुणे जिल्ह्यातून एक लाख 93 हजार 111 इतकी सदस्य नोंदणी झाली आहे.
भाजपा चिंचवड विधानसभा यांच्या वतीने सांगवीत स्वच्छता मोहीम
जुनी सांगवी : भाजपा चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभा भारतीय जनता पार्टी, वुई लव्ह फाऊंडेशन व महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सांगवी येथील पीडब्ल्युडी मैदान व परिसरात 'जागतिक स्वच्छता मोहीम-२०१८' अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
स्वच्छता अभियानाविषयी शिक्षकांची कार्यशाळा
निगडी – स्वच्छ भारत मिशन व स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छताविषयक विविध उपक्रमांचे वार्षिक नियोजन ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाकडून करण्यात येत आहे. याचा भाग म्हणून विद्यालयाने शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते.
जखमेवर आता इलेक्ट्रॉनिक बॅंडेज?
बारीकसारीक जखमा झाल्या की आपण पटकन एक बॅंडएड लावतो. जखम मोठी असेल तर बॅंडेज करतो. आता त्यासाठी येत आहे इलेक्ट्रोनिक बॅंडेज. अमेरिकेतील परड्यू विद्यापीठात चाललेल्या या प्रयोगात नॅनो आकाराच्या तारांची जाळी तलम पॉलिमरमध्ये बसवलेली आहे. जखमेवर अलगद बसणाऱ्याय या लवचिक इलेक्ट्रॉनिक बॅंडेजमधून आवश्यक ती औषधांची मात्रा आवश्यक त्या प्रमाणात सोडता येईल. इलेक्ट्रॉनिक्स वापरून त्वचेला सूक्ष्म उत्तेजन देऊन जखम भरण्याच्या आणि त्वचा सांधून येण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढवता येईल. पुढे जाऊन या बॅंडेजमध्ये नॅनोसेन्सर्स बसवून जखमेच्या स्थितीवर सतत लक्षदेखील ठेवता येईल. जखमेवर त्यांचा हलका थर दिला की तो त्वचेत सहज मिसळून जातो. अक्षरश: दोन मिनिटात हे बॅंडेज छापून होतं.
पुणे-लोणावळा लोकल दुपारच्या वेळेत बंद असल्याने विद्यार्थी, प्रवाशांची गैरसोय
पिंपरी : पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकल दुपारच्या वेळेत बंद असल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक यांची सध्या चांगलीच गैरसोय होत आहे. पर्यायाने, त्यानंतर सुटणाऱ्या लोकलला प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी अशा सर्वांचीच अडचण होत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)