Monday, 9 July 2012

नदीपात्रातील सात अनधिकृत बांधकामावर महापालिका आयुक्तांचा 'हातोडा'

नदीपात्रातील सात अनधिकृत बांधकामावर महापालिका आयुक्तांचा 'हातोडा' केशवनगर येथी...: नदीपात्रातील सात अनधिकृत बांधकामावर महापालिका आयुक्तांचा 'हातोडा'

केशवनगर येथील पवना नदीपात्रात भराव टाकून उभारण्यात आलेली सात बांधकामे महापालिकेच्या वतीने गुरुवारी (दि. 28) भुईसपाट करण्यात आली. नवनियुक्त आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कारवाईच्या दणक्याने नदीपात्रात बांधकामे करणा-यांच्या पोटात गोळा आला आहे


PCMC anti encroachment drive

पिंपरीतील स्मशानभूमीत प्रदूषण नियंत्रण यंत्रणा

http://www.mypimprichinchwad.com/पिंपरीतील स्मशानभूमीत प्रदूषण नियंत्रण यंत्...:

पिंपरी, 28 जून
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील स्मशानभूमीमध्ये वायू प्रदूषण यंत्रणा बसविण्यात येणार असून त्यासाठी महापालिका सुमारे 77 लाख रुपयांचा खर्च करणार आहे.

आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षेसाठी महापालिका भवनात सूचना फलक

http://www.mypimprichinchwad.com/आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षेसाठी महापालिका...:

पिंपरी, 28 जून
आपत्कालीन परिस्थितीत मुख्य प्रशासकीय इमारतीतून सुरक्षित बाहेर पडता यावे म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने इमारतीत सूचना फलक लावला आहे.

प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय मिळकतींची नोंदणी केल्यास फौजदारी गुन्हा

http://www.mypimprichinchwad.com/प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय मिळकतींची नोंदणी...:

पिंपरी, 27 जून
अनधिकृत बांधकामे होऊ नयेत तसेच अतिक्रमण रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्राधिकरणाची मंजुरी न मिळालेल्या प्रकल्पांतील मिळकतींची नोंदणी केल्यास यापुढे नोटरी किंवा दुय्यम निबंधक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. महावितरण किंवा महापालिकेने अनधिकृत प्रकल्पांना कोणत्याही सेवा किंवा सोयीसुविधा पुरवू नयेत असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच अतिक्रमण होऊ नये म्हणून प्राधिकरणाच्या मिळकतींवर कुंपण घालण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

GE to set up manufacturing plant at Chakan

GE to set up manufacturing plant at Chakan:
Indian Express: As part of its expansion plans, GE on Friday announced it would build a first-of-its-kind manufacturing facility in Chakan, spread over 68 acres at an investment of Rs 1,000 crore. The manufacturing facility would help the company develop localised products and solutions for the energy sector in its first phase of operations that would commence in 2013. A memorandum of understanding (MOU) was signed in this regard between the state government and GE here on Friday.

अजितदादांच्या आदेशाला महापालिका जागली

अजितदादांच्या आदेशाला महापालिका जागली: पिंपरी -&nbsp नदीपात्रालगत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी महापालिका प्रशासनाला दिले.

Corporates can play a role in maintaining city roads: Pandhre

Corporates can play a role in maintaining city roads: Pandhre: The city roads may have a new look with proper road signage, lane markings and zebra crossings, if a proposal by the traffic branch is implemented.

Former corporator arrested in attempt-to-murder case

Former corporator arrested in attempt-to-murder case: The Bhosari police on Tuesday night arrested former corporator of Pimpri-Chinchwad Municipal Corporation Sunny Ovhal and three others for allegedly assaulting a man at Dapodi on Tuesday afternoon.

No water cuts in Pimpri-Chinchwad

No water cuts in Pimpri-Chinchwad: Pune: The twin township of Pimpri-Chinchwad may not face water cuts unlike its neighbouring Pune city which is reeling under water crisis.

Bhosari man tests positive for H1N1

Bhosari man tests positive for H1N1: A case of swine flu infection was found in Pimpri-Chinchwad after a gap of almost two months, when a 21-year-old man tested positive on Wednesday.

यंदाही विद्यार्थ्यांना मोफत बसपास

यंदाही विद्यार्थ्यांना मोफत बसपास: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील महापालिकेच्या आणि मान्यताप्राप्त खासगी शाळेतील पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलचे मोफत बसपास यंदाही देण्यात येणार आहेत. त्यासाठी येत्या ३० जूनपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील, अशी माहिती महापौर मोहिनी लांडे यांनी दिली.

पर्यायी रस्त्याला लष्कराची फुली

पर्यायी रस्त्याला लष्कराची फुली: दापोडी-बोपखेल गावांना जोडणा-या सीएमई हद्दीतील प्रस्तावित २४ मीटर रस्त्यासाठी जागा देण्यास संरक्षण विभागाने स्पष्ट नकार दिल्यामुळे नागरिकांची पुन्हा एकदा घोर निराशा झाली आहे. पावसाळ्यात रस्त्यांचे डागडुजीकरण करण्यासही मज्जाव केल्यामुळे येथील रहिवाशांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

नऊ कोटींच्या औषध खरेदीत ...

नऊ कोटींच्या औषध खरेदीत ...:
स्थायी समितीत आज प्रस्ताव
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांसाठी नऊ कोटींची औषध खरेदी करण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव उद्या (गुरुवारी) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या औषध खरेदीच्या प्रक्रियेत ‘मॅचफिक्सिंग’ झाल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असून त्यामध्ये स्थायी समितीचे आघाडीचे सदस्य, पालिकेतील बडे अधिकारी आणि सत्तारूढ पक्षाची नेतेमंडळी सहभागी असल्याची उघड चर्चा सुरू आहे.
Read more...

अनधिकृत बांधकामे केल्यास वीज नाही ...

अनधिकृत बांधकामे केल्यास वीज नाही ...:
प्राधिकरण सभेचा निर्णय
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांविरुध्द सुरू असलेल्या धडक कारवाईवरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकारण पेटलेले असताना, एकीकडे पाडापाडी होत असूनही राजरोसपणे नव्याने अनधिकृत बांधकामे सुरूच असल्याचे पाहून प्राधिकरणाने त्याविरोधात कठोर पाऊल टाकले आहे.
Read more...

संक्षिप्त

संक्षिप्त:
‘पर्यावरण शाळेचे’ उद्घाटन
भारतीय सर्पविज्ञान संस्थेच्या वतीने वाकसाई, मावळ येथे सुरू करण्यात आलेल्या ‘पर्यावरण शाळेचे’ उद्घाटन नुकतेच अभिनेता संजय दत्त यांच्या हस्ते करण्यात आले. मावळ तालुक्यातील नागरिकांना सामाजिक व पर्यावरणीय समस्यांचे शास्त्रीय पद्धतीने निरसन करण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
Read more...

Now, Pimpri-Chinchwad too braces for water supply cuts

Now, Pimpri-Chinchwad too braces for water supply cuts: Activists say PCMC should stop leakage from pipelines, public taps and urinals

PCMC diary: Raj Thackeray pays a surprise visit, but keeps it apolitical

PCMC diary: Raj Thackeray pays a surprise visit, but keeps it apolitical: MNS chief Raj Thackeray made a surprise visit to Pimpri-Chinchwad on Monday but it had nothing to do with politics

निगडीत एमआयडीसीची जलवाहिनी फुटली

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31146&To=10
निगडीत एमआयडीसीची जलवाहिनी फुटली
पिंपरी, 27 जून
पावसाने पाठ फिरविल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य ओढवले असतानाच निगडी येथे एमआयडीसीची जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाण्याची नासडी झाली. तब्बल 12 तासानंतर जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

...अन्‌ दिसला माणुसकीचा झरा

...अन्‌ दिसला माणुसकीचा झरा: ...अन्‌ दिसला माणुसकीचा झराचिखली&nbsp - वेड लागलेल्या सगुनाम्माला (डावीकडे) सुनिता जाधव (उजवीकडे) यांनी माणुसकीच्या नात्याने जवळ केले.

सभापती निवडीच्या वाटेवर 'काटे'

सभापती निवडीच्या वाटेवर 'काटे': पिंपरी -&nbsp शिक्षण मंडळ सभापतीची निवडणूक घेण्यासाठी कायदा विभागाने "रेड सिग्नल' दाखविला आहे.

Hookah parlour raided in Pimpri

Hookah parlour raided in Pimpri: In the first ever crack down on hookah parlour in Pimpri, the police raided a restaurant for allegedly serving hookah to youths on Tuesday night. A team headed by Senior Police Inspector Mohan Vidhate of Pimpri PS raided Dhua restaurant and found four youths, all students, smoking hookah. ...

झोपडीधारक राहणार झोपड्यांतच

झोपडीधारक राहणार झोपड्यांतच: पिंपरी -&nbsp 'आमच्या हद्दीतील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आम्ही करू, महापालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) यांनी फक्त ना हरकत प्रमाणपत्र द्यावे,' असे दोन वर्षांपूर्वी आग्रहाने सांगणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) आता कोलांटउडी घेतली आहे.

'Pimpri-Chinchwad Municipal Corporation releasing untreated sewage into Indrayani river'

'Pimpri-Chinchwad Municipal Corporation releasing untreated sewage into Indrayani river': The Indrayani Bachav Kruti Samiti, a group working for protection of rivers, has alleged that the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) is releasing untreated sewage into the Indrayani river.

दुप्पट कर आकारणी अन्यायकारक

दुप्पट कर आकारणी अन्यायकारक: 'पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील २००८ नंतरच्या अनधिकृत मिळकतधारकांना दुप्पट कर आकारणी करण्याचा निर्णय घेतल्यास तो सामान्यांवर अन्याय होईल. त्यामुळे सर्वांगीण विचार करून या करात वाढ करू नये,' अशी मागणी शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

बिगर जकातीचा माल पकडला

बिगर जकातीचा माल पकडला: पिंपरी-चिंचवड पालिकेच्या जकात विभागाच्या भरारी पथकाने चिंतामणी ट्रान्सपोर्टचा बिगर जकातीचा ७८ लाख रुपयांचा माल मंगळवारी पकडला. सहायक आयुक्त अशोक मुंढे आणि त्यांच्या सहका-यांनी ही कारवाई केली.

आयुक्तांचे सौजन्य, काँग्रेसला वर्ज्य

आयुक्तांचे सौजन्य, काँग्रेसला वर्ज्य: आदर्श घोटाळ्यातील आरोपी जयराज फाटक यांना चर्चेसाठी वेळ देण्याबरोबरच त्यांच्याशी सौजन्याने वागणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याविषयी नॅशनल स्टुडटंस् युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) तक्रार केली आहे.

अण्णा भाऊ साठे भाजी मंडई वापराविनाच

अण्णा भाऊ साठे भाजी मंडई वापराविनाच: पिंपळे सौदागर स्मशानभूमीशेजारील मोकळ्या जागेत मागील वर्षी लाखो रुपये खर्च करून महापालिकेच्यावतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे भाजी मंडई उभारली आहे. मात्र, या मंडईतील गाळे अद्याप विक्रेत्यांना दिले नाहीत. त्यामुळे त्याचा वापर पार्कींग व निवारा म्हणून होत आहे.

पिंपरीत जकात नाक्यांवर सीसीटीव्ही ...

पिंपरीत जकात नाक्यांवर सीसीटीव्ही ...:
जकातचोर आणि दलालांना मोकळे रान?
बाळासाहेब जवळकर
पिंपरी महापालिकेच्या तिजोरीत कोटय़वधी रुपये जमा करणाऱ्या जकात नाक्यांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे वेळोवेळी उघड होऊनही त्याविषयी ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. नाक्यांवर होणारे हल्ले, जकातचोऱ्या, दलालांचा सुळसुळाट तसेच नको त्या उद्योगांना आळा बसविणे आणि पालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या हेतूने नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय झाला.
Read more...

दापोडीच्या करसंकलन विभागात चोरीचा ...

दापोडीच्या करसंकलन विभागात चोरीचा ...:
पुणे / प्रतिनिधी
दापोडी विभागाच्या करसंकलन कार्यालयाचे कुलूप तोडून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more...

शिक्षण उपसंचालकांची खुर्ची टांगली

शिक्षण उपसंचालकांची खुर्ची टांगली: वेळ देऊनही भेट न दिल्याने आमदार बाबर यांचा संताप

पुणे। दि. २६ (प्रतिनिधी)

वेळ देऊनही त्या वेळेत न भेटल्याचा राग येऊन शिवसेनेचे आमदार महादेव बाबर यांनी प्रभारी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांची रिकामी खुर्चीच छताला लटकावली व त्यांचा निषेध शांततामय पद्धतीने व्यक्त केला.

शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयामध्ये रामचंद्र जाधव यांच्यासमवेत त्यांची भेट ठरलेली होती; परंतु ठरलेल्या वेळी जाधव तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे आमदार बाबर यांचा राग अनावर झाला. आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालकांची कार्यालयातील खुर्चीच छताला लटकावली व जाधव यांचा निषेध केला. यापूर्वीही ४ वेळा संपर्क साधूनदेखील त्यांनी भेट दिलेली नव्हती, असा आक्षेप या वेळी घेण्यात आला. जाधव यांनी, ते न्यायालयात असल्याने वेळेत येऊ शकले नाहीत, असा खुलासा नंतर केला.

याविषयी आमदार बाबर म्हणाले, ‘‘प्रवेशाचा काळ सुरू आहे. अशा वेळी लोकांना विविध अडचणी येतात. सामान्य नागरिक त्यांची भेट घेण्यासाठी धडपडत असतात; परंतु शिक्षण उपसंचालक हे सातत्याने वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करतात. कधी मोबाईल हँग होतो, तर कधी कार्यालयाबाहेर असतात, तर कधी ते न्यायालयात असतात. नागरिकांच्या त्यांच्याविषयी खूप तक्रारी होत्या. यामुळे जर अधिकारी त्याच्या जागेवर बसतच नसेल तर त्यांच्या रिकाम्या खुर्चीचा नागरिकांना उपयोग काय? म्हणून आज त्यांची खुर्चीच लटकावली व त्यांचा निषेध केला.’’

97,000 vehicles check in at Moshi naka

97,000 vehicles check in at Moshi naka: PIMPRI: The Maharashtra Navnirman Sena (MBNS), which has launched a statewide agitation against toll collections, has counted movement of &nbsp 97,647 vehicles at Moshi toll naka here from June 18 to 23.

चिंतामणी'ची जकात चोरी पुन्हा एकदा हाणून पाड

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31136&To=8
'चिंतामणी'ची जकात चोरी पुन्हा एकदा हाणून पाडली
पिंपरी, 26 जून
अनेकदा जकात चोरी उघडकीस आणूनही धडा न घेतलेल्या चिंतामणी ट्रान्सपोर्टची आणखी एक जकात चोरी महापालिकेच्या भरारी पथकाने मंगळवारी (दि. 26) हाणून पाडली. सुमारे 78 लाख 59 हजार रुपयांच्या जकात चोरीच्या मालावर 28 लाख 9 हजार रुपयांच्या दंडाची नोटीस महापालिकेने बजावली आहे.

महापालिकेकडून नागरिकांना अपघाती रस्त्याची देणगी

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31128&To=5
महापालिकेकडून नागरिकांना
अपघाती रस्त्याची देणगी
पिंपरी, 23 जून
बिल्डरच्या ताब्यातील रस्ता नागरिकांच्या सोईसाठी महापालिकेने हस्तांतरीत करून घेतला. परंतु रस्त्याच्या डांबरीकरणाकडे मात्र दुर्लक्ष करून हा खडी पसरलेला रस्ता अपघातासाठी खुला करून दिला आहे. आकुर्डीतील जय गणेश व्हीजन येथील एक रस्ता यामुळे नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक यांनी पाठपुरावा करूनही या रस्त्याचे डांबरीकरण अद्यापही झाले नाही.

अखेर जुळून आला शुभाशिर्वादाचा 'राज'योग !

http://mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31109&To=9

अखेर जुळून आला शुभाशिर्वादाचा 'राज'योग !
पिंपरी, 25 जून
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका अश्विनी मराठे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांचे महाविद्यालयापासूनचे प्रेमप्रकरण महापालिका निवडणुकीनिमित्त पिंपरी-चिंचवडकरांना माहीत झाले. प्रेमप्रकरण आणि त्यानंतर राजकारणात यशस्वी 'एण्ट्री' करणा-या अश्विनी मराठे यांचा सचिन चिखले यांच्याशी विवाह जुळून आला. मात्र, राज ठाकरे यांची उपस्थिती लाभावी म्हणून दोन मुहूर्तांवर पाणी सोडण्यात आले. ठाकरे यांनी उपस्थित राहण्यासाठी होकार दिल्यानंतर विवाहमुहूर्त निश्चित करण्यात आला आणि अखेर ठाकरे यांच्या आशीर्वादाचा 'राज'योग सोमवारी (दि. 25) घडून आला.

अनधिकृत फलकांचा सुळसुळाट, एकाच ...

अनधिकृत फलकांचा सुळसुळाट, एकाच ...:
सत्ताधाऱ्यांचा दबाव अन् आयुक्तांपुढे कारवाईचे आव्हान
बाळासाहेब जवळकर
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांचा सुळसुळाट आणि त्यामुळे कोटय़वधी रुपयांचे नुकसान लक्षात घेता आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पालिकेच्या परवाना विभागाकडे वैयक्तिक लक्ष घातले आहे. अनधिकृत फलकांविरुद्ध मोहीम सुरू करण्याबरोबरच या विभागातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
Read more...

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश ...

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश ...:
प्रतिनिधी, पिंपरी
भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या चिटणीसपदी चिंचवडचे युवा कार्यकर्ते मोरेश्वर शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Read more...

प्राधिकरणाचे महत्त्वाचे प्रस्ताव जळून खाक झाल्याची भीती

प्राधिकरणाचे महत्त्वाचे प्रस्ताव जळून खाक झाल्याची भीती: पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहराच्या प्राधिकरण क्षेत्रातील हजारो अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासंदर्भात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने मंत्रालयात पाठविलेले प्रस्ताव जळून खाक झाल्याची भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मोशी टोलनाक्‍यावर 97 हजार वाहने

मोशी टोलनाक्‍यावर 97 हजार वाहने: पिंपरी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टोलनाक्‍यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून मोशी टोलनाका येथे दररोज येणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम सुरू आहे.

वायसीएमचे 'ना हरकत' कुठेय?

वायसीएमचे 'ना हरकत' कुठेय?: पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका भवन, वायसीएम रुग्णालय व चिंचवड प्रेक्षागृहात अग्निशमन केंद्राचे अद्यापही ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नसल्याची माहिती पुढे आली आहे.

एव्हरेस्ट सर, पण मदतीचे शिखर दूरच!

एव्हरेस्ट सर, पण मदतीचे शिखर दूरच!: पिंपरी - "माऊंट एव्हरेस्ट' मोहिमेतील दिवंगत गिर्यारोहक रमेश गुळवे यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या चार एव्हरेस्टवीर सहकाऱ्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत जाहीर आर्थिक मदत निश्‍चित मर्यादेपेक्षा अधिक असल्याने नियमांच्या कात्रीत सापडली आहे.

पालिकेच्या सुरक्षा यंत्रणेत गंभीर त्रुटी

पालिकेच्या सुरक्षा यंत्रणेत गंभीर त्रुटी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीसह प्रमुख सार्वजनिक ठिकाणची सुरक्षा केवळ रामभरोसे नाही, तर त्यामध्ये गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची नोंद महापालिकेने नियुक्त केलेल्या अधिका-यांच्या पथकाने घेतली असून, त्याबाबतचा अहवाल ते लवकरच आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना सादर करणार आहेत.

इंजिनीअरिंगसाठी मोफत वेबसाइट

इंजिनीअरिंगसाठी मोफत वेबसाइट: इंजिनीअरिंगच्या शाखा कोणत्या आहेत? कॉलेज आणि शाखा निवडताना कोणती काळजी घ्यावी? याचबरोबर ऑप्शन फॉर्म कसा भरावा इथपर्यंत सर्व माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

पाऊस पडताच स्वाइन फ्लूची धास्ती

पाऊस पडताच स्वाइन फ्लूची धास्ती: पिंपरी-पुणे। दि. २४ (प्रतिनिधी)

स्वाइन फ्लूची धास्ती अजूनही पिंपरी-चिंचवड व पुणेकरांमध्ये कायम आहे. त्यातच मार्च-एप्रिल महिन्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळल्याने आणि ९ जणांचा मृत्यू झाल्याने ‘एच १ एन १’ लाट पुन्हा आल्याची स्थिती निर्माण झाली होती. आता पाऊस पडू लागताच तपासणीसाठी येणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अवघ्या तीन महिन्यात ७५ हजार पुणेकरांची तपासणी केली आहे. त्यापैकी २११ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

Flood alert mock drill held in Chinchwad

Flood alert mock drill held in Chinchwad: Flood alert mock drill held in ChinchwadPIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Saturday conducted a mock drill to check the civic administration's preparedness to handle a flood situation in the city.

Jambe village deputy sarpanch shot dead

Jambe village deputy sarpanch shot dead: HINJEWADI: The deputy sarpanch of Jambe village in Mulshi taluka, Jalinder Suresh Temgire (29), was shot dead by unidentified assailants late on Saturday night on Jambe-Nere road.

भोसरीत दुकानदारांनी बळकावला पदपथ !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31093&To=9
भोसरीत दुकानदारांनी बळकावला पदपथ !
भोसरी, 25 जून
भोसरीतील वाहतूक दिवसेंदिवस जटील होत असून सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत येथील आळंदी रोडवर अक्षरशः वारीचे स्वरूप येते. येथील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. पादचा-यांसाठी पदपथ तयार करण्यात आले. परंतु या पदपथाचा उपयोग पादचा-यांच्या व्यतिरिक्त येथील दुकानदारच करताना दिसत आहेत. या दुकानदारांनी आपला माल या पदपथावर मांडून ठेवल्यामुळे पादचा-यांना पुन्हा रस्त्यावरूनच जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.

प्रक्रिया न करताच सांडपाणी इंद्रायणीत

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31090&To=5

प्रक्रिया न करताच सांडपाणी इंद्रायणीत
पिंपरी, 24 जून
कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी आणि मलमिश्रित पाणी थेट इंद्रायणी नदीत सोडण्यात येत असल्याने नदीत प्रदूषित होत आहे. त्यामुळे मलनिस्सारण प्रक्रियेचे काम दिलेल्या ठेकेदाराला पोसण्याचे काम पिंपरी-चिंचवड महापालिका करीत असल्याचा आरोप नदी विकास मंचतर्फे करण्यात आला आहे.

निगडी उड्डाणपुलाखालील स्टॉल्सच्या फलकांमुळे अपघाताला आमंत्रण

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31077&To=6
निगडी उड्डाणपुलाखालील स्टॉल्सच्या
फलकांमुळे अपघाताला आमंत्रण
पिंपरी, 24 जून
निगडीच्या दिवंगत महापौर मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली खासगी वाहतूकदारांच्या दुकानावर लावलेले फलक सध्या येथून जाणा-या वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरले आहेत. या फलकांमुळे वाहनचालकांना तसेच पादचा-यांना इतर दिशेकडून येणारी वाहने दिसत नसल्यामुळे अनेकदा याठिकाणी छोटे-मोठे अपघात होत असतात. हे सर्व फलक त्वरित काढले जावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.