Pimpri: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has an outstanding amount of around Rs 86 crore as water tax dues to be collected from consumers.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 11 April 2014
पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचा दहा कलमी जाहीरनामा प्रसिद्ध
पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वागीण विकासासाठी कार्यरत असणा-या पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या (पीसीसीएफ) वतीने शहरविकासासाठी आवश्यक असा दहा कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शहराच्या भावी खासदारांकडून या जाहीरनाम्यावर त्यांचा काय विचार आहे या विषयी मते मागविण्यात आली आहेत. उमेदवारांनी आपली मते जाहीरपणे व्यक्त करावीत असे आवाहन पीसीसीएफच्या वतीने करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवडकरांचे जलतरणही महागले
जलतरणाचे तिकीट दर दुप्पट
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तलावांवर पोहण्यासाठी जाणा-यांचे आता जलतरणही महागले आहे. महापालिकेने जलतरण तलावाचे तिकीट दर आजपासून (गुरुवार) दुप्पट केले असून पासच्या किमती तिप्पट ते पाचपट वाढविल्या आहेत. तब्बल अकरा वर्षानंतर ही दरवाढ होत आहे. आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी दरवाढीची फाईल रखडल्याने नवीन आर्थिक वर्ष सुरु होऊन नऊ दिवस उलटल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तलावांवर पोहण्यासाठी जाणा-यांचे आता जलतरणही महागले आहे. महापालिकेने जलतरण तलावाचे तिकीट दर आजपासून (गुरुवार) दुप्पट केले असून पासच्या किमती तिप्पट ते पाचपट वाढविल्या आहेत. तब्बल अकरा वर्षानंतर ही दरवाढ होत आहे. आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी दरवाढीची फाईल रखडल्याने नवीन आर्थिक वर्ष सुरु होऊन नऊ दिवस उलटल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
मतदान वाढविण्याकरिता सवलत देण्यासाठी निवडणूक आयोगाच्या परवानगीची गरज नाही - जिल्हाधिकारी सौरभ राव
पुणे मतदारसंघामध्ये ३६ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांची तीन टप्प्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यापैकी ८ ठिकाणी मायक्रो ऑब्झरव्र्हर असतील.
महापालिकेचे कामकाज ठप्प
पिंपरी : नागरिकांना अत्यावश्यक सुविधा पुरविणारे आरोग्य, वैद्यकीय, पाणीपुरवठा, विद्युत हे विभाग अपवाद वगळता अन्य सर्वच विभागांतील महापालिका कर्मचार्यांची निवडणूक कामासाठी नेमणूक केली आहे. ९0 टक्के कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने महापालिकेचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे.
२५ टक्के राखीव जागा प्रवेशासाठी टाळाटाळ
पिंपरी : शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी घेण्यात आलेल्या प्रवेशप्रक्रियेत पात्र ठरूनही प्रवेश देण्यासाठी काही शैक्षणिक संस्था टाळाटाळ करत आहेत. अल्पसंख्याक, मागासवर्ग घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाने सवलत दिली असताना, संस्था उदासीनता दाखवत आहे. अशा तक्रारी पालकांनी केल्या आहेत.
Techies working abroad in city to campaign for AAP
PIMPRI: A few IT professionals flew down from abroad to hit the campaign trail for Aam Aadmi Party (AAP) in Maval Lok Sabha constituency.
Farmers from PCNTDA threaten not to vote
PIMPRI: A section of the farmers staying in and around the Pimpri Chinchwad New Town Development Authority (PCNTDA) have threatened not to exercise their franchise on April 17.
निवडणुकीचे कामकाज जबाबदारीने पार पाडा - डॉ माने
मतदान प्रक्रीयेला आत्मविश्वासाने सामोरे जाऊन निवडणुकीचे कामकाज जबाबदारीने पार पाडावे, असे आवाहन पिंपरी विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी केले.
मावळ लोकसभा मतदार संघासाठी मतदार केंद्रावर नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचा-यांसाठी ईव्हीएम मशीन प्रत्यक्ष हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
चिंचवड येथे शनिवारी मारूती भापकर यांच्या प्रचारार्थ सभा
मावळ लोकसभा आम आदमी पक्षाचे उमेदवार मारूती भापकर यांच्या प्रचारार्थ आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांची मार्गदर्शनपर जाहिर सभा शनिवारी (दि.12) चिंचवड येथे आयोजित करण्यात आली आहे.
पोलिसांकडूनच पोलीस चौक्यांचे स्टिंग ऑपरेशन! -
पोलिसांकडून सांगवी, पिंपरी, विमानतळ आणि कोंढवा या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्यात आले. त्या वेळी तीन पोलीस ठाण्यांत तक्रार नोंदवून न घेतल्याचे समाेर अाले अाहे.
‘अलिप्त’ पानसरे प्रचारात पुन्हा सक्रिय!
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मावळचे राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्यासाठी पानसरेंना दूरध्वनी केल्यानंतर ते सक्रिय झाल्याचे सांगण्यात येते.
मावळ-शिरूरचे खासदार निवडून आणा, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावतो - अजित पवार
अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा तसेच शास्तीकराचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले.मात्र, मावळ-शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणा, असे त्यांनी बजावून सांगितले.
Subscribe to:
Posts (Atom)