Saturday, 3 November 2018

नाशिक फाटा चौकात मेट्रोचे काम सुरू

कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात पिंपळे गुरव-भोसरी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस पुणे मेट्रोच्या मार्गिकेचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी चौकात व सर्व्हिस रस्त्यावर बॅरिकेड्स लावल्याने वाहतूक संथ झाली आहे. 

शहरवासियांनो, अर्थसंकल्पासाठी दहा लाखापर्यंतची कामे सुचवा ; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने 2019-20 या पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास सुरवात केली आहे. या अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी दहा लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावीत, असे आवाहन महापालिकेने केले आहे. क्षेत्रीय कार्यालयात लेखी अर्जाद्वारे कामे सुचविता येतील. आलेल्या योग्य सूचनांचा समावेश पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात केला जाणार आहे.

पिंपरी-चिंचवडकरांची यंदा स्वरमयी दिवाळी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडवासीयांची दिवाळी यंदाची फराळ आणि खरेदीबरोबरच अधिकाधिक स्वरमयी करण्यासाठी विविध संस्थांनी दिवाळी पहाटचे आयोजन केले आहे. चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्यावतीने सुगम संगीत, भक्ती संगीत व भाव गीतांच्या  स्वर गंधार या सुरेल कार्यक्रम दिवाळी पहाटचे आयोजन केले आहे. 

‘प्राधिकरणातील मिळकतीमध्ये महसूल विभागाप्रमाणे वारसाचे नाव नोंदवा’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रामधील वारस नोंद ही मृत्यू दाखला व जाबजबाब देऊन सक्षम अधिका-यांकडून अथवा नगर भूमापन अधिकारी यांच्याकडून देण्यात येणा-या वारस नोंदीप्रमाणे वारस नोंद करण्यात यावी. महसूल विभागामार्फत देण्यात येणा-या वारस दाखल्यानुसार वारस नोंद करावी. त्याबाबतचा ठराव प्राधिकरणाच्या सभेत मंजूर करावा, अशी मागणी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. 

स्मार्ट सिटीच्या निविदेत ‘रिंग’ झाल्याचा भाजप नगरसेवकालाच दाट संशय

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणार्‍या नेटवर्किंगच्या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदेत ‘रिंग’ करुन एल अ‍ॅन्ड टी कंपनीला काम देण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यात रिंग झाली असल्याचा दाट संशय भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केला. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पार्लमेंट ते पालिका, गाजरांची मालिका

पार्लमेंट ते पालिका, फक्त भाजप' असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने केवळ आश्वासनरुपी गाजरांची मालिकाच घडविली असल्याची टीका होऊ लागली आहे. अटल महासंमेलनाच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या भाजपच्या कारभाऱ्यांनी पिंपरी-चिंचवडकरांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी आग्रही मागणी होऊ लागली आहे.

पीएमपीची रडकथा कायम?

नव्या वर्षांत पीएमपीच्या ताफ्यात चारशे गाडय़ा दाखल होणार आहेत. या गाडय़ा दाखल होताच प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार आयुर्मान संपलेल्या शंभर ते दीडशे गाडय़ा ताफ्यातून बाद करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुन्हा ताफ्यात शंभर ते दीडशे गाडय़ांची कमतरता जाणवणार असून नव्या गाडय़ा मिळूनही पीएमपीची रडकथा कायम राहण्याची शक्यता आहे.

आकुर्डी उपविभागीय कार्यालयातील धक्कादायक प्रकार

आकुर्डी : प्रिव्हिया बिझनेस सेंटर या व्यावसायिक इमारतीच्या वीज तोडणीची कामे अतिशय बेजबाबदारपणे बसविण्यात आलेली रोहित्रे व इतर संबंधित वीज उपक्रमांविषयी माहिती मिळण्याबाबत विद्युत वितरण समितीचे सदस्य राहूल कोल्हटकर यांनी माहिती अधिकार अंतर्गत माहिती घेण्याकरिता अर्ज केला होता. पण माहिती मिळालीही ती अपूर्ण देण्यात आली. माहिती अधिकार कायद्याचा गोपनीयतेचा भंग करुन विद्युत वितरण समितीचे सदस्य राहूल कोल्हटकर यांची माहिती तत्सम व्यक्तीला देणा-या आकुर्डी उपविभागीय कार्यालयातील अमित पाटील यांच्यावर त्वरीत कारवाई महावितरण यांनी करावी, अशी मागणी विद्युत वितरण समितीने राहूल कोल्हटकर यांनी केली.

सांगवी पोलिसांचे चौकीत नाही चौकात चला अभियान

जुनी सांगवी - सध्या पिंपरी चिंचवड शहराला नवीन पोलिस अधिकारी मिळाल्याने वरिष्ठांच्या शब्दाप्रमाणे 'चौकीत नाही चौकात चला'च्या सुचनेची अंमलबजावणी होताना सांगवी पोलिसांकडुन पहावयास मिळत आहे. शहराला वहातुकीची शिस्त लावण्याचे काम सध्या पोलिसांकडुन विविध ठिकाणी दिसुन येत आहे. 

59 मिनीटात मिळणार 1 कोटी रुपयांचे कर्ज ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली: छोटया आणि मध्यम स्वरुपांच्या व्यवसायासाठी 59 मिनिटात 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज मंजूर करण्याची महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. पंतप्रधान मोदींनी एमएसएमई सपोर्ट कार्यक्रम लॉंच केला.त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी आपल्या सरकारने धोरणांना मंजुरी दिल्याचे मोदी यावेळी म्हणाले. हे दिवाळी गिफ्ट असून यामुळे सूक्ष्म, छोटया आणि मध्यम स्वरुपाच्या व्यवसायांना सहज कर्ज उपलब्ध होईल आणि रोजगार वाढेल असे मोदी म्हणाले.

‘जीएसटी’ आला, तरीही ‘एलबीटी’ हटेना?

पिंपरी – “एक देश, एक कर’ ही घोषणा देत सरकारने जीएसटी आणला. पेट्रोलियम पदार्थ वगळता सर्वांना जीएसटीमध्ये समाविष्ट करून घेतले असल्याची घोषणा करण्यात आली. जीएसटी आल्यानंतर स्वाभाविक रित्या सर्व स्थानिक कर रद्द झाले असे मानले जात होते. परंतु दस्त नोंदणी करता एक टक्‍का एलबीटी अजूनही घेतला जात असल्याचा आक्षेप पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिसेस अँड ऍग्रीकल्चर या औद्योगिक संघटनेने केला आहे.