Thursday, 19 September 2013

मुसळधार पावसामुळे मिरवणूकीत व्यत्यय

मुसळधार पावसाची हजेरी
नेत्रदीपक विद्युत रोषणाई.. नानाविध फुलांनी सजवलेले  रथ़..  फटाक्यांची आतषबाजी.. रांगोळ्या.. ढोल-ताशांचा गजर.. अशा पारंपरिक पेहरावांनी सजलेल्या मिरवणुका ...आणि "पुढच्या वर्षी लवकर या"चा जयघोष करीत पिंपरीतील गणेशभक्तांनी आज (बुधवारी) अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या 'बाप्पा'ला

इंदिरा कॉलेजमध्ये रंगली वादविवाद स्पर्धा

इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स येथे सातव्या राज्यस्तरीय कै. शंकरराव वाकलकर वादविवाद स्पर्धा चांगलीच रंगली. या स्पर्धेत राज्यभरातून एकूण 61 संघांनी सहभाग नोंदविला.

मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीत होमहवन

भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने चिंचवड येथील श्री राघवेंद्र स्वामी मठात मंगळवारी (दि. 17) पूजापाठ आणि होमहवन करण्यात आले.

प्रबोधनकारांचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्नशील - डॉ. गो-हे

थोर समाजसुधारक, साहित्यिक, नाटककार, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी आणि झुंजार पत्रकार कै. केशव सीताराम ठाकरे यांचा पुतळा पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात उभारण्यासाठी पुढाकार घेऊ, असे प्रतिपादन शिवसेना मावळ लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी केले.

विर्सजन मिरवणुकीच्या खर्चातून शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य

रहाटणी काळेवाडी फाटा येथील गजानन मित्र मंडळाने यंदा विर्सजन मिरवणूक रद्द करुन 30 हजारांचा निधी गरीबांच्या शस्त्रक्रियेसाठी दिला आहे.

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला अतिशय जल्लोषात सुरुवात

मानाचा पहिल्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीने पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला अतिशय जल्लोषात सुरुवात झाली. ढोलताशांचा गजर, डीजेचा दणदणाट आणि उत्साही कार्यकर्त्यांचा 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा जयघोषात वाजत गाजत ही मिरवणूक निघाली.