पिंपरी-चिंचवड शहराचा घरोघरचा कचरा जमा करून तो मोशी कचरा डेपोत वाहून नेण्याचा कामासंदर्भात स्थायी समितीने घेतलेल्या ठरावाची माहिती अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही. त्यामुळे शहराचे 4 भाग करून सुरू असलेली निविदा प्रकिया कायम ठेवण्यात आली आहे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी(दि.22) पत्रकार परिषदेत सांगितले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 24 October 2018
मोरीला बोळा आणि दरवाजा सताड उघडा”, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची प्रशासनावर टीका
रावेत येथील बंधा-यावरून जेवढे पाणी उचलले जाते. त्यातील 40 टक्के पाण्याची गळती होते. ही गळती रोखण्याऐवजी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला जात आहे, म्हणजे “मोरीला बोळा आणि दरवाजा सताड उघडा” अशातला हा प्रकार आहे, अशी टिका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.
स्वच्छतागृह अस्वच्छ; ठेकेदारावर दंडात्मक कारवाई
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ प्रभाग क्षेत्रातील स्वच्छतेची आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि.22) अचानक पाहणी केली. स्वच्छातागृह अस्वच्छ होते. तसेच राडारोडा पसरलेला होता. अस्वच्छतेला कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई, मुकादमाचा एक दिवसाचा पगार कापण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच प्रभाग अधिका-यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. शहरातील आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
प्रभारी अतिरिक्त आयुक्तांनी भांडार विभागाचे केलेय दुकान – राजू मिसाळ
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी भांडार विभागाचे अक्षरश: दुकान केले आहे. भांडार विभाग दिवाळखोर मानसाच्या हातामध्ये दिला आहे. त्यांच्याबद्दल असंख्य तक्रारी असतानाही आयुक्त श्रावण हर्डीकर त्यांना वारंवार पाठिशी घालत आहेत.
आमदार आपल्या दारी गुरुवारी कार्यक्रमाचे आयोजन
एमपीसी न्यूज – विविध शासकीय योजनांची प्रकरणे एकाच ठिकाणी एकाच दिवशी मार्गी लागण्यासाठी दि. 25 ऑक्टोबरला चिंचवड मोहननगर येथे ‘आमदार आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरीचे शिवसेना आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
‘बेकायदा वृक्षतोड करणा-यांवर आता फौजदारी कारवाई’
एमपीसी न्यूज – वृक्षांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. झाडाची छाटणी करण्याची परवानगी असताना बुंध्यापासूनच झाड तोडले जात आहे. सर्रासपणे झाडांची कत्तल केली जात आहे. यापुढे विनापरवाना झाड कापल्यास सार्वजनिक मालत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. झाडाची कत्तल करुन घेऊन जाणारी वाहने जप्त करण्यात येणार आहेत.
वाहनतळावर बेकायदा कब्जा करणा-यांवर कारवाई; आयुक्तांचा आदेश
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी सेक्टर क्रमांक 23 वाहतूकनगरी येथील आरक्षित वाहनतळावर बेकादेशीरपणे कब्जा करणा-यांवर कारवाई करण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. तसेच वाहनतळाचा ताबा कोणाकडे आहे? याचा शोध घेण्यात यावा. वाहनतळाची पाहणी करावी. याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे देण्यात आली आहे.
वायसीएम रुग्णालयात दीड कोटीचे फर्निचर बसविणार
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात नवीन फर्निचर बसविण्यात येणार आहे. त्यासाठी दीड कोटी रूपये खर्च होणार आहे. तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. स्थायी समिती सभेत आयत्या वेळी या विषयाला मंजुरी देण्यात आली. संत तुकारामनगर येथे पिंपरी – चिंचवड महापालिकेचे 750 खाटांचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे.
शहरबात : वाढत्या गुन्हेगारीची चिंता
लोकप्रतिनिधी आणि पोलीस आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीत वाढत्या गुन्हेगारीविषयी लोकप्रतिनिधींनी चिंता व्यक्त केली. तर, अपुऱ्या सोयी सुविधांविषयी पोलिसांकडून तक्रारीचा सूर काढण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीत नव्या पोलीस आयुक्तालयाची खडतर वाटचाल सुरू आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी मोडून काढण्याचे मोठे आव्हानही पहिल्या पोलीस आयुक्तांसमोर आहे. तूर्त, कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही आणि कोणतेही प्रकरण दडपले जाणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
ई-बसची खरेदी रखडणार
स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या दीडशे ईलेक्ट्रिकल बस (ई-बस) खरेदीसाठीच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे निविदेला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची वेळ पीएमपी प्रशासनावर आली आहे. त्यामुळे ई-बस खरेदी प्रक्रिया रखडणार असल्याचे स्पष्ट झाले असून नव्या वर्षांत तरी पीएमपीच्या ताफ्यात ई-बस दाखल होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
खासगी प्रवासी वाहतूकदारांनी वेळा बदलल्या
पुणे - सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते आठ ही वेळ वगळून शहरात प्रवेश करण्याचा निर्णय खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालकांनी सोमवारी झालेल्या बैठकीत घेतला. त्यानुसार नागपूर, अमरावती, चंद्रपूरला जाणाऱ्या बस सुटण्याच्या वेळा बदलण्याचेही ठरले.
प्राधिकरणातही गगनचुंबी इमारती
पिंपरी - आतापर्यंत मोठ्या उंचीचे टॉवर मुंबईसारख्या शहरात बघायला मिळायचे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकरणाचा वाढता वेग आणि अपुऱ्या जागेची कमतरता भरून काढण्यासाठी प्राधिकरण परिसरात आता २२ मजली टॉवर उभे राहणार आहेत. प्राधिकरण क्षेत्रात पूर्वी ३६ मीटर उंचीपर्यंत (अकरा मजल्यांपर्यंत) बांधकाम करण्यास परवानगी होती. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत ६९ मीटर (बावीस मजल्यांपर्यंत) बांधकाम करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात सदनिका उपलब्ध होणार आहेत. प्राधिकरण परिसरात पिंपरी-चिंचवड पालिका, एमआयडीसी, पुणे पालिका व सिडको यांच्यासाठी मंजूर असलेल्या चटईक्षेत्र निर्देशांकाचा विचार करून बांधकाम चटईक्षेत्र निर्देशांक प्रस्तावित करण्यात आले आहे.
पाण्याचे गांभीर्य ना प्रशासनाला ना राज्यकर्त्यांना
निम्म्या शहराला पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने सत्ताधारी हवालदिल झाले आहेत. रखडलेला पवना जलवाहिनी प्रकल्प, नियोजित भामा आसखेड व आंद्रा प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठ्यास परवानगी हे दोन महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांना कंबर कसावी लागेल. या प्रकल्पांचे काम सुरू झाल्यानंतरही त्याद्वारे शहरात पाणी पोचण्यास किमान तीन वर्षे लागतील. तोपर्यंत नागरिकांना या पाणीसंकटाचा सामना करावाच लागणार आहे.
झोपडपट्टीमुक्तीसाठी थांबा १४२ वर्षे
पुणे - झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) स्थापन होऊन बारा वर्षे पूर्ण झाली. परंतु आतापर्यंत केवळ ४७ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन झाले. शहरातील घोषित झोपडपट्ट्यांची संख्या ५५७ आहे. सरकारचे धोरण असेच राहिले, तर पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त होण्यासाठी सुमारे १४२ वर्षे लागतील.
विकासकामांसाठी शासकीय जागा आगाऊ मिळणार
पुणे - शासकीय काम आणि सहा महिने थांब, हा सर्वसामान्य नागरिकांना येणारा अनुभव सरकारमधील खात्यांना देखील येत असल्याचे अनेक प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. मात्र, आता त्याला फाटा देत राज्य सरकारने सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांसाठी सरकारी जागेची मागणी झाली, तर त्यांना आगाऊ जमिनीचा ताबा द्यावा, असे आदेश काढले आहेत. ताबा दिल्यानंतर उर्वरीत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यात म्हटले आहे. त्यामुळे विकासकामे गतीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
तब्बल 38 टक्के पाण्याची गळती अन् चोरी
चौफेर न्यूज : शहरात दररोज होत असलेल्या पाणी पुरवठ्यापैकी तब्बल 38 टक्के पाण्याची गळती आणि चोरी होत असल्याचा खुलासा आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी केला आहे. 31 ऑक्टोंबरपासून अनधिकृत नळ कनेक्शन धारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असून या विभागाच्या सर्वच अधिकार्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्याचे सांगत आयुक्तांनी एकप्रकारे अघोषित ‘पाणीबाणी’ जाहीर केली आहे.
मॉडर्नमध्ये पर्यावरण पूरक आकाश कंदील कार्यशाळा
निगडी – यमुनानगर येथील मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. प्राचार्य सतीश गवळी यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले.शिरीष पडवळ यांनी विद्यार्थ्यांना कागदापासून अतिशय सहजरित्या वेगवेगळ्या आकाराचे आकाश कंदील बनवण्यास शिकवले. चौकोनी, गोलाकार, चांदणी अशा विविध आकाराचे आकाश कंदील बनवून विद्यार्थ्यांनी स्व-निर्मितीचा आनंद घेतला. दिवाळीसाठी बाजारात प्लास्टिकचे अनेक आकाश कंदील विक्रीसाठी येतात. मात्र प्लास्टिकचे अनेक दुष्परिणाम पाहता पर्यावरण पूरक आकाश कंदीलच सर्वांनी वापरावेत, यासाठी जनजागृती करण्याचा मानस विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
राजमाता जिजाऊ महाविद्यालयात नव मतदार नोंदणी सुरू
भोसरी – भोसरी विधानसभा मतदार संघ आणि राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी, भोसरी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाने नव मतदार नाव नोंदणी सुरू केली आहे. तहसीलदार अंजली सावंत, प्राचार्य डॉ. गौतम भोंग, उप प्राचार्य प्रा. दादासाहेब पवार यांनी उद्घाटन केले. वय वर्षे 18 पूर्ण आहे त्यांनी मतदार नोंदणी फॉर्म भरून नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. गौतम भोंग यांनी केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. दिपक पावडे, प्रा. सविता वीर, प्रा. मिनाक्षी मांढरे, प्रा. सुनिता पंचारिया, प्रा. कमलेश जगताप यांनी नियोजन केले.
अतिरिक्तांना आयुक्तांचे पाठबळ
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. मात्र, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर पाठिशी घालत आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतील हर्डीकर यांची ही भूमिका संशयास्पद आहे, अशा आरोप नगरसेवक राजू मिसाळ यांनी केला आहे.
हजारो लिटर पाणी वाया
सांगवी – स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात अनेक ठिकाणी कामे सुरु आहेत. मात्र, या कामात होत असलेल्या दिरंगाईचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. यावर्षी परतीच्या पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे कमी पाऊस पडला आहे, तसेच भविष्यात पाणी टंचाईची समस्या उभी राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे असताना दुसरीकडे मात्र पालिकेकडून करण्यात येत असलेल्या खोदकामामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकाजवळ खोदकाम करत असताना जेसीबीमुळे जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले.
एका रात्रीत तयार केलेला ‘तो’ गतिरोधक ठरतोय धोकादायक !
वाकड – डांगे चौक, चिंचवड रस्त्यावरील थेरगाव पुलाजवळ अचानक एका रात्रीत तयार केलेला ‘तो’ गतिरोधक नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. चोवीस तासाच्या आतच सहा जण धडकून पडले आहेत. या सहा अपघातांपैकी एका अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. कोणतेही निकष, मानक न पाळता रातो-रात तयार करण्यात आलेला हा गतिरोधक वेग कमी करण्याऐवजी अपघातांचे कारण बनला आहे. हा धोकादायक गतिरोधक ताबडतोब काढण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पिंपरी महापालिकेकडून 36 टक्के पाण्याचा जादा वापर
कामशेत –पिंपरी-चिंचवड महापालिकेला शासनाकडून मिळालेल्या मान्यतेपेक्षा 36 टक्के अधिक पाण्याचा वापर केला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत पाणीसाठ्यात 8 टक्के घट झाली आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळा, असे लेखी पत्र खडकवासला पाठबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाठविले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)