Friday, 10 August 2018

शाडू माती मूर्ती बनविण्याचे इंदिरा कॉलेज, ताथवडे मध्ये मोफत प्रशिक्षण.

एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन (इसिए) ने इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स एन्ड
सायन्स, ताथवडे मध्ये शाडू माती मूर्ती बनविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्याचा
उपक्रम राबविण्यात आला. दिनांक ०८ ऑगस्ट २०१८ रोजी महाविद्यालयीन
विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यासाठी सुरु केलेल्या विशेष प्रशिक्षणाची माहिती व
आवश्यकता इसिए अध्यक्ष विकास पाटील यांनी समजावून दिली. प्रशिक्षणात नमूद
केल्या प्रमाणे शाडू माती मूर्ती बनविण्याचे इंदिरा कॉलेज आवारात मोफत प्रशिक्षण
कार्यशाळा घेण्यात आली. 

हिंजवडी, भोसरी औद्योगिक भागात ‘बंद’चा परिणाम…

हिंजवडीतील आयटी कंपन्या व भोसरी औदयोगिक वसाहतीमध्ये देखील बंद पाळण्यात आला. भोसरी परिसरात साडे तीन हजार, तसेच कुदळवाडी, तळवडे आणि शहरातील एकूण आठ हजार कंपन्यांवर परिणाम बंदचा झाला आहे या सर्व कंपन्यांमधील साडे तीन लाख कर्मचाऱ्यांना आज सुट्टीवर आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आजच्या बंदचा परिणाम हिंजवडीतील आयटी कंपन्यावर जाणवत आहे बहुतांश कंपन्या बंद आहेत तर काही कंपन्यांनी वर्क फॉरहिंजवडी म चा पर्याय अवलंबला आहे. तसेच ज्या कामगारांची अतिशय महत्वाचे काम आहे ते कर्मचारी सकाळी नऊच्या आधी कंपनीत पोहचले आणि ते सायंकाळी सहा नंतर कंपनीतून बाहेर पडणार आहेत. हिंजवडीत एकूण १२० छोट्या-मोठ्या कंपन्या असून येथे साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. या सर्वांवर आजच्या बंदचा असा परिणाम जाणवत आहे

In a single day, 21,600 people pledge to donate their organs

Over 21,600 people and counting from 22 cities in Maharashtra have made an online pledge to donate their organs on Thursday. This beats the earlier record of 3,316 pledges in a single day. The pledges were made as part of an organ donation awareness programme ‘Gift Life’, undertaken by Rotary District, an NGO whose stated purpose is to bring together business and professional leaders to provide humanitarian services.

स्मार्ट सिटी उजळणार एलईडी दिव्यांनी

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी पथदिवे ‘एलईडी’ने उजळणार आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वीजबचतीमध्ये दरवर्षी 30 ते 50 कोटींची बचत होणार आहे. ‘इस्को’ तत्त्वानुसार राबविण्यात येणार्‍या या कामासाठी सुरुवातीला पालिकेस कोणताही खर्च करावा लागणार नाही.

‘मेट्रो’च्या ट्रॅकचे काम वर्षाअखेरीस सुरू होणार

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात पुणे मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. शहरात चिंचवडच्या मदर तेरेसा उड्डाणपुलापासून ते दापोडीतील हॅरिस पुलापर्यंत मेट्रो मार्गिकेचे काम केले जात आहे. या ठिकाणी लोहमार्ग (ट्रॅक) टाकण्यासाठी आणि विद्युत खांब लावण्याचा कामाची निविदा नुकतीच काढण्यात आली असून, हे काम वषार्र्ंअखेरीस सुरू होण्याची दाट शक्यता आहे. 

आयुक्तालय १५ ऑगस्टपासून

पिंपरी : शहराला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय मंजूर झाल्यावर आता स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्टला ते कार्यान्वित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनी ते कार्यान्वित करण्यास 'ग्रीन सिग्नल' दिला असून, त्याबाबत लवकरच अध्यादेश काढला जाईल. सध्याच्या पोलिस उपायुक्त कार्यालयातून १५ ऑगस्टला आयुक्तालयाचा कारभार सुरू होणार आहे.

बोर्‍हाडेवाडीतील गृहप्रकल्प मार्गी!

पिंपरी-चिंचवड : महापालिकेमार्फत राबविल्या जाणार्‍या बोर्‍हाडेवाडी येथील पंतप्रधान आवास योजनेच्या फेरसादर केलेल्या 112 कोटी रुपयांच्या निविदेला अखेर स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली. हे काम ठेकेदार एस. जे. कॉन्ट्रॅक्टस यांना देण्यात येणार आहे. दरम्यान, कामाचे स्वरुप बदलल्याने डीपीआर किमतीत मोठा फेरबदल झाला आहे. त्यासाठी या गृह प्रकल्पाचा सर्वंकष प्रकल्प अहवाल (डीपीआर) नोडल एजन्सी असलेल्या म्हाडाकडे सादर करण्यात येणार असून राज्य व केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे. दरम्यान, विद्यमान स्थायी समिती अस्तित्वात आल्यापासून पहिल्यांदाच 116 कोटींच्या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे.

रावेत, किवळेतील अनधिकृत बांधकांवर हातोडा

रावेत- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत व अ तिक्रमण विभागाने रावेत, किवळे येथील अनधिकृ त बांधकावर हातोडा चालविला. मंगळवारी के लेल्या कारवाईत एकूण तीन बांधकामे पाडण्यात आली. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 16 येथील रावेत व किवळे अनधिकृत बांधकामे झाली होती. या अनधिकृत बांधकामांवर पालिके च्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. कारवाईमध्ये आरसीसी एक व पत्राशेड दोन असे एकुण तीन बांधकामावर कारवाई करण्यात आली, अशी माहिती प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली. 

अण्णासाहेब मगर स्टेडियमचे अद्ययावत सुविधांसह नुतनीकरण करण्यात यावे

पिंपरी- औद्योगिकनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी- चिंचवड शहराची क्रीडानगरी म्हणून ओळख व्हावी. विविध खेळांमध्ये स्थानिक खेळाडूंना संधी मिळावी. यासाठी महापालिकेतर्फे नेहरुनगर येथे अण्णासाहेब मगर स्टेडियमची उभारणी करण्यात आली. तथापि, पालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे या स्टे डियमची अवस्था भयावह झाली असून खेळाडूंना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने अद्यावत सुविधांसह स्टेडियमचे नुतनीकरण करण्याची मागणी सामाजिक कार्यक र्ते कुणाल जगनाडे यांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

म. बसवेश्‍वर चौकात पादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावे-नगरसेविका मीनल यादव

चिंचवड- येथील महात्मा बसवेश्‍वर चौकामध्ये अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या चौकात पादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका मीनल यादव यांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत बीआरटी विभागाचे उपअभियंता विजय भोजने यांना नगरसे विका मीनल यादव यांनी निवेदन दिले.

संत नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा

पिंपरी-चिंचवड : नामदेव शिंपी समाज संस्थेच्या वतीने श्री संत नामेदव महाराज यांच्या 668 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शुक्रवारी (दि.10)विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष मोहन मुळे यांनी दिली. चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील मंदिरात शुक्रवारी सकाळपासून विविध कार्यक्रम होणार आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी व श्री नामदेव महाराज यांच्या मुर्तींना सकाळी आठ ते नऊ या वेळेत अध्यक्षांच्या हस्ते अभिषेक करण्यात येणार आहे. 

115 कोटीच्या विकास कामांना मंजुरी

पिंपरी-चिंचवड : शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणार्‍या सुमारे 115 कोटी 90 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत महापालिका क्षेत्रातील बोर्‍हाडेवाडी येथे 1288 निवासी सदनिका आर्थिक दुर्बल घटकांसाठी बांधण्यात येणार असून त्यासाठी 112 कोटी 18 लाख, भोसरी स.नं.एक मधील दवाखाना इमारतीसाठी बैठक व्यवस्था करणे व स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 73 लाख 38 हजार, महापालिका मुख्य कार्यालय व इतर विविध कार्यालयांचे नेटवर्किंगचे दुरुस्ती व देखभाल कामकाजासाठी एक कोटी 38 लाख 90 हजार या खर्चाचा समावेश आहे.

वीज दरवाढीच्या प्रस्तावाला ग्राहकांचा कडाडून विरोध

पुणे - स्थिर आकारामध्ये सुमारे शंभर ते अडीचशे टक्के सुचवलेली दरवाढ ही सामान्य ग्राहकांवर अन्यायकारक असून, शेतीपंप वीजवापराबाबत आयआयटी मुंबई आणि सत्यशोधन समितीचा अहवाल आयोगासमोर मांडण्यात यावा, अशी मागणी करीत विविध संस्था आणि संघटनांनी महावितरणच्या दरवाढीच्या प्रस्तावाला विरोध कडाडून केला. तर, महसुली तूट आणि विविध आर्थिक सूट द्यावी लागत असल्याने दरवाढ करावी लागणार असल्याचे सांगत महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी समर्थन केले.

5जी सेवा सुरू करण्याची तयारी वेगात

नवी दिल्ली: भारतात 2022 पर्यंत उच्च गती असलेली अत्याधुनिक 5जी दूरसंचार सेवा सुरू होईल, असे दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी सांगितले. सुंदराजन यांनी म्हटले की, 2022 पर्यंत 5जी सेवा पूर्णांशाने सुरू होईल. ही सेवा पुरवठ्यावर आधारित नसेल. ती मागणीवर आधारित असेल. इतर उद्योगांनी त्यादृष्टीने तयारी करायला हवी.

वायसीएममध्ये डॉक्‍टरांच्या हंगामी भरतीस मान्यता

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्‍टरांची संख्या अपुरी आहे. ही बाब लक्षात घेत 22 वरिष्ठ आणि 47 कनिष्ठ डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यास स्थायी समितीने मान्यात दिली आहे. ही नियुक्ती हंगामी स्वरुपाकरिता असणार आहे.

आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे

पिंपरी – राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भगवान महावीर शिक्षण संस्थेचे पाचवे विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन गुरुवारी (दि. 9) भोसरी येथे पार पडले. मात्र, मराठा मोर्चाने पुकारलेल्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर दिवसभराचे साहित्य संमेलन उरकते घेण्यात आले. इतर जातींप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, परंतु, आगामी काळात सर्वच आरक्षण बंद करून आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे, असा ठराव संमेलनात एकमताने मंजूर करण्यात आला.

रिक्षांना स्कूल बसचा परवाना कसा?

मुंबई – शालेय बसला कमीतकमी 13 आसनाचे बंधन असताना 3 आसनी रिक्षांना विद्यार्थ्यांची वाहतुक करण्याची परवानगी कशी दिली जाते, असा सवाल उपस्थित करून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले.
तीन आसनी रिक्षांमध्ये आठ ते दहा विद्यार्थ्यांना कोंबले जाते. विद्यार्थी रिक्षांमध्ये लटकत असतात.त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न आहे. त्यांचा जीव धोक्‍यात घातला जात आहे, असे स्पष्ट करून नियमांत दुरूस्ती करा अन्यथा आम्ही आदेश देतो, असे न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला बजावले.

यमुनानगर येथे पालिकेच्या वाहनाची तोडफोड

चौफेर न्यूज –  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सकाळपासूनच शहरातील सर्व दुकाने नागरिकांनी स्वत:हून बंद ठेवली आहेत. मात्र निगडी यमुनानगर येथे पिंपरी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या एका कंटेनरची तोडफोड करण्यात आली.

पिंपरी चिंचवडमध्ये आढळले स्वाईन फ्लूचे ३ रूग्ण

चौफेर न्यूज –  दोन वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड शहरात ६५ बळी घेतलेल्या स्वाईन फ्लूने यंदाच्या वर्षी पुन्हा आपले तोंड वर काढण्यास सुरूवात केली आहे. शहरात आज स्वाईन फ्लूची लागण झालेले ३ रूग्ण आढळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन वेगवेगळ्या खाजगी रूग्णालयात या तीन रूग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पिंपरी महापालिकेच्यावतीने क्रांतिवीरांना अभिवादन

चौफेर न्यूज –  भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहूती देणा-या क्रांतिवीरांना क्रांतीदिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन  चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षेनेते एकनाथ पवार तसेच अतिरिक्त  आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.