Friday, 27 July 2018

विशेष मतदार नोंदणी मोहीम दिवस 28 जुलै; महत्वाची माहिती

मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदविणे, नावातील दुरुस्ती, पत्ता दुरुस्ती, रंगीत फोटो देणे, मतदार यादीतून नाव वगळणे इत्यादी कामासाठी दिनांक 28 जुलै 2018, शनिवार या दिवशी आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदार नोंदणी/ यादी अद्ययावत करण्याचे कामकाज चालणार आहे तेव्हा जरूर या संधीचा लाभ घ्यावा. मतदार नोंदणी हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे!

👉 पिंपरी / भोसरी / चिंचवड विधानसभा क्षेत्रातील तुमच्या जवळचे मतदान केंद्र/BLO केंद्र जाणून घेण्यासाठी इथे दिलेली लिंक वापरावी - https://goo.gl/AR8v4o 
👉 ऑनलाईन नोंदणीसाठी दुवा www.nvsp.in (हेल्पलाईन 1950) 
👉 मतदार नोंदणी संदर्भात नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQs) - https://goo.gl/auy4Ey
👉 मतदार नोंदणी मोहीमेसंदर्भात अधिक माहिती व मदतीसाठी कृपया इथे संपर्क साधावा 
#1 205 CHINCHWAD | Ms. Varsha Sapkal - Mobile/WhatsApp: 7798755699, Email: 205chinchwadelc@gmail.com, Landline: 020 27703134 (Office hours)
#2 206 PIMPRI | Mr. Kulkarni - Mobile/Whatsapp: 9765706451, Email: 206pimpriac2014@gmail.com
#3 207 BHOSARI | Ms. Sawant - Mobile/Whatsapp: 9049340944, Email: 207bhosari@gmail.com
👉 कृपया आपल्या विधानसभा क्षेत्रातील जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत हा मेसेज फेसबुक टॅग, ट्विटर, whatsapp द्वारे पोहचवा 🙏
Facbook page: facebook.com/PCMCVoter
Twitter: twitter.com/PCMCVoter

पिंपरी न्यायालयाच्या नव्या इमारतीचे काम लवकर होणार सुरु

मुख्यमंत्र्यांनी दिले पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशनला आश्‍वासनशहरास स्वतंत्र व प्रशस्त न्यायालयीन इमारतीची आवश्यकता

‘बीआरटीएस’ चा अहवाल उच्च न्यायालयात सादर

सिंहासन न्यूज : निगडी – दापोडी बीआरटीएस चाचणी अहवाल उच्च न्यायालयात सादर सिंहासन न्यूज ः पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बहुचर्चित बीआरटीएस कॉरिडॉरचा चाचणी अहवाल गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. बुधवारी (दि.25) या काॕरिडाॕरमध्ये बसची चाचणी घेण्यात आली होती. यावेळी बसथांब्यांचे दरवाजे न उघडण्याच्या चुकांची पुनरावृत्ती झाली. मात्र, ही तांत्रिक त्रुटी दूर केल्यानंतर या मार्गावरील बस चाचणी यशस्वी पार पडली. या चाचणीचा अहवाल आज महापालिका प्रशासनाच्या वतीने उच्च न्यायालयात सादर करण्यात आला.

केवळ एक खड्डा बुजविण्यास ‘जेट पॅचर’चा खर्च बाराशे रूपये; पावसाळ्यातील 4 महिन्यांसाठी 2 कोटी 80 लाख पालिकेचा खर्च

पिंपरी चिंचवड शहरात पावसाळ्यातील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने जेट पॅचर मशिन ठेकेदारी तत्वावर घेतले आहे. एक चौरस मीटरचा खड्डा बुजविण्यासाठी 1 हजार 200 रूपये दर आहे. केवळ 4 महिन्यांच्या कामासाठी तब्बल 2 कोटी 80 लाखांचे बिल अदा केले जाणार आहेत. सर्व प्रकारच्या खड्डे दुरूस्तीसाठी ही यंत्रणा उपयुक्‍त नाही. हे काम ठेकेदारांसाठी कुरण ठरत असून, भरमसाट खर्च करूनही शहरातील खड्डे दुरूस्त होत नसल्याचे विरोधक दावा करीत आहेत.

Action plan to check porn, net addiction among kids

PUNE: Members of the city advisory board (CAB) of Dnyana Dev ..


रहाटणी, काळेवाडीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी

पिंपरी – रहाटणी-काळेवाडी परिसरात एकाच महिन्यात दोघा जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आणि गुन्हेगारांना चाप बसविण्यासाठी रहाटणी-काळेवाडी परिसरात प्रामुख्याने बळीराज मंगल कार्यालय चौक, रहाटणी फाटा आदी ठिकाणी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी रहाटणी-काळेवाडी येथील शिवसेना प्रभाग प्रमुख युवराज दाखले यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

“कामगार’ संकल्पनेवर घाला?

कामगारनगरीतून

निशा पिसे
——–

कामगार हा पिंपरी-चिंचवड कामगारनगरीचा कणा. मात्र, राज्यकर्त्यांच्या बिल्डरधार्जिण्या धोरणामुळे हा कणा डळमळीत झाला असतानाच केंद्र सरकारने कामगार कायद्यात बदलाचा घाट घालून कामगार उद्धवस्त करण्याचे धोरण अवलंबले आहे. कायम कामगार ही संकल्पना धोक्‍यात असताना आता कंत्राटी कामगार ही संकल्पना देखील मोडीत निघण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. रोजगार निर्मितीच्या नावाखाली प्रशिक्षणार्थी कामगार म्हणून श्रमिकांना राबवून घेण्याची खेळी कामगार कायद्यातील बदलामध्ये करण्यात आली आहे. कामगार या संकल्पनेवर घाला घालणारे हे बदल पाहता कालचा गोंधळ बरा होता, असे म्हणण्याची वेळ कामगार वर्गावर आली आहे.

पिंपरी पदांचा रंगमंच

पिंपरी : सत्ता कोणत्याही पक्षाची असो. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदांचा फिरता रंगमंच कायम आहे. कारभार बदलला तरी कारभारी तेच असल्यामुळे या राजकीय पटलावर महापौरपदावर कोण बाजी मारणार, यासाठी चढाओढ चालू झाली आहे. निवडून आलेल्या प्रत्येकाला पद देण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या धोरणाची चर्चा या निमित्ताने पुन्हा रंगू लागली आहे.

[Video] पिंपरी महानगरपालिकेच्या पंतप्रधान घरकुल योजनेत ११० कोटींचा भ्रष्टाचार !


बोर्‍हाडेवाडी गृहप्रकल्प आयुक्तांनी मागे घेतला; स्थायी कडून उपसूचनेत तांत्रिक सुधारणा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बोर्‍हाडेवाडी येथे राबविण्यात येणार्‍या पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पाचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी (दि.25) झालेल्या स्थायी समिती सभेत मागे घेतला. त्यामुळे या विषयी फेरप्रस्ताव लवकरात लवकर दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

पिंपरीच्या महापौर व उपमहापौरांची नावनिश्‍चिती होणार मंगळवारी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे व उपमहापौर शैलजा मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मंगळवारी (दि. 24) दिला. या रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवार (दि. 31) अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्या दिवशी भाजपच्या दुसर्‍या महापौर व उपमहापौराचे नाव निश्‍चित होणार आहे. तसेच, निवडणुकीची विशेष सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 4 ऑगस्ट) सकाळी अकराला आयोजित केली आहे, अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी गुरुवारी (दि.26) दिली. 

पिंपरी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांवर भाजप नेत्यांची मेहेरनजर

भाजप नेत्यांच्या कृपादृष्टीमुळेच आष्टीकरांना अतिरिक्त आयुक्तपदाची प्रभारी जबाबदारी सोपवण्यात आली.

महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिल राॅय यांचे आर्थिक अधिकार काढण्याचा स्थायीचा निर्णय

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्या अधिकारात स्थायी समितीने बुधवारी (दि.२५) आणखी घट केली. वैद्यकीय विभागातील खरेदीचे अधिकार व  वायसीएम रुग्णालयाचा पदभार काढून घेतल्यानंतर आता त्यांचे सर्व आर्थिक अधिकार काढून घेण्याचा निर्णय स्थायी समिती बैठकीत घेतला आहे.

चिंचवडला रविवारी शास्त्रीय संगीत सभेचे आयोजन…

चिंचवड :  ऋतुराज संगीत विद्यालयाच्या वतीने गुरूपौर्णीमेच्या निमित्ताने शास्त्रीय संगीत सभा आयोजित  करण्यातआली आहे.

कासारसाई धरणावर गर्दी

सोमाटणे - कासारसाई धरणात भिजण्याचा, कुसगाव, पाचाणे डोंगरदऱ्यातील जंगलातून फिरण्याचा आनंद, डोंगर उतारावरून वाहणारे पाणी, दऱ्याखोऱ्यांतून फिरताना ऐकू येणारा पक्ष्यंचा किलबिलाट याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गेल्या दोन वर्षांपासून कासारसाई धरण परिसराला अधिक पसंती आहेत. तथापि, एकूण पर्यटकांमध्ये तरुणांचे प्रमाण मोठे असल्याने, बेशिस्तीही वाढत असल्याचे चित्र आहे. त्याला लगाम घालण्याची आवश्‍यकता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. 

खऱ्या ओबीसींवर भाजपकडून अन्याय

पिंपरी (पुणे) - महापालिका निवडणुकीत ओबीसींनी भाजपला भरभरून मतदान केले. मात्र आता पदांचे वाटप करताना खऱ्या ओबीसींवर अन्याय केला जात असून कुणबी जात प्रमाणपत्रावर निवडून आलेल्यांना संधी दिली जात असल्याचा आरोप बारा बलुतेदार महासंघ आणि पिंपरी चिंचवड ओबीसी संघर्ष समितीने केला आहे. 

सरकारी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला

सातवा वेतन आयोगाची थकबाकी गणेशोत्सवात मिळणार 
मुंबई – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अखेर गणपती बाप्पा पावला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी येत्या गणेशोत्सवापूर्वीच मिळणार आहे. थकबाकीचा सुमारे पाच हजार कोटींचा पहिला हप्ता थेट कर्मचाऱ्यांच्या पगारात जमा होणार आहे, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली.

मेडिकल प्रवेशासाठी डोमिसाइल बंधनकारक


हायकोर्टाचा निर्वाळा : राज्य सरकारचा निर्णय ठरविला वैध
30 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्दमुंबई- वैद्यकिय अभ्यासक्रमासाठी

 राज्यातील कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डोमिसाइल प्रमाणापत्राबरोबरच (वास्तव्याचा दाखला) दहावी आणि बारावी राज्यातून उर्त्तीण असणे बंधनकारक करण्याची राज्य सरकारची अट ही राज्य हिताच्या दृष्टीने योग्य आणि घटनात्मकदृष्टया वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.