पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील स्मशानभुमीलगतची जागा आणि डीपी रस्त्यांची जागा ताब्यात घेऊन रस्ते विकसित करावे. शहरातील 36 स्मशानभुमी, दफनभुमी आणि दशक्रीया विधी घाट अद्ययावत पध्दतीने विकसित करण्यासाठी 2019-2020 च्या अंदाजपत्रकामध्ये 40 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी. प्रत्येक प्रभागात नव्याने लेखाशिर्ष तयार करून अंदाजपत्रकात आवश्यक तरतुदी कराव्यात, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत. महापौर राहुल जाधव यांनी महापालिकेच्या शहरातील 36 स्मशानभुमी, दफनभुमीची स्थानिक नगरसेवकांसोबत पाहणी केली. यावेळी महापौरांना पाण्याची कमतरता, ठिकठिकाणी वाढलेले गवत, घाटांची दुरवस़्था, त्यातील शेड आदी सर्वच ठिकाणी दुरूस्ती करण्याची गरज होती, हे लक्षात आले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 26 December 2018
महापालिकेची अवैध नळजोड धारकांवरील कारवाई अधिक तीव्र
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने अवैध नळजोड धारकांवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे. पाणीपुरवठा विभागाने आजपर्यंत 389 अवैध नळजोड तोडले असून त्यांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील सर्वाधिक म्हणजेच 78 अवैध नळजोड तोडले आहेत. तर, सर्वात कमी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 30 अवैध नळजोड तोडण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत होत आहे. शहरात अनधिकृत नळजोडचे प्रमाण जास्त आहे. चुकीच्या पद्धतीने नळ जोड केले आहेत. त्यामुळे 30 ते 40 टक्के पाण्याची गळती होत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. तसेच दुषित पाणीपुरवठा देखील होतो. त्यासाठी महापालिकेने मे महिन्यापासून अनिधकृत नळजोडचे सर्वेक्षण केले.
2018, the year that was: PCMC’s Dapodi-Nigdi BRTS sees light of day
While formation of a new police commissionerate in the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) was a major event in the year, other things such as increased swine flu deaths, making operational the Dapodi -Nigdi Bus rapid transit System (BRTS) lane operational, low rank in ease of living index, and an autorickshaw driver turning into a politician and becoming a mayor also were the major attractions.
डांगे चौक अतिक्रमणांच्या विळख्यात
पिंपरी - हातगाडी, टेम्पो, पथारी व्यावसायिक यांच्या अतिक्रमणांसह पदपथ, दुभाजक, बीआरटी मार्ग येथेही विक्रेत्यांची अतिक्रमणे यामुळे डांगे चौक परिसरात दर रविवारी मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यामुळे येथील नागरिक हैराण आहेत.
भोसरी-चाकण मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक
पिंपरी - भोसरी पीएमपी बस टर्मिनल परिसरातील अवघे पाच मिनिटे... सोमवार-सकाळी अकराची वेळ...चाकणकडे निघालेली पीएमपी बस...त्यातील प्रवासी ४० ते ४५...त्याच वेळी चाकणकडे निघालेल्या ऑटो रिक्षा पाच, पॅगो रिक्षा दोन, एक जीप व एक ओमिनी...एका रिक्षात किमान प्रवासी पाच, एका पॅगोतील प्रवासी ११, जीपमधील प्रवासी १३... ओमिनीतील प्रवासी १२ सर्व मिळून प्रवासी ७२...असे अवैध प्रवासी वाहतुकीचे चित्र भोसरीत दररोज बघायला मिळते. ठराविक वेळेनुसार सुटणाऱ्या पीएमपी बस आणि इच्छितस्थळी थांबणारे अवैध प्रवासी वाहन चालक यामुळे भोसरी-चाकण मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक सर्रास सुरू आहे.
मेट्रोसाठी सहा हजार कोटींचे कर्ज
पिंपरी - युरोपियन इन्व्हेस्टमेंट बॅंक आणि एएफडी फ्रान्स या दोन बॅंकांकडून पुणे मेट्रोसाठी सहा हजार कोटी रुपये कर्ज मिळणार असून, त्याची प्रक्रिया येत्या मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होईल. महामेट्रोच्या या प्रकल्पासाठी ११ हजार ४२० कोटी रुपये खर्च येणार असून, त्यापैकी साठ टक्के रक्कम कर्जाद्वारे उपलब्ध करायचे ठरले होते. दोन विदेशी बॅंकांमार्फत ती रक्कम मिळणार असल्यामुळे, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली रक्कम उभी राहणार आहे.
महापौरांनी घेतला “बीआरटी’चा आढावा
पिंपरी – महापौर राहुल जाधव यांनी सोमवारी (दि. 24) शहरातील बीआरटीएस मार्गांची पाहणी केली. सकाळी अकरा वाजता ऑटो क्लस्टर येथून या दौऱ्याला सुरुवात झाली.
या दौऱ्यादरम्यान काळेवाडी फाटा ते देहु आळंदी रस्ता या बीआरटीएस मार्गावरील बस सेवा सुरु करण्यासाठी बसेसच्या उपलब्धतेबाबत चौकशी केली व पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या कॉरिडॉर वरील काळेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा विकास आराखड्या प्रमाणे करण्याची देखील सूचना दिली. त्यानंतर बीआरटीएस कॉरिडॉर वर अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करणेबाबत शहर वाहतूक पोलीस यांना सूचना दिल्या. तसेच उर्वरीत बीआरटीएस मार्गाची पाहणी करणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.
या दौऱ्यादरम्यान काळेवाडी फाटा ते देहु आळंदी रस्ता या बीआरटीएस मार्गावरील बस सेवा सुरु करण्यासाठी बसेसच्या उपलब्धतेबाबत चौकशी केली व पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या कॉरिडॉर वरील काळेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा विकास आराखड्या प्रमाणे करण्याची देखील सूचना दिली. त्यानंतर बीआरटीएस कॉरिडॉर वर अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करणेबाबत शहर वाहतूक पोलीस यांना सूचना दिल्या. तसेच उर्वरीत बीआरटीएस मार्गाची पाहणी करणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.
आता आयुक्तांची “सटकली’
पिंपरी – अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वारंवार टीकेचा सामना करावा लागणाऱ्या महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आपला दांडपट्टा फिरवायला सुरूवात केली आहे. कर्तव्यात सचोटी न राखल्याबद्दल सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे यांना प्रत्येकी दोनशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. वर्ग एकच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी पालिकेकडून सल्लागारांची नियुक्ती
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजना सक्षमपणे राबविण्यासाठी आता सल्लागाराची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने समीर घोष यांची नियुक्ती केली आहे. या निवडीमुळे विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शहरातील नागरिकांना मिळेल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
’स्मार्ट सिटी’योजनेअंतर्गत विकास कामांसाठी जनता दरबार घेण्याची मागणी
पिंपरी- चिंचवड – स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पिंपळेसौदागर आणि पिंपळेगुरव परिसराचा विकास केला जात आहे. स्मार्ट सिटीतील कामे करताना नागरिकांच्या सूचना घेण्यात याव्यात. त्यासाठी जनता दरबार घ्यावेत. त्यातून येणार्या सूचनांचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये करावा, अशी मागणी चिंचवड विधानसभा ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी महापालिकेकडे केली आहे.
रावेत बंधार्याची पाणी पातळी तपासण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण
पिंपरी चिंचवड ः रावेत येथील जुन्या बंधार्याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्यात येणार आहे. पाणलोट क्षेत्राचे सर्वेक्षण महापालिकेतर्फे केले जाणार आहे. या सर्वेक्षणात बंधार्याची उंची वाढविणे, खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने बंधार्याच्या वरील बाजूस पाणलोट क्षेत्राच्या धोक्याची पाण्याची पातळी तपासण्यात येणार असून, त्यासाठी थेट पद्धतीने काम दिले जाणार आहे. याकरिता ड्रोन सर्वेक्षण करुन त्या कामास साडेपाच लाख रुपये खर्च होणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यूची 53 जणांना लागण
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात डिसेंबर महिन्यात 53 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर, जानेवारी महिन्यांपासून अद्यापपर्यंत 563 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. वातावरणातील बदलामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. दर महिन्याला डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे निर्माण झाली आहे.
PCMC claims to have saved Rs 2.39 crore on key contract
Pimpri Chinchwad: Even as opposition leader Data Sane alleged irregularities in the tender process, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) .
Pimpri Chinchwad Municipal Corporation to track sanitation workers through smartwatches
The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is planning to use ‘smart’ wristwatches to track the movements of its sanitation workers and record their attendance. The decision was taken by the civic body in response to the complaints received from residents regarding erratic garbage collection in the industrial township.
Pimpri Chinchwad municipal corporation to use tracking system for garbage trucks
In order to keep track of the collection and disposal of garbage, Pimpri Chinchwad municipal corporation (PCMC) has decided to implement a vehicle tracking and management (VTS) system to keep a tab on vehicles collecting garbage within the city limits.
साडे पाच लाख खर्चून बंधाऱ्याचे सर्व्हेक्षण
पिंपरी – शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन रावेत येथील जुन्या बंधाऱ्याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने बंधाऱ्याच्या वरील बाजूस पाणलोट क्षेत्राच्या धोक्याची पाण्याची पातळी तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी ड्रोन सर्व्हेक्षण करण्यात येणार असून साडेपाच लाख रूपये खर्च केला जाणार आहे.
शिरूर-पुणे मार्ग आठपदरी होणार
शिरूर - ‘‘शिरूर- पुणे या राज्य मार्गावरील वाहतूक समस्येचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी हा मार्ग ‘नॅशनल हायवे’कडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. आठपदरीसह या रस्त्याच्या संपूर्ण कामासाठी सुमारे सव्वादोन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्र शासनाच्या दळणवळण मंत्रालयाने मान्यता दिली आहे,’’ अशी माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
आयटीयन्सच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्याची मागणी
निगडी – तळवडे आयटी पार्क परिसरात वाढलेली लूटमार आणि आयटीयन्स महिलांची होत असलेली छेडछाड थांबवण्यासाठी या परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात यावेत, अशी मागणी स्विकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर यांनी महापौर राहुल जाधव यांच्याकडे केली आहे.
पुणे विद्यापीठात साकारणार 'रिसर्च अँड इनोव्हेशन पार्क'
पुणे : तुम्ही विद्यार्थी, शिक्षक वा तरुण असाल आणि तुमच्या डोक्यात उद्योग सुरू करण्यासाठी अभिनव आणि नावीन्यपूर्ण कल्पना असतील, तर त्या पुढे नेण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ "रिसर्च अँड इनोव्हेशन पार्क'ची उभारणी करणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते 15 जानेवारी रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे.
सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे महापालिका, कंत्राटदारांचे दुर्लक्ष
पिंपरी – महापालिकेच्या अ व फ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दितील कचरा वेचक कर्मचारी व कामगारांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात आलेली नाही तसेच त्यांना सुरक्षा साधनेही पुरविण्यात आलेली नाहीत. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे कचरा वेचक कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी केली आहे.
महापालिका भवनाजवळची जागा “पीएमपी’ला
पिंपरी – महापालिका भवनाजवळील मोकळी जागा बसस्थानक आणि डेपो उभारण्यासाठी पीएमपीएमएलला देण्याचा निर्णय महासभेने घेतला आहे. तीस वर्षांच्या कालावधीसाठी ही जागा दिली जाणार आहे.
कुशल मनुष्यबळाचा अभाव बांधकाम क्षेत्रासमोरील मोठी समस्या
पिंपरी – सुमारे तीन ते चार वर्षांपूर्वी कित्येक संस्थांनी अंदाज वर्तवले होते की, 2019 ते 2020 च्या काळात बांधकाम क्षेत्राला कुशल मनुष्यबळाचा मोठा तुटवडा जाणवणार आहे. मध्ये मोठा मंदीचा काळ गेला असताना या भाकितांबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती परंतु आता ही भाकिते खरी ठरताना दिसत आहे. बांधकाम क्षेत्रासमोर कुशल मनुष्यबळ ही मोठी समस्या उभी राहिली आहे.
गहुंजेमध्ये होणार हायपरलूपचा ट्रॅक
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पुणे-मुंबई दरम्यान हायपरलूप हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. यासाठी गहूंजे ते उर्से टोलनाका दरम्यान सुमारे 11.4 किलोमीटर लांबीचा मार्ग प्रायोगिक तत्त्वावर “चाचणी ट्रॅक’ उभारण्यासाठी निवडला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)