MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 3 July 2017
Citizens' forum to push for metro rail extension
Next week, the forum's representatives will meet guardian minister Girish Bapat and office-bearers of the Pimpri Chinchwad Municipal Corporation to press the demand. The online petition was started in October last, and 668 people have signed it so far.
In one-tax regime, some taxes will linger
In civic bodies, only the local body tax (LBT), which is the main source of revenue for them, has ceased to exist from July 1, the day GST was rolled out.
PCNTDA's demolition drive on pause
Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) has decided not to demolish illegal buildings, which were to be razed to facilitate construction of High Capacity Mass Transit Route (HCMTR), during monsoon.
PCMC invites bids for energy project at Moshi
Hoping to be successful in its third attempt, the PCMC, which plans to provide five acres of land at the Moshi garbage depot, has invited fresh bids for implementing the project for a period of 20 years on the design, finance, build, operate and ...
“बीआरटी’च्या दिरंगाईचा आकाशचिन्ह परवानाला भुर्दंड?
– सुमारे 5 कोटींचा फटका बसण्याची शक्यता
– बीव्हीजीला जाहिरात क्षेत्र द्यावे लागणार
– बीव्हीजीला जाहिरात क्षेत्र द्यावे लागणार
पिंपरी – बांधा, वापरा व हस्तांतरित (बीओटी) करा, या तत्वानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील निगडी-दापोडी बीआरटी मार्गावरील 16 बस स्थानक भारत विकास ग्रुपने (बीव्हीजी) तयार केली आहेत. मात्र, प्रत्यक्षात बीआरटी सुरु न झाल्याने “बीओटी’चा मोबदला म्हणून बीव्हीजीला जाहिरात क्षेत्र मिळाले नाही. त्याची भरपाई म्हणून “बीव्हीजी’ला पाच वर्षांसाठी 600 चौरस मीटर जाहिरातीचे क्षेत्र द्यावे लागणार असून, त्यामुळे आकाशचिन्ह व परवाना विभागाला 5 कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवडचा वाद संपवा
पिंपरी : पीसीएमटी आणि पीएमटीचे विलिनिकरण झाल्यानंतर जन्माला आलेल्या पीएमपीएमएलकडून पिंपरी-चिंचवला नेहमीच दुर्लक्षित ठेवले गेले. या प्रकरणाला व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या येण्याने पुन्हा एकदा तोंड फुटले. पुणे व ...
वाहन प्रवेश शुल्क आकारणी बंद
पुणे, खडकी व देहू रस्ता कॅंटोन्मेंटमध्ये वाहनचालकांना दिलासा
पुणे: केंद्र सरकारने शुक्रवारी मध्यरात्रीपासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केल्यानंतर देहू रस्ता, खडकी व पुणे कॅंटोन्मेंटमधील वाहन प्रवेश शुल्क/कर (व्हीईटी) आकारणी तत्काळ बंद केली. त्यामुळे व्यावसायिक वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र "व्हीईटी'च्या माध्यमातून कॅंटोन्मेंटला मिळणारा महसूल बंद होणार आहे. त्यामुळे आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी कॅंटोन्मेंट प्रशासनाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे.
“रिंगरोड’ प्रकल्पाचा फेरविचार करावा
मुख्यमंत्र्यांना निवेदन : नागरी हक्क सुरक्षा समितीची मागणी
पिंपरी, (प्रतिनिधी) – पीएमआरडीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील प्रस्तावीत रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात येत आहे. याकरिता नवनगर विकास प्राधिकरणाने सर्व्हेक्षणाचे काम सुरु केले असून, रिंगरोड कसा व कुठून जाणार याविषयी काही माहिती नाही. तोपर्यंतच प्राधिकरणाने मालमत्ता धारकांना नोटीस देण्यास सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये घबराट व अस्वस्थता निर्माण झालेली आहे. या प्रकल्पाचा फेरविचार करावा, अशी मागणी नागरी सुरक्षा समितीने केली आहे.
पिंपरीगावात मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडी
पशुवैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष : मोकाट जनावरे पकडणारे पथक गायब
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरीगाव व परिसरात मोकाट जनावरांनी रस्त्यावर ठिय्या मांडत आहेत. त्या जनावरांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवू लागला आहे. मोकाट जनावराकडे महापालिका पशुवैद्यकीय विभागाने दुर्लक्ष केल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली आहे.
खूषखबर ! पिंपरी-चिंचवडकरांची पाणी कपात पूर्णतः रद्द
महापौर काळजे यांची माहिती : नागरिकांना उच्च दाबाने मिळणार पाणी
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात पुरेशा पाणी साठा शिल्लक झाला आहे. तसेच, पवना धरणात क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. त्यामुळे शहरात सुरु असलेली 10 टक्के पाणी कपात उद्या रविवारीपासून (दि. 2) रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांना दिली. याबाबत पाणी पुरवठा विभागाला तसे आदेश देण्यात आले आहेत.
पिण्याच्या पाण्याची मिटली चिंता
पिंपरी : पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरात धुवाधार पाऊस पडत आहे. संततधार पवना धरण परिसरात गेल्या २४ तासांत ९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पवना धरणातील पाणीसाठा वाढल्याने दहा टक्के पाणीकपात प्रशासनाने मागे घेतली आहे. शहराला पवना ...
सहायक आयुक्त दंडवते, खोसेंची बदली
शनिवारी त्यांची लातूर महापालिकेत उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. चंद्र्रकांत खोसे १७ नोव्हेंबर २०१४ ला पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्त म्हणून रूजू झाले होते. त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक व सुरक्षा विभाग होता.
पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांकडून वृक्षारोपण
या उपक्रमातंर्गत पिंपरी चिंचवड येथील झोन ३ मधील एकुण नऊ पोलीस स्थानकात झाडे लावण्यात आली. या उपक्रमात पोलीस अधिकाऱ्यांनी देखील सहभाग घेतला. विशेष म्हणजे तब्बल ५०० हून अधिक झाडांची रोपांची लागवड करण्यात लावण्यात आली. त्यामुळे ...
पीएमपीची “जीपीएस’ यंत्रणा अल्पावधीतच “ब्रेकडाऊन’
त्रुटी काढण्यास अपयश: कोट्यवधींचा खर्च पाण्यात जाण्याची भीती
– नियंत्रण कक्षाचे अल्पावधीतच वाजले तीनतेरा
– सुविधा सुरू करूनही प्रवाशांनाही दिलासा नाही
– नियंत्रण कक्षाचे अल्पावधीतच वाजले तीनतेरा
– सुविधा सुरू करूनही प्रवाशांनाही दिलासा नाही
पुणे – गेल्या काही वर्षांपासून आर्थिक भार सोसत अडखळत वाटचाल करणाऱ्या पीएमपी प्रशासनाने मालकीच्या आणि भाडेतत्वावरील प्रत्येक बसेसना “जीपीएस’ यंत्रणा बसविली. त्यासाठी प्रत्येक डेपोमध्ये कंट्रोल रुम सुरू करण्यात आली आहे. मात्र, या यंत्रणेतील प्रचंड त्रुटी काढण्यास प्रशासनाला अपयश आल्याने ही यंत्रणा अल्पावधीतच “ब्रेकडाऊन’ झाली आहे. या योजनेमुळे दिलासा मिळण्याऐवजी त्यांची डोकेदुखी वाढली आहे. परिणामी, त्यासाठी करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च “पाण्यात’ जाण्याची भीती आहे.
पीएमपी बससेवेला कोणाकडे पर्याय आहे?
पुणे - पुणेकरांचे शहरांतर्गत प्रवासाचे ‘ऑफिशियल व्हेइकल’ कोणते आहे, असे विचारले तर उत्तर एकमेव असेल ‘पीएमपीची बस’ ! या एका वाक्यात पीएमपी बससेवेचे महत्त्व आणि तिचे सार्वजनिक अंतर्गत वाहतूक क्षेत्रातील निर्विवाद वर्चस्व सिद्ध होते. ही वस्तुस्थिती असताना या सेवेकडे कित्येक वर्षांपासून दुर्लक्ष का होत आहे? की या व्यवस्थेला काही पर्याय आहे, असे धोरणकर्त्यांना वाटत तर नाही ना?
पी. के. इंटरनॅशनलमध्ये रंगला विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा
पिंपळे सौदागर – येथील व्हीएचबीपी पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचलित पी. के इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून दिंडीत विठ्ठल-विठ्ठल व हरी नामाचा गजर करत डोक्यावर तुळशी घेऊन तसेच फुगड्या खेळून कार्यक्रमाचा आनंद लुटला. शाळेमध्ये पालखी निमित्त रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता. तर काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी बनून दिंडीची शोभा वाढवली. दिंडी सोहळ्यात शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे, मुख्याध्यापिका जुगुळकर, अनिता साने तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.
ज्ञानप्रबोधिनीला कबड्डीत विजेतेपद
पिंपरी – प्रो-कबड्डी लिगमधील पुणेरी पलटणमार्फत झालेल्या आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत निगडी प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी क्रीडाकुलाच्या संघाने विजेतेपदाचा मान मिळविला.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निकेतन, पुणे संघाचा 45-14 असा 51 गुणांच्या फरकाने पराभव केला. विजेत्या संघाच्या अंकीता बोडके, सरिता गोयेकर, यांनी उत्कृष्ट खेळ केला. पूनम कोकाटे, वैष्णवी शेरकर यांनी आक्रमक चढाया केल्या. याशिवाय कविता गुंजवटे, निकीता जाधव, प्रतिक्षा कदम, गौरी जाधव, श्रावणी पानसे, शिवानी जाधव यांनीही चांगली कामगिरी केली. या स्पर्धेत रुणाली जाधव हिने उत्कृष्ट खेळाडूचा मान मिळवला.
महिला सक्षमीकरणासाठी महापालिका प्रयत्नशील!
महापौर नितीन काळजे : आरोग्य समिती प्रशिक्षण समारंभ
पिंपरी, (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील महिला कुटूंबातील इतर सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. त्यामुळे त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले.
Subscribe to:
Posts (Atom)