Tuesday, 2 October 2018

‘स्वच्छते’पुढे समस्या डोंगराएवढी (व्हिडिओ)

पिंपरी - स्वच्छ भारत अभियानाचे चौथे वर्ष महात्मा गांधी जयंतीपासून (मंगळवार, ता. २) सुरू होत आहे. या अभियानात सध्या शहर देशात ४३ व्या स्थानावर आहे. ते पहिल्या दहामध्ये येण्यासाठी महापालिकेला डोंगराएवढी आव्हाने पार करावी लागणार आहेत. या वर्षी स्पर्धेत चार हजार २०३ शहरे असून, पाच हजार गुणांच्या आधारे ‘स्वच्छ शहरा’ची निवड होणार आहे. 

आता कॉल ड्रॉप झाल्यास होणार कंपन्यांना दंड

कॉल ड्रॉपमुळे केवळ सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर देशाचे पंतप्रधान देखील त्रस्त आहेत. म्हणूनच ही कॉल ड्रॉपची समस्या रोखण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकण अर्थात ट्रायने नवा नियम लागू केला आहे. जो नियम आजपासून लागू होतोय. आता कंपनीकडून कॉल ड्रॉप झालास मोठा दंड भरावा लागणार आहे .

Aadhaar link must for govt school students

PUNE: Government school students in the state will have to l .. 


हिंजवडी आयटी हबमध्ये कंपन्या येण्यास इच्छुक

हिंजवडीच्या वाहतूक कोंडीला कंटाळून आयटी हबमधून 54 कंपन्या जाणार असल्याची वावटळ उठल्याने सर्व शासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. मात्र, हिंजवडीतून कंपन्या जाणार नसून आणखी 10 ते 12 कंपन्या नव्याने येणार आहेत. त्यातील काही कंपन्यांना एमआयडीसीने फेज-3 मध्ये प्लॉटदेखील दिले असल्याची माहिती हिंजवडी इंडस्ट्रीयल असोशिअशनचे अध्यक्ष कर्नल चरणजितसिंह भोगल यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.   

पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या ‘अपयशी’ कारभाराचा अजितदादांनी वाचला पाढा!

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड गलिंच्छ शहर झाले आहे. मेट्रोचं काम निगडीपर्यंत नेता आले नाही. चऱ्होलीतील पंतप्रधान आवास योजनेच्या कामाला हरताळ फासली गेलीय. कचऱ्याचा प्रश्न बिकट झालायं. स्मार्टसिटीच्या कामाला दिशा नाही. पाण्याचा प्रश्न गंभीर झालायं, वायसीएम रूग्णालय दुर्लक्षित आहे. महापालिकेत भोंगळ कारभार सुरू आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐंरणीवर असून शहराला कोणी वालीच उरला नसल्याचे सांगत दिड वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या भाजपाच्या ‘अपयशी’ कारभाराचा पाढाच राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखविला.

पीएमपीच्या ‘एसी’ बसची दरकपात

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) एसी बसचे तिकीटदर सामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्याने, आता त्या बसचे दर कमी केले जाणार आहे. जिल्हा परिवहन प्राधिकरणाने हे दर कमी करण्यास नुकतीस मान्यता दिली असून, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

फौजदारांच्या मुलाखतीतून आयुक्तांनी घेतला आढावा

तुम्ही यापूर्वी कोठे काम केले आहे. सध्याच्या पोलिस ठाण्यात किती दिवसांपासून काम करीत आहात. नवीन आयुक्तालय झाल्यावर कोणत्या विभागात अथवा पोलिस ठाण्यात काम करण्याची इच्छा आहे,' अशा प्रश्नांद्वारे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी फौजदार आणि सहायक निरीक्षकांची सोमवारी (१ ऑक्टोबर) मुलाखत घेतली. यापुढे चार दिवस याच पद्धतीने पिंपरी-चिंचवड शहरातील फौजदार-सहायक निरीक्षकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

राज्यातील ‘पोलिओ’ लस सुरक्षित

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये पोलिओ लसीत 'टाइप टू व्हायरस' आढळला असल्याने महाराष्ट्रात संबंधित कंपनीच्या लसींचा वापर करण्याचे राज्य सरकारने थांबविले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पोलिओ लस सुरक्षित असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.

गदिमा नाट्यगृहाचे काम संथ गतीने

पिंपरी - प्राधिकरण, पेठ क्रमांक २६ येथे उभारण्यात येणाऱ्या ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचे काम अद्याप संथ गतीने सुरू आहे. अंतर्गत इंटेरिअरसह काम पूर्ण होण्यासाठी ऑगस्ट २०१९ उजाडणार आहे. तोपर्यंत नाट्यकलाकार आणि नाट्यरसिकांच्या पदरी प्रदीर्घ प्रतीक्षा आहे.

आयटीचा आलेख उंचावता

पिंपरी - आयटी कंपन्यांच्या प्रगतीचा आलेख प्रत्येक वर्षी उंचावत आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील नव्या कंपन्यांमध्ये दरवर्षाला दहा टक्‍के वाढ होत असल्याचे समोर आले आहे. 

बंबाचे सोडा, प्यायलाही पाणी नाही

चिखली - कर्मचाऱ्यांना बसण्यास खोली नाही, अग्निशामक बंबात सोडा कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी नाही. तीन बाजूने गायरान, साप आणि भटक्‍या कुत्र्यांची भीती, त्यामुळे जीव मुठीत धरून रात्र काढावी लागते. अग्निशामक केंद्र असल्याचा फ्लेक्‍स फाटल्याने ते शोधूनही सापडत नाही. सुविधांचा अभाव असलेले हे तळवडे येथील हे अग्निशामक केंद्राला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. 

वाहतूक बदलामुळे पाऊण तासाची बचत

पिंपरी - हिंजवडीमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी वाहतुकीमध्ये बदल केले. याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. चार लाख आयटीयन्सचा सकाळ व सायंकाळच्या प्रवासातील पाऊण तास वाचत आहे.

पंचवीस वर्षे एकही खड्डा पडणार नाही - चंद्रकांत पाटील

हिंजवडी - पाच, दहा नव्हे, तर पुढील २५ वर्षे एकही खड्डा पडणार नाही, असे दर्जेदार रस्ते हिंडवडीत तयार करू, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिले. 

‘आधार’पासून मोबाईल डी- लिंक करण्याचा प्लॅन १५ दिवसांत मिळणार

चौफेर न्यूज – मोबाईल क्रमांकासाठी सुप्रीम कोर्टाने आधार कार्ड सक्तीतून सुटका केल्यानंतर युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) सोमवारी टेलिकॉम कंपन्यांना १५ दिवसांत आधार – मोबाईल क्रमांक डि- लिंक करण्यासाठी प्लॅन सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.

तीन दिवसात पाण्याचा प्रश्न निकाली काढा – महेश लांडगे

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच भागातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. यामुळे नागरिक वैतागले असून त्रस्त झाले आहेत. नगरसेवक देखील वैतागले आहेत. येत्या तीन दिवसात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. अन्यथा ‘माझ्याशी गाठ’ असल्याचा निर्वाणीचा इशारा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अधिकाऱ्यांना दिला. तसेच नागरिकांना दोषी धरत अधिका-यांनी बिल्डर, ठेकेदारांना पाठिशी घालू नये, अशी तंबीही त्यांनी दिली. आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचा कामाला वेग देण्यात यावा, असेही ते म्हणाले.

12 मीटरच्या रस्त्यासाठी 28 लाख

पिंपरी – कोकणे चौक ते पार्क रॉयल पर्यंतच्या 12 मीटरच्या रस्त्यासाठी महापालिका तब्बल 28 लाख रुपये मोजणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थापत्य विभागाने बुधवारी (दि. 3) होणाऱ्या स्थायी समिती सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे.

महापालिकेच्या दारातच अवैध वाहनतळ

पिंपरी – पिंपरी महापालिका मुख्यालयाकडून गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवैध वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच अहल्यादेवी होळकर चौकात मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ता अरूंद झाला असून तिथेही अवैध रिक्षा उभ्या राहत आहेत. यामुळे वाहतुकीस खोळंबा होऊन अपघात होण्याची शक्‍यता असल्याने वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरीक करत आहेत.

पटसंख्येत महापालिका “फर्स्ट क्‍लास’

पिंपरी – “स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळा “हायटेक’ होत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थी पटसंख्येवर दिसू लागला आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवित असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. यामुळे, महापालिका शाळांची गुणवत्ता वाढत असल्याने मागील वर्षीपेक्षा यंदा महापालिका शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या अकराशेने वाढली आहे. या शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा वाढता कौल पाहता या शाळा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहेत.

स्मार्ट सिटीसाठी एक पाऊल पुढे (व्हिडिओ)

पिंपरी - स्मार्ट सिटीमध्ये शहराचा समावेश झाल्यानंतर महापालिकेनेही वेगवेगळ्या योजना राबवायला सुरवात करून एक पाऊल पुढे टाकले आहे. यात आर्थिक दुर्बल घटकातील बेघर व्यक्तींसाठी गृहप्रकल्प योजना, शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन, स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवून सक्रिय सहभाग नोंदविला आहे. उर्जाबचतीसाठी शहरातील रस्त्यांवर एलईडी दिव्यांचा वापर करण्यावर भर दिला आहे.

मेट्रोच्या संथ कामामुळे वाहतूक कोंडी (व्हिडिओ)

पिंपरी - मेट्रोच्या संथपणे सुरू असणाऱ्या कामामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते पिंपरीदरम्यानचा दोन्ही बाजूचा रस्ता चिंचोळा झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. येत्या काही दिवसांत खडकी ते दापोडी रस्त्यावर मेट्रोच्या कामाला सुरवात झाल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक समस्येत भर पडणार आहे. 

विना अनुदानित सिलिंडर 59 रुपयांनी महागले

नवी दिल्ली – इंधन दरवाढीची छळ बसत असताना रविवारी अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 2 रुपये 89 पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे 499.51 पैशांना मिळणारा सिलिंडर आता 502.40 पैशांना खरेदी करावा लागणार आहे. तर विना अनुदानित सिलिंडर तब्बल 59 रुपयांनी महागले आहे. ही दरवाढ मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे.

पिंपरी पालिकेंच्या राजकारणात भाजप-राष्ट्रवादीत वाढता संघर्ष

पिंपरी पालिकेच्या राजकारणात विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाचा सपाटा लावला असल्याने सत्तारूढ भारतीय जनता पक्षाशी त्यांचे सातत्याने खटके उडत आहेत. परिणामी, राष्ट्रवादी आणि भाजपमधील संघर्ष सभागृहाप्रमाणेच रस्त्यावरही दिसू लागला आहे.

इसिऐने केले स्वच्छता फेरी, निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन

पिंपरी : एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशनच्यावतीने पिंपरी-चिंचवड मनपा शाळांच्यासोबत स्वच्छ भारत जनजागरण फेरी, निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यास पुढाकार घेतला आहे. त्यानुसार शहरातील 635 शाळांमधून विविध उपक्रम सुरु झाले आहेत. शहरात स्वच्छ भारत जनजागरण करण्याबाबत लाखो विद्यार्थी शिस्तबद्ध उपक्रम राबवीत आहेत. त्याचे संपूर्ण नियोजन पिंपरी-चिंचवड मनपा अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. 2800 विद्यार्थी स्वच्छ भारत जनजागरण फेरीमध्ये सहभागी होणार आहेत.

ओबीसी समितीचा निषेध मोर्चा

पिंपरी : कासारसाई येथील दोन अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व त्यातील एक मुलगी मरण पावली सदर कुटुंबाला न्याय मिळावा म्हणुन पिंपरी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

ऑरेंज हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिर

चिंचवडगाव : जागतिक हृदयदिनाच्यानिमित्त 7 ऑरेंज हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत तपासणी शिबिरात 350 पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला आणि ऍन्जिओग्राफी तपासणीचा लाभ घेतला. त्याच सोबत बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयावर होणार्‍या दुष्परिणांबद्दल हृदयरोग तज्ज्ञ तसेच आहार तज्ज्ञांनी नागरिकांचे मार्गदर्शनही केले. मोफत तपासणी किंवा सवलतीच्या दरात उपचार हे एका विशिष्ट दिवासकरिता मर्यादित नसून, सामान्य माणसाला परवडणार्‍या दरात हृदयविकारावरील उपचार वर्षभर करण्यावर 7 ऑरेंज हॉस्पिटलमध्ये आमचा भर आहे. पिंपरी- चिंचवड परिसराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले 7 ऑरेंज हॉस्पिटल हे हृदयविकारांवरील सर्व उपचारांसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.

कन्व्हेअन्स नसल्यास पुनर्विकासात अडचणी

'सोसायट्यांचा पुनर्विकास करण्याची अनेकांची इच्छा असली, तरी या प्रक्रियेला सुरुवात करण्यापूर्वी मानीव अभिहस्तांतर (डीम्ड कन्व्हेयन्स) करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कन्व्हेअन्सची प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुनर्विकासात अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे,' असे सहकार खात्याचे जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी स्पष्ट केले.

इव्हीएम मशिन हॅक प्रुफ : सहारिया

इव्हीएम मशिनबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात, मात्र राज्य निवडणूक आयोगाकडील सर्व इव्हीएम मशिन हॅक प्रुफ असून त्यात कोणीही, कसलीही ढवळाढवळ करू शकत नाही, असे स्पष्ट मत राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी व्यक्त केले.

No VVPAT for local polls: State election chief

PUNE: State election commissioner JS Saharia on Saturday ruled out use of voter verifiable paper audit trail (VVPAT) machines for local body polls.

बारावीचे अर्ज भरण्यास 1 ऑक्टोबरपासून सुरुवात

यंदा पहिल्यांदाच ‘सरल’ पोर्टलच्या माध्यमातून भरले जाणार अर्ज
पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीचे अर्ज भरण्यास 1 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून यंदा पहिल्यांदाच ‘सरल’ पोर्टलच्या माध्यमातून अर्ज भरले जाणार आहेत. यासाठी नियमित तसेच पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.