Monday, 30 July 2012

मार्च 2012 नंतरच्या अनधिकृतबांधकामावर बुलडोझर फिरणारच !

मार्च 2012 नंतरच्या अनधिकृतबांधकामावर बुलडोझर फिरणारच ! पिंपरी, 28 जुलै मार्च...: मार्च 2012 नंतरच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरणारच !
पिंपरी, 28 जुलै
मार्च 2012 नंतरच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाणारच असा ठाम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे शहरात नव्याने होणा-या अनधिकृत बांधकामाला संबंधित विभागाचे अधिका-यांना जबाबदार धरले जाणार असल्याचेही ते म्हणाले. अजित पवार यांच्यासमवेत पालिका आयुक्त, तीन आमदार, महापौर आणि उपमहापौरांच्या समवेत अनधिकृत बांधकाम प्रश्नी झालेल्या बैठकीमध्ये पवार यांनी स्पष्ट केले.

आयुक्तांचे काय चुकले ?

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31942&To=9
आयुक्तांचे काय चुकले ?
निशा पाटील
अनधिकृत बांधकामांवरुन पिंपरी-चिंचवडचे वातावरण भलतेच तापले आहे. त्यातच आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना पत्राव्दारे जीवे मारण्याच्या धमकी दिल्याने ते आणखीनच चिघळले. एक एप्रिल 2012 नंतरच्या म्हणजेच सध्या सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त बेंबीच्या देठापासून सांगत आहे. अनधिकृत बांधकामे होताना अधिकारी झोपा काढतात का, अशी ओरड महापालिका सभागृहात करायची तर सभागृहाच्या बाहेर पडताच बेकायदा बांधकामांचा कैवार घ्यायचा असा डबल ढोल बहुसंख्य नगरसेवक बडवित आहेत. राजकीय श्रेय ओरबाडण्याच्या नादात लोकप्रतिनिधींकडून शहर नियोजनाला तिलांजली दिली जात आहे. अशात प्रश्न उरतो तो आयुक्तांचे काय चुकले याचा...

रविवारपासून दोन लोकल शिवाजीनगर येथून सुटणार

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31941&To=7
रविवारपासून दोन लोकल शिवाजीनगर येथून सुटणार
शिवाजीनगर-लोणावळा दरम्यान दोन लोकल प्रायोगिक तत्वावर शिवाजीनगर येथून सोडण्यात येणार असून येत्या रविवार (ता. 29) पासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांकडून कळविण्यात आले आहे.

Five get 10-yr rigorous imprisonment for businessman Behl murder

Five get 10-yr rigorous imprisonment for businessman Behl murder: The court of additional sessions judge V V Bambarde on Friday sentenced five men to 10 years' rigorous imprisonment for the murder of a Pimpri-based businessman in 2003.

पिण्याच्या पाण्याचे ३0३0 स्रोत दूषित

पिण्याच्या पाण्याचे ३0३0 स्रोत दूषित: सुषमा नेहरकर। दि. २७ (पुणे)

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे तब्बल ३ हजार ३0 स्रोत दूषित झाल्याचे राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीत उघडकीस आले आहे. शेतीसाठी रासायनिक खतांचा अतिवापर ग्रामीण लोकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. यामुळे ग्रामीण भागातील लोक मोठय़ा आजारांना सामोरे जात आहेत.

स्रोतांची तालुकानिहाय संख्या -
आंबेगाव-१, बारामती-३९४, भोर-१६, दौंड-५९६, हवेली-२२३, इंदापूर-५५१, जुन्नर-१७0, खेड-१६२, मावळ-८, मुळशी-0, पुरंदर-२७२, शिरुर-६0७, वेल्हा-0

‘घरकुल’ मोर्चासाठी नेते उकळतात पैसे

‘घरकुल’ मोर्चासाठी नेते उकळतात पैसे: पिंपरी । दि. २७ (प्रतिनिधी)

‘घरकुल’ प्रश्नावर काही संघटना लाभार्थींची दिशाभूल करीत आहेत. लाभार्थींनी कोणीही संघटनांकडे धाव घेतली नसताना काहीजण स्वयंस्फूर्तीने घरकुलासाठी लढा देत आहेत. काहींचा उद्देश केवळ पैसा कमविणे हा आहे. आंदोलन, मोर्चासाठी पावत्या फाडून लाभार्थींकडून पैसे वसूल केले जातात. घरकुलाच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची वेळ आली की, वेगळीच मागणी करून त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न होत आहे, असा सनसनाटी आरोप एक घरकूल लाभार्थी दगडू वाकचौरे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. याच निवेदनाद्वारे त्यांनी काल (गुरुवार) महापालिका आयुक्तांसमोर संघटनांच्या नेत्यांमध्ये भांडणे कशी जुंपली याचाही भांडाफोड केला आहे.

धमकीचे पत्र म्हणजे खोडसाळपणा

धमकीचे पत्र म्हणजे खोडसाळपणा: पिंपरी । दि. २७ (प्रतिनिधी)

महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना निनावी पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी देणे खोडसाळपणा असावा, असा सर्वसाधारण सूर आहे. अशा प्रकारच्या धमक्यांची पोलीस दफ्तरी अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद होत असली, तरी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन तपासाची चक्रेही वेगाने फिरविली आहेत. या प्रकरणातील ठोस माहिती लवकरच हाती लागेल, असा विश्‍वासही सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे.

अनधिकृत ५३ मोबाईल टॉवरवर कारवाई

अनधिकृत ५३ मोबाईल टॉवरवर कारवाई: पिंपरी । दि. २७ (प्रतिनिधी)

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने अनधिकृतपणे उभारलेल्या ५३ मोबाईल टॉवरवर कारवाई केली जाणार आहे. सर्वाधिक टॉवर भोसरी परिसरात आहेत. त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना प्राधिकरणाने महावितरणला केली आहे. तसेच टॉवर मालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
प्राधिकरणाच्या एक ते चाळीस पेठांमध्ये अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. प्राधिकरण व महापालिकेची परवानगी न घेताच त्याची उभारणी करून पैसे कमविण्याचा धंदा केला जात होता.

राष्ट्रवादीच्या विभागीय समन्वयक प्रदेश सरचिटणीसपदी यशवंत भोसले

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31927&To=9
राष्ट्रवादीच्या विभागीय समन्वयक प्रदेश सरचिटणीसपदी यशवंत भोसले
पिंपरी, 27 जुलै
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डेरेदाखल होवून चार वर्षे उलटल्यानंतर माजी नगरसेवक तथा कामगार नेते यशवंत भोसले यांना राष्ट्रवादीने विभागीय समन्वयक कार्यकारिणीच्या प्रदेश सरचिटणीसपद बहाल केले आहे. पिंपरी-चिंचवडपासून दूर ठेवत त्यांना पुणे ग्रामीण आणि सोलापूरचा कार्यभार देण्यात आला आहे. यशवंत भोसले यांनी शुक्रवारी (दि. 27) पत्रकार परिषदेत नियुक्तीविषयीची माहिती दिली. मात्र यावेळी एकही स्थानिक नेता उपस्थित नव्हता.