स्टीकर्स, बॅनर्स आणि अनधिकृत फलक यामुळे शहराच्या सौदर्यात बाधा येऊ नये म्हणून सातत्याने अतिक्रमण विरोधी विभागाने कारवाई करावी, अशी सूचना आयुक्त राजीव जाधव यांनी दिल्या. याबाबत लवकरच संबंधित अधिका-यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
आज (शनिवार) सकाळी आठवाजल्यापासून 'फ' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या भागाची त्यांनी पाहाणी केली. त्यानंतर झालेल्या अधिका-यांच्या बैठकीत ते बोलत होते. यमुनानगर येथून पाहणी दौ-याला प्रारंभ झाला. त्यानंतर साईनाथनगर, श्रमिकनगर परिसर, रुपीनगर, गणेशनगर, तळवडे, संभाजीनगर येथून उद्यमनगर या परिसराची आयुक्तांनी पाहाणी केली.