Sunday, 8 September 2013

‘Frame plan for laying underground cable TV wires ’

‘Frame plan for laying underground cable TV wires ’
Pimpri: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has directed cable operators in the city to frame a plan within the next three months for laying&nbsp underground&nbsp cable TV wires.

क्रीडा धोरणासाठी सूचना पाठवण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड महापालिकेने क्रीडाधोरण तयार केले असून त्याचा सुधारीत मसुदा महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. या धोरणासंदर्भात सूचना करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

मोरवाडी ते पिंपरी वाहनांची गर्दीच...

पिंपरी चौकात ग्रेडसेपरेटरमध्ये पडलेले खड्डे आज (शनिवारी) महापालिकेकडून बुजविण्यात आले. परंतु, खड्डे बुजविण्यासाठी  वाहतूक सर्व्हीस रस्त्यावरुन वळविण्यात आल्याने मोरवाडी ते पिंपरी चौकादरम्यान वाहतूक कोंडी पहायला मिळाली.
मोरवाडी चौक ते पिंपरी चौकादरम्यान ग्रेडसेपरेटरमध्ये पडलेले खड्डे

फुगेवाडी शाळेच्या इमारतीची धोकादायक

महापालिकेच्या फुगेवाडी येथील शाळेची इमारत धोकादायक झाली असून विद्यार्थ्यांना धोक्यात घालून ज्ञानार्जन करीत आहेत. महापालिकेने त्वरीत उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

राष्ट्रवादी युवतीच्या शहर संघटकपदी वर्षा जगताप यांची नियुक्ती

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहर संघटकपदी वर्षा जगताप यांची तर सहसंघटकपदी अर्चना भालेराव आणि प्रियंका लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्रीमती पार्वतीबाई शाऴेला 'आदर्श शाळा पुरस्कार'

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने मोरया शिक्षण संस्थेच्या श्रीमती पार्वतीबाई शाऴेला 'आदर्श शाळा पुरस्कार' उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकताच देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका

पिंपरी-चिंचवडमधील पहिली 'मातृ दुग्ध पेढी' (ह्युमन मिल्क बँक) सुरु

आजारपण, प्रसुती दरम्यान मातेचा मृत्यू यामुळे आईच्या दुधाला वंचित राहणा-या नवजात बालकांसाठी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आजपासून 'यशोदा' या नावाने 'मातृ दुग्ध पेढी' (ह्युमन मिल्क बँक) सुरु करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरातील ही पहिलीच पेढी ठरली आहे.

अग्निशामक दलात 18 मजली उंचीची 'स्काय लिफ्ट'

पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक विभागाच्या ताफ्यात 54 मीटर उंचीच्या महाकाय शिडी असलेले 'स्काय लिफ्ट' वाहन दाखल झाले आहे. त्यामुळे अठरा मजली इमारतीत दुर्घटना घडल्यास बचाव कार्य राबविणे अग्निशामक विभागाला सहज शक्य होणार आहे. अग्निशामक दलाची पोहोच आणि क्षमता उंचाविण्यासाठी महापालिकेने सुमारे 3 कोटी रुपये खर्च

शहरातील 9999 फेरीवाल्यांना लाभ

पिंपरी -&nbsp केंद्र सरकारने मंजूर केलेल्या फेरीवाला संरक्षण विधेयकामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नऊ हजार 999 फेरीवाल्यांना सामाजिक सुरक्षेच्या मूलभूत अधिकाराबरोबरच उपजीविकेची हमी आणि कायदेशीर संरक्षण मिळणार आहे.

पुण्यात लवकरच 'जर्मन व्हिसा' सेंटर

पुणे -&nbsp शहरात लवकरच "जर्मन व्हिसा ऍप्लिकेशन सेंटर' सुरू होणार असून, त्यापाठोपाठ अहमदाबाद आणि गोव्यातही अशी सेंटर कार्यान्वित होणार आहेत, अशी माहिती जर्मनीचे मुंबईतील वाणिज्यदूत मायकेल सिबर्ट यांनी दिली.