पिंपरी - चऱ्होली ते लोहगाव विमानतळ अवघे सहा किलोमीटर अंतर. मात्र, रस्त्याअभावी दिघी- विश्रांतवाडी मार्गे तब्बल २० किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे. अतिरहदारीमुळे एक तासापेक्षा अधिक वेळ लागत आहे. आता हे अंतर अवघ्या पाच मिनिटांवर येणार आहे. कारण, चऱ्होलीगाव ते लोहगाव रस्त्याचे काम सुरू झाले आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 25 April 2018
Maharashtra: In a first, PCMC opts for technical audit of development work
Development works in Pimpri-Chinchwad will undergo a third party technical audit, a move said to be the first-of-its-kind in the state. The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has initiated the process to conduct the audit of development works following a directive from the state government to all civic bodies in Maharashtra.
Smart city officials plan 270 Wi-Fi hotspots in Pimpri Chinchwad
PIMPRI CHINCHWAD: As part of the smart city project, the Pimpri Chinchwad Municipal
वायसीएमला स्वस्त दरात वीज?
पिंपरी - महापालिकेची मालकी असणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात सर्वत्र वातानुकूलित सुविधा उपलब्ध झाली, कायमस्वरूपी गरम पाण्याची सुविधा मिळाली, स्वस्त दरातल्या विजेचा वापर करता आला तर या रुग्णालयाचे रूपच पालटले जाईल. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) नॅचरल गॅस बेस पॉवर जनरेशनच्या माध्यमातून या सर्व सुविधा देणे शक्य असून या संदर्भातील प्रस्ताव पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाठविल्याचे एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद तांबेकर यांनी सांगितले.
जेनेरिक औषधांची शहरात 5 दुकाने
पिंपरी - मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब या विकाराने अनेक जण त्रस्त आहेत. त्यावरील ‘ब्रॅंडेड’ कंपन्यांची औषधे महाग आहेत. त्या तुलनेत जेनेरिक (जनौषधी) औषधे ३० ते ७० टक्के स्वस्त आहेत. मात्र, अशा मेडिकल स्टोअर्सची संख्या शहरात कमी होती. आता नव्याने अशी पाच मेडिकल स्टोअर्स शहरात सुरू झाली आहेत. त्यांचा सामान्य रुग्णांना लाभ होत आहे. आणखी दहा मेडिकल स्टोअर्स लवकरच सुरू होणार आहेत.
झाडे तोडताय, छायाचित्र काढा
पिंपरी-चिंचवड शहरात खासगी बांधकाम व्यावसायिक झाडे तोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे अर्ज करतात. त्यांना संबंधित झाडांचे छायाचित्र सादर करण्याची अट आहे. मात्र, ती अट पालिका, सरकारी व शासकीय संस्था व कार्यालयांना नाही. त्यांनाही छायाचित्राची सक्ती करण्यात आली आहे. छायाचित्रे नसल्याने पालिकेच्या स्थापत्य, बीआरटीएस आणि पुणे मेट्रोचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीने फेटाळून लावला आहे.
पिंपरी चिंचवड शहराला गुरुवारी पाणी नाही; दुरूस्तीच्या कारणास्तव पाणीपुरवठा राहणार बंद!
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत पंपिंग स्टेशन आणि सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रात तातडीची कामे करण्यासाठी गुरुवारी (दि.२६) पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याबाबतची माहिती पाणीपुरवठा विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
उद्योगनगरीत वर्षांकाठी हजार ‘वर्दी’
वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील पराकोटीच्या वादामुळे या विभागाचे ‘तीन तेरा’ वाजले असून कोणाचेही नियंत्रण नसल्याने काही चांगल्या सुधारणा होण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगण्यात येते.
शहरबात पिंपरी : कचऱ्याचे अर्थकारण आणि लाभार्थीची चढाओढ
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कचऱ्याशी संबंधित विषयांवर मोठय़ा प्रमाणात वाद होतात, हा निव्वळ योगायोग नाही.
म्हाळुंगे-माणमध्ये साकारणार गगनचुंबी इमारती
पुणे - म्हाळुंगे-माण येथे राबविण्यात येत असलेल्या पहिल्या प्रारूप नगर रचना योजनेत (टीपी स्कीम) जागा मालकांना टीडीआरसह ३.७० एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक) वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. त्यामुळे मान्य एफएसआयपेक्षा जादा एफएसआय मिळाल्याने म्हाळुंगे-माण या ठिकाणी गगनचुंबी इमारती उभ्या राहणार आहेत. परिणामी घरांच्या किमतीदेखील कमी होण्यास मदत होणार आहे.
स्वारगेट ‘मल्टिमॉडेल हब’ दोन टप्प्यांत होणार
पुढील महिन्यात कामास सुरूवात – महामेट्रोची माहिती
पुणे- स्वारगेट चौकात होणाऱ्या “मल्टिमॉडेल हब’चे काम दोन टप्प्यांत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी पीएमपीचे राजर्षि शाहू बसस्थानक तसेच त्याच्या जवळील पाणीपुरवठा विभागाची जागा महामेट्रोला देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
सोसायटीच्या सुरक्षेसाठी हायटेक तंत्रज्ञान
पिंपरी (पुणे) - अनुचित घटना व चोऱ्या टाळण्यासाठी थेरगाव येथील रॉयल कॅसल सोसायटी विविध कामानिमित्त, पार्सल देण्यासाठी किंवा भेटायला येणाऱ्यांची अचूक माहिती व डाटा ठेवण्यासाठी मोबाईल ऍपचा वापर करत आहे. या हायटेक तंत्रज्ञानामुळे प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाकडे नोंद करण्यात जाणारा वेळ, वादावादीचे प्रसंग टाळण्यात मदत होत आहे.
प्राइड होम सोसायटीला अनधिकृत नळजोड प्रकरणी साडेसहा हजारांचा दंड
पिंपरी (पुणे) - काळेवाडी-तापकीरनगर येथील प्राइड होम सोसायटीचे एक वर्षापासूनचे अनधिकृत नळजोड महापालिका पाणीपुरवठा विभागाने तोडला होता. मात्र, साडेसहा हजारांचा दंड भरून हा नळजोड अधिकृतपणे पुन्हा जोडण्यात आला. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी दिली.
सांगवी स्मशानभूमीत अखेर निवारा
जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील स्मशानभूमीत पालिका प्रशासनाकडुन अखेर निवारा शेड बांधण्यात आल्याने सांगवीकरांच्या अडचणी कमी झाल्या आहेत.
चिंचवड़ प्रेमलोक पार्क में होगा नया पुलिस आयुक्तालय!
परिमंडल 3 के उपायुक्त ने मनपा को भेजा खत
बढ़ते नागरिकरण और अपराध के चलते बीते कई सालों से की जा रही मांग की सुध लेते हुए राज्य सरकार ने हाल ही में पिंपरी चिंचवड़ शहर के लिए अलग पुलिस आयुक्तालय को मंजूरी दी है। आयुक्तालय की इमारत के लिये स्थायी तौर पर जमीन उपलब्ध होने तक अस्थायी तौर पर किराए से इमारत हासिल कर 1 मई को कामकाज शुरू कराने की गतिविधियां जारी है। पुणे पुलिस के वरिष्ठ अधिकारियों ने शहर में चार इमारतों का मुआयना करने के बाद चिंचवड़ प्रेमलोक पार्क स्थित महात्मा फुले विद्यालय की इमारत को पसंद किया है। यह इमारत फर्नीचर आदि के साथ पुलिस बल को जल्द से जल्द कब तक, कैसे और कितने किराए पर मिल सकती है? इस बारे में परिमंडल 3 के पुलिस उपायुक्त गणेश शिंदे ने मनपा आयुक्त श्रावण हार्डिकर को खत भेजा है।
दोन्ही कारभार्यांविरोधात भाजप निष्ठावंत एकवटले
पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या दोन्ही आमदाराकडून भविष्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचे क्षेत्रीय सदस्य निवडीद्वारे पुनर्वसन करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे निष्ठवंतांना गुरुवारी (दि.26) होणार्या क्षेत्रीय सदस्य निवडीत ही कात्रजचा घाट दाखिविला जाणार ही भीती निर्माण झाली आहे. या भितीतून निष्ठावंत पुन्हा एकत्र होऊन ‘दोन वरिष्ठ’ पदाधिकारी त्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्येक ह्लचालीवर लक्ष असल्याने सर्व जुळवाजुळव ‘फोनाफोनी’वर सुरू आहे; त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांसह प्रदेशस्तरावर भेटीगाठी घेणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
भाजपने भ्रष्टाचारात राष्ट्रवादीला पछाडले !
पिंपरी – शिवसेनेच्या दोन्ही खासदारांनी पिंपरी चिंचवड पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजपने राष्ट्रवादीलाही मागे टाकले असून, दुपटीने भ्रष्टाचार चालवला असल्याचा आरोप केला. तर खासदार आढळराव पाटील यांनी नाशिक फाटा ते खेड सहा पदरी रस्त्याच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप केला. यावेळी दोन्ही खासदारांनी नामोल्लेख टाळत दोन्ही आमदारांवर न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचाही आरोप केला.
Subscribe to:
Posts (Atom)