Tuesday, 24 July 2018

PCMC to hold drives to check pollution

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to conduct various public awareness drives to check the rising pollution within its limits

MNGL to expand piped gas network in PCMC areas

Pune: The Maharashtra Natural Gas Limited (MNGL) has cited the high road digging charges imposed by the Pimpri Chinchwad civic body for its decision to to expand the piped natural gas network in the Pune municipal areas.

शास्तीकराचा अधिकार महापालिकेला - मुख्यमंत्री

पिंपरी - ‘‘शास्तीकरासंदर्भात नुकतेच एक विधेयक मंजूर केलेले आहे. प्रधान सचिव नितीन करीर यांच्यासोबत बैठक घेतली आहे. त्यानुसार शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी शुल्क आकारणीचे अधिकार महापालिकेला देण्यात आलेले आहेत,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

चाकणला बीओटी तत्त्वावर विमानतळ?

चाकण - चाकण परिसरात होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्‍यात गेले असले तरी एमआयडीसीने भूसंपादनासाठी पुढाकार घेतल्यास चाकणला बीओटी तत्त्वावर विमानतळ होण्याची शक्‍यता आहे. यासाठी काही उद्योजक सरकारदरबारी प्रयत्न करीत आहेत. त्यास यश आल्यास चाकणला विमानतळ होऊ शकते.  

सर्वाधिकार महामेट्रोला

पुणे - नागपूरच्या धर्तीवर मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या ‘टीओडी झोन’ (ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट)च्या विकासासाठी महापालिकेऐवजी महामेट्रोलाच विशेष अधिकार देण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे. तसे झाल्यास मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूने पाचशे मीटर परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्याची जबाबदारी महामेट्रोकडे जाणार आहे.

'सुधारित विकास आराखडा समिती कार्यान्वित करा'

पिंपरी - सुधारित विकास आराखडा समिती कार्यान्वित करा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना दिला. जुन्या विकास आराखड्यातील प्रस्तावित रिंगरोड रद्द करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ आणि घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले, त्या वेळी त्यांनी वरील सूचना केल्या. 

पिंपरी चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली

पिंपरी, (पुणे)- पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. सध्या पवना धरणात 90 टक्‍के पाणीसाठा झाल्याने शहरवासियांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

पिंपरी महापालिकेतर्फे अनधिकृत फलक, टपऱ्यांवर कारवाई

पिंपरी – महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे सोमवारी (दि. 23) अ व ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनधिकृत फलक, टपऱ्या व हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई मुकाई चौक, रावेत येथे विनापरवाना हातगाडी वरील खाद्य पदार्थ विक्रेते यांच्यावर अतिक्रमण कारवाई करण्या आली. यामध्ये 3 टपरी, 13 हातगाडी, 38 प्लास्टीक खुर्ची, 6 प्लास्टीक स्टुल व एक लोखंडी काउंटर जप्त करण्यात आला. हे साहित्य कै. अण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करण्यात आले. तर अ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिक्षेत्रात नाना-नानी पार्क येथे 2, शाहुनगर, संभाजीनगर परिसर 5, टिळक चौक 4, लोकमान्य रुग्णालय 3, भेळ चौक 2, आनंद रुग्णालय 4, मोरवाडी चौक 1 अशा एकुण 21 अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात आली.

[Video] मुख्यमंत्री फडणवीस यांचे चिंचवड येथील पूर्ण भाषण !

चिंचवड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे आज भाषण झाले 

चापेकरांनी चेतविले स्फुल्लिंग - मुख्यमंत्री

पिंपरी - ‘‘क्रांतिवीर चापेकर बंधूंनी तरुणांच्या मनामध्ये देशभक्ती व क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली. क्रांतीचे स्फुल्लिंग चेतविले. त्यातून अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली. त्यामुळे स्वातंत्र्याची बिजे रोवली गेली. त्यांच्या नावाने संग्रहालय होत आहे. त्यात देशातील क्रांतिकारक व महापुरुषांचा इतिहास असेल,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. २३) केले.

PCMC residents live in fear as vehicle vandalism becomes favourite sport of gangs

On Saturday night, a petty dispute between two friends resulted in vehicle vandalism in Nigdi. Their motive seems to be spreading terror among residents and establishing supremacy of their gangs.


Pune,PCMC,crime

धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना महासंघाचे निवेदन

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आले असता शहरातील समाज बांधवांच्या तर्फे त्यांना धनगर आरक्षणाबाबतचे निवेदन धनगर समाज महासंघाच्या वतीने देण्यात आले.

आत्महत्या रोखण्यासाठी मुंबई मंत्रालयाप्रमाणे पिंपरी पालिकेतही जाळी

शासन स्तरावरुन मागण्या मान्य न झाल्याने नैराश्य आलेल्या लोकांकडून प्रशासनाला आत्महत्येचा इशारा देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातील काही जीवावर उदार होवून स्वताः आत्महत्याही करु लागले आहेत. मुंबई मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. त्यामुळे मंत्रालयात संरक्षण जाळी लावण्यात आली. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिकेतही आंदोलकांच्या सुरक्षेसाठी संरक्षण जाळी लावण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका घंटागाडी कामगारांना कायम करण्याची कर्मचारी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महापालिकेच्या वतीने शहरात सन 1997 पासून घंटागाडी कामगार कार्यरत आहेत. त्यांना पालिका सेवेत कायम करण्याचे आदेश पालिकेस द्यावेत, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महासंघाचे अध्यक्ष शशिकांत झिंजुर्डे व पदाधिकार्‍यांनी निवेदन दिले. या वेळी पालकमंत्री गिरीष बापट, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आदी उपस्थित होते.

जनहिताच्या खटल्यांचे चित्रीकरण व प्रक्षेपण शक्य

जनहिताच्या खटल्यांचे चित्रीकरण व प्रक्षेपण शक्य 
केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात निर्वाळा

सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्राला वाव देण्यासाठी राष्ट्रवादीचा नेहमीच पुढाकार – संजोग वाघेरे

पिंपरी : महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे पीसीएमसी गॉट टेलेंन्ट सीजन ४ या डान्स स्पर्धेची अंतिम फेरी २२ जुलै रोजी भोसरी येथील कै. अंकुशराव  लांडगे सभागृहात पार पडली.

रिंगरोड खर्च ५०० कोटी रुपयांनी कमी

रिंग रोडच्या पहिल्या टप्प्याचा सुधारित प्रस्ताव पुन्हा एनएचएआयकडे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) विकसित केल्या जाणाऱ्या पहिल्या टप्प्यातील रिंग रोडचा खर्च पाचशे कोटी रुपयांनी कमी झाला आहे. या टप्प्यातील खर्चाचा सुधारित आराखडा सोमवारी पुन्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) सादर करण्यात आला असून, त्यांच्याकडून 'ग्रीन सिग्नल' मिळाल्यास पीएमआरडीएला रिंग रोडचे काम सुरू करता येणे शक्य होणार आहे.

जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे वृक्षारोपण व जनजागरण

निगडी  – हरित क्रांती मोहिमेंतर्गत जमात-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र, आकुर्डी शाखा आणि विविध समाजा तर्फे वृक्ष लागवड अभियान राबवण्यात आले. वृक्ष रोपणाच्या महत्त्वाबद्दल मो. शुकरुल्लाह यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जल शुद्धीकरण केंद्र परिसरात 15 प्रकारची 110 लहान-मोठी झाडे लावण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष शेख मुसा, जिल्हा संघटक एम. आय. शेख, शेख मसूद व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यावेळी उपस्थित होते.