NEW DELHI: From next July, new driving licences (DLs) and ve ..
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 15 October 2018
14k citizens give views for civic projects
Pimpri Chinchwad: More than 14,000 citizens have submitted t ..
एक किलोमीटर मेट्रो स्पॅनचे काम पूर्ण
पुणे मेट्रोचा पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन प्रकल्पांपैकी पिंपरी ते स्वारगेट या ‘रिच-वन’ प्रकल्पातील पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील एक किलोमीटर अंतरातील स्पॅन बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. खराळवाडी ते वल्लभनगर एसटी आगारापर्यंत मेट्रो मार्गिकेचे स्पॅन तयार झाल्याने नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत `#MeToo'; परंतु भीतीने तक्रारच नाही
पिंपरीः श्रीमंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतही `#MeToo' ची प्रकरणे घडली आहेत. चालू आहेत. पण नोकरी व इभ्रत जाण्याच्या भीतीने कुणी तक्रारीसाठी पुढे येत नाही. तसेच `#MeToo'ची शिकार झालेल्या तक्रारदार महिलेचीच बदली झाल्याचा अनुभव असल्याने पालिकेत `#MeToo'च्या बळी ठरलेल्या तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करीत आहेत. मात्र, अनेक वर्षापूर्वीची ही प्रकरणे आता देशभरातच समोर आल्याने पिंपरी पालिकेतही ती उजेडात येण्याची शक्यता बळावली आहे.
Pay tax, get rewards from the government
NEW DELHI: A cup of tea with the state governor, priority check-in at the airport, passports on priority, dedicated toll lanes, airport lounge access — these are some of the rewards that could be offered to exemplary taxpayers.
लोणावळा-दौंड लोकल प्रवास होणार सुखकर
पिंपरी - तुम्ही जर नोकरी, व्यवसायानिमित्त लोणावळ्यावरून दौंड परिसरात जात असाल, तर आगामी काळात तुमचा हा प्रवास सोईस्कर होणार आहे. लोणावळा ते दौंड मार्गावर लोकलसेवा सुरू करणे शक्य असून, त्यासंदर्भातील सकारात्मक अहवाल मध्य रेल्वेने सहा महिन्यांपूर्वी केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. येत्या काही दिवसांत बोर्डाने त्याला हिरवा कंदील दाखविल्यास प्रवाशांसाठी ते फायदेशीर ठरणार आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीसाठी 8.33 टक्के बोनस व 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. या कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षक व बालवाडी शिक्षकांना देखील हा लाभ दिला जाणार आहे. याकरिता कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भार महापालिका तिजोरीवर पडणार आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना मिळेल, याची तजवीज करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी लेखा विभागाला दिले आहेत.
अनियमित पाणीपुरवठ्याने दळवीनगरकर त्रस्त
पिंपरी - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अनियमित आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे चिंचवड- दळवीनगरमधील सोनवणे चाळ, पांढरकर चाळ, समर्थ कॉलनी परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून, प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
शहरातील शिक्षकांच्या समस्या सोडविणार – महेश लांडगे
विद्यार्थ्यांच्या दर्जा सुधारणे गरजेचे आहे. आजचे विद्यार्थी शहराचे उद्याचे भवितव्य आहे. त्यांना नाविन्यपुर्ण, स्मार्ट शिक्षण दिले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी मनापासून प्रयत्न करावेत, असे आवाहन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी शिक्षकांना केले. तसेच शहराताली सर्व शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत. याबाबत लवकरच शिक्षकांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली जाईल, अशी ग्वाही लांडगे यांनी शिक्षकांना दिली. तसेच हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात येईल. महापालिका शाळेतील शिक्षकांसाठी धन्वंतरी योजना लागू करण्याच्या सूचना देखील त्यांनी पालिकेतील पदाधिका-यांना केली.
नवरात्रीमुळे मिरची, राजगिऱ्याला मागणी वाढली
पिंपरी – नवरात्रीनिमित्त मोशीतील नागेश्वर महाराज उपबाजारात राजगिरा व मिरचीची मोठी आवक झाली. बटाट्याची आवक घटली आहे. तर रताळी व भुईमूग शेंगांची आवक वाढली आहे. याशिवाय कोथिंबीरीची ावक वाढूनही भाव मात्र चढेच आहेत. फळभाज्यांची एकूण आवक 1 हजार 25 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 20 हजार 428 गडड्या एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक 38 क्विंटलने तर पालेभाज्यांची आवक 4 हजार 928 गडड्यांनी वाढली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)