Wednesday, 28 November 2012

Advocates' body seeks better facilities at Pimpri court

Advocates' body seeks better facilities at Pimpri court: The Pimpri Chinchwad Advocates' Bar Association has sought improvement of facilities at the court building provided on rent by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC).

अवैध कत्तलखाना बंद करा!

अवैध कत्तलखाना बंद करा!: पिंपरी उड्डाणपुलाखालील अवैध कत्तलखाना त्वरीत बंद करण्यासाठी मातृभूमी दक्षता चळवळीचे अध्यक्ष मुबारक शेख यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण करण्यात आले आहे. पिंपरी उड्डाणपुलाखालील अवैध कत्तलखान्यामुळे प्रदूषण वाढत असून, पर्यावरण कायद्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर सर्रास उल्लंघन होत आहे.

बजेटवरून आयुक्तांना चेकमेट

बजेटवरून आयुक्तांना चेकमेट: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बजेटमधील तरतूद खर्च न झाल्यामुळे विकासकामे प्रलंबित राहिल्याची जोरदार टीका मंगळवारी (२७ नोव्हेंबर) झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्यावर केली. सदस्यांच्या शाब्दिक हल्ल्यामुळे आयुक्तही अडचणीत सापडले.

शहरात ५५ ठिकाणे ‘अॅक्सिडेंड स्पॉट’

शहरात ५५ ठिकाणे ‘अॅक्सिडेंड स्पॉट’: शहरातील अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत असले तरी दुसऱ्या बाजूला ५५ ठिकाणे अॅक्सिडेंट स्पॉट म्हणून ओळखले जात आहेत. प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड आणि येरवडा या भागांमध्ये हे स्पॉट आहेत.

खिडकीतून पडून चिंचवडमध्ये बालिकेचा मृत्यू

खिडकीतून पडून चिंचवडमध्ये बालिकेचा मृत्यू: इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडल्याने चिंचवडमधील दळवीनगर येथील नऊ महिन्याच्या बालिकेचा मंगळवारी मृत्यू झाला.
निधी प्रताप कटारे (वय नऊ महिने) असे या बालिकेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डीतील उज्ज्वल पार्क येथे सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.

राजगुरूनगर विमानतळासाठी बजेटमध्ये तरतूद करणार

राजगुरूनगर विमानतळासाठी बजेटमध्ये तरतूद करणार: राजगुरूनगर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळास मान्यता मिळाली आहे. आता राज्याच्या येत्या बजेटमध्ये त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

100 PMPML buses break down in two days

100 PMPML buses break down in two days: ‘Short trips put pressure on different parts of a bus’

161.73-km ring road project does not move an inch

161.73-km ring road project does not move an inch: Chief Minister Prithviraj Chavan has been pushing for the ring road project aimed at decongesting the roads in Pune city and Pimpri-Chinchwad bursting at the seams with increasing traffic.

एटीएक कार्ड पिंपरीत, पैसै काढले मलेशियात

एटीएक कार्ड पिंपरीत, पैसै काढले मलेशियात
पिंपरी, 27 नोव्हेंबर
बनावट एटीएम कार्ड व पासवर्ड तयार करून मलेशियातील एका भामट्याने पिंपरीतील एका महिलेच्या खात्यातून चार लाख 60 हजार रूपये काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मलेशिया येथील एटीएममधून सात ते 30 जुलै दरम्यान चोरीचा हा प्रकार घडला.
www.mypimprichinchwad.com

महापालिका सभेत आयुक्त 'टार्गेट' ; विकास कामे खोळंबल्याचा आरोप

महापालिका सभेत आयुक्त 'टार्गेट' ; विकास कामे खोळंबल्याचा आरोप
पिंपरी, 27 नोव्हेंबर
निवडणुका होवून नऊ महिने उलटूनही विकास कामे होत नसल्याचा आरोप करत 'अमेरिका रिटर्न' आयुक्त डॉ . श्रीकर परदेशी यांना सर्वपक्षीय नगरसेवकांनी आज (मंगळवारी) झालेल्या महापालिका सभेत 'टार्गेट' केले. आयुक्तांनी अवैध बांधकाम पाडापाडीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे शहरविकास खोळंबला आहे. आयुक्त केवळ बैठका, चर्चांमध्ये मग्न असून आयुक्तांच्या कार्यपध्दतीमुळे अधिकारी राजीनामे देत आहेत, रजेवर जात आहेत, अशी घणाघाती टीकाही करण्यात आली.
www.mypimprichinchwad.com

भारतकेसरी विजय गावडेचे जल्लोषात स्वागत

भारतकेसरी विजय गावडेचे जल्लोषात स्वागत
पिंपरी, 27 नोव्हेंबर

भारतकेसरी विजय गावडे याचे आज सायंकाळी लोहगाव येथील विमानतळावर आगमन झाले त्यावेळी त्याचे पिंपरी-चिंचवडमधील कुस्तीप्रेमींनी उत्साहात स्वागत केले.
www.mypimprichinchwad.com

पिंपरी-चिंचवड शहरातील उद्यानांची सफर महागली !

पिंपरी-चिंचवड शहरातील उद्यानांची सफर महागली !
पिंपरी, 27 नोव्हेंबर
शहरातील मोठ्या उद्यानांच्या प्रवेश शुल्कात पाचपटीने वाढ करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आज (मंगळवारी) झालेल्या सभेमध्ये घेण्यात आला. त्यामुळे लहान मुलांना एक रुपयांऐवजी पाच तर प्रौढांना दोन रुपयांऐवजी दहा रुपये मोजावे लागणार आहेत. याखेरीज उद्यानांमध्ये चित्रीकरणासाठी असलेले दर अडीच पटीने वाढविण्यात आले आहेत.
www.mypimprichinchwad.com

नारदीय कीर्तन परंपरा जोपासण्यासाठी उच्चशिक्षित उत्सुक

नारदीय कीर्तन परंपरा जोपासण्यासाठी उच्चशिक्षित उत्सुक
पिंपरी, 27 नोव्हेंबर

नारदीय कीर्तन परंपरेतून गेल्या अनेक वर्षांपासून समाजप्रबोधन केले जात आहे. या कीर्तनाच्या उत्तररंगात क्रांतीकारक व समाजसुधारकांच्या विचारांचे आणि चरित्राचे तात्विक विवेचन करण्यात येते. त्यामुळे समाजप्रबोधनाचे हे एक फार मोठे माध्यम म्हणून ओळखले जाते. ही परंपरा खंडीत होते की काय अशी शंका वाटत असतानाच ही कला शिकून घेण्यासाठी समाजातील सर्वच घटकातील लोक उत्सुक आहेत
चिंचवड देवस्थान ट्रस्ट व विश्व हिंदु परिषदेने नारदीय कीर्तन परंपरेला पुढे सुरु ठेवण्यासाठी दहा दिवसांचे निवासी नारदीय कीर्तन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. यामध्ये डॉक्टर, अभियंते बँकींग व्यवसायातील लोक नारदीय कीर्तनाचे प्रशिक्षण घेत असल्याचे दिसून येत आहे.
www.mypimprichinchwad.com

रावेत पुलावरून गॅस टँकर नदीपात्रात कोसळला

रावेत पुलावरून गॅस टँकर नदीपात्रात कोसळला
पिंपरी, 27 नोव्हेंबर

रावेत पुलाचा कठडा तोडून 25 ते 30 फुटावरून भारतगॅस कंपनीचा एलपीजी गॅस टँकर पवना नदीपात्रातील जमिनीवर कोसळल्याची घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. सुदैवाने या टँकरमध्ये गॅस नव्हता. या घटनेत चालक आणि क्लिनर जखमी झाले असून त्यांना निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.