Sunday, 24 March 2019

करसंकलन कार्यालये सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार

पिंपरी चिंचवड ः आर्थिक 2018-19 हे वर्ष 31 मार्च 2019 रोजी संपत असल्याने नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने सर्व 16 कर संकलन विभागीय कार्यालये सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार आहेत. 31 मार्चपर्यंत दरररोज कार्यालये सुरु राहतील. त्यामुळे ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मिळकत कराचा भरणा केलेला नाही. त्यांनी मिळकतकराचा भरणा करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे २१५ खांब पूर्ण

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये मेट्रोचे २१५ खांब बांधून पूर्ण झाले असून, आणखी ६७ खांबांसाठी पायाचे काम झाले आहे. नाशिक फाटा उड्डाण पुलाजवळील परिसर तसेच काही चौकांतील भागांमध्ये मेट्रोच्या खांबांसाठी पाया घेण्याचे काम अद्याप शिल्लक आहे.

मीटररीडिंगची एक दिवस आधी सूचना

पुणे - मीटररीडिंग आणि वीजबिलात अचूकता व पारदर्शकता राहावी, यासाठी आता मीटरचे रीडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे, याची पूर्वसूचना महावितरणकडून ग्राहकांना मोबाईलवरून एक दिवस अगोदर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे.

मोशी आरटीओमध्ये आगळे वेगळे उद्यान

पिंपरी : पिंपरीच्या उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाचे स्थलांतर गेल्या वर्षी मोशी येथील प्रशस्त इमारतीमध्ये झाले. या इमारती जवळच्या पडीक मोकळ्या जागेचा योग्य वापर करून तेथे उद्यान विकसित करण्याचा निर्णय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून घेतला. त्यानुसार येथे विविध फळ झाडांसह, शोभेच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. उद्यानात सुंदर हिरवळही तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे हे उद्यान साकारल्याची भावना मनात ठेवून कर्मचाऱ्यांनी या उद्यानाला ‘आनंदवन’ असे नाव दिले आहे.

कला, साहित्य निसर्गविषयक प्रेम रुजविण्यासाठी ‘जिप्सी क्लब’ ची स्थापना

एमपीसी न्यूज- आजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या आयुष्यात प्रत्येकाला निसर्ग, कला, संगीत, इतिहासप्रेमात रममाण करण्यासाठी उद्योगनगरी पिंपरी -चिंचवड आणि विद्यानगरी पुण्यात ‘जिप्सी क्लब ‘ची स्थापना होत आहे. युवक,युवती, महिला आबालवृद्धाना हे नवे दालन उपलब्ध होत आहे. संस्थापक निनाद थत्ते यांनी ही माहिती दिली. पिंपरी -चिंचवड, पुणे या ठिकाणी जिप्सी क्लबचे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. 

Bhosari : इंद्रायणीनगरमध्ये पाणीटंचाई

एमपीसी न्यूज – चोवीस तास पाणीपुरवठा अंतर्गत इंद्रायणीनगर परिसरात जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येत आहे. ज्या भागात हे काम पूर्ण झाले. त्या भागात नळजोडणीतील त्रुटीमुळे विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप इंद्रायणीनगरवासियांनी केला आहे. 

दिव्‍यांग मतदारांना मतदान केंद्रावर आवश्‍यक त्‍या मुलभूत सुविधा पुरवाव्‍यात – विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर

पुणे- दिव्‍यांग मतदारांना (पीपल विथ डिसअॅबिलीटी- पीडब्ल्‍यूडी) मतदान केंद्रावर आवश्‍यक त्‍या मुलभूत सुविधा उपलब्‍ध राहतील, याची खात्री करण्‍याच्‍या सूचना विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्‍या पूर्वतयारीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपायुक्‍त संजयसिंह चव्‍हाण, निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह उपस्थित होत्‍या.

अमृत योजनेअंतर्गत पिंपळे सौदागरमध्ये नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू

पिंपरी (Pclive7.com):- सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत पिंपळे सौदागरमध्ये काम सुरू करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याच्या जुन्या पाईप बदलून नवीन पाईप टाकण्यात येणार असून या परिसरात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. स्थानिक नगरसेविका निर्मलाताई संजय कुटे व नगरसेवक शत्रुघ्न बापु काटे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे याकामाची सुरूवात झाली आहे.

बीव्हीजी, एनव्हायरोकडून शहरातील कचरा संकलनास विलंब

पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड शहरातील कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याचे काम ए. जी. एनव्हायरो इंफ्रा आणि बीव्हीजी या दोन ठेकेदारांना मिळाले आहे. या संदर्भात, उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. महापालिकेने दोघांनाही कामाचे आदेश दिले असताना त्यांच्याकडून काम सुरू करण्यास विलंब होत आहे. बीव्हीजी कंपनीने 1 एप्रिलपासून तर ए. जी. एनव्हायरो कंपनीने 1 मे पासून कचरा गोळा करण्याची तयारी दर्शविली आहे.

‘पीएमपीचे मार्ग बदलावेत’

पिंपरी - पुण्यातून कासारवाडी, नाशिक फाटामार्गाने भोसरीला जाणाऱ्या बसचा मार्ग वल्लभनगर, तसेच निगडीला जाणाऱ्या बसचा मार्ग मासुळकर कॉलनीमार्गे केल्यास नागरिकांची सोय होईल. त्यामुळे हे मार्ग बदलावेत, अशी मागणी आहे.

गुगलवरील पत्ता आरटीईसाठी कन्फर्म असावा

पिंपरी - आरटीई प्रवेशांतर्गत ऑनलाइन फॉर्म भरताना ‘गुगल’वर घराचा पत्ता चुकीचा दर्शविला जात असल्याने पालकांनी अर्ज ‘कन्फर्म’ करताना पत्ता योग्य असल्याची खात्री पालकांनी करावी. अन्यथा पाल्यांना प्रवेश मिळण्यास अडसर निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

शिक्षकांना मिळणार ७६ सुट्या

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक शाळा व महापालिका हद्दीतील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित, कायम विनाअनुदानित खासगी सर्व माध्यमांच्या शाळांचा कार्यक्रम प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी जाहीर केला. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात (सर्व रविवार वगळून) एकूण ७६ सुट्या निश्‍चित केल्या आहेत.

बालेवाडीत रंगणार नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धा

पिंपरी (दि. २२ मार्च) :-   वाको इंडिया यांच्या वतीने आणि अमॅच्युर स्पोर्टस् किंक बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने ‘राष्ट्रीय किक बॉक्सिंग फेडरेशन चषक २०१९’ या स्पर्धेचे आयोजन २४ मार्च पासून शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी पुणे येथे करण्यात आले आहे. सदर स्पर्धा २८ मार्चप्रर्यंत चालणार असून, या स्पर्धेत देशातील २७ राज्य आणि ७ केंद्रशासित प्रदेश यामधील संघ सहभागी होणार आहेत. अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन पुण्यामध्ये प्रथमच होत असल्याचे या स्पर्धेचे आयोजक व असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष म्हात्रे व चेअरमन संतोष बारणे यांनी सांगितले.

Pimpri Chinchwad municipal corporation logs 4000 plaints, requests in 12 days

The use of social media by Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to address issues affecting residents has received good response.