Friday, 6 July 2018

पहिल्या फेरीत 41 हजार 961 विद्यार्थ्यांना प्रवेश

पुणे - अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाची पहिली नियमित गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या 75 हजार 939 विद्यार्थ्यांपैकी जवळपास 41 हजार 961 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश देण्यात आला. यातील सुमारे 17 हजार 189 विद्यार्थ्यांना त्यांनी नोंदविलेल्या पहिल्या पसंती क्रमांकाच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. 

वारीदरम्यान प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी नाही

कारवाई न करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश

तळवडेत 24 लाखांची दारु जप्त

पिंपरी – निघोजे एमआयडीसी हद्दीतील तळवडे म्हाळुंगे रस्त्यावर अवैधरित्या भारतीय बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांमधून मद्याचे 30 बॉक्‍स जप्त करत तिघांना अटक करण्यात आली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. 4) केली.

शहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल

पिंपरी – संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीच्या सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात आज (दि. 6) वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

#SaathChal 'साथ चल' उपक्रमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी होणार सहभागी

पिंपरी (पुणे) : सकाळ माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल्स यांच्या वतीने यंदा आषाढी वारीत राबविण्यात येणाऱ्या "साथ चल' या अनोख्या उपक्रमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही तिच्या आई-वडिलांसह सहभागी होणार आहे. 

#SaathChal पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

पिंपरी (पुणे) : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीच्या स्वागतासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. मुक्काम, विसावा आणि पालखी मार्गावर आवश्‍यक पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. 

स्पर्धा परिक्षा केंद्रांमुळे महापालिकेच्या नावलौकिकात भर – महापौर नितीन काळजे

चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिकेने विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षा केंद्रांची व्यवस्था केली असून या स्पर्धा परिक्षा केंद्रातुन अनेक चांगली होतकरु मुले उत्तीर्ण होऊन महापालिकेच्या नावलौकिकात भर पाडत आहेत. ही अतिशय कौतुकास्पद बाब असल्याचे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.

पिंपरीत हायवेला मासे विकतात,मग ही स्मार्ट सिटी कशी : शिवाजीराव आढळराव

पिंपरी : पुणे-नाशिक भोसरीत महामार्गावर मासे विकले जातात. मग पिंपरी-चिंचवड कसले स्मार्टसिटी. तसेच याच हायवेवर अनधिकृत टपऱ्या आणि शेड असून त्यावर गुंड पाळले जात आहेत. असे असेल, तर मग ही बकाल सिटीच म्हणायला पाहिजे, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर केली.

मल्टिप्लेक्स आंदोलनाबद्दल राज ठाकरेंकडून मनसैनिकांचे कौतूक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मल्टिप्लेक्स, चित्रपट गृहामध्ये ज्यादा दराने होणा-या पदार्थ विक्रीवरून मनसे स्टाईल आंदोलन केले. त्यासाठी पिंपरी-चिंचवडच्या मनसैनिकांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तोंडभरून कौतूक केले.

दारूची जाहिरात पडणार महागात

वाईन शॉप, बिअर शॉप आणि बिअर बार विक्रेत्यांना यापुढे दारूच्या ब्रँडची जाहिरातबाजी करण्यास शासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे  ठिकठिकाणी लावलेले जाहिरात फलक तातडीने काढून घ्यावेत, अन्यथा  गुन्हा दाखल केला जाईल,  असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू विक्रेत्यांना दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील अनेक दारू विक्रेत्यांनी उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होण्याच्या भीतीने दुकानासमोरील जाहिरातीचे फलक हटवले असल्याचे चित्र  पाहायला मिळत आहे.

पानाच्या दुकानातून इतर वस्तू विकण्यास बंदी

रिटेलर्सची मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; उत्पन्नावर परिणाम होण्याची भिती महाराष्ट्रातील दहा लाख किरकोळ विक्रेत्यांवर परिणामाची शक्‍यता

पवनाच्या पाणी साठ्यात सव्वा तीन टक्‍के वाढ

पवना नगर – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवण्याऱ्या पवना धरण परिसरात गेल्या 24 तासात 103 मि. मी. पाऊस पडला, तर 1 जूनपासून 491 मि. मी. पाऊस पडला असून सव्वा तीन टक्‍के धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

इंद्रायणी प्रदुषणाची तक्रार थेट पंतप्रधान, राष्ट्रपतींकडे

पिंपरी – इंद्रायणी नदीच्या प्रदुषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोणतीही प्रभावी उपाय-योजना केली नसल्याने नागरिकांनी या प्रदुषणाच्या तक्रारी थेट पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे केल्या आहेत. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत लवकरच संबंधित सर्व विभागांची मुंबईत मंत्रालयात बैठक आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिक्षण समिती सभापतीपदी प्रा. सोनाली गव्हाणे; उपसभापती शर्मिला बाबर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीच्या पहिल्या सभापती होण्याचा मान भोसरीतील भाजपच्या नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांना मिळणार आहे. तर, उपसभापती शर्मिला बाबर यांची निवड होणार आहे. आज (गुरुवारी) सभापती आणि उपसभापतीपदासाठी भाजपकडून दोघींचे अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे त्यांची निवड निश्चित आहे. त्यांच्या निवडीवर सोमवारी (दि.9) अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल. दरम्यान, सोनाली गव्हाणे पहिल्या सत्ताधारी भाजपकडून प्रा. सोनाली गव्हाणे यांचा सभापतीपदासाठी तर उपसभापतीपदासाठी शर्मिला बाबर या दोघींचे अर्ज भरण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची निवड निश्चित आहे.

WhatsApp Image 2018-07-05 at 16.06.20

काय आहे ‘जिओ-गिगा-फायबर’ केबल?

रिलायन्सने ‘जिओ’च्या प्रचंड यशानंतर रिलायन्सने बाजारामध्ये ‘जिओ-गिगा-फायबर’ हि ऑप्टिकल फायबर केबल आधारित ब्रॉडबँड सेवा ११०० शहरांमध्ये सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. मुंबईमध्ये कंपनीच्या ४१व्या वार्षिक बैठकीचे औचित्य साधून रिलायन्सच्या मॅनेजिंग डायरेक्टर व मुकेश अंबानीयांच्या कन्या इशा अंबानी यांनी ही घोषणा केली.

“`परिवर्तन सोशल फ़ाऊंडेशनतर्फे अपंग प्रशिक्षण केंद्राला मदत“`

चौफेर न्यूज – थेरगाव येथील उद्योजक सुरेंद्र सरवदे यांच्या वाढदिवसाचा होणार अनावश्यक खर्च टाळून मुळशी तालुक्यातील माण येथील महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्राला मदत करण्यात आली. संस्था अपंग मुलांना भावी आयुष्यात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने तांत्रिक, संगणकिय प्रशिक्षण देण्याचे काम करते. तेथील अपंग व अनाथ मुलांसाठी परिवर्तन सोशल फ़ाऊंडेशनतर्फे अन्नधान्य देण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीसीसीओईआरचा प्रथम क्रमांक

कुशवाह आणि वाडी यांना पैकीच्या पैकी गुणचौधरी आणि जगताप विद्यापीठात प्रथम
चौफेर न्यूज –  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी परिक्षेत पीसीसीओईआरने कमी कालावधीमध्ये विद्यापीठातील नामवंत महाविद्यालयांना मागे टाकीत एकूण निकालात चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. अशी माहिती संस्थेच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी व संशोधन केंद्र महाविद्यालयाचा (पीसीसीओईआर) प्रथम वर्षातील सौरभसिंग कुशवाह आणि पियुष वाडी या दोन विद्यार्थ्यांनी इंजिनिअरींग मॅथेमॅटिक्स पार्ट दोन मध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तसेच इंजिनिअरींग केमिस्ट्री या विषयात संकेत चौधरी व इंजिनिअरींग मेकॅनिक्स या विषयात वैष्णवी जगताप यांनीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी परिक्षेत विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक मिळवला.