Friday, 3 November 2017

आता व्हॉट्सवरूनही करा पालिकेकडे तक्रार

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी सारथी हेल्पलाईन, संकेतस्थळ, एसएमएस, मेल, लोकशाही दिन, मोबाईल अॅप, किऑक्स या माध्यमातून नागरिकांना तक्रारी करता येतात. त्यात आणखी भर पडली असून पालिकेने तक्रारींसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू केला आहे. त्यानुसार  पालिकेने ९९२२५०१४५० हा व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर केला आहे. या क्रमांकावर तक्रारी करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

Related image

नागरिकांचे मत आता थेट पोहचणार केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या ईमेलवर!

निगडीपासून मेट्रो ऑनलाईन याचिका नुकतीच अपडेट करण्यात आली; केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी, पुणे मेट्रो यांचे ईमेल आयडी त्यात नव्याने अंतर्भाव करण्यात आले म्हणजेच नागरिकांचे मत आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर व नव्याने अंतर्भाव केलेल्या केंद्रीय मंत्री, पुणे मेट्रो टीमच्या अधिकृत ईमेल आयडीवर थेट पोहचणार आहे. पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना आवाहन - कृपया आपला आवाज गल्ली ते दिल्ली जास्तीजास्त संख्येने पोहचवा

खडकी, बोपोडीत ‘कसोटी’

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून पुणे-मुंबई महामार्गावरून मेट्रो प्रकल्पाचे काम खडकी कॅंटोन्मेंट हद्दीत सुरू झाल्यानंतरचा काळ वाहनचालकांची कसोटी पाहणारा ठरणार आहे. या हद्दीत बोपोडी आणि खडकी या दोन मेट्रो स्थानकांची कामे होणार आहेत. तसेच बोपोडी चौकात ग्रेड सेपरेटर करण्याचाही प्रस्ताव आहे.

‘एमआयडीसी’तील अतिक्रमणे काढणारच

पिंपरी - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागांवर झालेली अतिक्रमणांसंदर्भात कोणत्याही प्रकारची समिती नियुक्‍त करण्यात येणार नसून, त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

निधी न आल्यास स्मार्ट सिटी प्रकल्प सुरू करू नये

नागरी हक्क सुरक्षा समितीची आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मागणी
चौफेर न्यूज – स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होवून बराच कालावधी लोटला आहे, तरीही केंद्र व राज्य सरकारकडून अद्याप एक रुपयाचा ही निधी पालिकेला स्मार्ट सिटीसाठी मिळालेला नाही. यामुळे जोपर्यंत निधी येत नाही, तोपर्यंत प्रकल्पांचे काम सुरू करू नये, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीने आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

मिळकतधारकांचा आॅनलाइन भरणा, ४३ टक्के नागरिकांनी घेतला सुविधेचा फायदा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आॅनलाइन पेमेंट सुविधेचा वापर करण्याकडे मिळकतधारकांचा कल वाढत आहे. सुमारे ९५ हजार ६०० मिळकतधारकांनी आजअखेर आॅनलाइन भरणा केला आहे, अशी माहिती करसंकलन विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

महापालिकेने राबविलेला मतदार जागृतीचा पिंपरी पॅटर्न सर्वत्र राबवावा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदार जनजागृती केली होती. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत १० टक्क्यांनी वाढ झाली होती. महापालिकेने राबविलेला मतदार ...

पिंपरीत भाजपाला ‘घरचा आहेर’; महापालिकेतील ‘भ्रष्टाचार’ पदाधिकाऱ्याकडूनच उघड!

पिंपरी चिंचवड शहरात भाजपाला घरचा आहेर मिळाला आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार चक्क भाजपाच्या पदाधिकाऱ्यानेच उघड केला आहे. महापालिकेने केलेल्या बिन्स कंटेनर खरेदीत मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या तुलनेत दुप्पट दराने सदरची कंटेनर खरेदी करण्यात आली असल्याचे भाजपा सरचिटणीस अमोल थोरात यांनी म्हटले आहे. दरम्यान या खरेदीत महापालिकेच्या अधिकार्यांनी सत्ताधारी भाजपला अंधारात ठेवल्याचा दावा ते करत आहेत.

भोसरी विधानसभा : राजकीय संघर्षाची पुनरावृत्ती होणार का?

पिंपरी चिंचवड मध्ये तीन विधानसभा मतदार संघ येत असले तरी शहरात सर्वाधिक ‘लक्षवेधी’ मतदारसंघ म्हणून भोसरी मतदार संघ पाहिले जाते. अर्थात त्याला कारण आहे इथले प्रतिस्पर्धी.. भोसरी म्हटले की नाव समोर येते ते विलास लांडे यांचे….! पिंपरी चिंचवडचे शरद पवार म्हणून ओळख असलेल्या लांडे यांचे ‘डावपेच’ नेमके काय? हे अनेकांना कोडे असते म्हणून या मतदार संघाकडे सर्वांचेच लक्ष असते..! पण त्यांच्या या डावपेचाला मागच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या आमदार महेश लांडगे यांनी ‘छेदले’ आणि अशक्यप्राय वाटणारा विजयश्री खेचून आणला.. त्याचमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते समोरासमोर आले तर राजकीय वातावरण पुरते तापणार यात शंका नसल्याने हा मतदार संघ कमालीचा लक्षवेधी ठरतोय..भोसरी विधानसभा मतदार संघातले आणखी एक नाव म्हणजे शिवसेना नेत्या सुलभा उबाळे…! शहरातला शिवसेनेचा एकमेव महिला चेहरा…! महेश लांडगे आणि विलास लांडे यांच्या सारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्यांना तेवढ्याच धैर्याने त्यांनी तोंड दिले..! पण दुर्दैवाने त्यांना दोन वेळेला पराभवाचा सामना करावा लागला. आता महापालिका निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने आणि या पूर्वी दोनवेळा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांच्या नावाचा आगामी निवडणुकीत शिवसेना नेते किती विचार करतील हे सांगता येणे अवघड आहे. त्याचमुळे भोसरी मतदारसंघात सध्या लांडे आणि लांडगे हिच लढत होईल अशी चर्चा आहे.

पाच कोटींच्या विकासकामांना मंजुरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी (१ नोव्हेंबर) ५ कोटी ४८ लाख ५७ हजार रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली.

विनाअनुदानित गॅस सिलेंडर ९३ रुपयांनी महागला

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमध्ये बुधवारी दरवाढ झाली असून विनाअनुदानित सिलिंडर ९३ रुपयांनी तर अनुदानित सिलेंडर साडेचार रुपयांनी महागले आहे.

'आधार'चा संथ कारभार; पुणे-पिंपरीसह जिल्ह्यातील नागरिकांची होतेय ससेहोलपट

जिल्ह्यासह पुणे आणि पिंपरी महापालिका क्षेत्रात आधार केंद्रांची संख्या, मशीन्स यांची संख्या कमी आहे. जिल्हा प्रशासनाकडून आधार केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यापूर्वी काम केलेल्या खासगी ...