Tuesday, 17 December 2013

PCMC removes ad signage at Pimpri


After Mirror reported last month about how the expanded fountain at the main Pimpri Chowk, installed with lawn sprinklers and signboards, has made it difficult for motorists to clearly see traffic signals, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation ...

बहुचर्चित ‘घरकुल’ प्रकल्पातील १००८ घरांचे वाटप

चिखलीतील पेठ क्रमांक १७ व १९ येथील घरकुल प्रकल्पातील १००८ सदनिकांचे वाटप रविवारी (२२ डिसेंबर) सकाळी साडेआठ वाजता होणार आहे.

आर्मी, पोलीस लिहिणार्‍यांचा सुळसुळाट

पिंपरी : एखाद्या चौकात अथवा सार्वजनिक ठिकाणी उभे राहिल्यास निम्म्यापेक्षा अधिक वाहनांवर ‘आर्मी’, ‘पोलीस’ असा मजकूर लिहिल्याचे पहायला मिळते. असा मजकूर वाहनांवर लिहून मिरविणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. काही वाहनांवर तर थेट राजमुद्राच बसविलेली असते. अशा वाहनांचा सध्या सर्वत्र सुळसुळाट असल्याचे पहायला मिळते. 

भांडणे मिटविण्याचा प्रयत्न करा : गिरीमहाराज

पिंपरी : महाभारतात कौरव-पांडवांचे वैर शमविणे शक्य होते; मात्र ते वैर वाढावे यासाठी कर्ण व शकुनीने खतपाणी घातले, असे प्रतिपादन स्वामी श्री गोविंददेव गिरीमहाराज यांनी येथे केले. भांडणे मिटविण्यातून एखाद्याचा दाह कमी होतो. शिवलिंगावर अभिषेक केल्याचे पुण्य त्यातून मिळते, म्हणूनच भांडणे न लावता ती मिटविण्याचा प्रयत्न करा. परमात्मा तुमच्यावर कृपा करेल, असे ते म्हणाले.

झोपडी पुनर्वसन दिवास्वप्न

पिंपरी : झोपडपट्टीविरहित शहर संकल्पना राबविण्याचा गवगवा करणार्‍या महापालिकेने शहरातील एकूण ७१ पैकी केवळ ६ झोपडपट्टय़ांमधील नागरिकांसाठी पुनर्वसन प्रकल्प राबवला आहे. एकूण १ लाख ४६ हजार ६८७ पैकी १८ हजार झोपडपट्टीवासीयांना घरे मिळणार आहेत. एमआयडीसी, प्राधिकरण,रेल्वे आणि खासगी जागेवरील झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे.

औषधाविना गैरसोय

पिंपरी : अन्न आणि औषध प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला पिंपरी-चिंचवड शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शहरातील शेकडो रुग्णांची गैरसोय झाली. याप्रकरणी उच्च न्यायालयाने दखल घेतल्याने पुढील दोन दिवस होणारा बंद मागे घेण्यात आला. रात्री पावणे आठला केमिस्ट असोसिएशन पुणेने आंदोलन मागे घेतल्याचे कळविले आहे.