Wednesday, 16 January 2013

Akurdi station subway to be completed by February 15




Akurdi station subway to be completed by February 15
Times of India
At present, the old subway near Akurdi station connects Ravet, Kiwale, Walhekarwadi and other areas with the old Pune-Mumbai highway and Nigdi Pradhikaran areas. However, water overflowing from the Pimpri Chinchwad Municipal Corporation's water ...

Pimpri-Chinchwad to get more CFCs




Pimpri-Chinchwad to get more CFCs
Times of India
PUNE: The number of citizens facilitation centres (CFCs) in Pimpri-Chinchwad will soon be increased from the existing nine to 20 in the first phase. In the second phase, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) proposes to set up CFCs in all ...

स्मशानभूमीसाठी काळजीवाहकांच्या नेमणुकीची 27 संस्थांना 'खिरापत'

स्मशानभूमीसाठी काळजीवाहकांच्या नेमणुकीची 27 संस्थांना 'खिरापत'
पिंपरी, 15 जानेवारी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कानउघडणी केल्यानंतर गेली तीन आठवडे तहकूब करण्यात आलेली स्थायी समितीची सभा आज अखेर पार पडली. सुमारे अकरा कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देतानाच महापालिकेच्या 33 स्मशानभूमींसाठी काळजीवाहक नेमण्याचे काम 27 ठेकेदार संस्थांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

अध्यक्षस्थानी सभापती जगदीश शेट्टी होते. महापालिकेच्या 35 स्मशानभूमीमध्ये काळजी वाहक नेमण्याच्या कामासाठी निविदा प्रसिध्दी करण्यात आली होती. त्यानुसार 28 निविदा प्राप्त झाल्या. त्यातील 27 निविदाधारकांनी आठ तासासाठी प्रती कर्मचारी 309 रुपये दर देण्याची तयारी दाखविली आहे. एका स्मशानभूमीसाठी चार काळजीवाहक या संस्थांमार्फत नेमले जाणार आहेत. 28 पैकी प्राप्त झालेल्या मोरया महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेचा निविदा दर जास्त होता. या व्यतीरिक्त आयुक्तांनी प्रसिध्दीस दिलेल्या जाहीर निवेदनात कोणत्याही सामाजिक संस्था अथवा धर्मादाय संस्था यांनी आयुक्तांनी ठरवून दिलेल्या किमान वेतनदरानुसार काळजी वाहक पुरवून स्मशानभूमींची देखभाल व दुरुस्ती करण्याची तयारी दर्शविल्यास थेट पध्दतीने काम देण्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार चार सामाजिक धर्मादाय संस्थांनी अर्ज दाखल केले आहेत.

पिंपरीनगर येथील स्मशानभूमीकरीता जुलै 2014 पर्यंत करारनामा झाला आहे. तसेच शहरातील 35 पैकी एक स्मशानभूमी खासगी असल्याने तेथे महापालिकेमार्फत काळजीवाहक पुरविता येत नाहीत. त्यामुळे उर्वरीत 33 स्मशानभूमीसाठी काळजीवाहक नेमण्याचे काम देण्याचे निश्चित झाले आहे. 27 संस्थांना 27 स्मशानभूमीमध्ये काळजीवाहक नेमण्याचे काम देवून उर्वरीत सहा स्मशानभूमीसाठी पात्र 27 संस्थांमधून सोडत पध्दतीने काळजीवाहक नेमण्याचे काम दिले जाणार आहे. त्यांच्यासोबत तीन वर्षे कालावधीसाठी हा करारनामा करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली.

महापालिकेमार्फत येत्या 17 व 18 जानेवारीला चोविसतास पाणीपुरवठ्यासंदर्भात नगरसेवक आणि अधिका-यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील ऑटो क्लस्टरच्या सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे. अ‍ॅडमिनीस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडियाचे (आस्की) संचालक डॉ. वेदाला चारी मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा आयोजित करण्याबरोबरच त्यासाठी येणा-या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली. महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या बारा हजार पैकी चार हजार लाभार्थ्यांना शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत लाभार्थ्यांनाही शिवणयंत्र देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
'ड' प्रभाग कार्यक्षेत्रातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी 28 लाख 51 हजार रुपये, च-होलीतील मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी 45 लाख, दत्तवाडीतील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 39 लाख 78 हजार, फुगेवा़डीतील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 64 लाख 32 हजार रुपयांच्या खर्चासह सुमारे अकरा कोटी रुपयांच्या विकास कामांना स्थायी समितीने मान्यता दिली. जकात दर 'जैसे थे' ठेवण्याबरोबरच मिळकरामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जगदीश शेट्टी यांनी सांगितले.

पादचारी महिलेचे मंगळसूत्र पळविले

पादचारी महिलेचे मंगळसूत्र पळविले
पिंपरी, 15 जानेवारी
रस्त्याने पायी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पळ काढला. निगडी प्राधिकरणात सोमवारी (दि. 14) सायंकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी शारदा संपत फडतरे (वय-40, रा. निगडी, प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदा फडतरे या रस्त्यावरून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 30 हजार रूपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकवले. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले तपास करीत आहेत.

'चिरीमिरी' न देणा-या अवैध बांधकामांवरच फौजदारी- श्रीरंग बारणे

चिरीमिरी' न देणा-या अवैध बांधकामांवरच फौजदारी- श्रीरंग बारणे
पिंपरी, 15 जानेवारी
पिंपरी-चिंचवड महापालिकेने 1 एप्रिल 2012 पूर्वी झालेल्या बांधकामांविरोधात मोहीम उघडली आहे. 'चिरीमिरी' न देणा-या मालमत्ताधारकाविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा नवा गोरखधंदा करआकारणी आणि करसंकलन विभागाने सुरु केला आहे. पैसे खाण्याचे हे 'रॅकेट' कारकुनापासून ते सहायक आयुक्तांपर्यंत पोचले असल्याचा घाणाघाती आरोप शिवसेना गटनेता श्रीरंग बारणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

याबाबत अधिक माहिती देताना बारणे म्हणाले की, शासनाच्या आदेशानुसार 1 एप्रिल 2012 पूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात झालेल्या बांधकामांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्याअंतर्गत अवैध बांधकाम करणा-या नागरिकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यानंतर संबंधितांचे बांधकाम पाडण्याची कारवाई केली जाते. महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून 31 मार्च नंतरच मिळकतीच्या नोंदी केल्या जातात.

गेल्या दोन वर्षातील 90 टक्के मिळकतकराच्या नोंदी 1 एप्रिल 2012 रोजी केलेल्या आहेत. या नोंदी करताना महापालिका करसंकलन विभागाच्या कर्मचा-यांपासून ते अधिका-यांपर्यंत लागे बांधे असल्याने कर बुडविण्यासाठी 31 मार्चपूर्वी नोंदी केल्या जात नव्हत्या. 1 एप्रिलपासून मिळकतकर लागू केल्याने महापालिकेचा एक वर्षाचा मिळकतकर बुडतो. त्यामुळे महापालिकेला वर्षाकाठी कोट्यावधी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.

ज्या मिळकतकराच्या नोंदीच करुन घेतल्या नाही, अशा करसंकलन विभागाच्या अधिका-यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. मात्र करसंकलन विभागाच्या गालथान कारभारामुळे 31 मार्च 2012 पूर्वी मिळकतकराची नोंद न झाल्यामुळे अनेक गरीब नागरिकांना सर्रास अनधिकृत बांधकामांच्या नोटीसा बजावून फौजदारी गुन्हे दाखल करुन बांधकामे पाडण्याची कारवाई होत आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनातील नोंदीच्या त्रुटी शोधून वीज बिल, दुरध्वनी बिल, पाणी बिल आदी शासकीय पुरावे गृहीत धरुन नागरिक राहत असलेल्या इमारतींची 1 एप्रिल 2012 पूर्वीची नोंद करुन घ्यावी, अशी मागणीही श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

आमदार गप्प का?

श्रीरंग बारणे यांनी अवैध बांधकामप्रकरणी पिंपरी, चिंचवड आणि भोसरीच्या आमदारांवर सडकून टीका केली. निष्क्रीय असे तीनही आमदार मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करतात तर महापालिका प्रशासन वस्तुस्थिती दडवून ठेवते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कठोर निर्णय घ्यावे लागतात. बांधकामे पाडावीत हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. तीनही आमदारांना समस्या सोडवायची नाही तर जटील कराची असल्याची टीकाही श्रीरंग बारणे यांनी केली.

ढेरंगे खुनीहल्लाप्रकरणी आरोपीला 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

ढेरंगे खुनीहल्लाप्रकरणी आरोपीला 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
पिंपरी, 15 जानेवारी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ढेरंगे यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणी आरोपी विक्रांत माने याला मंगळवारी (दि. 15) पिंपरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हल्ल्यातील जखमी संदीप ढेरंगे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी ढेरंगे यांच्या पत्नी वैजयंती संदीप ढेरंगे (वय-31, रा. अक्षय अपार्टमेंट, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोमवारी (दि. 14) दुपारी एकच्या सुमारास विक्रांत माने याने उसनवारीच्या पैशावरून पिंपरीच्या विशाल टॉकीजजवळील कार्यालयात घुसून धारदार शस्त्राने संदीप ढेरंगे यांच्यावर खुनी हल्ला केला. या हल्ल्यात ढेरंगे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर विक्रांत माने याला पोलिसांनी आळंदी येथून अटक केली.

संदीप ढेरंगे यांच्याकडून विक्रांत माने याने बहिणीच्या लग्नासाठी व रिक्षा सोडविण्यासाठी 50 हजार रूपये घेतले होते. ते पैसे मिळावेत म्हणून ढेरंगे माने याच्याकडे तगादा लावल्याने माने याने खुनी हल्ला केला. त्याला पिंपरी न्यायालयाने 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) बी. मुदीराज तपास करीत आहेत.

देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार धर्मशाळेच्या विश्वस्तपदी उषा खोल्लम

देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार धर्मशाळेच्या विश्वस्तपदी उषा खोल्लम
पिंपरी, 15 जानेवारी
आळंदी येथील देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज धर्मशाळेच्या विश्वस्तपदी उषा खोल्लम यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अध्यक्षपदी संतोष खोल्लम, उपाध्यक्षपदी ह.भ.प.शांताराम होनावळे तर सरचिटणीसपदी सचिन टकले यांची निवड करण्यात आली आहे.

उषा खोल्लम यांचा तळेगावात येथील विविध सामाजिक उपक्रमात सहभाग असतो. महिला मंडळांद्वारे कला व संस्कृती जपण्याचे मोलाचे काम त्या करीत आहेत. त्यांना रोटरी क्लब ऑफ तळेगावतर्फे विशेष सेवा पुरस्कार, अखिल सुवर्णकार महिला मध्यवर्ती महिला मंडळातर्फे नवदुर्गा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

आकुर्डीत शुक्रवारी खंडोबा उत्सव

आकुर्डीत शुक्रवारी खंडोबा उत्सव
पिंपरी, 15 जानेवारी
आकुर्डी येथील खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने 18 व 19 जानेवारीला खंडेराय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवात खंडोबाची पालखी मिरवणुक काढण्यात येणार आहे.

दि.18 रोजी सकाळी 5 वाजता उद्योजक प्रेमचंद भोळे यांच्या हस्ते गणेशाला अभिषेक करण्यात येणार आहे. साय़ंकाळी आकुर्डी गावठाणातुन खंडोबापालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच सौंदर्य तारका मालती इनामदार यांचा लोकनाट्याचा कार्यक्रमही होणार आहे.

दि.19 रोजी सायंकाळी मराठी शाळेत कुस्त्यांचा जंगी सामना होणार आहे.या कुस्त्या वजनावर होणार आहे. यावेळी भारत केसरी किताब पटकविणारे कुस्तीगिर विजय गावडे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष व्ही.एस्.काळभोर,माजी अध्यक्ष शंकर पांढरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना अमरावती येथे ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना त्वरित विमानाने मुंबईला हलविण्यात आले आहे

त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना अमरावती येथे ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना त्वरित विमानाने मुंबईला हलविण्यात आले आहे

निगडीत बाप-लेकांवर चाकूहल्ला; हल्लेखोर गजाआड

निगडीत बाप-लेकांवर चाकूहल्ला; हल्लेखोर गजाआड
पिंपरी, 15 जानेवारी

सलून दुकानातील टॅवेल घेण्यावरून झालेल्या वादातून एका तरूणाने बाप-लेकांवर चाकूहल्ला केला. निगडीतील ओटास्किम येथील सलून दुकानात सोमवारी (दि. 14) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी हल्लेखोरास पोलिसांनी अटक केली आहे.

फिरोज साजीद शेख (वय-22) व त्याचे वडील साजीद श्याममहंमद शेख (वय-50, दोघेही रा. गुरूदत्त हौसिंग सोसायटी, दळवीनगर, ओटास्किम, निगडी) असे चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी राम साहेबराव साठे (वय-23, रा. दळवीनगर, पत्राशेड, ओटास्किम, निगडी) अशी अटक करण्यात आलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. या प्रकरणी फिरोज याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीतील ओटास्किम येथे सजीद शेख यांचे सलूनचे दुकान आहे. सोमवारी सायंकाळी राम साठे हा फिरोज यांच्या सलूनच्या दुकानात आला. तोंड पुसण्यासाठी दुकानातील एक टॉवेल साठेने घेतला. त्यामुळे फिरोजने त्याना टॉवेल घेण्यास विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या साठे हा रागाने दुकानाबाहेर पडला. त्यानंतर काही वेळात तो चाकू घेऊन दुकानात आला आणि 'तुम्हाला जिवंत सोडणार नाही', असे म्हणून साठे याने फिरोजच्या डोक्यावर आणि त्याचे वडील साजीद शेख्‍ा यांच्या पोटात चाकूने भोसकले. त्यानंतर दोघांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. फिरोज आणि साजीद यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बाप-लेकांवर चाकूहल्ला करणा-या राम साठे यांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

थेरगावात जुगार अड्ड्यावर छापा; सहा जणांना अटक

थेरगावात जुगार अड्ड्यावर छापा; सहा जणांना अटक
पिंपरी, 15 जानेवारी
थेरगाव येथील मोकळ्या जागेत एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात सहा जणांना अटक केली. अटक सहा आरोपींची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. थेरगाव गावठाणातील पाण्याच्या टाकीजवळ सोमवारी (दि. 14) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

सतीश भगवान गवारे (वय-38, रा. बापूजीबुवानगर, थेरगाव), सतीश एकनाथ खंडागळे (वय-43, रा. संदीपनगर, थेरगाव), अतुल सदाशिव बोडके (वय-32, रा. बालाजी हाईटस, विशालनगर, पिंपळे निलख), संतोष रामभाऊ दहिभाते (वय-35, रा. बापूजीबुवानगर, थेरगाव), अंकुश राजाराम अडसूळ (वय-27, रा. थेरगाव), सतीश काळूराम नढे (वय-32, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या सहा जणांची नावे असून, या सर्व आरोपींची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई एन. एम. लोंढे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव गावठाणातील पाण्याच्या टाकीशेजारील मोकळ्या जागेत सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी या अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांना अटक केली. या आरोपींकडून रोख नऊ हजार आठशे रूपये व जुगार साहित्य पोलिसांनी जप्त केले. अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पी. एन. पवार तपास करीत आहेत.

पुण्यातील मेट्रो स्वारगेटपर्यंतच!

पुण्यातील मेट्रो स्वारगेटपर्यंतच!: पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मार्ग कात्रजपर्यंत वाढण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला असला, तरी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये (डीपीआर) या मार्गाचा समावेश नसल्याने नवी दिल्लीमध्ये झालेल्या चर्चेत या बदलाचा विचारही करण्यात आला नाही. त्यामुळे स्वारगेट ते कात्रज या वाढीव मार्गाला ‘रेड सिग्नल’ लागला आहे.

अतिक्रमण नियंत्रणासाठी महापालिकेतर्फे 'नागरी पोलीस'

अतिक्रमण नियंत्रणासाठी महापालिकेतर्फे 'नागरी पोलीस'
पिंपरी, 14 जानेवारी
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या अवैध बांधकामांना आळा घालण्यासाठी आणि अतिक्रमणविरोधी कारवाई प्रभावीपणे राबविण्यासाठी एक स्वतंत्र पोलीस ठाणे आणि चार पोलीस चौक्या उभारण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी घेतला आहे. विकासकामांत अडथळे निर्माण करणारे नागरी गुन्हे रोखणे तसेच त्यांचा तपास करुन दोषारोपपत्र दाखल करण्याचे काम या 'नागरी पोलिसां'ना करावे लागणार आहे. हे नागरी पोलीस पुणे पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणाखाली काम करतील. मात्र त्यांचा खर्च महापालिकेला उचलावा लागणार आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त डॉ.श्रीकर परदेशी यांनी याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंगळवारी (दि. 15) होणा-या साप्ताहिक सभेपुढे ठेवला आहे. पिंपरी-चिंचवड शहराचे नागरीकरण वेगाने होत आहे. त्यामुळे शहरात मोठया प्रमाणावर अवैध बांधकामे आणि अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

ती रोखण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेने वेळोवेळी केलेल्या उपाययोजना पुरेशा परिणामकारक नसल्याने स्पष्ट झाले आहे. अशा बांधकामांवर नियंत्रण आणण्यासाठी पिंपरी महापालिकेने मुख्यालय स्तरावर तसेच प्रभाग स्तरावर अतिक्रमण नियंत्रण आणि निर्मूलन पथक नेमली आहेत. या पथकात एका पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे. मात्र, त्यांची कामगिरी सुमार दर्जाची आहे.

नागरी भागातील अतिक्रमण निर्मूलनासाठी विशेष पोलीस ठाणी उभारण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्याने त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. अवैध बांधकामांना आळा घालण्यासाठी आणि अतिक्रमणविरोधी कारवाई प्रभावीपणे राबविण्यासाठी एक स्वतंत्र पोलीस ठाणे, चार चौक्या उभारण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी तयार केला आहे.

त्यात एक सहायक पोलीस आयुक्त, एक पोलीस निरीक्षक, सहा फौजदार, पाच सहायक फौजदार, सोळा हवालदार, ऐंशी शिपाई आदींची नेमणूक करण्याचे नियोजित आहे. त्यांच्या वेतनावर दरमहा 32 लाख रुपये तर निवृत्ती वेतनापोटी दरमहा दोन लाख 22 हजार रुपये खर्च करण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे. हे पोलीस ठाणे,चार चौक्या महापालिकेच्या जागेत उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी 70 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

नागरी पोलिसांवर महापालिका खर्च करणार असली तरी त्यांच्यावर पुणे पोलीस आयुक्तांचे नियंत्रण असेल. स्वतंत्र पोलीस ठाणे, चार चौक्या उभारण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तो राज्याच्या नगरविकास खात्याकडे पाठवला जाणार आहे. तसेच नागरी पोलिसांवरील खर्च आगाऊ स्वरुपात राज्य सरकारकडे जमा करावा लागणार आहे.

यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात कायमस्वरुपी लेखार्शीर्ष उघडावे लागणार असल्याचेही आयुक्तांनी प्रस्तावात म्हटले आहे. पोलीसभरती आणि पदनिर्मिती गृह विभागाकडून केली जाणार आहे. महापालिका कायदयांतर्गत आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम,1966 येणारे सर्व नागरी गुन्हे नोंदविताना नियमित पोलिसांची कर्तव्यही नागरी पोलीस बजावतील. विकासकामांत अडथळे निर्माण करणारे नागरी गुन्हे रोखणे तसेच त्यांचा तपास करुन दोषारोपपत्र दाखल करण्याचे काम या नागरी पोलिसाना करावे लागणार आहे.

राजमाची परिसरात भरटकलेल्या विद्यार्थ्यांना शोधण्यात यश

राजमाची परिसरात भरटकलेल्या विद्यार्थ्यांना शोधण्यात यश
लोणावळा, 14 जानेवारी
लोणावळ्याजवळील राजमाची किल्ला परिसरात भरकटलेल्या पुण्यातील सहा विद्यार्थ्यांना तसेच एका वाटसरूला लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र मंडळ, राजमाची ग्रामस्थ व पोलिसांनी आठ तासांच्या अथक परिश्रमानंतर शोधून त्यांची सुटका केली. हे सात जण सहाशे मीटर खोल दरीत रविवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास सापडले.

स्वप्नील संजय कांबळे (वय- 20), विकास किसनराव आंदेगावकर (वय- 21), शिवशंकर जगदीश बिरादार (वय- 20), निलेश देवराम आढाव (वय- 21), नंदकुमार बहिरू तोडमोल (वय- 21), मयूर माणिक नवसुपे (वय- 20, सर्व रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी पुणे) हे सहा विद्याथी आणि शिवाजी सहदेव मोहिते (वय- 60, रा. एएमएफसी कॉलेज इंदीरानगर, पुणे) असा एक वाटसरु अशी या भरकटलेल्यांची नावे आहेत. पुण्यातील बिबवेवाडी येथील व्हीआयटी इंजिनिअरिंग कॉलेजचे हे विद्यार्थी आहेत.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थी रविवारी सुटटी असल्याने लोणावळा परिसरात पर्यटनासाठी आले होते. सकाळी अकरा वाजता ते लोणावळ्यापासून 16 किलोमीटर अंतरावरील राजमाची किल्ल्याकडे पर्यटनासाठी निघाले होते. दरम्यान, काही अंतर चालत गेल्यावर आपण वाट चुकलो असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने ते पुन्हा ज्या वाटेने आले त्या वाटेने परत माघारी फिरले. परंतु ते अधिकच भरकटले. अखेर त्यांनी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान पोलीस नियंत्रण कक्षाला मोबाईलवरून राजमाची परिसरात चुकलो असल्याची माहिती कळविली. नियंत्रण कक्षाने या घटनेची माहिती लोणावळा शहर पोलिसांना दिली.

पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले आपल्या सहका-यांसह राजमाची किल्ला परिसराकडे गेले. तत्पूर्वी पोलिसांनी मदतीसाठी लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र मंडळाला प्राचारण केले. सायंकाळी सहा वाजता पोलीस व शिवदुर्गचे सदस्य, राजमाची येथील काही युवकांनी शोध मोहिमेला सुरूवात केली. मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास भरकटलेल्या विद्यार्थ्यांचा शोध लागला. हे सर्वजण सहाशे मीटर खोल दरीत अडकून बसले होते. शोध पथक पोहचल्याचे पाहून विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले, संतोष शेळके, राजेंद्र कुरणे, संतोष दोरगे, अमोल रोकडे तर शिवदुर्गचे अध्यक्ष- अजय राऊत, सचिव- सुनील गायकवाड, आनंद गावडे, राजू कडू, अशोक मते, गणेश गिध, विशाल पाडाळे, नरेश बोरकर, बाळू वरे व रघुनाथ यांच्या पथकाला आठ तासांच्या अथक परिश्रमानंतर या विद्यार्थ्यांना शोधण्यात यश आले.

असोसिएटेड चिटफंडच्या कॉर्पोरेट कार्यालयाचे उद्‌घाटन

असोसिएटेड चिटफंडच्या कॉर्पोरेट कार्यालयाचे उद्‌घाटन
पिंपरी, 14 जानेवारी
असोसिएटेड चिटफंडच्या कॉर्पोरेट ऑफीसचे उद्‌घाटन आज सायंकाळी मोरवाडी येथील अजमेरा रस्त्यावरील ग्राहकांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी चार वाजता कल्याण धर्मप्रांताचे बिशप डॉ.थॉमस एलावनल यांनी कॉर्पोरेट ऑफीसला भेट देवुन आशिर्वाद दिले.

पिंपरी येथील असोसिएटेड चिटफंडच्या कॉर्पोरेट ऑफीसचे आज उद्‌घाटन करण्यात आले. त्यापुर्वी चिटफंडच्या इमारतीतच गणेशाची पुजा करण्यात आली. एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सीलचे अध्यक्ष पी.सी.नांबियार यांनी दीपप्रज्वलन करुन कॉर्पोरेट ऑफीसचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी व्यवस्थापकीय संचालक के.एम.रॉय, संचालक के. हरीनारायणन, सजी वर्की, जिजी मॅथ्यु, माजी नगरसेवक बाबु नायर, एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सीलचे अध्यक्ष पी.सी.नांबियार, कृष्ण मंदीराचे अध्यक्ष हरीदास नायर, पी. माधवन कुट्टी, टी मुरलीधरन, प्रकाश भोसले, यु.रामचंद्रन आदी उपस्थित होते. दुपारी चार वाजता कल्याण धर्मप्रांताचे बिशप डॉ.थॉमस एलावनल यांनी कॉर्पोरेट ऑफीसला भेट देवुन आशिर्वाद दिले.

असोसिएटेड चिटफंडचे हे नववे वर्ष आहे. सध्या 15 हजार ग्राहक आहेत. चिटफंडच्या मुंबई, चाकण, कोल्हापुर, नाशिक, पुणे, नेरुळ आदी ठिकाणी शाखा आहेत. उद्‌घाटन प्रसंगी बोलतांना व्यवस्थापकीय संचालक के.एम.रॉय म्हणाले की, ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी असोसिएटेड चिटफंट कायमच पुढे राहील. ग्राहक हेच आमचे दैवत आहे. असोसिएटेडची ही यशस्वी वाटचाल ग्राहकांच्यामुळेच झालेली आहे. या पुढेही ग्राहकांचे हित जपण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आश्वासनही के.एम.रॉय यांनी दिले.

एक्स्पोर्ट कमिशन कॉन्सीलचे अध्यक्ष पी.सी.नांबियार म्हणाले की, फायनान्स कंपनी चालवतांना पारदर्शकता आणि विश्वास असणे गरजेचे असते. फायनान्स कंपनी चालवतांना व्यवस्थापन गरजेचे असते. लघुउद्योजकांना चिटफंड सारख्या कंपन्यांकडुन मदत झाल्यास त्यातुन उद्योग उभारणीस मदत होवु शकते. चिटफंड सारख्या कंपन्याद्वारे सामान्य नागरीकही उद्योजक बनु शकतो, असेही नांबियार म्हणाले.