Monday, 12 November 2018

‘बेस्ट सिटी टू स्मार्ट सिटी’!

(गणेश यादव) संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, क्रांतीवीर चापेकर बंधू यांची जन्मभूमी असलेली पिंपरी-चिंचवडची भूमी आहे. ग्रामपंचायतींचे एकत्रीकरण करुन स्थापन झालेल्या नगरपालिकेने आशिया खंडातील सर्वात श्रीमंत नगरपालिका असा लौकिक मिळविला. खेड्याकडून शहराकडे, शहरातून महानगराकडे आणि महानगराकडून आता ‘स्मार्ट सिटी’कडे हे पिंपरी-चिंचवड शहर पाऊल टाकत आहे. औद्योगिक, कामगार, क्रीडा, […]

आनंददायक… पुण्यात पुढील वर्षी मेट्रो धावणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील वर्षात मेट्रो सेवा प्रत्यक्ष सुरू होणाऱ्या शहरांमध्ये नागपूर, अहमदाबाद, गांधीनगर, नोएडा, पुणे आणि नवी मुंबई या शहरांचा समावेश आहे. नव्याने मेट्रो प्रकल्पाची आखणी होणाऱ्या शहरांमध्ये प्रामुख्याने कानपूर, विशाखापट्टणम, सुरत, गुवाहाटी, पाटणा, कोइमतूर, थिरूअनंतपुरम, इंदूर आणि वाराणसी आदींचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय मंत्री हरदीपसिंह यांनी दिली आहे.

ग्रेड सेपरेटरमधील एक लेन वाहतुकीस खुली करणार

पिंपरी – दापोडी ते पिंपरी ग्रेड सेपरेटरमधील एक्‍स्प्रेस लेनवरील खराळवाडी ते वल्लभनगर येथील मेट्रोचे सेगमेंटचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूने बंद असलेली एक लेन सुरू करण्यात येणार आहे.

मेट्रोच्या ‘व्हायाडक्‍ट’ उभारणीला वेग (व्हिडिओ)

पिंपरी - महामेट्रोने बसविलेल्या तिसऱ्या गर्डर लाँचरचे काम सुरू झाल्यामुळे व्हायाडक्‍ट उभारणीला वेग आला आहे. व्हायाडक्‍टचे ५१ स्पॅन पूर्ण झाले. व्हायाडक्‍टचे १३ टक्के काम झाले असून, आता दरमहा पाच टक्के काम पूर्ण करण्याचे नियोजन महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. 

पहिला टप्पा ६६ हजार कोटींचा

पुणे - मेट्रो, मोनो रेल, लाइट रेल, बायपास रेल, बीआरटी यांसह प्रमुख चौकांचे आणि त्यांचे रुंदीकरण अशा सुमारे ६६ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची शिफारस असलेला पहिल्या टप्प्यातील अहवाल एल अँड टी कंपनीने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे सादर केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या हद्दीपासून सुमारे १० किलोमीटरच्या परिसरातील वाहतुकीचे नियोजन यामध्ये करण्यात आले आहे.

मदर तेरेसा पुलाच्या रॅम्पचे काम वेगात (व्हिडिओ)

पिंपरी - शहरातील सर्वाधिक लांबीच्या संत मदर तेरेसा पुलावर ये-जा करण्यासाठी एम्पायर इस्टेट सोसायटीजवळ रॅम्प बांधण्याचे काम वेगाने सुरू असून, दोन्ही बाजूला त्यासाठी १८ खांब उभारण्यात आले आहेत. उर्वरित दोन खांब उभारणीचे कामही सुरू असून, येत्या चार महिन्यांत रॅम्पचे काम महापालिकेतर्फे पूर्ण करण्यात येईल. रॅम्पवरून वाहतूक सुरू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन उद्यान विकसित

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाच्या समोरील जागेत नवीन उद्यान विकसित करण्यात येत आहे. लहान मुलांमध्ये विविध खेळांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हे उद्यान विकसित करण्यात येत असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या उद्यानामध्ये जॉगिंग ट्रॅक, अडथळ्यांची शर्यत, ट्री वॉकर्स, जंपर्स, वॉल क्‍लायबिंग आदी खेळणी बसविण्यात आली आहेत. त्याची ही चित्रमय झलक टिपली आहे "सकाळ'चे छायाचित्रकार अरुण गायकवाड यांनी.

40% PCMC-Swargate Metro route construction complete


PCMC warns habitual late-comers to maintain punctuality, introduces biometric attendance


Harassment tops complaints from societies in PCMC areas


Citizens vexed over trash situation near Chinchwad rly stn


स्वच्छता कर्मचाऱ्यांवर “डिजीटल वॉच’!

पिंपरी – महापालिका सेवेतील 1800 आणि कंत्राटी 2200 अशा सुमारे चार हजार स्वच्छता कामगारांवर लक्ष ठेवण्यासाठी जीपीएस घड्याळांचा आधार घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, जीपीएस घड्याळावरील हजेरीच्या आधारेच आरोग्य निरीक्षक आणि स्वच्छता कामगारांचे वेतन तर कंत्राटदाराचे बील निघणार आहे.

माध्यमिक विद्यालयांनाही “के-यॉन’ मशिन

पिंपरी – महापालिकेच्या प्राथमिक शाळांबरोबरच आत्ता माध्यमिकच्या अठरा शाळांनाही के-यॉन मशिन पुरविण्यात येणार आहे. दोन वर्षांसाठी या मशिनची देखभाल-दुरूस्ती ठेकेदार कंपनीकडून करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे पावणे बावीस लाख रुपये इतका खर्च केला जाणार आहे.

123 schools to get e-classrooms under smart city project


150 illegal vendors 'scrapped', 15000 residents relieved


Napping guards in Pimpri-Chinchwad societies prompts improved security


शहर परिवर्तन विकास आराखड्यात गोलमाल?

पिंपरी : महापालिकेच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहराचे एक अनोखे स्थान तयार करण्यासाठी आणि नागरिकांची जीनवशैली उंचावण्यासाठी एक उच्च दर्जाचे शहर म्हणून ओळख निर्माण करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांचे सर्वेक्षण करून शहर परिवर्तन विकास आराखडा तयार केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, त्यामध्ये सर्वाधिक सर्वेक्षण चिंचवड परिसरातून केले गेले आहे. त्यामुळे हा आराखडा सर्वसमावेशक नसल्याचे स्पष्ट होत आहे. शहराची नवी स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी शहराची तुलना बुरसा, लिऑन, बार्सिलोना, फ्रँकफर्ट तसेच, बर्मिंगहॅम, रिओ, सँटीयागो, जोहान्सबर्ग, मँचेस्टर, स्टुटगार्ट, क्लालालंपूर, तेल अविव, कोन, इंदूर, मेक्सिको सिटी या निवडक जागतिक शहरांशी करण्यात येत आहे.शहर परिवर्तन कार्यालय (सिटी ट्रॉन्सफॉर्मेशन ऑफिस-सीटीओ) या खासगी एजन्सीच्या मार्फत पालिकेस शहराची सध्याची परिस्थिती व भविष्यातील स्थितीमधील फरक व अंतर ओळखण्यास व अंमलबजावणीस योग्य उपाय शोधण्यात येत आहेत.  त्यासाठी पालिका सदर एजन्सीवर वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. 

रेकॉर्डब्रेक’ हवा प्रदूषण


PCMC will spend Rs 3.5 crore to remove illegal hoardings


महत्त्वाच्या शहरांची सुरक्षा तोकडी

पुणे : राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम ठेवण्याची सूचना मुख्यमंत्र्यानी केली. प्रत्यक्षात मात्र, या शहरांमधील वर्दळीची ठिकाणे बेभरवशाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः पुण्यासह, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड येथील सुरक्षा व्यवस्थेत तृटी असल्याचे आढळून आले आहे. 

11 हजार 765 वैयक्तिक शौचालयांचे काम पूर्ण

पिंपरी- भारत स्वच्छ अभियानाअंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानात शहरात 11 हजार 765 वैयक्तिक शौचालयांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याकरिता केंद्र व राज्य सरकारकडून 14 कोटी, चार लाख, 49 हजार, 935 रुपयांचा हप्ता प्राप्त झाला आहे. केंद्र, राज्य व महापालिकेच्या वतीने दिलेल्या आर्थिक अनुदानातून या शौचालयांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

लेखा विभागाने केले हात वर

पिंपरी – महापालिकेच्या लेखा विभागाला सादर केल्या जाणाऱ्या विविध बिलांची सर्व विभागांनी रितसर पोहच पावती घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. मात्र, ही पोहच न घेतल्यास बीले काढण्यात विलंब झाल्यास संबंधित विभाग प्रमुखांवर त्याची जबाबदारी राहणार असल्याचे सांगत लेखा विभागाने हात वर केले आहेत.

अवैध धंद्यांविरोधात अण्णा हजारेंना साकडे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारीबरोबरच अवैध धंद्याविरोधात अपना वतन संघटनेच्या वतीने मोहीम उघडण्यात आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन शहरातील अवैध धंदा विरोधात 17 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येणाऱ्या उपोषणाविषयी माहिती देण्यात आली.

एकपात्री नाट्यप्रयोगातून अहिराणीचे दर्शन

पिंपरी – खान्देश सांस्कृतीक विकास संस्थेमार्फत प्रथम अहिराणी चित्रपट “सटीना टाक’ या चित्रपटाचे निर्माते स्व. दत्ताराम सखाराम चिंचोले यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या एकपात्री नाट्यप्रयोगाने रसिकांना अहिराणीचे दर्शन घडले.

ही वाहने 'गॅस'वरच!


बर्सिलोना दौरा निव्वळ उधळपट्टी


रेशनवर आता चना, उडीद डाळही नियमित मिळणार

पुणे : रेशन दुकानात केवळ दिवाळीतच नव्हे, तर त्यानंतरही शिधापत्रिकाधारकांना दर महिन्याला तूरडाळीसोबतच उडीद आणि चना डाळही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत डाळी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिली. 

“त्या’ भंगार व्यावसायिकांना दणका

पिंपरी – चिखली, मोशी, कुदळवाडी परिसरातील भंगार व्यावसायिक दुरुउपयोगी साहित्याची जाळून विल्हेवाट लावतात. त्यामुळे परिसरात धूर व दुर्गंधी पसरते. याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वायूप्रदुषण करणा-या भंगार व्यावसायिकांना पालिकेतर्फे देण्यात येणा-या सोयी-सुविधा बंद कराव्यात. भंगार व्यावसाय सात दिवसात बंद करावा, असे सक्त निर्देश आमदार महेश लांडगे यांनी पालिकेच्या अधिका-यांना दिले आहेत. तसेच चाकण आणि परिसरातील घनकचरा पाठविणा-या कंपन्यांनाही नोटीस देण्याच्या सूचना त्यांनी केली आहे.

आळंदी-बोपखेल बीआरटीएसला मार्च महिन्याचा मुहूर्त?

पिंपरी – आळंदी-पुणे बीआरटी मार्गावर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बॅरिकेटस्‌चे काम पूर्ण झाले. बसथांबे व तांत्रिक कामे बाकी आहेत. येत्या मार्चमध्ये हा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्‍यता बीआरटी सूत्रांनी दिली. पुणे महापालिका हद्दीतील विश्रांतवाडीपासून पुढील सर्व मार्गावरील बस बीआरटी कॉरिडॉरमधून धावत आहेत.