Thursday, 1 November 2018

पिंपरी ते निगडी डीपीआरचे दिवाळीनंतर सादरीकरण

– आयुक्त श्रावण हर्डिकरांची स्थायी समिती बैठकीत माहिती

चौफेर न्यूज – पिंपरी महापालिकेपासून निगडीच्या भक्ती-शक्ती चैाकापर्यंतच्या मेट्रोचा सर्वांगीण प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार झाला आहे. त्याचे दिवाळीनंतर महापालिकेच्या सभागृहात सादरीकरण करण्यात येईल. तसेच या पाच किलोमीटर अंतराच्या प्रकल्पासाठी सुमारे एक हजार 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, चिंचवड, आकुर्डी व निगडी याठिकाणी मेट्रो स्थानके असणार आहेत, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी स्थायी समितीच्या आज ( मंगळवारी) झालेल्या बैठकीत सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 24 महिन्यात डीपी तयार होणार

विकास आराखडा करण्यास एचसीपी’ कंपनीला ग्रीन सिग्नल
चौफेर न्यूज   पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा संपुर्ण विकास आराखडा तयार करण्यासाठी एचसीपी डिझाईन प्लॅानिंग अॅन्ड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निविदा स्विकारण्यास आज (मंगळवारी) स्थायी समितीने मान्यता दिली. सदरील कंपनी 24 महिन्यात संपुर्ण शहराच्या डीपीचे काम पुर्ण करणार आहे, अशी माहिती नगरसेवक विलास मडिगेरी यांनी दिली.

पोलीस आयुक्तालयाच्या शाखा सुरू झाल्या; मात्र अधिकार्‍यांना बसण्यास जागा नाही – आर.के.पद्मनाभन

 चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्तालय सुरू होऊन आज तीन महिने होत आले तरीही शासनाने आयुक्तालयास अद्याप मनुष्यबळ व गाड्या उपलब्ध करून दिल्या नाहीत. पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या शाखा सुरू झाल्या; मात्र अधिकार्‍यांना बसण्यास जागादेखील उपलब्ध नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवड हे श्रीमंत महापालिकेतील गरीब आयुक्तालय असल्याची खंत पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी व्यक्त केली. मंगळवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला या वेळी ते बोलत होते.

60% of society watchmen caught sleeping on duty


सोसायट्यांची सुरक्षा गाढ झोपली!

पिंपरी – रात्रीच्या वेळी आपल्या घराचे व परिसराचे संरक्षण व्हावे यासाठी सोसायटी त्यासाठी स्वतंत्र सुरक्षा रक्षक नेमतात. मात्र हेच सुरक्षा रक्षक रात्रीच्या वेळी झोपलेले असल्याने सोसायट्यांची सुरक्षा “राम भरोसे’ असल्याचे चित्र खुद्द पोलिसांनीच उघड केले. वाकड पोलिसांच्या “सरप्राईज व्हिजीट’मध्ये हे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

शहर सुधारणा समितीला डावलले

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहराचे जगभरात एक वेगळे स्थान तयार करणे, नागरिकांची जीवनशैली उंचाविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहर परिवर्तनाचे उद्दिष्ट्य साधण्याकरिता स्थापन केलेल्या शहर परिवर्तन समितीने आपला पहिला अहवाल तयार केला आहे. हा अहवाल शहर सुधारणा समितीमध्ये मांडून, मान्यतेनंतर महासभेत मांडणे गरजेचे असताना, हा अहवाल थेटपणे महासभेत मांडण्यात आला. शहर सुधारणा समितीला डावलत या अहवालाला महासभेत कोणतीही चर्चा न करता मंजुरी देण्यात आली आहे.

पीएमआरडीए मेट्रोचा “ग्राऊंड सर्व्हे’ सुरू

टाटा व सिमेन्स कंपनीसोबत होणार करार : 100 कर्मचारी पुण्यात
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम करण्याचा करारनामा लवकरच टाटा व सिमेन्स या कंपनीसोबत करण्यात येणार आहे. त्यानंतर टाटा सिमेन्सला वर्क ऑर्डर दिली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असून प्रत्यक्ष जानेवारीमध्ये पीएमआरडीएच्या मेट्रोचे काम सुरू होणार आहे. दरम्यान, टाटा व सिमेन्स कंपनीचे 100 कर्मचारी पुण्यात दाखल झाले असून ग्राऊंड सर्व्हेचे काम सुरू करण्यात आले आहे.

शहर प्रदुषणमुक्त करणार – इसिए

पिंपरी-चिंचवड : शहरामध्ये इसिए संस्थेकडून पर्यावरण संवर्धनाचे काम केले जाते. समितीचे अध्यक्ष विकास पाटील आणि विश्‍वस्त विनिता दाते यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण समितीचे काम सुरू असते. या समितीत असणारे सर्वचजण सेवानिवृत्त असल्याने या कामासाठी बराच वेळ देता येतो. विद्यार्थी हे भारताचे भावी आधारस्तंभ आहेत. त्यामुळे विद्यार्थी दशेतच त्यांच्यावर पर्यावरणाचे संस्कार करण्यासाठी सर्व शाळांंमध्ये विद्यार्थी पर्यावरण समिती स्थापन केल्या आहेत

Pimpri: ‘बांधकाम एनओसी बंद प्रकरण’; आयुक्त हर्डीकर, पठाण, तांबे यांची चौकशी करा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदार संघातील काही विशिष्ट भागातील बांधकाम व्यवसायिकांना पाणी पुरवठ्याचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) बंद केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, माजी सहशहर अभियंता ए. ए. पठाण आणि कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांची उच्चस्तरीय चौकशी करावी. दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी केली आहे. याबाबत

पिंपरीत ९०० बसची थेट खरेदी


PMPML in search of agency for fleet fire audit, contacts central institute

... Ltd (PMPML) bus had a close shave as the Kothrud-bound vehicle caught fire while moving along H K Firodia bridge near Sancheti hospital.

Maval Lok Sabha seat: It’s Shiv Sena vs BJP vs NCP in next three days


दत्ता सानेंची अस्तित्वासाठी ‘कोल्हे कुई’, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार यांचा ‘टोला’

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाही दत्ता साने यांनी सातत्याने स्वत:च्या पक्षाविरोधात गरळ ओकण्याचे काम केले होते. तेव्हाही त्यांची ‘डाळ’ शिजली नाही. त्यानंतर राष्ट्रवादीची सत्ता जाऊन कोणीही प्रभावी पदाधिकारी आणि स्थानिक नेता नसल्याने दत्ता साने यांच्याकडे महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद आले आहे. मात्र कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास नसल्याने त्यांच्याकडे  मुद्दा नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेता म्हणून स्वत:चे अस्तित्व डळमळीत होऊ नये म्हणून त्यांच्याकडून सातत्याने आरोप केले जातात. साने यांचे हे आरोप म्हणजे केवळ ‘कोल्हे कुई’ आहे, असा टोला महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार यांनी केला आहे. 

Pimpri : पिंपरी चिंचवड शहर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. सुनील कडुसकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड अडव्होकेट्‌स बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. सुनील कडुसकर यांची तर उपाध्यक्षपदी अॅड. योगेश थंबा यांची बुधवारी (ता. 31) निवड करण्यात आली. पिंपरी-चिंचवड अडव्होकेटस बार असोसिएशनच्या एक हजार एकशे एकतीस सभासदांपैकी नऊशे आठ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. अध्यक्षपदासाठी अॅड. सुनील कडूसकर व अॅड. मनोज अगरवाल यांच्यात लढत झाली. उपाध्यक्षपदी अॅड. योगेश थंबा 444 […]

सरदार पटेल, इंदिरा गांधी यांना आदरांजली

पिंपरी – स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 143वीं जयंती आणि भारताच्या माजी आणि एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 34व्या पुण्यतिथी निमित्त शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे त्यांना आदरांजली अर्पित करण्यात आली.

सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी घंटानाद

पिंपरी – कंत्राटदाराकडून सफाई कामगारांची पिळवणूक होत असल्याचा आरोप करत जनरल माथाडी कामगार संघर्ष सेनेच्या वतीने दापोडी चौकात बेमुदत घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

सीपीएम अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांना आकारणार शुल्क

– वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळणार सवलत
चौफेर न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आतापर्यंत कॉलेज ऑफ फिजीशियन अॅन्ड सर्जन (सीपीएस) या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जात नव्हते. मात्र, यापुढे महापालिका खासगी रुग्णालयाप्रमाणे वायसीएम रुग्णालयातील सीपीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून दोन वर्षांत तब्बल 9 लाख रुपये शुल्क आकारणार आहे, त्या प्रस्तावास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज (बुधवारी) मान्यता देण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापैार राहूल जाधव होते.

पिंपरी-चिंचवडच्या गिर्यारोहकांनी फडकाविला ‘माउंट मेरा’ हिमशिखरावर तिरंगा

चौफेर न्यूज  पिंपरी—चिंचवड शहरातील ५ गिर्यारोहकांनी ‘माउंट मेरा’ या उत्तुंग हिमशिखरावर तिरंगा फडकावला आहे. ‘गिरिप्रेमी’च्या ‘माउंट कांचनगंगा इको इक्स्पिडिशन २०१९’ ला पाठिंबा म्हणून या मोहिमचे आयोजन केले होते.

इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे सिग्नलवर साहित्य विकणाऱ्या मुलांना गणवेश वाटप

चौफेर न्यूज –  रस्त्यावर, सिग्नलवर आणि चौकासारख्या ठिकाणी पोस्टर, लिंबू मिरची, फुगे विकणाऱ्या मुलांच्या शाळेत इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने ३५ गणवेश वाटप केले. खऱ्या अर्थाने गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना या माध्यमातून मदत करण्यात आली आहे. दिग्विजय प्राथमिक विद्यालय, धनकवडी येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा प्रतिभा जोशी-दलाल, आरती मुळे आदी उपस्थित होत्या.

उद्योग सुलभतेत भारत ७७ व्या क्रमांकावर

तब्बल २३ गुणांनी आगेकूच, आघाडीचे सलग दुसरे वर्ष
चौफेर न्यूज – जागतिक बँकेच्या उद्योगसुलभता क्रमवारीत भारताने तब्बल २३ गुणांनी उडी मारली असून यंदा देशाने ७७ क्रमांकावर स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी भारत १००व्या क्रमांकावर होता. सलग दुसऱ्या वर्षी भारताने उद्योगसुलभतेत आघाडी घेतली आहे.